शनिवार, २१ मार्च, २०२०

प्रधानमंत्री मोदी यांच्या आव्हानास साथ देऊयात,जालना जिल्ह्यात ''जनता कर्फ्यु "चे अनुकरण करू या जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे
जालना प्रतिनिधी :- प्रधानमंत्री  मोदी यांच्या
आवाहनास साथ देउुया.जालना जिल्ह्यातील आपण सगळे नागरीक 'जनता कर्फ्यू'चे अनुसरण करत रविवार 22 मार्च रोजी सकाळी 7 ते रात्री 9  या वेळेत घराबाहेर पडू नये असे जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे  यांनी सांगितले आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील आवाहनाचा सारांश :कोरोना व्हायरसच्या संकटा विषयी देशाला संबोधित करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की, संपूर्ण जग एका खोल संकटातून जात आहे. प्रधानमंत्री श्री. मोदींनी नागरिकांना घरी राहून संयम बाळगण्याचे आणि कोरोनाव्हायरस (साथीच्या रोग) साथीच्या आजाराला शक्य तेवढे पुढे पाऊल  टाकू न देण्याचे आव्हान केले. यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 22 मार्च रोजी सकाळी 7 ते नऊ या वेळेत सर्व नागरिकांना 'जनता कर्फ्यू'चे अनुसरण करण्याचे आवाहन केले.कोरोनाचे हे वाढते संकट,  130 कोटी लोकसंख्येच्या आणि विकासासाठी धडपडणार्या भारतासारख्या देशासाठी सामान्य घटना नाही. या जागतिक संकटावर मात करण्याचा आपला संकल्प आणखी मजबूत करावा लागेल, नागरिक म्हणून आपली सर्व कर्तव्ये पार पाडणे आणि केंद्र आणि राज्य सरकारांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करणे. आज आपण सर्वांनी स्वतःला संसर्ग होऊ नये आणि इतरांनाही संसर्ग होण्यापासून रोखण्याचा संकल्प केला पाहिजे.जरी असे काही देश आहेत ज्यांनी जलद निर्णय घेऊन आणि शक्य तितक्या आपल्या लोकांना दूर करून परिस्थितीवर नियंत्रण ठेवले आहे. आत्तापर्यंत आपण कोरोना साथीच्या आजारापासून वाचवण्यासाठी ठोस उपाय शोधू शकला नाही, किंवा लसदेखील विकसित केलेली नाही.अशा परिस्थितीत काळजी घेणे खूप स्वाभाविक आहे. कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक प्रभावित देशांच्या अभ्यासानुसार आणखी एक बाब समोर आले आहे. या देशांमध्ये, रोगाचा प्रसार सुरुवातीच्या काही दिवसांनंतर जवळजवळ स्फोट झाला आहे. कोरोनामुळे संसर्ग झालेल्या लोकांची संख्या जगात वेगवान वेगाने वाढली आहे.भारत सरकार या परिस्थितीवर सतत नजर ठेवून आहे .हे लक्षात ठेवून, मी आपणा सर्वांना आवाहन करतो की पुढील काही आठवड्यांसाठी तुमच्या घरातून बाहेर जावू नका. शक्य असेल तर, घरातूनच आपला व्यवसाय, नोकरीशी संबंधित कामे करण्याचा प्रयत्न करा.जे लोक सरकारी सेवा, आरोग्य सेवा, लोकांचे प्रतिनिधी, माध्यम कर्मचारी कार्यरत आहेत त्यांना बाहेर पडणे आवश्यक आहे. बाकी सर्वांनी  गर्दीपासून, समाजातील इतर लोकांपासून स्वत: ला वेगळे ठेवले पाहिजे.यासाठी यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 22 मार्च रोजी सकाळी 7 ते रात्री 9  या वेळेत सर्व नागरिकांना 'जनता कर्फ्यू'चे अनुसरण करण्याचे आवाहन केले. 
उद्या च्या जनता कर्फ्यु चे पालन करा - बालाजी बच्चेवार माजी जि.प.सदस्य
नांदेड /प्रतिनिधी (भगवान कांबळे) :- देशाचे पंतप्रधान
नरेंद्रजी मोदी यांनी केलेल्या जनता कर्फ्यु च्या आव्हानाला स्वयं स्फुर्तपने प्रतिसाद देवून रविवार दि. 22मार्च लक्षात ठेवा सकाळी 7 ते रात्री 9 वाजे पर्यंत घराबाहेर न पडता सहभागी होण्याचे आव्हान भाजप नेते बालाजी बचेवार यांनी केले आहे.आपणा सर्वांना माहितच आहे की, संपूर्ण जगात 'करोना' विषाणूच्या प्रादुर्भावाने जगात हाहाकार माजविला आहे.  या जागतिक महामारीच्या समुळ उचटनासाठी आपण ही सज्ज झाले पाहिजे; यासाठी आपण सर्वजण मिळून एकत्रितपणे याचा सामना करने गरजेचे आहे. यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी काल यासंदर्भात देशाला उद्देशून केलेले संबोधनही आपण ऐकलं असेलच. त्यांनी येत्या रविवारी, दि.22 मार्च रोजी 'जनता कफ़र्यू'चे ही आवाहन त्यांनी केले आहे. याबरोबरच आपण कोणती खबरदारी घ्यावी व जनता कर्फ्यु का महत्वाचा अस आहे याविषयीही त्यांनी सर्वांना संबोधित ही केले आहे.   आशा महा संकटसमयी सर्व देशवासीयांनी एकत्रित कृती करून एक जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य बजवावे, अशी आशा आहे.
