सोमवार, १६ मार्च, २०२०

त्या मयत व्यक्तीचे कोरोना चाचणी 'निगेटिव्ह'*नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी - पालकमंत्री डॉ. राजेन्द्र शिंगणे यांचे आवाहन            
बुलडाणा (ब्यूरो चीफ):  सौदी अरेबिया येथून परतलेल्या
७१ वर्षीय वृद्घाला काल बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना संशयीत म्हणून दखल करण्यात आले होते. दरम्यान काल त्यांचा मृत्यू झाला होता. या वृद्ध व्यक्तीचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तरी आज या नमुण्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पंडित यांनी दिली आहे. पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे या रुग्णाच्या बाबतीत सातत्याने जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या संपर्कात होते. त्यांनी रुग्णाच्या परिस्थितीबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी चर्चाही केली होती. याबाबत पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे म्हणाले, मयत व्यक्तीचा कोरोना अहवाल नकारात्मक आला असून नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी. कुणीही गर्दीच्या ठिकाणी जावू नये. गर्दीत न जाणे शक्य असल्यास टाळावे. नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छता पाळावी. हात स्वच्छ धुऊन रुमाल वापरावा. खोकताना व शिंकताना तोंडावर रुमाल धरावा.चिखली येथील रुग्ण असल्यामुळे चिखली शहरासह जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.
*

कोरोना मुळे शिरासमार्ग येथे शाळाबंद ,बाजार बंद रस्ते साम सुम
___________________________
कोरोणा विषाणू प्रसार नियंत्रणासाठी प्रशासन सज्ज
शिरसमार्ग प्रतिनिधी :-  कोरोना व्हायरास मुळे सर्वत्र
नागरिक भयभीत झाले आहेत.जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी देश आणि राज्य पातळीवर शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत तर स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.
बीड जिल्ह्यातील शिरसमार्ग येथील ग्रामपचायत क्षेत्रातील शाळा, महाविद्यालये,आठवडी बाजार, जनावराचा बाजार,31 मार्चपर्यंत बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.शिरसमार्ग येथील जिल्हा परिषद शाळा
 ना सुट्या देण्यात आले आहे. व तसेच आठवडी बाजार, जनावराचा बाजार, व्यवहार ठप्प झाली आहे.रस्ते साम सुम झाले आहे.
शिरसमार्ग ग्रामपचायतने आजचा आठवडी बाजार बंद केला आहे.हा बाजार स्थळ ह्या ठिकाणी भरतो.ह्या बाजारात विविध ठिकणांहून व्य पारी मोठ्या प्रमाणात येतात.हा बाजार बाजूला खेडे पाडे,वड्या अासल्यामुळे येथे नागरिकांची व व्यापाऱ्याची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. त्यांच्यप्रमाणे  आठवडी बाजारात होणारी गर्दी टाळण्यासाठी व तसेच सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला. व त्यामळे आठवडी बाजार शिरसमार्ग येथे भरला नाही.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...