शुक्रवार, ८ मे, २०२०

लॉकडाऊनमध्ये कुंटनखान्यावर छापा.
अविनाश तांदळे | बीड महाराष्ट्र
  कोरोनामुळे देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आला आहे. मात्र या लॉकडाऊनच्या काळातही अंबाजोगाई शहरामध्ये कुंटनखाना सुरु असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक कक्षास प्राप्त झाली. गुरुवारी रात्री केलेल्या कारवाईमध्ये एका आंटीवर गुन्हा दाखल करत दोन पीडिताची सुटका करण्यात आली.

     पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अंबाजोगाई शहरातील महात्मा फुले नगर येथे कुंटनखाना सुरु होता. याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक कक्षास मिळाली. त्यांनी दोन पोलीस डमी ग्राहक पाठवून शहानिशा केली. फोनवरुनच संभाषण करुन आंटीने सर्व माहिती त्यांना दिली. त्या ठिकाणी गेल्यानंतर दोन मुली आंटीने समोर उभ्या केल्या. डमी ग्राहक असलेल्या पोलीसांनी बाजूलाच असलेल्या पोलीसांना इशारा करताच छापा टाकण्यात आला. यावेळी एका आंटीला ताब्यात घेत तिच्यावर अंबाजोगाई पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. तर दोन पीडिताची सुटका करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपअधीक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेेचे पोनि.भरत राऊत, भास्कर केंद्र, अनैतिक मानवी वाहतूक कक्षाच्या प्रमुख पोउपनि.राणी सानप, शमीम पाशा, सिंधु उगले, सुरेखा उगले, मिना घोडके, शिवाजी भारती, प्रताप वाळके, विकास नेवडे, सतिष बहिरवाळ, चालक सुस्कर यांनी केली
========================================================================

बीड रिपोटर



शासकीय हरभरा खरेदी केंद्र, धर्माबाद गोदाम अभावी पुन्हा बंद होण्याची शक्यता


धर्माबाद (भगवान कांबळे ):- कृषी उत्पन्न बाजार समिती धर्माबाद चे गोदाम महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने किरणे घेऊन गोदामाची अडचण दूर करावी ह्यासाठी मा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.हंगाम 2019-2020 मधील शेतकऱ्यांच्या हरभरा शेतमालाची शासकीय दराने नाफेड मार्फत खरेदी सुरू आहे. धर्माबाद तालुक्यातून जवळपास 3400 शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. नाफेड मार्फत खरेदी झालेला माल गोदामात डिपॉझिट करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ धर्माबाद येथे जागा उपलब्ध नसल्याने मध्यंतरी खरेदी बंद ठेवण्यात आली. खरेदी केंद्र गोदामा अभावी पुन्हा बंद होण्याची शक्यता आहे. धर्माबाद वर्ष 2016 मध्ये हे महाराष्ट्र कृषी स्पर्धाक्षम प्रकल्प अंतर्गत 2000 मेट्रिक चे गोदाम उभारले असून सदर गोदाम विनावापर पडून आहे. तेव्हा सदर गोदाम महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने प्रचलित दरानुसार बाजार समिती धर्माबाद जी करारनामा करून किरायाने घेतल्यास धर्माबाद तालुक्‍यातील शेतकऱ्यांची समस्या सुटण्यास मदत होईल. सदर गोदामात जवळपास 20 हजार क्विंटल माल ठेवण्याची क्षमता आहे .तरी या पर्यायाचा संबंधित विभागाने लवकरात लवकर विचार करून गोदामा अभावी खरेदी केंद्र बंद पडणार नाही या दृष्टीने प्रयत्न करावेत. हे निवेदन मा मुख्यमंत्री मा विरोधी पक्षनेता मा ना पालकमंत्री , नांदेड ,मा खा प्रतापराव पाटील चिखलीकर,मा जिल्हाधिकारी  मा आ राजेशजी पवार ,मा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, नांदेड, वरीष्ठ व्यवस्थापक,वखार महामंडळ, लातूर ,जिल्हा मार्केटिंग अधिकारी ,नांदेड ह्यांना मेल द्वारे पाठविण्यात आले. सोबत मी स्वतः रविंद्र पोतगंटीवार, साईनाथ शिरपूरे, अविनाश जैरमोड व मुरली गौड होते.
उद्धावसाहेबानी  बदामराव पंडित यांना विधान परिषदेवर घेवून जनतेसाठी काम करण्याची संधी द्यावी - समद शेख यांची  मागणी


