मंगळवार, २३ जून, २०२०

राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५१ टक्के ६२ हजार ८३३ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे


मुंबई,ब्युरोचीफ :- कोरोनाच्या ३२१४ नवीन रुग्णांचे आज निदान झाले असून सध्या राज्यात  ६२ हजार ८३३ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यात आज १९२५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून  एकूण संख्या ६९ हजार  ६३१ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५०.०९ टक्के एवढे झाले आहे,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८ लाख २ हजार ७७५ नमुन्यांपैकी १ लाख ३९ हजार १० नमुने पॉझिटिव्ह (१७.३१ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ५ हजार  १४१ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २६ हजार ५७२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज २४८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून यापैकी ७५ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित १७३ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर  ४.६९ टक्के एवढा आहे.

गेल्या ४८ तासात नोंद झालेल्या ७५ मृत्यूंमध्ये मुंबई मनपा-४२, भिवंडी-निजामपूर मनपा-१, धुळे मनपा-१, पुणे-१, पुणे मनपा-८, पिंपरी-चिंचवड मनपा-२, सोलापूर मनपा-१, सातारा-१, सांगली-१, रत्नागिरी-४, औरंगाबाद-१, औरंगाबाद-८, अकोला -१, अमरावती मनपा-१,  यवतमाळ-१, बुलढाणा-२ अशाप्रकारे जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील मृत्यूंची नोंद झाली आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधित रुग्ण- (६८,४१०), बरे झालेले रुग्ण- (३४,५७६), मृत्यू- (३८४४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९,९८२)

ठाणे: बाधित रुग्ण- (२६,५०६), बरे झालेले रुग्ण- (१०,७६६), मृत्यू- (७५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४,९८८)

पालघर: बाधित रुग्ण- (३८६६), बरे झालेले रुग्ण- (११५४), मृत्यू- (९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६१९)

रायगड: बाधित रुग्ण- (२७१४), बरे झालेले रुग्ण- (१७११), मृत्यू- (९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (९०८)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (५०४), बरे झालेले रुग्ण- (३५२), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२९)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (१६४), बरे झालेले रुग्ण- (१४४), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६)

पुणे: बाधित रुग्ण- (१६,९०७), बरे झालेले रुग्ण- (९१४२), मृत्यू- (६२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७१४१)

सातारा:  बाधित रुग्ण- (८६८), बरे झालेले रुग्ण- (६३२), मृत्यू- (४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९५)

सांगली: बाधित रुग्ण- (३०२), बरे झालेले रुग्ण- (१७२), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२१)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (७५०), बरे झालेले रुग्ण- (६९१), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१)

सोलापूर: बाधित रुग्ण- (२३४५), बरे झालेले रुग्ण- (११७०), मृत्यू- (२१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९६०)

नाशिक: बाधित रुग्ण- (२९६५), बरे झालेले रुग्ण- (१६२०), मृत्यू- (१७९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११६६)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (३००), बरे झालेले रुग्ण- (२२४), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६४)

जळगाव: बाधित रुग्ण- (२४७६), बरे झालेले रुग्ण- (१२६७), मृत्यू- (१८९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०२०)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (८९), बरे झालेले रुग्ण- (५२), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२)

धुळे: बाधित रुग्ण- (५८७), बरे झालेले रुग्ण- (३५०), मृत्यू- (४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८८)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (३६८६), बरे झालेले रुग्ण- (१९८२), मृत्यू- (२०१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५०३)

जालना: बाधित रुग्ण- (३९५), बरे झालेले रुग्ण- (२५९), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२५)

बीड: बाधित रुग्ण- (१०२), बरे झालेले रुग्ण- (६८), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (३१)

लातूर: बाधित रुग्ण- (२२७), बरे झालेले रुग्ण- (१४९), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६५)

परभणी: बाधित रुग्ण- (८५), बरे झालेले रुग्ण- (७४), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७)

हिंगोली: बाधित रुग्ण- (२६२), बरे झालेले रुग्ण- (२२६), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५)

नांदेड: बाधित रुग्ण- (२९५), बरे झालेले रुग्ण (१७८), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०६)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (१८३), बरे झालेले रुग्ण- (१३०), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७)

अमरावती: बाधित रुग्ण- (४६३), बरे झालेले रुग्ण- (३१२), मृत्यू- (२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२७)

अकोला: बाधित रुग्ण- (१२७२), बरे झालेले रुग्ण- (७८८), मृत्यू- (६६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१७)

वाशिम: बाधित रुग्ण- (७९), बरे झालेले रुग्ण- (४४), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (१७६), बरे झालेले रुग्ण- (११७), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५०)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (२५१), बरे झालेले रुग्ण- (१६१), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८२)

नागपूर: बाधित रुग्ण- (१३५२), बरे झालेले रुग्ण- (८९७), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४२)

वर्धा: बाधित रुग्ण- (१४), बरे झालेले रुग्ण- (११), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२)

भंडारा: बाधित रुग्ण- (७७), बरे झालेले रुग्ण- (४९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८)

गोंदिया: बाधित रुग्ण- (१०१), बरे झालेले रुग्ण- (७२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (६०), बरे झालेले रुग्ण- (४४), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (६०), बरे झालेले रुग्ण- (४७), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (११७), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९७)

एकूण: बाधित रुग्ण-(१,३९,०१०), बरे झालेले रुग्ण- (६९,६३१), मृत्यू- (६५३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१५),ॲक्टिव्ह रुग्ण-(६२,८३३)

