गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२०

ग्राहक संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य च्या वतीने मंत्रीमहोदयांना निवेदन.प्रायव्हेट मोबाईल रिचार्ज कंपनीने केलेली भरमसाठ दरवाढ विरोधात नामदार मा.छगन भुजबळ साहेब.अन्न नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य, यांना निवेदन

नाशिक (प्रतिनिधी) :- प्रायव्हेट मोबाईल रिचार्ज कंपनी केलेली 25 ते 30% भरमसाठ दरवाढ म्हणजे ग्राहकाचे खूप मोठे नुस्कान होत आहे.मोबाईल कंपनी जिओ आयडिया एअरटेल कंपनी वाढलेल्या रिचार्ज जवळपास 30 टक्के वाढ केली आहे या सर्व वाढीचा फटका ग्राहकांना सोसावा लागत आहे. या दरवाढीमुळे ग्राहकांना आर्थिक सुरुवात मोठी मोबाईल कंपनीकडून लूटमार होत आहेत,तरी ग्राहकांची होणारी लूटमार थांबण्यासाठी प्रयत्न करावे.मल्टिप्लेक्स थिएटर याठिकाणी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात लूटमार होत असते. या थेटरमध्ये खाण्यापिण्याच्या वस्तू पिण्याची मिनरल वॉटर मनमानी दार लावून ग्राहकांची फसवणूक करत आहे थेटरच्या बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी मिळणेबाबत व तिथे मिळणारे खाद्यपदार्थ दर कमी करण्याबाबत.
या मागण्यासंदर्भात श्री दादाभाऊ केदारे राज्य उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने  मा.नामदार.भुजबळ साहेब यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनावर श्री. दादाभाऊ केदारे (वरिष्ठ उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य),मा.सौ.स्मिता मुठे (अध्यक्ष विभागीय), मा.प्रसादभाऊ बोडके (अध्यक्ष नाशिक शहर),मा.मोहिनी भगरे (अध्यक्षा नाशिक शहर),मा.कुंदनभाऊ खरे (जिल्हा उपाध्यक्ष) ,मा.श्रीकांत कार्ले(धुळे जिल्हा),मा.मंगला खोटरे (उपाध्यक्ष नाशिक शहर)  मा.वैशाली दराडे (महासचिव नाशिक शहर) आदि उपस्थित होते.
मानवी हक्क अभियानाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन.

घनसावंगी (प्रतिनिधी) :- घनसांवगी येथील तहसील कार्यालय मानवी हक्क देण्याच्या वतीने निवेदन देण्यात आले. अधिक माहिती अशी की, महाराष्ट्रतील मातंग समाजावर सतत होणाऱ्या अन्याय,अत्याचार,बलात्कार,खुना, मधील दोषी आरोपीना शासन स्तरावरून फाशी देण्यात यावी.
व तसेच विविध मागण्यांसंदर्भात मानवी हक्क अभियानाच्या वतीने  तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. श्री.धोंडीराम पाटोळे (प्रदेश उपाध्यक्ष), श्री अंकुश सखाराम सोनवणे (जिल्हाध्यक्ष), श्री भगवान सोनवणे (तालुका अध्यक्ष) घनसावंगी,श्री.प्रकाश सोनवणे (कार्याध्यक्ष), श्री.सर्जेराव सोनवणे, श्री.उद्धव गुडेकर,राजू गुडेकर,श्री राहुल खरात, श्री.नागोराव गुडेकर , श्री.उत्तम भालेकर, आधीच्या निवेदन वर सह्या आहेत.

आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषद अधिवेशनासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे : मा.सुरेश मुळे व मा.विनायक फुलंब्रीकर