गेवराई, प्रतिनिधी :- शिवसेना मजबूत करण्यासाठी बळ द्यावे अशी मागणी तमाम  नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना व शिवसैनिकांनी पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे भाजप युतीची जागा न मिळाल्याने बदामराव पंडीत हे अपक्ष यांच्याकडे केली आहे . म्हणून निवडणूक लढले .पक्षाची उमेदवारी नसतानाही आज ३ मे रोजी बदामराव पंडित यांचा तब्बल ५२ हजार मतदारांनी त्यांना मतदान रूपी आशिर्वाद वाढदिवस आहे . याच वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणुन दिले आजही बदामराव पंडीत हे ठामपणे पक्षाच्या शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे संयमी मुख्यमंत्री विचारांवर व नेतृत्वावर विश्वास ठेवुन बीड जिल्ह्यामध्ये ना.उध्दवजी ठाकरे यांनी बदामराव पंडीत यांना पक्षासाठी निष्ठेने काम करीत आहेत .गेल्या तीन वर्षांत विधानपरिषदेवर आमदार म्हणुन काम करण्याची संधी शिवसेना पक्षाला बदामराव पंडीत यांच्या रूपाने सामन्याला द्यावी , अशी मागणी पत्राद्वारे समद शेख यानी  केली आहे . आपलेसे वाटणारे नेत्रत्व मिळाले आहे . पुढील काळात बीड मागील २५ वर्ष बदामराव पंडित यांनी गेवराई मतदार जिल्हा हा शिवसेनेचा हक्काचा जिल्हा करण्यासाठी संघाचे प्रतिनिधी म्हणुन जनतेची सेवा केली आहे यामध्ये लोकनेते बदामराव पंडीत यांच्या रूपाने शिवसेनेचा दोन वेळा अपक्ष तर एक वेळ पक्षाचे आमदार म्हणून तर विधानपरिषद सदस्य म्हणून म्हणुन निवड करून , पुन्हा १९९४ साली युतीच्या सरकार मध्ये राज्यमंत्री म्हणुन जनतेसाठी काम करण्याची संधी त्यांना द्यावी , अशी मागणी बदामराव यांनी काम केलेले आहे . व विनंती गेवराई विधानसभा मतदार संघातील , संघटक गेल्या २ वर्षात बदामराव पंडित यांनी शिवसेना  तमाम शिवसैनिक अशोक मुंडे समद शेख  अशोक नाईकनवरे , नाविद शेख पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना, पक्षात प्रवेश करून , बीड जिल्ह्यात गेवराई मतदार संघात भार    शिवसेना पक्षवाढविण्याचे काम मोठ्या प्रमाणावर केले आहे   समद शेख यानी  केली आहे . गेवराई (वार्ताहर ) गेवराई मतदार संघासह व महाराष्ट्रातील जनतेसाठी आहोराञ २४ तास सर्पकात राहुन काम करणारे माजी मंत्री,शिवसेना नेते बदामराव पंडित यांना विधानपरिषदेवर घेण्यात यावे अशी समद शेख यांनी केली आहे

बीड हॅलो रिपोर्टर

रेल्वे रुळावर थकून झोपलेली १४ मजूर मालवाहू रेल्वेखाली चिरडली.


या दुर्दैवी अपघाताला जबाबदार कोण प्रशासन की संभाव्य परिस्थिती ? 



