मंगळवार, १४ एप्रिल, २०२०

             डॉ.बाबासाहेब अंबेडकर यांची 129 वी जयंती
                    घरी अभिवादन करत केली साजरी
बौद्ध धर्म हा शांततेचा प्रेरक आहे - युवा नेते राहुल व्ही खरात*
अंबड,प्रतिनिधी :-जगात कोरोनो या संसर्ग जन्य रोगाने आनेकाचे निष्पाप प्राण गेले आहेत.या कोरोनो विषाणु ला आटोकयात आणण्यासाठी देशभरासह,महाराष्ट्र
मध्ये ही लोकडावउन ठेवण्यात आले आहे.तसेच संपूर्ण जगात प्रत्येक वर्षी भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव,भारतरत्न डॉ.बाबासाहेब अंबेडकर यांची जयंती मोठ्या थाटात सम्पन्न होत असते.परंतू या वेळी जगावर कोरोनो चे सावट असल्याने 129 वी जयंती 14 एप्रिल रोजी अत्यंत साध्या पद्धतीने संपन्न झाली.नेहमी प्रमाणे जयंती मध्ये मिरवणूक,सासंकृतिक कार्यक्रम,विविध वेगवेगळ्या भरगच्छ कार्यक्रम घेण्यात येत असतात.परंतु कोरोनो या रोगाच्या वाढत्या प्रभावा मुळे या वेळ ची जयंती ही प्रत्येकाने घरिच साजरी करायची असे समस्त बोद्ध समाजच्या वतीने एकमत  करण्यात आले होते.त्यांच् अनुषंगाने रिपब्लिकन सेना युवा जालना जिल्हा आध्यक्ष राहुल व्ही खरात यांनी, आपल्या सहपरिवार सोबत आज आपल्या घरीच डॉ.बाबासाहेब अंबेडकर यानां पुष्प माला अर्पण करित,तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमे समोर फूल वाहून,बोद्ध वंदना घेत,डॉ.बाबासाहेब आबेडकर यांची129 वी जयंती साजरी करण्यात आली.या वेळी बबिता वसंत खरात(आई)राहुल वसंत खरात,दर्शना राहुल खरात,श्रद्धा प्रवीण गुरुचल(भाची),आकाश वसंत खरात(भाउ),कल्पना वसंत खरात,(बहिन) सह परिवार अभिवादन करण्यात आले.
कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी राज्यात दोन समित्यांची नियुक्ती मुंबईसाठी स्वतंत्र समिती- आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई, दि. १४: कोरोनामुळे महाराष्ट्रात होणारे मृत्यू कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. या मृत्यूचे
विश्लेषण करणे आणि त्याचे प्रमाण कमी करण्याकरिता आरोग्य विभागाने मुंबई अणि परिसरासाठी तसेच उर्वरित महाराष्ट्रासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात व मुंबई परसिरता ज्या रुग्णालयात कोरोनामुळे एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला तर त्या रुग्णालयाच्या प्रमुखाला संबधित मृत रुग्णाची सविस्तर माहिती या समितीला पाठविणे तसेच समितीसमोर व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहणे देखील बंधनकारक करण्यात आले आहे. असे पत्र आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा शल्यचिकित्सकांना पाठविले आहे.
मुंबई शहर व परिसरात कोरोनाची विषाणूबाधा व मृत्यूचे प्रमाण जास्त असून त्यावर उपाययोजना व विश्लेषण करण्याकरिता सात सदस्यीय समिती नेमण्यात आली आहेत. कोरोनामुळे होणाऱ्या मुत्यूच्या कारणांचे विश्लेषण आणि त्यानुसार मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी ही समिती उपाययोजना सुचविणार आहे. त्याचबरोबर कोरोना उपचारासाठी रुग्णालयांना आवश्यक त्या तयारीसाठी मार्गदर्शन देखील केले जाणार आहे.