जालना (प्रतिनिधी) :- 22 ते 23  फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 10 वा दसरा चौक कोल्हापुर येथे कार्य क्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणुन (जलसंपदा मंत्री) मा.जयंत पाटील,( सार्वजनिक बांधकाम मंत्री ), मा.अशोक चव्हाण ( ग्रामविकास मंत्री), मा.हसन मुश्रीफ ( गुहराज्यमंत्री), मा.सतेज उर्फ बटी डी पाटील (वस्त्रोघोग  मंत्री), मा.राजेंद्र पाटील यड्रावकर ( राज्यमंत्री ), मा.अर्जुन खोतकर शिवसेना (माजी राज्यमंत्री),मा.राजु वाघमारे काँग्रेस प्रवक्ता, मा.केशव उपाध्ये भा.ज.पा. प्रवक्ता  ( मिडीया हेड  ),  दि. 22 फेब्रुवारी रोजी सकाळी  8.30 ते 10 शोभायात्रा मंगलधाम ते महाध्दार   रोड मार्ग दसरा चौक 10 ते 1.30 उदृघाटन समारंभ व वेवबाईट उदृघाटन 1.30 ते 2.30  विषय रुढी परंपरा व कालानुरूप बद्दल प. पु अतुलशास्त्री भगरे  दुपारी 3.30 ते 4.30 फळप्रक्रिया उघोग शेती विषयक विजय कुमार चोले पुणे 5 30 ते 6.30 किर्तन  ह भ प वासुदेव बुवा जोशी सायंकाळी 7.ते 9 (सुमधूर गीताचा कार्यक्रम) 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 10 30 चहा नाश्ता 10 30 ते 11 30:बॅकिग व अर्थशास्त्र जयंत काशिनाथ काकतकर सकाळी 11.30 ते 12 30 मोटिव्हेशनल  स्कील डेव्हलपमेट सौ.शुभांगी कुलकर्णी (औरंगाबाद ), 12 : 30 ते 10:30 ब्राह्मण समाजाचे सैन्यदलातील योगदान  मा.अतुलजी अशोक इदुरकर दुपारी 1.30 ते 2.30 भोजन 2 30 ते 4 खुले चर्चा सत्र ठराव विविध संघटनांच्या अध्यक्ष  मनोगत   होनार आहे याअधिवेशनासाठी जास्ती जास्त  संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आतंरराष्ट्रीय ब्राह्मण परिषद  अध्यक्ष  मकरंद कुलकर्णी  (कोल्हापूर ), श्री.सुरेश मुळे (जालना),भगवती पुरोहित संघाचे विनायक महाराज फुलंब्रीकर ( जालना),  सचिन वाडे पा  (औरंगाबाद ) आनंद दवे( पुणे ) धनंजय कुलकर्णी ( केज ), विश्वजित देशपांडे पुणे, अंकित काणे (पुणे ), दिनेश कुलकर्णी (सोलापूर), सतीश शुक्ल (नाशिक), यानी केले आहे.
 जालना शहरातील मोती तलाव येथे प्रलंबीत असलेला तथागत गौतम 
बुद्धांचा पुतळा तात्काळ उभरण्यात यावा :- कैलास रत्नपारखे
जालना (प्रतिनिधी) :- शहरातील मोती तलावात येथे तथागत गौतम बुद्ध यांच्या भव्य मुर्ती उभारण्याचा प्रलंबीत प्रश्‍न निकाली काढण्यात यावा. अशी मागणी जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे कैलास रत्नपारखे यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी

याबाबत देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, जालना शहराच्या सौदर्यात भर घालण्यार्‍या मोती तलावाlत हैद्राबाद येथील हुसेन सागरच्या धर्तीवर तथागत गौतम बुद्ध यांची मुर्ती बसवण्याचा प्रश्‍न गेल्या अनेक वर्षापासुन प्रलंबित आहे. मोती तलावात तथागत गौतम बुध्दाची मुर्ती स्थापीत करण्यात यावी. यासाठी शहरातील अनुज्ञयाकडुन अनेकदा आंदोलन करण्यात आले आहे. त्यानंतर साधारणताः सन 2005 मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष भास्कर आंबेकर यांनी बौध्द अनुज्ञयांच्या तिव्र भावना लक्षात घेवुन नगरपालीकेचे स्थायीसमिती व सर्वसाधारण सभेत एकमताने ठराव पास करण्यात आला होता. त्यानंतर हा ठराव पास झाल्यानंतर एक समिती गठीत करण्यात येऊन त्या माध्यमातुन प्रशासकीय पुर्तताकरण्यात आली होती. विशेषत या समितीने अहवाल तयार केला होता. त्यांनतर तत्कालीन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मोतीतलाव परिसरात भेट देऊन पाहणी केली होती, पंरतु त्यांनतर या प्रश्‍नाकडे कोणीही लक्ष दिले नाही. त्यामुळे हा प्रश्‍न अजुनही रेंगाळत पडलेला आहे.मोती तलावात तथागत गौतम बुद्धाची मुर्ती उभारण्याच्या प्रक्रीयेला सुरुवात होऊन मुर्ती बनवीणार्‍या शिल्पकाराला अग्रीम रक्कमही देण्यात आली होती. अजुनही नगरपालीकेने लक्ष दिल्यास या कामांला पुन्हा वेग येऊ शकेल विशेष म्हणजे मोती तलावात तथागत गौतम बुध्दाची मुर्ती उभारल्यास शहराच्या सौदर्यातं मोठी भर पडुन एक पर्यटन स्थळ म्हणुन नावारुपाला आल्या शिवाय राहणार नाही. सदरचा प्रश्‍न हा बौध्द अनुयायांच्या व इतर नागरीकांच्या भावनेशी निगडीत असल्यामुळे तो तात्काळ सोडविण्यात यावा. अन्यथा वंचीतबहुजन आघाडीच्या वतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल असा ईशाराही शेवटी निवेदनात दिला आहे.
या निवेदनावर जिल्हाध्यक्ष दीपक डोके शहराध्यक्ष कैलास रत्नपारखे, जिल्हा सचिव विनोद दांडगे, सचिन कांबळे, गौतम म्हस्के, अर्जुन जाधव, किशोर जाधव, राजेंद्र पारखे, महेंद्रसींग हजारी, राजु गवई, धर्मेश कणसे, मनोज म्हस्के यांच्यासह वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

*आरोग्यमंत्री मा.राजेश टोपे साहेब यांची *अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयास रात्री 11 वाजेच्या सुमारास अचानक भेट*
*रुग्णालयाची आरोग्य सेवा सुधारण्यासाठी दिले तातडीचे आदेश*
अंबड : दिनांक 9 फेब्रुवारी 2020 रोजी राज्याचे आरोग्यमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री *मा.ना.राजेशभैय्या टोपे*  यांनी प्रशासनाला कोणतीही माहिती न देता रात्री 11 वा.उपजिल्हा रुग्णाल अंबड येथे अचानक भेट दिली. तब्बल दोन तास संपूर्ण रुग्णालयाची पाहणी करुन रुग्णासोबत संवाद साधला.