त्याबरोबरच दुसरीकडे  हजारो लोक मोठी जोखीम घेऊन जनतेची सेवा सातत्याने करीत आहेत, जसे डॉक्टर, परिचारिका, रुग्णालयातील कर्मचारी, पोलिस, मीडिया बांधव, सरकारी कर्मचारी, रेल्वे आणि हवाई वाहतुकीशी संबंधित लोक  या सर्वांबद्दल दि. 22 मार्च रोजी सायं. 5 वाजता कृतज्ञता व्यक्त करावी असे मा.पंतप्रधानांनी आवाहन केले आहे.
'मी निरोगी तर माझा देश निरोगी ' हे आपण विसरता कामा नये. चला, आपण सर्वजण एकत्रितपणे संकल्प करून या. जागतिक अपतीचा सामना करू या.  सर्वांनी एक सामूहिक जबाबदारी म्हणून याचे सर्वांनी काटेकोर पणे पालन करावे असे आव्हान भाजपा नेते तथा  माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजी बचेवार यांनी केले आहे.
ग्रामपंचायत कार्यालय नाळविहिरा पंचायत समिती जाफराबाद यांनी दिली कोरोना विषयी माहिती.
जाफराबाद प्रतिनिधी :-नळविहीरा येथील सरपंच सौ.मिनाबाई रमेश पाटील गाडेकर  यांनी कोरोना विषयक जनजागृती केली.
या गावातील सर्व नागरिकांना आव्हान केले कि आपल्या आरोग्यासाठी आपल्याला 31 मार्च पर्यंत तरी सहकार्य करणे गरजेचे आहे.सर्वप्रथम आपल्या गावातील शाळा पुढील आदेशपर्यंत बंद ठेवण्यात येत आहे याची सर्वांनी नोंद घ्यावीतसेच उद्याच्या जनता कर्फ्यु मुळे व त्यानंतरही आपण अतिशय आवश्यक काम असेल तरच बाहेर पडा बाहेरगावी शक्यतो जाऊच नका व आपल्या गावात पण एका ठिकाणी अनावश्यक गर्दी करू नका राज्यभरात कोरोना व्हायरस ची साथ पसरलेली आहे.गावातील सर्व ग्रामस्थांना याव्दारे कळविण्यात येते कि,गावामध्ये
१० लोकांपेक्षा अधिक लोकांचा जमाव करण्यात येऊ नये, शक्यतोवर गर्दी टाळावी व कोरोना व्हायरसला प्रतिबंधात्मक उपाय म्हणून खालील प्रमाणे खबरदारी घ्यावी. हि विनंती
कोरोना व्हायरसची लक्षणे :-
१) श्वास घेण्यास अडचण.
२) खोकला.
३) ताप.
४) डोकेदुखी.
५) घशात(गळ्यात) खवखव.   
६) शिंका येणे.   
७) अशक्तपणा वाटणे.
प्रतिबंधात्मक उपाय : -
 १) साबण व पाणी वापरून आपले  हात वारंवार स्वच्छ धुवावे.
२) शिकंताना व खोकलतांना
    आपल्या नाकावर व तोंडावर
    रुमालचा वापर करावा.
३) शिळे अन्न तसेच शितपेय घेऊ नये.
४) गरम पाणी प्यावे.
५) सर्दी  किंवा फ्लू  सदृश लक्षणे असलेल्या लोकांशी जवळीकचा संपर्क टाळावा.
६) घर व परिसराची स्वच्छता ठेवावे.
७) शक्य असल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
आजाराची लक्षणे दिसल्यास उपायासाठी आपल्या जवळच्या शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. पुणे, मुंबई, औरंगाबाद किंवा आपल्या देशातील कोणत्याही मोठ्या शहरातुन आलेल्या ‌प्रत्येक व्यक्ती ने खबरदारी म्हनुण शासकीय रुग्णालयात चिकीत्सा करुन घ्यावी
सरपंच,उपसरपंच,सर्व सदस्य,ग्रामविकास अधिकारी व सर्व कर्मचारी.
