बुधवार, ६ मे, २०२०

युवक राष्ट्रवादीने दिला गरजुना मदतीचा आधार
संकटकालीन धावून येण्यासाठी राष्ट्रवादी सदैव तत्पर - शरद टोपे




जालना / प्रतिनिधी :- कोरोना आजारामुळे लॉकडाऊन वाढले असून गोर - गरीबाचे आणि हातावर पोट असलेल्यांचे हाल होत आहेत . त्यांची दखल घेऊन जालना युवक राष्ट्रवादीच्या वतीने गरजवंत नागरीकांना संसारउपयोगी साहित्य वाटप करण्यात आले आहे . यावेळी युवक राष्ट्रवादीचे शरद टोपे दिपक भुरेवाल , बबलू चौधरी , नंदकिशोर जांगडे , सौ . रसनाताई देहडकर , डॉ . हंडे ताई मेघराज चौधरी , शेख सलीम , अनवर मिा महेंद्र हुळे , महेश कुलकर्णी , संतोष शिखोटे आदींची उपस्थिती होती . संकटकालीन धावुन येण्यासाठी राष्ट्रवादी सदैव तत्पर सामान्य जनतेच्या पाठीमागे खंबीर पणे उभी राहते . असे शरद टोपे यांनी यावेळी सांगितले . आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली अणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे यांच्या नेतृत्वाखाली युवक राष्ट्रवादी शहराध्यक्ष राजेंद्र जाधव यांच्या पुढाकाराने शहरातील विविध भागातील गरजवंतांना २५० कुटुंबीयांना संसारउपयोगी साहित्य वाटप करण्यात आले आहे . कोरोना या विषाणू ला हरवण्यासाठी जनतेने शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे , असेही यावेळी शरद टोपे म्हणाले . राजेंद्र जाधव यांनी केलेल्या या कार्याचे नंदकिशोर जागडे यांनी कौतुक केले आहे . केलेल्या या उपक्रमाचे आमचे कर्तव्य म्हणून राबवत असल्याचे राजेंद्र जाधव यांनी सांगितले . पुढे बोलताना ते म्हणाले की , येणारा काळ हा संकटाचाच आहे . लॉकडाऊन हे वाढण्याची भीती आहे . अशा वेळी हातावर पोट भरणाऱ्यांचा प्रश्न बिकट बनण्याची शक्यता आहे . मात्र राजेश टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी आपला मदतीचा यज्ञ हा अविरत सुरू ठेवणार असून गरजवताना कधीही मदतीसाठी हात देईल त्यांच्या मदती साठी आम्ही कायम उभे राहणार असल्याची ग्वाही राजेंद्र जाधव यांनी दिली .


परराज्यातील लोकांचा जाण्याचा प्रवास खर्च जालना
जिल्हा काँग्रेस कमिटी करणार - जिल्हाध्यक्ष देशमुख


जालना (प्रतिनिधी) :- देशातील विविध राज्याचे नागरीक व मजुर आणि कामगार प्रप्रांतात कोरोना संसर्गजन्य आजारामुळे उद्धभवलेल्या लॉकडाऊमुळे अडकुन पडले आहेत. त्यांच्या मुळ गावी (परराज्यात) जाण्यासाठी त्यांच्याजवळ अदलापैसा नाही अश्या परप्रांतीयांना काँग्रेसपक्षाने मदतीचा हात पुढे केला आहे. जालना जिल्ह्यातील अश्या लोकांचा जाण्याचा प्रवास खर्च जालना जिल्हा काँग्रेस कमिटी करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी सांगीतले आहे.अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी पक्षाचे नेते खा. राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी देशातील विविध राज्यातील मजूर, कामगार कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे आपल्या राज्यात जावू शकत नाही त्यांची अत्यंत हलाकीची परिस्थिती बनली आहे. हजारो कामगार पायी निघाले आहेत. देशातील या लाखो लोकांची गंभीर व नाजूक परिस्थिती समोर आल्यामुळे काँग्रेसपक्षाने या लाखो लोकांना त्यांच्या राज्यात पोहचत करण्यासाठी त्यांचा प्रवास खर्च उचल्ला आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष तथा महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसनेत्या श्रीमती सोनिया गांधी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरसद्वारे चर्चा करून जालना जिल्ह्यात अडकलेले प्रप्रांतीयांना त्यांच्या राज्यात पोहचत करण्यासाठी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, आमदार कैलास गोरंट्याल, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, शहराध्यक्ष शेख महेमूद यांच्यावर जवाबदारी सोपवली आहे. सबंधीतांनी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.