यावेळी *मा.ना.राजेशभैय्या टोपे* यांनी उपजिल्हा रुग्नालयाच्या शवविच्छेदन कक्ष, रुग्णालयातील सर्व प्रसाधन कक्ष,वार्ड, प्रसुती कक्ष,आतंररुग्ण,बाह्यरुग्ण, सामान्य रुग्ण वार्डाला भेट देत रुग्णांची व नातेवाईकांशी संवाद साधला. दरम्यान शहरातील एका किडणी च्या आजाराने गंभीर असलेल्या रुग्णास सर्वोतोपरी मदत करण्याबाबत सुचना केल्या. तसेच प्रयोगशाळा, धर्मशाळा, क्ष-किरण,औषधालय, वैद्यकीय अधिकारी निवासस्थाने पाहुन तेथे आवश्यक असलेले यंत्र तसेच दुरुस्तीचे आदेश उपस्थित अभियंता यांना दिले. उपजिल्हा रुग्णालयात तातडीने सोनोग्राफी यंत्र, क्ष-किरण यंत्र, जैविक नमुने तपासणी यंत्र,रुग्णकक्षातील बेड,अत्यावश्यक औषधी तत्रंज्ञ तसेच वैद्यकीय अधिकारी नियुक्ती करणेबाबत आरोग्य विभागाला सुचना दिल्या.रुग्णालयाची पाहणी करुन अस्वच्छता आणि परिसर आणि तातडीने स्वच्छ करुन रंगरंगोटी व तांत्रिक दुरुस्ती करण्याचे *ना.राजेशभैया टोपे* यांनी आदेश दिले.
यावेळी शहराध्यक्ष ॲड अफरोज पठाण,गटनेते शिवप्रसाद चांगले,बाळासाहेब नरवडे,कैलास भोरे,ॲड.वसंत गायकवाड,गौतम ढवळे,पाशा पठाण,डॉ.तलवाडकर,डॉ.दोरके आदी उपस्थित होते.

गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात करणाऱ्या इंदूरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा
सामाजिक कार्यकर्त्या नंदा पवार यांची मागणी
 जालना: आपल्या कीर्तनातून गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात करणाऱ्या इंदूरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी जालना येथील सामाजिक कार्यकर्त्या नंदा पवार यांनी केली आहे.
      यासंदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नंदा पवार यांनी म्हटले आहे की, निवृत्ती महाराज इंदुरीकर हे आपल्या कीर्तनातून सामाजिक प्रबोधन करतात, त्यांच्या कीर्तनाला लाखो नागरिक आणि महिला उपस्थित असतात,ते आपल्या कीर्तनातून सामाजिक व राजकीय घडामोडीवर विडंबन करतात,त्यातून जनतेचे मनोरंजन होते, मंगळवारी संपन्न झालेल्या इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा व्हिडिओ समाज माध्यमातून फैलावत आहे, इंदूरीकर महाराजांनी कीर्तनातून दिलेल्या सम -विषमच्या सल्ल्यामुळे महिला मंडळीत संताप व्यक्त केला जात आहे.इंदूरीकर महाराजांनी आपल्या कीर्तनातून गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात केली असून पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन केले आहे.
नंदा पवार
(सामाजीक कार्यकर्त्या)

इंदूरीकर महाराज यांनी केलेले वादग्रस्त आणि अशास्त्रीय विधान हे पुरोगामी महाराष्ट्रातील तमाम महिला वर्ग आणि समाजाचा अपमान करणारे आहे.एकीकडे महाराष्ट्र राज्य महिलांच्या वाढत्या अत्याचारांच्या घटनांमुळे बदनाम होत आहे, महिलांचे सतत अपमान होत आहेत,त्यातच इंदूरीकर महाराजांची भर पडली आहे,आपल्या कीर्तनातून सतत महिला वर्गाची टिंगल करणाऱ्या इंदूरीकर महाराजांनी कीर्तनातून अंधश्रद्धेचा बाजार मांडला आहे.
  गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात करणाऱ्या इंदूरीकर महाराजांनी स्वताला आवरावे, तसेच त्यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी नंदा पवार यांनी केली असून इंदूरीकर महाराजांनी यापुढेही महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले तर त्यांच्या कीर्तनाचे कार्यक्रम उधळून लावले जातील,असा इशाराही त्यांनी दिला आहे.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...