मुंबई शहरासाठी नेमलेल्या समितीच्या अध्यक्षपदी के.ई.एम. रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे असून के. ई.एम. रुग्णालयाचे औषधी वैद्यक शास्त्र प्रमुख डॉ. मिलिंद नाडकर, सायन रुग्णालयाचे अतिदक्षता विभागप्रमुख डॉ. नितीन कर्णीक , जे.जे. रुग्णालयाचे कम्युनिटी मेडीसीनचे प्रा.डॉ. छाया राजगुरू, जे.जे. रुग्णालयाच्या औषधी वैद्यक शास्त्र विभग प्रमुख डॉ. विद्या नागर, आरोग्य विभागाचे माजी महासंचालक डॉ. सुभाष साळुंके यांचा समिती सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. तर आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे समितीच्या सदस्य सचिव आहेत.
मुंबई वगळून उर्वरित राज्य असे कार्यक्षेत्र असलेल्या या समितीत सहा तज्ज्ञ सदस्य असून आरोग्य संचालक समितीचे अध्यक्ष आहेत. राज्याच्या समितीत माजी आरोग्य संचालक डॉ. पी.पी. डोके, औषधी वैद्यक शास्त्राचे निवृत्त प्राध्यापक डॉ. ए. एल. काकराणी व डॉ. दिलीप कदम, पुणे येथील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या औषधी वैद्यक शास्त्र विभागप्रमुख डॉ. शशीकला सांगळे, आरोग्य सहसंचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
                        सोशल डिस्टन्सींगचे नियम पाळा
                   - जिल्हा पोलीस अधीक्षक एस.चैतन्य
जालना,प्रतिनिधी:- लॉकडाऊनचा कालावधी दि. 30 एप्रिल, 2020 पर्यंत वाढविण्यात आला आहे.
कोरोना विषाणुचा संसर्ग होऊ नये यासाठी नागरिकांनी  सोशल डिस्टन्सींगचे नियम पाळण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांनी केले आहे.कोरोना विषाणुचा प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविण्यात येत असुन पोलीस प्रशासन हे चोवीस तास नागरिकांच्या सेवेसाठी कार्यरत आहे.  नागरिकांनी लॉकडाऊनचे नियम पाळावेत.  गर्दी होईल अशा प्रकारचे कुठलेही सण, उत्सव, समारंभ  साजरे करु नयेत. लॉकडाऊनचे निमय मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा ईशाराही जिल्हा पोलीस अधीक्षकांनी यावेळी दिला.
गर्दी होईल असे कुठलेही सण, उत्सव, समारंभ साजरे करु नयेत कोरोना विषाणुचा मुकाबला करण्यासाठी नागरिकांनी घरातच राहून जिल्हा                                      प्रशासनास सहकार्य करावे
               जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे आवाहन
जालना, प्रतिनिधी:- विषाणु प्रादुर्भावाच्या अनुषंगाने संपुर्ण राज्यात लॉकडाऊनचा कालावधी दि. 30 एप्रिल, 2020 
पर्यंत वाढविण्यात आला असुन जिल्ह्यातील नागरिकांनी एकत्रित येऊन गर्दी होईल अशा प्रकारचे कुठलेही सण, उत्सव, समारंभ  साजरे करु नयेत, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले आहे.कोरोना विषाणुचा प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविण्यात येत असुन नागरिकांनी एकत्रित येऊन गर्दी होईल अशा प्रकारचे कुठलेही सण, उत्सव, समारंभ  साजरे करु नयेत. प्रत्येकाने आपल्या घरातच रहावे. जिल्ह्यात सर्वत्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असुन नागरिकांना काही अडचण असल्यास त्यांनी जिल्हा प्रशासनास संपर्क साधावा. तसेच कोरोना विषाणुचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले आहे.



