शनिवार, ११ एप्रिल, २०२०

मादळमोहित पासट गरीब कुटुंबाला पंढरिनाथ बापू लगड कडुन                   पन्नास हजाराचा किराणा मालाची वाटप

मादळमोहि (हँलो रिपोर्टर) दि.10- महाराष्ट्रात कोरोणा सारख्या महामरीचा जोर वाढत चाललाय
त्यातच सर्वत्र लाँकडाऊन परस्थिती आहे.गरीबाना घरात पैशाची व खाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.महामारीचा ऊपद्रव कधी थांबेल सांगता येत नाही. मजुरी करुन खाणारी आणी ज्याला कामही होत नाही. आशा कुटुंबातील व्यक्ती उपाशीपोटी राहु नये म्हणून मादळमोत माजी सभापती श्री पंढरीनाथ लगड यांनी बीड जिल्यात सुरु आसणारे लाँकडाऊन व सोशल डिस्टंट चा नियम पाळत मादळमोहि च्या पासस्ट कुटुंबात पन्नास हजार रुपयाचा किराण हँलो रिपोर्टर संपादक चंद्रकांत हक्कदार. मादळमोहि पोलीस जमादार सोनवणे पो .काँ.गणेश गुरखुदे. पत्रकार रामकिसन तळेकर लक्ष्मण सरपते आंगणेवाडी सेविका गमेबाई.संगिता वखरे. टाकसाळ मँडम सौ.केशरबाई लगड यांच्या हस्ते .पंढरिनाथ लगड(बापू)यानी स्वतःच्या निवासस्थानी शिस्तबद्ध पध्दतीने 10 एप्रिल रोजी हा समाजीक ऊपक्रम राबवला आहे.
योग्यवेळी योग्य मदत हेच खरे समाज कार्य-
बीड जील्हयात कोरोना या महामारी आजारा मुळे सरकारने लाँकडाऊन घोषित केले आहे.पंधरा दिवसाचा कालावधी लोटलाय संचारबंदी कायम आहे.गरीबा सह श्रीमंतानी ही आपल्याला घरात कोंडुन घेतले आसुन यामध्ये गरीबाकडील पैसा आन्नधान्य.जवळ आसणारा पैसा कधीच संपला कुटुंब प्रमुख हताश झाला आहे.शासनाने मोफत रासेन ची घोषणा केली पण ती कधी पदरात पडणार या विंवचनेत सध्या गरीब लोक आहेत.म्हणून येथील सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जी.प.चे माजी शिक्षण सभापती पंढरिनाथ लगड यांनी आंगणेवाडी सेविकेला गावातील आतीशय गरीब कुटुंबाचा सर्व करण्यासाठी सांगितले त्यात संख्या हि अदिकच होती.पण त्यातील  40 लाभधारक निवडली पंरतु माल वाटप करताना मात्र पासस्ट कुंटुबाला किराणा द्यावा लागला.
स्वतः ची पन्नास हजाराची एफ.डी.तोडून केली गरीबाला मदत
लगड यांनी विचार केला कि आज गरीब लोक संकटात आहेत . मी जरी आज घरात दोन टाईम सुखात खात आसेल पण माझे गावातील गरीब कुटुंबातील कोणी ऊपाशी झोपु नयेत.गहु.तांदूळ. रासेन चे मिळाले पण त्यांच्या ईतर किराणा मालाचे काय याचा विचार केला व पन्नास हजारात  .एक एक लाभ धारकाला दोन कि.साखर दोन कि.तेल  .तिखट.शेंगदाणे. चाहापुडे आंगाच्या .व कपड्याच्या साबणी सह किमान दोन महिने पुरेल ईतका कीराणा दिला आसल्याने सदरील माल घेताना आनेकांच्या चेहर्यावर एक प्रकारे समाधान दिसत होते. कुठल्याही पदावर आथवा सत्तेत नसताना हि.गरीबाच्या घरात आशा संकट समयी जो नेता किंवा सामाजिक कार्यकर्ता धाऊन येतो तो व्यक्ती लोक विसरत नाहित.
आता ऊर्वारित गरीब कुटुबासाठि मादळमोहित कोणी दाता पुढे येईला काय?
दोन दिवसा पुर्वि कैलास भुजबळ यांनी मोफत रासेन  400 कुंटुबाला वाटप केले लगड यांनी पासस्ट गरीब कुटुंबात किराणा वाटला आहे.आता बाकीच्या गरीब कुटुंबाला समाजातील दानशुर व्यक्तीने पुढे येऊन मदत करावी आशि विनंती गेवराई तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने करण्यात येते.
 या सामाजिक ऊपक्रम यशस्वी करण्यासाठी आजीत वर्मा. सुरज लगड.आक्षय.किरण. लगड.विनोद भोपळे. हरिभाऊ जगताप. दत्ता तळेकर. माऊली दुधाळ.यांनी मोलाचे सहकार्य केले.