(टीप-आज राज्यात एकूण नोंदविलेल्या २४८ मृत्यूंपैकी ७५ मृत्यू हे मागील ४८ तासातील आहेत आणि १७३ मृत्यू हे त्या पूर्वीच्या कालावधीतील आहेत आणि १७३ मृत्यू हे त्या पूर्वीच्या कालावधीतील आहेत. या मृत्यूंमध्ये मुंबईतील ६५,सोलापूर ४२, औरंगाबाद – १५, ठाणे -१३,  नाशिक -१८, जळगाव -७, अमरावती -१, बुलढाणा -१, कल्याण डोंबिवली -२, मालेगाव -१, मीरा भाईंदर -३, पिंपरी चिंचवड -१, रत्नागिरी -२, सांगली -१, सातारा -१, यांचा समावेश आहे.  हे  १७३ मृत्यू दैनंदिन स्वरुपात न दाखविता प्रगतीपर आकडेवारीत समाविष्ट करण्यात आलेले आहेत. ही माहिती केंद्रसरकारच्या आयसीएमआर पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)


शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार – गृहमंत्री अनिल देशमुख


मुंबई,ब्युरोचीफ - सध्या शेतकऱ्यांचा पेरणीचा काळ आहे. यासाठी त्यांना पीक कर्जाची आवश्यकता असताना अनेक राष्ट्रीयकृत बँका या शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याची बाब समोर येत आहे. ही अतिशय गंभीर बाब असून ज्या बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देणार नाही त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असा गंभीर इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांना सुलभतेने कर्ज मिळावे यासाठी राज्य शासन आग्रही आहे. यासाठी राज्य शासनाच्यावतीने देखील विशेष आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. असे असतानाही अनेक राष्ट्रीयकृत बँका या शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याच्या  तक्रारी या प्राप्त होत आहे, ही अतिशय गंभीर बाब आहे. ज्या बँक पीक कर्ज देत नाही त्यांना वारंवार सूचनासुद्धा करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे अशा बँकांची तक्रार  जिल्हाधिकारी यांनी दिली तर अडचणीच्या काळात शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या बँकांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती  गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.


सामाजिक अंतर न राखणारे 72 व्यक्तीकडून 14 हजार 400 रुपये व तोंडाला मास्क न लावणा-या 15 नागरिकांकडून 7 हजार 500 रुपये दुकानदाराकडुन 200 रुपये असा 23हजार 900 रुपये दंड वसुल


जालना,ब्युरोचीफ :- जिल्हा प्रशासनाकडून गठीत करण्यात आलेले एकूण 8 पथकाकडून शहरामध्ये सकाळच्या व दुपारच्या सत्रामध्ये सामाजिक अंतर न राखणारे नागरिक, तोंडाला मास्क न लावणारे नागरिक व इतर बाबींसाठी नागरिकांवर कार्यवाही करण्यात आली असून  पथकांमार्फत  सामाजिक अंतर न राखणारे 72 व्यक्तींकडून एकुण 14 हजार 400, तोंडाला मास्क न लावणा-या 15 नागरिकांकडून 7 हजार 500 रुपये आणि सामाजिक अंतर न राखणा-या  एका दुकानदाराकडून 200 रुपये असे एकूण 23 हजार 900 रुपये दंड आकारण्यात आला असल्याचे, उपपोलीस अधिक्षक जालना यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.तसेच नगर पालिका प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी संयुक्तपणे प्रतिबंध क्षेत्रांमध्ये हातगाडीवर भाजीपाला व फळे विक्रेते यांच्यावरही दंडात्मक कार्यवाही करण्यात आली  आहे.


    

जिल्हास्तरीय बँकर्स समितीची जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न.


जालना,ब्युरोचीफ :- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज दि. 23 जुन रोजी जिल्हास्तरीय बँकर्स समितीची बैठक जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सन 2020-21 वार्षिक पतपुरवठा आराखड्यामध्ये तीन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.या बैठकीस अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी निशांत ईलमकर, नाबार्डचे पी.जी. भागवतकर, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नानासाहेब चव्हाण, संतोष शर्मा, ग्रामीण बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक श्री वानखेडे, एसबीआय बँकेचे श्री सदावर्ते, अग्रणी बँकचे श्री तावडे, प्रदीप जोशी यांच्यासह विविध बँकांचे व्यवस्थापकांची उपस्थिती होती. या आराखड्यामध्ये पीककर्जासाठी 1 हजार 600 कोटी, दीर्घ मुदतीच्या कर्जासाठी 400 कोटी, तर लघु व मध्यम उद्योगासाठी 600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. यावेळी वार्षिक पतपुरवठा आराखड्याचे तसेच महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार संस्था यांच्या सन 2019-20 वार्षिक कार्य अहवाल पुस्तिकेचे विमोचनही मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.


लक्ष्मी कॉटेक्स कापुस खरेदी केंद्रास जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांची भेट

एकाही शेतकऱ्याचा कापूस खरेदीविना पडून राहणार नाही याची दक्षता घ्या


जालना,ब्युरोचीफ :– जालना येथे सीसीआयच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या लक्ष्मी कॉटेक्स या कापूस खरेदी केंद्राला जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आज प्रत्यक्ष भेट देत खरेदी करण्यात येत असलेल्या कापसाची पहाणी करुन एकाही शेतकऱ्याचा कापूस खरेदीविना पडून राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश संबंधितांना यावेळी दिले.या पाहणी दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांसमवेत अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हाउपनिबंधक सहकारी संस्था नानासाहेब चव्हाण, जिनिंगचे मालक रमेशजी मुंदडा, ग्रेडर हेमंत ठाकरे  आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले, जिल्ह्यामध्ये विक्रीविना पडून असलेल्या शेतकऱ्यांच्या कापसाचे दोनवेळेस सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.  राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या प्रयत्नातुन जिल्हयात चार ठिकाणी अशाच पद्धतीचे कापुस खरेदी केंद्र सुरु करण्यात आले असुन या केंद्राच्या माध्यमातुन कापसाची खरेदी करण्यात येत आहे.  जिल्ह्यात एकाही शेतकऱ्याचा कापूस विक्रीवाचुन पडून राहणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.  जिनिंग मालकांच्या असलेल्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी प्रशासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी सांगितले.