ग्रामपंचायत कार्यालय  नळविहीरा ता.जाफराबाद जिल्हा जालना  असे यावेळी नळविहीरा सरपंच मीनाताई गाडेकर यानी  गावकऱ्यांना  माहिती दिली
कोरोना च्या विषाणू ची धास्ती,अंबड पोलिस ठाण्यात तक्रारदारांसाठी सँनिटायझरची केली व्यवस्था
अंबड पोलीसांचे जमावकडे लक्ष व जनजागृती मोहिम
अंबड/ प्रतिनिधी (आरविंद शिरगुळे) :- कोरोणाविषाणुचा
प्रादुर्भाव  रोखण्याचासाठी अंबड़ पोलिस ठाणे यांने पूर्ण पने खबरदारी घेतलेली असून तक्रार देण्यास येणाऱ्या तक्रारदारांना सँनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे तक्रारदारांना तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधून आल्यावरच आपली तक्रार नोदविल्या जाईल.तसेच पोलिस स्टेशन हद्दीत जमाव होऊ दिला नसून जनजागृति सुद्धा पोलिसांकडून करण्यात येत आहे. भारतातच नव्हे तर बऱ्याच देशामधे  कोरोना हाहाकार मजविला असून सर्वत्र भीतिचे वातावरण पसरलेले आहे. महाराष्ट्र शासनाकडून वेगवेगळी खबरदारी घेण्यासाठी उपाय योजना आखण्यात येत आहे. शाळा महाविद्यालय, मंदिर, यात्रा, आठवड़ी बाजार असे बंद करण्यात आलेले असून स्वछता राखुन काळजी घेण्याची आवाहन करण्यात येत आहे. त्यात अंबड़ पोलिस ठाण्याचे  पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी अंबड़ पोलिस स्टेशनमध्ये  काळजी घेतलेली आहे. पोलिस स्टेशनच्या ठाणे अमलदार कक्षाच्या बाहेर सर्व बँरीकेट लावून पँक करुण एक व्यक्तिच आत जाईल अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. बेरिकेटला कोरोना संदर्भात जनजागृति पोस्टर सुद्धा लावण्यात आलेली आहे0 जंतुनाशकाने हात धुवून तोंडाल रुमाल किंवा मास्क लावून आत प्रवेश करावा असा फलक लावून सँनिटायझर ठेवण्यात आले असल्यामुळे प्रत्येकी व्यक्ति   सँनिटायझर ने हात तोंडाल रुमाल किंवा मास्क धुवून लावून आत प्रवेश करताना पहावयास मिळत आहे तसेच पोलिस स्टेशन हद्दित असलेली दर्गा रवना पराडा  येथील सकलादी बाबा दर्गा येथे मोठ्या प्रमाणात भाविक भक्त दर्शनासाठी जातात त्यामुळे इथे यत्रेचे स्वरूप नेहमी पहायाला मिळते पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांनी येथे जाऊन तेथील पुजारी मुजावर व प्रतिष्ठित नागरिक व्यापारी यांच्या सोबत बैठका घेऊन जनजागृति केली व मंदिर दुकान बंद ठेवण्यात आले गुरुवार आठवड़ी बाजार दिवस असल्यामुळे पोलिसांनी सकाळ पासूनच बजारावर करडि नजर ठेऊन तिथे लगलेल्या दुकाने, नगर परिषद व तहसील कार्यल्याच्या कर्मच्यारी मदतीने हटविन्यात आल्या तसेच पोलिस स्टेशन हद्दित जमाव होऊ दिला जात नसून त्याची सुद्धा खबरदारी पोलिस निरीक्षक  नांदेडकर यांच्या कडून घेतली जात आहे. शहरातील जमाव होते असलेल्या  दुकान, पान शेंटर, हॉटेल यांना नोटिसा पोलिस स्टेशन कडून देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे पोलिस ठाणे अंबड़ हे कोरोना प्रादुर्भाव संदर्भात पुढे असल्याने दिसून येत आहे.