औरंगाबाद, प्रतिनिधी : औरंगाबाद तालुक्यातील सटाणा शिवारात ( करमाड डीएमआयसी परिसर) रेल्वे रुळावर थकून झोपलेली १४ मजूर मालवाहू रेल्वेखाली चिरडली गेली. हा भीषण अपघात दिनांक 8 मे शुक्रवारी पहाटे ५.१५ वाजता घडला. यात २ मजूर गंभीर जखमी असून तिघे जीव वाचविण्यात यशस्वी झाले आहेत. सर्व मजूर मध्य प्रदेश येथील असून ते जालना येथे लॉकडाऊन मध्ये अडकले होते. घराच्या ओढीने सर्व मजूर पायी रेल्वे रुळाच्या मार्गे निघाले होते.याबाबत अधिक माहिती अशी की, जालना येथील एसआरजे कंपनीत मध्य प्रदेश येथील १९ मजूर काम करतात. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे ही मजूर जालना येथे अडकली गेली. दरम्यान, शासनाने परप्रांतीय मजुरांना घरी जाण्यासाठी विशेष रेल्वे सुरू केल्या आहेत अशी माहिती या मजूरांना मिळाली. तसेच भुसावळ येथून मध्य प्रदेशला रेल्वे जाणार असल्याची माहिती या १९ मजुरांना मिळाली असता पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी ते रेल्वे रुळाच्या मार्गे औरंगाबादच्या दिशेने चालत निघाले. सटाणा परिसरात रात्री थकून हे मजूर रेल्वे रुळावर झोपले. पहाटे अचानक  एक मालवाहू रेल्वे त्यांच्या दिशेने आली . काही कळायच्या आत १४ मजूर रेल्वे खाली  चिरडले गेले तर दोघे गंभीर जखमी असून तिघे प्राण वाचविण्यात यशस्वी झाले आहेत.जालना येथील स्टील कंपनीचे १९  कामगार भुसावळला  जाण्यासाठी रेल्वेरुळावरून पायी निघाले होते. सटाना परिसरात ते रुळावर झोपले असतांना मालगाडीने त्यांना चिरडले. यात १४ जण ठार  तर २ कामगार जखमी झाले. सर्वांचे मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथे पाठवण्यात आले आहे.


बीड हॅलो रिपोर्टर न्यूज

रेल्वे रुळावर थकून झोपलेली १४ मजूर मालवाहू रेल्वेखाली चिरडली.

या दुर्दैवी अपघाताला जबाबदार कोण प्रशासन की संभाव्य परिस्थिती ? 


औरंगाबाद, प्रतिनिधी : औरंगाबाद तालुक्यातील सटाणा शिवारात ( करमाड डीएमआयसी परिसर) रेल्वे रुळावर थकून झोपलेली १४ मजूर मालवाहू रेल्वेखाली चिरडली गेली. हा भीषण अपघात दिनांक 8 मे शुक्रवारी पहाटे ५.१५ वाजता घडला. यात २ मजूर गंभीर जखमी असून तिघे जीव वाचविण्यात यशस्वी झाले आहेत. सर्व मजूर मध्य प्रदेश येथील असून ते जालना येथे लॉकडाऊन मध्ये अडकले होते. घराच्या ओढीने सर्व मजूर पायी रेल्वे रुळाच्या मार्गे निघाले होते.याबाबत अधिक माहिती अशी की, जालना येथील एसआरजे कंपनीत मध्य प्रदेश येथील १९ मजूर काम करतात. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे ही मजूर जालना येथे अडकली गेली. दरम्यान, शासनाने परप्रांतीय मजुरांना घरी जाण्यासाठी विशेष रेल्वे सुरू केल्या आहेत अशी माहिती या मजूरांना मिळाली. तसेच भुसावळ येथून मध्य प्रदेशला रेल्वे जाणार असल्याची माहिती या १९ मजुरांना मिळाली असता पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी ते रेल्वे रुळाच्या मार्गे औरंगाबादच्या दिशेने चालत निघाले. सटाणा परिसरात रात्री थकून हे मजूर रेल्वे रुळावर झोपले. पहाटे अचानक  एक मालवाहू रेल्वे त्यांच्या दिशेने आली . काही कळायच्या आत १४ मजूर रेल्वे खाली  चिरडले गेले तर दोघे गंभीर जखमी असून तिघे प्राण वाचविण्यात यशस्वी झाले आहेत.जालना येथील स्टील कंपनीचे १९  कामगार भुसावळला  जाण्यासाठी रेल्वेरुळावरून पायी निघाले होते. सटाना परिसरात ते रुळावर झोपले असतांना मालगाडीने त्यांना चिरडले. यात १४ जण ठार  तर २ कामगार जखमी झाले. सर्वांचे मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथे आहेत.


  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...