जिल्ह्यात सहा व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह तर नऊ रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज - जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती


जालना,ब्युरोचीफ :- जिल्हा सामान्य रुग्णालयातून जालना शहरातील अलंकार टॉकीज परिसरातील-1, राज्य राखीव पोलीस दलातील–3 जवान,समर्थनगर -1 ,उतार गल्ली – 2 सोनक पिंपळगाव  ता. अंबड येथील -2,
अशा एकुण नऊ रुग्णांवर यशस्वी उपचार करुन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला तर जालना शहरातील तेली समाज रामनगर परिसरातील-1, संभाजीनगर -2, इंद्रप्रित अपार्टमेंट  इंदेवाडी  येथील-2, नुतन कॉलनी भोकरदन– 1 अशा एकुण  सहा  व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.भोकरदन शहरातील नुतन कॉलनी परिसरातील रहिवासी असलेल्या 60 वर्षीय पुरुष रुग्णास श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे त्यास दि. 19 जुन 2020 रोजी भोकरदन शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दि.22 जुन 2020 रोजी संबंधित रुग्णाची प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्यास जालना येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र तेथुन त्या रुग्णाला जिल्हा सामान्य रुग्णालयात संदर्भित (Refer) केले. अत्यावस्थ परिस्थितीतील या रुग्णास दि. 22 जुन 2020 रोजी सामान्य रुग्णालयात आय.सी.यु. मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असतांनाच दि. 22 जुन 2020 रोजी रात्री 10.20 मिनिटांनी त्यांचा मृत्यु झाला, मृत्युनंतर लगेचच त्यांच्या लाळेचा नमुना घेऊन प्रयोगशाळेकडे तपासण्यासाठी औरंगाबाद येथे दि. 22 जुन 2020 रोजी पाठविला होता.  त्याचा अहवाल दि. 23 जुन 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण–3740 असुन  सध्या रुग्णालयात -108, व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-1420, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या–92, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या -4593, एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने–06 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -384, एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या -4101 रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-404 एकुण प्रलंबित नमुने-104, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-1300.14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती–13, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती –1212, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-75, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-225, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत–20, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -108, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-136, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या- 9, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-257, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या -109, तर संदर्भित रेफर केलेली रुग्ण संख्या-06, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-10471, तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 12 एवढी आहे.आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 225 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :- पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना-14, शासकीय मुलींचे वसतिगृह  मोतीबाग जालना-19, संत रामदास वसतिगृह जालना-00, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह जालना-00, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह जालना-26, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना–59 मॉडेल स्कुल परतुर-06, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह अंबड-02, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-11, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर-15 मुलींचे शासकीय वसतीगृह भोकरदन-03, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी–00,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र 02 भोकरदन -13, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -00, हिंदुस्थान मंगल  कार्यालय, जाफ्राबाद-12, जिजाऊ इंग्लिश स्कुल जाफ्राबाद –00, शेठ इ.बी.के. विद्यालय टेंभुर्णी -04. आय.टी. आय. कॉलेज जाफ्राबाद- 41लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत - 171 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन 863 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 827 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली   3 लाख 61 हजार 430 असा एकुण 3 लाख 88 हजार 238 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.  



               "जगावं आईच्या अस्तित्वासाठी"

मी बालाजी हौसाजी किरवले
  पोलीस उप निरीक्षक

माझा जीवन प्रवास - हा एक धगधगता जीवन प्रवास आहे. मला सार्थ अभिमान आहे माझ्या आई-बाबांचा. माझे आई बाबा हिंगोली जिल्ह्यातील खापरखेडा या गावाचे रहिवासी. पोटाची खळगी भरण्यासाठी मोलमजुरी करण्यासाठी वाकोडी या गावात स्थायिक झाले.

वाकोडी हे डोंगराच्या कुशीत वसलेलं. जवळच ईसापुर धरण. निसर्गरम्य वातावरण. नद्या नाल्यांना पाण्याचा सुकाळ.माझा जन्म वाकोडी या गावात झाला. ईथूनच सुरू होतो माझ्या जीवनाचा प्रवास. आई - बाबा  अडाणी. आम्ही पाच बहिण भाऊ. मी सर्वात लहान. आम्ही तुटक्या मुटक्या झोपडीत राहत होतो. आई बाबा दिवस भर दोघे ही लोकांच्या शेतात मजुरी काम करायचे. ज्या दिवशी काम लागेल त्या दिवशी पोटभर जेवण भेटायचे. आम्ही खाणारे पाच बहिण भाऊ. आम्ही उपाशी झोपू नये म्हणून आई बाबा काबाड कष्ट करायचे. गावातील बलाढ्य  लोकांच्या शेतात मजुरीने काम करत राब राब राबायचे. आमच्या पोटाची खळगी भरायचे. ज्या दिवशी काम नसेल त्या दिवशी चिंतेने विचार करत बसायचे. आज पोरं उपाशी झोपणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्यायचे. माझे भाऊ बहीण देखील घरचे काम करण्यास मदत करायचे. गरिबीने भावा बहिणीला शिक्षणापासून वंचित ठेवले. मला बालपणापासून शिक्षणाची गोडी होती. विठ्ठलराव शिंदे गुरुजींच्या कृपेने  मला वाकोडी या गावात जिल्हा परिषद शाळेमध्ये पहिली वर्गात प्रवेश मिळाला. एक झो-या. त्यात खापराची पाटी. फाटकेच पँट शर्ट, बेल्टच्या जागी कर्दोडा गुंडाळलेला. मी पहीली ते पाचवी जिल्हापरिषद शाळा वाकोडी येथे शिकलो. तिसरी, चौथी, पाचवीत प्रथम क्रमांक मिळविला म्हणून नावारूपाला आलो होतो. गावात झालेल्या "एकच प्याला" या नाटकात बालकाची भूमिका बजावली म्हणून गावकऱ्यांनी माझं कौतुक केलं. तेव्हा  पासून  गावातील लोक मला "हौसाजी आंधाचं पोरगंʺ म्हणून ओळखू लागले. (मी आंध समाजातील असल्यामुळे) आई बाबाची खूप ईच्छा होती की मी  खूप शिकावं, मोठं व्हावं, साहेब व्हावं. माझ्या शिक्षणासाठी आई बाबानी खूप  काबाड कष्ट केले. माझ्या आई बाबांच्या हाता-पायाला काम करुन जख्मा व्हायच्या. मला त्यांना बघून रडू यायचं की का हा भोग नशिबी आला. गरिबी, दारीद्र्य काय असतं ते मीच समजू शकतो...