                  💥भंगाराच्या दुकानाला भीषण आग🔥, 
                           सुदैवाने जीवित हानी नाही🔹
चिखली (ब्युरो चीफ) :- चिखली शहरातील मध्यवस्तीत ,आठवडी बाजार स्थित असलेल्या मच्छी बाजारातील भंगाराच्या दुकानांमध्ये आज दि 14 एप्रिल रोजी दुपारी अचानक आग 
लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.याबाबत असे की, कोरोना पासून बचाव करण्यासाठी सर्वत्र लॉक डाउन करण्यात आले आहे, तर चिखली शहरात मुख्याधिकारी यांचे आदेशानुसार मेडिकल व दवाखाने वगळून संपूर्ण व्यापारी प्रतिष्ठाने आज पासून तीन दिवस संपुर्ण बंद ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार आज संपूर्ण दुकाने बंद होती मात्र दुपारी 1 वाजेच्या सुमारास शहरातील आठवडी बाजारातील काही भंगाराच्या दुकानांना अचानक आग लागली, सर्वत्र सामसूम असल्याने आगीने लगेच रौद्ररूप धारण केले, आगीचे वृत्त समजताच परिसरातील नागरिकांनी मिळेल त्या मार्गाने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले, नगर पालिकेची अग्निशमन दलाची गाडी वेळेवर पोहचल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे सोपे गेले, वृत्त लिहिपरेत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले होते, तर प्राथमिक माहितीनुसार या ठिकाणी शे समदखा यांची भंगार दुकान व नजीर कुरेशी यांचे भंगाराचे गोडाऊन असल्याचे समजते.           

            जालना आॕईल मिल आसो.च्या वतीने मागील 
                15 दिवसा पासून गरजूंना अन्न वाटप.
                 जालना आॕईल मिल आसो.चे अध्यक्ष 
                 श्री.संजय जी शिनगारे यांचा पुढाकार

जालना,प्रतिनिधी :- जालना आॕईल मिल असोशियसन चे अध्यक्ष श्री संजय जी शिनगारे,अमित शेठ मिसाळ,कैलासजी सोनुने  यांचे सहकार्य लाभले. तर राजेश जी जिंदल,
सचिन मिसाळ, सचिन अग्रवाल,अंकित अग्रवाल,जितेंद्र मुंदडा,हेमेन्द्र लखोटीया,विजय कामड,सतीश पंच,नितिन पंच,विक्की बोथरा, मनोज देम्बडा,जयाजी देम्बडा,मुकेश अग्रवाल,रामेश्वर गाडगीळ,अरुण गाढे,विनोद शिनगारे,गणेश शिनगारे, ,अक्षय मिसाळ,गोपाल गौड,अमित मिसाळ,मनोज गडगील,संजय करवंदे,दीपक लोणकरवले,नारायण मिटकर,अनुज शिनगारे आदींनी अन्नदान साठी विशेष योगदान दिले.संपूर्ण जगामध्ये थैमान घातलेल्या कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव भारतामध्ये सुद्धा दिसून येत आहे. त्यातच महाराष्ट्रामध्ये कोरोना ने जास्तच थैमान घातले आहे.माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21दिवसा साठी संपूर्ण देश लाॕक डाऊन केल्याचे निर्देश दिले आहेत. देशात व महाराष्ट्रात संचारबंदी लागू झाल्यानंतर सर्व छोटे-मोठे उद्योगधंदे, व्यापार बंद झालेले आहेत. अशा स्थितीत मोलमजुरी करून ऊदरनिर्वाह करणाऱ्यांची बिकट स्थिती होत आहे.त्याच प्रमाणे जालना शहरातील बऱ्याच  भागामध्ये कामगार,मजूर व हातावर काम असणारे बरेच कुटुंब आपला उदरनिर्वाह करीत आहेत. परंतु लाॕक  डाऊन मुळे या सर्वांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.त्या अनुषंगाने आॕईल मिल असो.चे अध्यक्ष संजयजी शिनगारे यांच्या पुढाकाने गरजूंना मागील 15 दिवसा पासून पूरी भाजी आणि खिचडी देण्यात येत आहे.गांधीनगर येथील वृध्दाश्रम,संजीवनी हाॕस्पीटल येथील रूग्णांचे नातेवाईक,SPआॕफीस हेडक्वाटर परिसरातील गरजू तसेच चंदनझीरा येथील योजना हाॕटेल, ईंदेवाडी व शहरातील विविध परिसरात अन्नवाटप करण्यात आले.राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प अधिकारी मनोज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मागील 15 दिवसांपासून जालना आॕईल मिल आसोशियसन चा अन्नदान ऊपक्रमांमध्ये सहभाग.