पत्रकारांना विमा संरक्षण मिळावे या साठी माणगांव प्रेस क्लबचे तहसिलदारांना लेखी निवेदन


बोरघर  / माणगांव (प्रतिनिधी)  :- लोकशाहीचा चौथा स्तंभ आज वैश्विक कोरोना संकटात सापडला असून तो कोरोना मुक्तीच्या पार्श्वभूमीवर शासनाने लावलेल्या लाॅकडाऊन संचारबंदीत स्वतः च्या जीवाची पर्वा न करता, कोरोना मुक्तीच्या राष्ट्रीय लढ्यात जीवाची बाजी लावून कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता काम करतोय. कोरोना संकटात सापडलेल्या जनतेचे वास्तव स्थिती, शासनाच्या सूचनांचे पालन करण्यासाठी समाजप्रबोधनपर माहिती आपल्या लेखणी द्वारे जनते पर्यंत पोहचविणे, गोरगरीब, दीन दूबळ्यांची आर्थिक परिस्थिती जगासमोर आणण्यासाठी, भूकेलेल्यांना अन्न, मदत मिळवून देण्यासाठी पत्रकार अहोरात्र आवाज उठवित आहेत. अनेकांना त्यांनी केलेल्या सत्कर्मांचे आपल्या लेखणीद्वारे कौतुक करुन प्रोत्साहीत केले.परंतु स्वतःसाठी मात्र कसलीच अपेक्षा केली नाही. एवढे सर्व करूनही आज लोकशाहीचा चौथा स्तंभ सर्व प्रकारच्या सरकारी सुविधांपासून वंचित आहे. शासन आणि जनता या मधील दुवा असलेल्या पत्रकारांना विमा संरक्षण मिळावे या करीता रायगड प्रेस क्लब संलग्न माणगांव प्रेस क्लबच्या सर्व पत्रकार सदस्यांनी या संदर्भात एकमुखाने निर्णय घेतला असून राज्याचे मा. मुख्यमंत्री यांना माणगांव तहसिलदार श्रीमती प्रियंका आयरे यांच्या मार्फत लेखी निवेदन सादर केले आहे. 
       राज्याचे माननीय संवेदनशील  मुख्यमंत्री श्री. उद्धव जी ठाकरे साहेब आणि संबंधित प्रशासकिय अधिकारी यांनी पत्रकारांची ही रास्त मागणी लक्षात घेऊन त्या अनुषंगाने अंमलबजावणी करावी. तसेच पत्रकारांना सुद्धा इतरांप्रमाणे तातडीने मदत देण्यासाठी काहीतरी उपाययोजना करावी. यासाठीच पत्रकारांना कमितकमी विमा संरक्षण तरी मिळावे या मागणीचा विचार व्हावा. म्हणुन आज दि. ६ मे रोजी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांना विनंती वजा मागणीचे निवेदन माणगांव तालुका प्रेसक्लब च्या वतिने तहसिलदारांना सादर केले आहे. कोव्हिड १९ संदर्भात तातडीच्या सभेसाठी तहसिलदार बाहेर गेल्या असल्या कारणे माणगांव नायब तहसिलदार बि. वाय. भाबड यांच्याकडे सदर निवेदन देण्यात आले.
       या प्रसंगी माणगांव तालुका प्रेसक्लबचे पत्रकार अध्यक्ष उत्तम तांबे, माजी अध्यक्ष गौतम जाधव, जेष्ठ सल्लागार रविंद्र कुवेसकर या तिघांनी प्रातिनिधीक स्वरूपात माणगांव प्रेसक्लबच्या सर्व पत्रकार सदस्यांच्या वतिने निवेदन दिले आहे. 


  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...