एक प्रसंग आठवतो-- मी लहान असतांना घरा मध्ये चिमूट भर पीठ नव्हतं. आई चिंतेत बसली. मी विचारलं, "आई, आज आपण उपाशी झोपणार का ग..." आई म्हणाली, "नाही रे बाळा. आपल्याला सरपंचाने त्यांचे येथील लग्नातील उरलेल्या भाकरी दिल्या होत्या. त्या मी वाळू घातल्या आहेत. त्याचे  कुटके करून खाऊ." आई मनातल्या मनात रडत होती. मी तीचे केवीलवाणे डोळे फक्त बघत होतो. मी तिचा चेहरा वाचला होता. तिच्या चेह-यावरील भाव मला सर्व काही सांगुन गेले... असे मी अनेक प्रसंग पाहिले. मी निश्चय केला की काही झाले तरी मी शिकणार, मोठा होणार, नोकरी करणार. माझ्या आई बाबाचे स्वप्न पूर्ण करणार. आमच्या घरी लाईट नव्हती. मी चिमणीच्या अंधुक उजेडात अभ्यास करायचो. माझे आठवड्यातील कामाचे दोन दिवस पक्के ठरलेले होते. प्रत्येक शनिवारी शाळेला दांडी  मारून शनिवार व रविवार मी आई सोबत लोकांचे शेतात कधी निंदन काम तर कधी कापूस वेचन्यासाठी जायचो. माझ्या हिश्याचं काम आईच करायची. आई दोन्ही दोन्ही हताने कापूस वेचायची. 
मी  शक्य तेवढा हातभार लावायचो--बाकी सर्व काम आईच्या माथी असायचं. पण कंटाळा हा शब्द ओठी नव्हता.
मी ईयत्ता पाचवी प्रथम क्रमांकाने पास झालो. पुढचे शिक्षण घेण्यासाठी घरची आर्थिक परिस्थिती बिकटच होती. तेव्हा एक मसीहा माझ्या जीवनात आला. ते आमचे गोविंदराव नाईक गुरुजी. त्यांनी माझी नवोदय परीक्षेचा फाॅर्म भरला. नवोदयचं पुस्तक घेऊन दिलं. नवोदय परीक्षा पास झालो. वाकोडी गावात अजुनच नावा रुपाला आलो. गुरुवर्यांनी व गावातील समजदार लोकांनी कौतुकाची थाप दिली. कारण नवोदय परीक्षा पास होणारा जि.प. वाकोडीच्या इतिहासातील मी पहीला विद्यार्थी होतो. खंडाळे सरांनी वसमतला जाण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करुन प्रवासासाठी आर्थिक मदत केली. मला पुढील शिक्षणासाठी वसमत नवोदय विद्यालयात ईयत्ता सहावीत प्रवेश मिळाला. पण मन मात्र तिथं रमत नव्हते. आई बाबाची आठवण सारखी भेडसावत असे. माझ्या सारखे आई बाबांच्या आठवणीत गहीवरलेले जवळपास सगळेच विद्यार्थी असावेत. स्वत:च्या भाकरीचा प्रश्न तात्पुरता मिटला होता.
सहावी ते दहावीपर्यंत नवोदय विद्यालय वसमत येथे शिकलो. तेथे खुप छान छान अनुभव आले.  रनिंग व कबड्डी हे ईवेंट दोन वेळेस राष्ट्रीय स्तरावर खेळलो. सिल्व्हर मेडल प्राप्त केले. दहावी पास झालो. आई बाबा म्हणायचे तू शिक्षण कर. आम्ही वाटेल ते करू. शिक्षणासाठी आई बाबानी रात्रंदिवस एक करून मजुरी केली. उपाशी राहून मला शिक्षणासाठी खर्च पुरविला. मी अकरावी  बारावीचे शिक्षण लातूर नवोदय विद्यालयात पुर्ण केलं.
       नवोदय विद्यालय लातूर  मधील एक प्रसंग आठवतो. ती घटना अविस्मरणीय ठरली.
*माझी अकरावीची वार्षिक परीक्षा नुकतीच संपली होती.  उन्हाळी सुट्टया लागणार होत्या.  माझे वर्ग मित्र व सर्व  विद्यार्थी आपापल्या घरी जाण्यासाठी उत्साही होते. आनंदात व खुश होते. मी मात्र रात्रभर झोपलो नाही. अनेक विचार, असंख्य प्रश्न मनामध्ये वादळ निर्माण करत होते. मी घरी,गावी जाऊन काय करू...!? लातूर ला राहिलो तर इथेच मजुरी किंवा ईतर काहीही काम करता येईल. थोडे पैसे घरी देता येतील ह्या विचारात मी  रात्रभर विचार करत राहिलो. दुसऱ्या दिवशी मी कामाच्या शोधात बाहेर पडलो. अचानक माझ्या लक्षात आलं की नवोदय विद्यालयाचे ईमारतीचे बांधकाम सुरू आहे. जर आपल्याला इथेच काम मिळाले तर... राहण्याची व्यवस्था इथेच होईल. मी धाडस करून काँट्रॅक्टरकडे गेलो. विचारलं, "काका, मी ईथेच शिकतो. सुट्ट्या लागल्यात पण मी गावी जाणार नाही". थोडक्यात त्याला परीस्थिची जाणीव करुन दिली.  "मला इथं मजुरी काम मिळेल का?... कोणतंही काम करण्याची माझी तयारी आहे,,,तुम्ही सांगाल ते..." काँट्रॅक्टरने सांगितले प्रिंसीपल सरांना विचार. मी  प्रिंसीपल सरांना थोडक्यात हकीकत सांगीतली. प्रिंसीपल सरांनी माझ्याकडं बघीतलं. क्षणभर विचार केला. स्मितहास्य करुन मान हलवली. त्यांनी लगेच होकार दिला. राहण्यासाठी जुन्या बिल्डींगची एक खोली दिली. परत एक प्रश्न होता... जेवणाची व्यवस्था कशी करणार...!? पी.टी.