     एक मदतीचा हात

गरजूंना अन्नधान्य वाटप
गेवराई, प्रतिनिधी :- शिरसमार्ग येथील ग्रामपंचायत अंतर्गत मौ. सिरसमार्ग,तरटेवाडी,काळवाडी येथे कोव्हीड-१९ च्या अनुषगाणे करण्यात आलेल्या लॉकडाऊन  मुळे अनेक जनाचे रोजगार  बुडाल्यामुळे अनेक कुटुंब आज् उघड्यांवर आले आहेत त्याच जाणिवेतून सिरसमार्ग ता. गेवराई येथील तलाठी अशोक डरफे व ग्रामसेवक बाबासाहेब कूडके  यांनी गावातील प्रतिष्ठित  नागरिक तसेच सरपंच यांचेशी चर्चा करून "एक् हात मदतीचा" असा कार्यक्रम हाती घेतला आणि सर्व लोकांनी या मध्ये हिररीने सहभाग नोंदवला त्या कार्यक्रमाआंतर्गत आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करून घरोघरी जाऊन ज्याला जे शक्य  होईल तितकी मदत करण्याचे आव्हान करण्यात आले त्या मध्ये अनेक दानसुर लोकांनी आपल्या मदतीचा हात दिला कोणी तांदूळ कोणी गहू कोणी  पैश्याच्या स्वरूपात मदत केली त्यामधून तबल ७० गरजु कुटुंब निवडून त्यांना एक महिना पुरेल येवढे राशन व किराणा आज् दि. ११ वार् शनिवार रोजी सकाळी ११:०० वाजता  मा. उपविभागीय अधिकारी बीड श्री टीळेकर साहेब यांच्या हस्ते  घरोघरी जाऊन वाटप करण्यात आले. यां वेळी गेवराई पोलिस स्टेशनचे एपीआय काळे साहेब, मंडळअधिकारी मादळमोही साळुंके साहेब ,तलाठी डरफे, ग्रामसेव कुडके, सरपंच वखरे उपस्थित होते यावेळी समितीला मार्गदर्शन करताना  माननीय टिळेकर  साहेब  यांनी  गावातील  एकजुटीचे  व राबवलेल्या उपक्रमाचे  कौतुक केले तसेच या जागतिक संकटाला घरी राहून सुरक्षित राहून हरवण्याचे आव्हान केले. तसेच एपीआय  श्री काळे साहेब यांनी देखील उपक्रमाचे कौतुक करून  सर्वांना घरी राहण्याचे व पोलीस  प्रशासनाला सहकार्य करण्याचे आव्हान केले ग्रामसेवक बाबासाहेब कुडके यांनी आलेल्या पाहुण्यांचे आभार व्यक्त केले तसेच समितीमध्ये  असणारे  व सहकार्य करणारे पंचायत समिती सदस्य अनिल पवळ, सरपंच महारुद्र वखरे, माजी सभापती पांडूरंग कोळेकर,सोमेश्वर गचांडे, सुहास पवळ, दिनेश गुळवे, सुरेश मार्कड, काकासाहेब काळे ,भास्कर मार्कड ,नागेश रडे,शेख दस्तगिर, बंडू देवकर, गुलाब मगर,संचार उमाप,ऋषिकेश परदेशी,व सर्व गावकर्याने खुप सहकार्य केले.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...