 विश्वाला मिळालेले महान व्यक्तीमत्व - डाॕ.बाबासाहेब आंबेडकर
भारताच्या पावन भूमीवर अनेक थोर महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांचा सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशा दर्शक ठरलेला आहे.
अशा या थोर महापुरुषात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव व सर्वात वर आहे.भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म वडील रामजी व माता भीमाबाई यांच्या पोटी १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. बाल भीमाचे वडील रामजी आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून दक्ष असत, त्यांना स्वतः वाचनाची आवड असल्यामुळे घरात ग्रंथसंग्रह हा होताच. मुलांना ही ते चांगली पुस्तके वाचावयास आणून देत असत. म्हणून बाबासाहेबांच्या आयुष्याच्या अंतिम क्षणापावेतो वाचनाची व अभ्यासपूर्ण चिंतनाची सवय त्याच्या ठायी आढळते. तुकाराम व कबीर बाबासाहेबांच्या अभ्यासाचे विषय भावी आयुष्यात झालेले दिसतात.डॉ.बाबासाहेब म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन, दलितांच्या, श्रमिकांच्या विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. गलितगात्र झालेल्या मनामनांतून समाजक्रांतीचे स्फुलींग चेतवून डॉ. आंबेडकर यांनी मुर्दाड झालेल्या समाजाला आपल्या हक्काप्रती जागृत केले.
डॉ. आंबेडकर म्हणजे प्रेरक, उद्धारक व तारक शक्ती होय:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नुसते पुस्तकी पंडित नव्हते तर त्यांनी आपल्या आयुष्यात आचार आणि विचार यांची सांगड घातली आणि आपल्या तत्वज्ञानाला कृतीची जोड दिली. त्यांनी मनुष्य मात्रांच्या जीवनातील दुःख, दारिद्रय आणि क्लेश दूर करण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले पूरे ज्ञान माहिती व बळ लावले आणि रंजल्या गांजल्या जनतेच्या तसेच स्त्री वर्गाच्या शेतकरी, मजूर वर्गाच्या आणि पददलितांच्या उद्धारार्थ आपले प्राण पणाला लावून समतेची मंगलवाट दाखविते आणि मानवतेची दिव्य ज्योत निर्माण करते ती व्यक्ती केवळ वंदनीय नव्हे तर ती व्यक्ती प्रेरक, उद्धारक व तारक शक्ती ठरते.
शैक्षणिक विचार:
शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. समाजातील अस्पृश्य समाजाला स्वत्वाची जाणीव व्हावी या साठी त्यांनी शिक्षणाचे महत्व समाजात विशद केले. ''शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पिल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही,'' असे ते समाज बांधवांना सांगत. प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे असे सांगत. ''प्राथमिक शिक्षणाचे ध्येय असे असले पाहिजे की, मुलगा किंवा मुलगी एकदा शाळेत दाखल झाले की, ते पूर्णपणे सुशिक्षित, माहितीपूर्ण व गुणवत्ता प्राप्त करुनच बाहेर पडावेत. शासनाने यासाठी लक्ष द्यायला हवे त्यांचे म्हणणे हाते की, समाजाच्या सर्व थरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे. शिक्षण प्राप्त झाल्याने व्यक्ती बौद्धिक दृष्टा सशक्त होतो. व्यक्तीला चांगले आणि वाईट यातील फरक समजायला लागतो. प्रज्ञा, शील आणि करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज त्यांनी प्रतिपादन केलेली आहे. शाळेत मुलांना केवळ बाराखडी शिकवू नये तर मुलांची मने सुसंस्कृत व गुणवत्तामय बनवावी. समाज हितार्थ या ज्ञानप्राप्त मुलांनी आपली सामाजिक बांधिलकीची कर्तव्ये योग्य व समर्थपणे पार पाडावीत असे शिक्षण असावे. शाळा म्हणजे उत्तम नागरिक व कर्तव्यदक्ष नागरिक बनविणारे कारखाने आहेत. याचे भान या प्रक्रियेत भाग घेणार्‍यांनी ध्यानी घ्यावे. पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापन १९४६ साली करुन त्यांनी मुंबइला सिद्धार्थ कॉलेज व औरंगाबादला मिलींद महाविद्यालय सुरू केले. राष्ट्रहीत व समाजहीताचे भान ठेवणारेच खरे शिक्षण होय असे ते मानीत.
सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक होते. भ्रष्टाचार, अनीति, अत्याचार, अन्यायास त्यांचा प्रखर विरोध होता. जातीभेदाच्या ते विरोधात होते. जातीभेद म्हणजे समाजाला लागलेली किड ते मानत असत. ही सामाजिक किड नष्ट केल्याशिवाय समाज एकसंघ होणार नाही असे ते समजत. डॉ. आंबेडकर म्हणजे तळागळातील लोकांना बौद्धिक व समाजिक गुलामगिरीतून मुक्त करुन त्यांना मंत्र देणारे एक पथदर्शक होते. शिकल्याशिवाय आपल्यावरील न्याय, अन्याय, आपले हक्क ही आपल्याला कळत नाही अशा प्रकारे त्यांनी सामाजिक क्रांतीचे रणशिंग समाजात फुंकले.
बाबासाहेबांचे प्रखर राष्ट्रप्रेम व राष्ट्रनिष्ठा :
डॉ. बाबासाहेबांच्या आचार विचारांत राष्ट्रप्रेम व राष्ट्रनिष्ठा भरलेली होती. डॉ. आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा करताच तात्कालीन राष्ट्रीय नेते मंडळी घाबरली त्यांना वाटले डॉ. आंबेडकर आता देश सोडून जाणार परंतु डॉ. आंबेडकरांनी सांगितले, '' आम्ही या भारतदेशाची संतान आहोत, आम्हाला राष्ट्रीयत्वाची जाणीव आहेच, राष्ट्रावर संकट आल्यास प्राणपणाला लावून देशाचे रक्षण केले व करु सुद्धा '' यात डॉ. आंबेडकरांची प्रखर राष्ट्रनिष्ठा समावलेली आहे. 
विनोद पाटोळे सर 
सहशिक्षक सरस्वती विद्यामंदिर बीड
मो.8275004299

स्त्रियाचे शेतकरी, शेतमजूर श्रमजीवी, व दलितांचे कैवारी :
स्त्रियांना पुरुषांप्रमाणे समान हक्क मिळावेत यासाठी त्यांनी अनेक चळवळी केल्या. स्त्रियांची गुलामगिरी डॉ. आंबेडकरांनी दूर केली. १९२७ ते १९५६ पर्यंतच्या काळात बाबासाहेबांनी भारतीय स्त्रीचा सामाजिक, कायदेशीर आणि राजकीय दर्जा, वाढावा म्हणून सतत प्रयत्न केला. १९४२ साली भरलेल्या नागपूर येथील परिषदेत त्यांनी महिलांना सांगितले की, स्वच्छता पाळा, सर्व दु्र्गुणांपासून दुर रहा, मुलामुलींना शिक्षण द्या त्यांना महत्वाकांक्षी बनवा, त्यांचा न्यूनगंड दूर करा असा महत्वाचा उपदेश केला. दलितांना त्यांचे हक्क मिळावे यासाठी त्यांनी त्यांच्या हक्कासाठी लढा दिला. श्रमजिवीच्या साठीही ते खंबीरपणे उभे राहिले. दलितांना मानाचे जीवन जगता यावे म्हणून ते सातत्याने संघर्ष करीत राहीले. केवळ दलितासाठीच नव्हे तर शेतकरी व मजूर यांच्या प्रश्नासंबंधी जोरदार लढा दिला.
अशा या महामानवाचे महान कार्य म्हणजे देशासाठी व समाजासाठीचे
सामाजिक बांधिलकीचे कर्तव्य होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विश्वाला मिळालेली महान देणगी होय. अशा या महामानवाने 6 डिसेंबर 1956 साली या महान व्यक्तीमत्वाने जगाचा निरोप घेतला घेतला .

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...