टीचर वरघट सरांनी मला थोडी भांडी, स्टोव्ह दिला. मी दिवस भर काम  करून एक वेळ भाकरी करुण खात होतो. ते सर्व ठीक आहे. खरी गंमत तर आता आहे. ज्या ठिकाणी मी कामाला होतो, त्या ठिकाणापासुन काही अंतरावर एक मारोती मंदीर व मंगल कार्यालय होते. त्या ठिकाणी लग्न लागायचे. ज्या दिवशी त्या ठिकाणी लग्न असेल त्या दिवशी मी खूप खूष व्हायचो. कारण त्या मी जेवनाच्या पंगतीत आवर्जुन हजर असायचो. मग पोटभर जेवण करायचो आणि आजच्या मजुरीतून पूर्ण पैसे घरी देता येतील ह्या आशेने खुप खुश असायचो. मी दोन महीने मजूरी काम केलं. प्रिंसीपल सरांना भेटलो. घरी जाण्यासाठी सरांचा निरोप घेतला. दोन महिन्या नंतर घरी जातांना माझा आंनद गगनात मावेनासा झाला. मी घरी गेलो. आईच्या गळ्यात पडलो. आईच्या हातात मजूरी चे पैसे दिले. आई स्तब्ध... आईच्या डोळ्यातुन आनंदाश्रु येत होते... प्रत्येक पाऊल आम्हाला दुःखाचा सामना करावा लागतो याची तीला खंत होती. म्हणुन ती माझ्याकडुन खुप मोठ्या आशेवर होती. मी जे दिवस बघते, ते दिवस माझ्या मुलाच्या वाट्याला येऊ नयेत म्हणुन ती माझ्यासाठी, माझ्या शिक्षणासाठी वाटेल ते करण्यास तयार होती.*
      पुढील सत्र सुरु झाले. नवोदय विद्यालय लातुर येथे प्रवेश केला. तेथे शिक्षकवृंद खुप प्रेमळ होते.  वरघट सरांच्या सानिद्यात राहीलो. त्या दरम्यान रनिंग ईवेंट मध्ये राष्ट्रीय स्तरावर खेळलो. बारावीचं शिक्षण पुर्ण केलं. आज पर्यंत नवोदयनं मला खुप दिलं. जड अंतकरणानं नवोदयचा निरोप घेतला. जे मी सहावी ते बारावी पर्यंत जीवन जगलो ते बालपण, ते शिक्षकवृंद, तो मित्र परीवार, तो आनंद ईथपर्यंत ठीक होतं. पण यापुढं काय! पुढील शिक्षण कसं करायचं...? आई बाबाना किती दिवस कष्ट करू द्यायचे..!
        मी बारावी नंतर पुढील शिक्षण व नोकरीच्या शोधात औरंगाबाद मध्ये राहू लागलो. पुन्हा एक प्रसंग घडला. मी उपाशी पोटी पाणी पिऊन कामाला लागलो. भूक पिच्छा सोडत नव्हती. माझ्याकडे एक रुपया होता. त्या एक रुपयात मी दोन केळी विकत घेतली. दोन केळीत भूक भागणार नाही याची मला जाणीव होती. मी ते दोन केळी सालटा सहित खाल्ली. पुन्हा कामाला लागलो. काम करत कुठं नोकरी मिळेल का...याच विचारात औरंगाबाद येथे नाईक काॅलेजला B.A.ला Admission घेतलं. सकाळी काॅलेज आणि नंतर काम दोन्ही चालु असतानाच जिंदगीतल्या संकटांनी पुन्हा एकदा परीक्षा घेतली. ज्या बाबांनी जिवाचं रान केलं, माझ्यासाठी अनेक स्वप्न बघितली, काळाने असा घाव घातला की माझ्या बाबाची प्राणज्योत मावळली. मी पूर्ण पणे खचलो. आईने धीर दिला. एक पेपरला जाहिरात वाचली. पोलीस भरतीसाठी जागा निघाली. जबाबदारी वाढलेली होती. एकीकडे बाबा नुकतेच गेल्याचं दुःख. दूसरीकडे भरतीची तयारी. मी सावरलो. भरतीसाठी जायला पैसे नव्हते. परत एकदा संकट दाराशी उभं राहिलं. पोलीसात भरतीसाठी प्रवास करणं म्हणजे समोर अथांग सागर दिसत होता. जायचं कसं काही सुचत नव्हतं. आईने माझ्या चेह-यावरील भाव ओळखले. ती हजर जवाबी होती. आईने तिच्या गळ्यातील मंगळसूत्र काढुन मला म्हणाली, "हे घे. हे मोड. ते पैसे घेऊन भरतीला जा. पायाखालची जमीन घसरली. मी मंगळसूत्र बाजारात मोडलं. आईचा आशीर्वाद घेतला. चरण स्पर्श केले. घरुन निघालो. पुन्हा एकदा आईकडं वळुन बघीतलं. तीला डोळे भरुन बघीतलं. तीच्या मनातील भाव मी ओळखले. आज ती खुप खुप खुष होती. तीचा माझ्यावरील विश्वास कायम होता. मी पुन्हा एकदा मागे वळुन बघीतलं. हात हालवुन टाटा केला. तीनेही टाटा केला. तीने हात हालवले. जणु ते हात म्हणत होते की आता मागे वळु नकोस. पुढं जा. आणि पुढच जात रहा.  छाती भरुन आली. मन दाटुन आलं. मनानं ठाम निश्चय केला. पुन्हा मात्र मी मागे फिरुन पाहीले नाही. 'भरती झालो तरच तोंड दाखविन...' असे काही काही मनात विचार आले. आई बाबाचा आशीर्वाद पाठीशी होता. भरतीसाठी गेलो. ईतरांनी दोन दोन डझन केळी खाल्ली होती. गाडीभर साल्टं जमा झाले होते. आईनं मला भाकरी, हिरव्या मिरच्याचा ठेचा आणि आंब्याचं लाणचं पालवात बांधुन दिलं होतं. ते मी तीन दिवस खाऊ शकलो होतो. मी पोटभर जेवलो. आई बाबाचा चेहरा समोर ठेवुन भरतीत उतरलो. आईचे मला पुढं ढकलत असलेले हात हारण्यास नकार देत होते. ते मला प्रेरणा देत होते--मागे वळु नकोस. पुढं जा आणि पुढच जात रहा. आई बाबाचा आशीर्वाद - मी पहिल्याच प्रयत्नात आणि सहजरित्या भरती झालो. नवोदय आणि नवोदय मधील त्या माय बाप गुरुवर्यांची खुप आठवण आली. कारण नवोदय मधील अथक परीश्रमाने मिळवलेले राष्ट्रीय स्तरावरील द्वीतीय क्रमांकाचे प्रमाणपत्राने माझा मेरीटचा ऊचांक गाठला होता. घरी आलो. आईला आनंदाची बातमी दिली. आई खूप खुष झाली. ड्युटीवर जाॅईन  होण्याची ऑर्डर मिळाली. मग मी खुप रडलो. आई पण खुप रडली. कारण माझा आनंद बघण्यासाठी बाबा नव्हते न...!!!
         मी ट्रेनिंगला गेलो. 
ट्रेनिंग दरम्यान मी गावी आलो होतो - आईला भेटायला... माझा पहीला पगार झाला होता. पहिल्या पगारातच मी आईला सोन्याची पोत करून दिली. हा आनंद माझ्यासाठी माझ्या जीवनातील सर्वात मोठ्ठा आनंद होता. 'आता तु लोकांच्या कामाला जायचं नाही...' मी स्मितहास्य करुन आईला बजाऊन सांगीतलं.
      मी ट्रेनिंग दरम्यान बंदोबस्तसाठी नाशिक या ठिकाणी आलो.एक दिवस अचानक मित्राचा फोन आला. "बाला, आईची तबेत बिघडली. आई तुझी आठवण करत आहे." कशी बशी रजा मिळाली. रजा घेऊन गावी आलो. आई बाजे वरती पडलेली. गावातच माझा मित्र होता-डाॅ.मनाठकर. लगेच मनाठकर डॉक्टरला घरी बोलावलं. डॉक्टरांनी आईची तपासणी केली. ते म्हणाले, 'वेळ खुप कमी आहे.' डाॅक्टरांनी आईला बाजेवरुन ऊचलुन जमिनीवर झोपवलं. मी आईचं डोकं माडीवर व तीचा हात हातात घेऊन बसलो. "आई, मी तुझा बाला. मी आलोय ग--तुला भेटायला."
निसर्गाला काही वेगळंच मान्य होतं. हळू हळू सर्व ठिक होणार होतं. मी आईला म्हणलो, "आई, आता आपले वाईट दिवस गेलेत. आता तुला काम करायची गरज नाही. आई खुप वृद्ध झाली होती. अचानक बोलता बोलता माझी आई गप्प झाली. आई ग!, ये आई!, आई! उठ! बोलणं माझ्याशी! काही तरी बोल. गप्प राहू नको ग आई! आता आपल्याला शिळ्या भाकरीचे कुटके करून खाण्याची वेळ निघून गेलीय. आपले वाईट दिवस संपले. आई!!!आई!!! आई शांत डोळे मिटून... पण तीचा श्वास चालु होता. माझ्यासाठीच ती जीवंत होती. ती मला सोडुन जाणारच नाही. वेडी आशा  होती मला कि आई डोळे ऊघडेल, उठेल.
वाटलं नव्हतं तिची साथ फक्त इतकीच टिकेल.
तीचं नेमकं काय म्हणनं होतं,,,
मला समजलं नव्हतं...
तिला जाण्याची का घाई झाली,,,
कोडं उमगलं नव्हतं...
तिच्या हातावर जेंव्हा
अश्रु माझे पडले,,,
आईनं चटकन डोळे उघडले...
अन् तीचे ओठ थरथरले---
ती काही तरी पुटपुटली...मला सारं काही कळुन चुकलं होतं...
अजुन काही तरी तीनं बोलावं,
वेडं मन आशेवरच होत...
माझा धरलेला हात तिनं तेंव्हा घट्ट दाबला होता,,,
फसलो ग मी आई,
तो तर तुझा…
शेवटचा निरोप होता...
आई....साता समुद्रापलीकडे निघून गेली होती. माझ्या डोळ्यातून अश्रु धारा वाहू लागल्या. कुणी काळजावर वार केल्यासारखं झालं. माझी आई देखील मला सोडून देवा घरी गेली. नशिबानं थट्टा केली. माझा आधार! माझी हिंमत! माझी ताकत! बघता बघता माझ्या आईची प्राणज्योत मावळली. जणू काही माझ्या आईने माझ्यासाठी मी भरती होईपर्यंत जीव हाताशी  धरून ठेवला होता. माझ्या आईने माझ्या मांडीवर  प्राण सोडला. एवढ्या मोठ्या जगात मी पोरका झालो. आज ही तो क्षण आठवला की जीव कासाविस होतो.
मला माझ्या आईची सेवा करण्याची संधी मिळाली नाही. मला आई बाबा गेलेलं दुःख मोठं होतं. माझ्यापुढं आता फक्त आईबाबाचं स्वप्न होतं. आईच्या स्वप्नासाठी मी पुन्हा एकदा दुःखातून सावरलो. पोलिसाची नोकरी करत मी MPSC ची तयारी केली. मी MPSC पास झालो परंतु मेरिटमध्ये येण्यासाठी मला तीन मार्क कमी पडले. पुन्हा एकदा मला नशिबाशी झटावं लागलं. मी परत MPSC परीक्षा दिली. परंतु मेरिट लिस्टमध्ये येण्यासाठी मला पुन्हा एक मार्क कमी पडला. मी हताश झालो नाही. हिंमत सोडली नाही. जीवनात अनेक दुर्दैवाचे प्रहार सहन केले. मला माझ्या आई बाबाचं स्वप्नं पूर्ण करायचं होतं. मी पुन्हा MPSC ची परीक्षा दिली आणि मेरिट लिस्टमध्ये नाव आलं. मी PSI झालो. एकीकडे आनंद होता तर दूसरीकडे आई बाबाचे स्वप्न पूर्ण झाले हे पाहण्यासाठी आई बाबा नव्हते. त्या दिवशी मी जिंकुन सुध्दा हारलो. देव एवढा निष्ठुर कसा झाला. त्यानं सगळं काही देऊन सगळं काही हिसकावून घेतलं. आज पण असा एक ही दिवस जात नाही आई बाबांच्या आठवणी शिवाय.. मी देव पाहिला नाही पण देवरूपी आई-बाबा पाहिले. ज्यावेळेस मी आई बाबाचा फोटो पाहतो, त्यावेळेस वाटतं की त्यांनी त्या फोटोतून बाहेर यावं आणि मला त्यांच्या छातीशी बिलगुन घ्यावं. आई बघ ना ग,  मी साहेब झालो .......
मला सुखाचे दिवस आले आणि मी आई बाबाना परत आणू शकत नाही. एक निश्चय केला की आईच्या नावानं कोणत्या तरी माध्यमातून गरीब, वृद्ध यांच्यापर्यंत पोचावे. यासाठी एक संस्था असावी. हे स्वप्न मनात होतं. पैशाचं मोल कळालेलं होतं. पोटाची भूक काय असते त्याची जाणीव झालेली होती.
एक दिवस अचानक माझी भेट एक संस्था चालक ज्योती आडेकर मॅडमशी झाली. चर्चेतून विषय निघाला. मी माझे स्वप्न मॅडम समोर मांडले की माझ्या आईच्या नावाने एक फाउंडेशन सुरू करू. त्यांनी लगेच होकार दिला. माझी आई स्व.अंजानी हौसाजी किरवले यांच्या नावाने मागील एक वर्षा पासून "अंजानीआई फाउंडेशन" हे जालना या ठिकाणी कार्यरत आहे. अंजानीआई फाउंडेशनच्या माध्यमातून कोरोना संसर्गामुळे लॉक डाऊन मध्ये अडकलेले लोक, मोल मजुरी करणारे, धूनी भांडी करणारे, हातगाडी ओढणारे, विधवा अनाथ, मूकबधिर, अपंग, शेत मजूर, बिडी कामगार यांना  किराणा किट, भाजी पाला, अन्नधान्य, फुड पॅकेट, तसेच पोलीस, होमगार्ड, सफाई कामगार यांना चहा, नाश्ता, सेनीटायजर, मास्क, फेस शील्ड , विटामिन सी गोळ्या, तसेच रखरखत्या ऊन्हात गावाच्या दिशेने पायी प्रवास करणारे वयोवृद्ध, लहान मुले यांना चप्पल जोड, पायी प्रवास करणारे तरुणांना टी-शर्ट, रुमाल, चप्पल जोड, पाणी बॉटल, बिस्कीट, चिवडा पाकीट, खिचडी, पोळी भाजी,  लहान मुलांना फळं वगैरे गरजेनुसार वाटप करण्यात आले. जवळपास 4000 हजार लोकांची भूक भागविण्याचं काम या ठिकाणी अंजानी आई फाऊंडेशनच्या माध्यमातुन करण्यात आलं. आम्ही भूक मारी सोबत लढलो. आमच्याकडे मदत म्हणुन कुणी पैसे दिले, कुणी गहू दिले, कुणी तांदुळ, दाळ दिले. ते घेऊन आम्ही गरजुपर्यंत पोचलो. मूठभर धान्याने अनेकांच्या घरात चुली पेटल्या. आमचा उद्देश एवढाच होता की कोणी ही उपाशी झोपू नये. उपासमारी, भूक काय असते ते मी जवळून पाहिलंय. स्वत: अनुभवलंय. ज्या वेळेस काही कुटुंबात चूल पेटवण्यासाठी काडी डबी नसायची, घरात पीठ नसायचे, लहान लहान मूलं भुकेने व्याकूळ होऊन आईला जेवन मागायचे त्या वेळेस माझ्या वरील प्रसंग नजरेसमोर यायचे. कोरोनामुळे व लॉक डाऊनमुळे अडकलेले लोकं आपल्या गावी जाण्यासाठी 500 - 500 कि.मी. रखरखत्या ऊन्हात पायी चालत यायचे. त्या वेळेस त्यांना जेवणाचे पाकीट, पाणी द्यायचो. त्या वेळेस त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मन समाधान व्हायचं. आमची अंजानी आई फाऊंडेशनची टीमने लॉक डाऊन काळात रखरखत्या ऊन्हात लगातार दररोज पायी जाणारे लोकांपर्यंत पोहचुन त्यांना जेवन, पाणी दिले. वस्तीत, वाडीत जाऊन कोरोना वायरस बदल जनजागृती केली. किरवले मित्र मंडळींची आर्थिक मदत व सहकार्याने जालना टीमचे विद्या जाधव, अंजानी आई फाउंडेशनची संकल्पना लिहिणारे ज्योती आडेकर व त्यांचे सहकारी यांना सोबत घेऊन लॉक डाऊन दरम्यान कोरोनावर मात करण्यासाठी व गोरगरीबांच्या सेवेसाठी झटत राहीलो. अजूनही काही लोकांचे मदतीसाठी फोन येतात. तेव्हा तात्काळ मदत पोहोचवली जाते. नक्कीच लॉक डाऊन संपेपर्यंत व त्यानंतरही निरंतर गोरगरीब, गरजू लोकांना मदत करू अशी शाश्वती दतो.
बेरोजगार व हालाखीची परिस्थिती असलेल्या तरुण मुलांना योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. येणाऱ्या काळात अंजानीआई फाउंडेशनच्या वतीने जे गरीब मूलं पोलीस भरती/MPSC ची तयारी करत असतील परंतु त्यांची आर्थिक परीस्थिती खुपच हालाखीची आहे अशा तरुणांना पोलीस भरती व MPSC चे मार्गदर्शन व शिक्षणाचा खर्च फाउंडेशन मार्फत  करण्यात येणार आहे. तसेच ज्या घरामध्ये मुलं आई-वडिलांचा सांभाळ करत नसतील अशा वयोवृद्ध आजीबाई, आईंना योग्य तो न्याय देऊन त्यांना महिनेवारी किराणा सामान भरून देण्यात येईल. जे मुलं चुकीच्या मार्गाने घर सोडून पळून आले त्यांना घरी पोचतं करणे, रस्त्यावर भीक मागणारे अशा मुलांना शिक्षणाची आवड निर्माण करून देणे, आई-वडील नसलेल्या मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेऊन शिक्षणासाठी लागणारा खर्च अंजानीआई फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
मी काही सूर्य कुळातला नाही. मी माझ्या आईचा आहे. माझी आई एक उजेड देणारी पणती आहे......
आई तुझा आशीर्वाद माझ्या पावलांकरिता दिवा व माझ्या मार्गावर प्रकाश आहे....

बालाजी हौसाजी किरवले
   पोलीस उप निरीक्षक
       औरंगाबाद

सहाय्यक अभियंता श्रेणी नं २ या पदावर जेष्ठतेनुसार नियुक्ती करावी - कैलास रत्नपारखे


जालना, ब्युरोचीफ :- सहाय्यक अभियंता श्रेणी नं २ या पदावर जेष्ठतेनुसार नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी
कैलास रत्नपारखे यांनी मुखधिकारी जिल्हा परिषद यांना
निवेदनात केली आहे,अधिक माहिती अशी की,थी.टी.डी झोरे हे सध्या बदनापुर पंचायत समिती बांधकाम विभाग येथे शाखा अभियंता असुन सेवा जेष्ठते नुसार त्यांचा यादी क्र .१४४ असा असुन सुध्दा उप विभाग जालना येथे त्यांना डावलुन राजकीय दवाबाखालीथी .डी.बी.टोके यांना यांचा यादी क्र .३ ९ ३ असुन वरील पदाची नियुक्ती दिल्यामुळे थी.टी.डी.मोरे ते ओबीसी असल्यामुळे त्यांच्यावर अन्याय झालेला असुन मा.मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनी चौक्तशी करून श्री.टी.बी.परोरे यांना उपअभियंता उपविभाग जालना या पदावर सेवा जेष्ठतेनुसार नियुक्ती देण्यात यावी नसता वचीत बहुजन आपाठी शहर शाखेतर्फे मा.जिल्हाअध्यक्ष यांच्या नेवृत्वाखाली लोकशाही मागनि तिव स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल.अशी मागणी वंचित बहुजन आघाडी चे शहर अध्यक्ष कैलास रत्नपारखे यांनी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना निवेदना मार्फत केली आहे.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...