वैजापूर प्रक्रारणातील आरोपींना अटक करून फास्ट ट्रँक कोर्टात केस चालवा - वंचित बहुजन आघाडी
जालना प्रतिनिधी :- खंडाळा लाख गावात,
ता.वैजापूर, जि.औरंगाबाद येथील घडलेल्या घटने विषयी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तिव्र निषेध करून जिल्हाधिकारी जालना यांना निवेदन द्वारे आरोपींना कडक शिक्षा करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली .जातिवाधांनी बौद्ध कुटुंबावर रात्री अचानक तलवारीने व कुल्हाडीनी हल्ला करण्यात आला. या हल्यात बौध्द तरुण भिमराव बाळासाहेब गायकवाड(वय १७) यांच्यावर हल्ला केला व ते जागीच ठार झाला. माता पिता व लहान भावावर हल्लेखोरांनी हल्ला केला असता मुलाचे वडील बाळासाहेब गंगाधर गायकवाड व आई सौ.अल्का बाळासाहेब गायकवाड हे दोघेही गंभिर जखमी झाले व त्यांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात आय.सी.यु.मध्ये अँडमीट केले. आज ते मूत्युशी झुंज देत आहेत. या घटनेने खंडाळा(लाख),ता.वैजापूर, जि.औरंगाबाद या ठिकाणी नरसहार झाले आहे. भिमराव गायकवाड हे बौध्द समाजाचा आसल्यामुळे बौध्द समाजात एकच आक्रोश निर्माण झाला आहे. जातिवादी गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी व सर्व घटनेची निस्पर्शपणे चौकशी करून काही फरार गुन्हेगार असुन त्यांना तात्काळ अटक करून तात्काळ शिक्षा देण्यात यावी.
तसेच गायकवाड कुंटुबाच्या तक्रारीवरुण कलम ३०२ व जातीवाद्यांवर अँट्रासिटी अँक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा.व गायकवाड कुंटुबला न्याय देण्यात यावा या प्रकरणातील आरोपींना अटक करून फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवा. या मागणीसाठी निवेदन देण्यात आले,या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा पदाधिकारी दिपक डोके,विष्णु खरात, दिपक घोरपडे, अँड.कैलास रत्नपारखे, गौतम वाघमारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
अवकाळी पाऊस व वारा गारपीटमुळे नुकसान झाल्याने प्रशासनाने दखल घ्यावी- जाफराबाद तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी.
जाफराबाद प्रतिनिधी :- जाफराबाद तालुक्यातील
नळविहीरा, आंबेगाव, टेंभुर्णी व परिसरात आज (दि .१७ ) मंगळवारी रात्री ७.४५ वा. पंधरा मिनिटे अवकाळी वारे व पावसासह गारपीटही झाली आहे. भोकरदन तालुक्यातील बऱ्याच भागासह जालना जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी हीच अवस्था आहे.यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाण्याची शक्यता बळावली आहे.या अवकाळी वारे,पाऊस व गारपिटीमुळे आंब्याचा मोहर व फळे गळून पडली आहेत तर द्राक्ष, डाळिंब  आदी फळपीकालही याचा फटका बसला आहे.
       अगोदर पेरा झालेला काही अंशी  गहु, हरभरा, शाळू ज्वारी, करडई, मका काढणीच्या अवस्थेत आहे तर थोडी उशिराने पेर झालेली ही पिके आता पक्व होण्याच्या अवस्थेत आहेत. ऑक्टोंबर नोव्हेंबर मध्ये झालेल्या अती पावसाने शेत तयार करण्यात जास्त अवधी गेल्याने नंतर झालेल्या पेऱ्याचे प्रमाण अधिक आहे.
     यामुळे या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीमुळे अगोदरच हतबल झालेल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडल्याशिवाय राहणार नाही.
प्रशासनाने तात्काळ दखल घेत झालेल्या नुकसानीचा अंदाज घेऊन कार्यवाही केली पाहिजे.
दलित पॅंथर औरंगाबादच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन.
औरंगाबाद प्रतिनिधी :- .खंडाळा (ता.वैजापूर)
औरंगाबाद येथे बौध्द कुटुंबावर झालेला जीवघेणा हल्ला व त्या हल्ल्यात निर्घुण हत्या झालेला भिमराज गायकवाड यांच्या मारेकऱ्याचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी ह्या मागणीचे निवेदन औरंगाबाद जिल्हाधिकारी यांना दलित युथ पॅंथर औरंगाबाद शहर
पॅंथर संदिप गायकवाड यांच्याकडून देण्यात आले.

   कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सेवानिवृत्तीवेतनधारकांना          आवाहन

जालना प्रतिनिधी :-सध्या पसरत चाललेल्या कोरोना 
विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  जिल्ह्यातील सर्व सेवानिवृत्तीवेतनधारकांना आवाहन करण्यात येते की,निवृत्तीवेतनधारकांनी आपल्या शंका व अडचणीबाबत कोषागार कार्यालयामध्ये प्रत्यक्ष भेट देण्याचे  टाळावे. आपल्या शंका व अडचणी संदर्भात अपर कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन) यांचा दूरध्वनी क्रमांक (०२४८२) 223584, 223720 या किंवा  to.jalna@zillamahakosh.in या ई-मेल वर  संपर्क साधू शकता, तरी प्रत्यक्ष वैयक्तिक भेटी टाळून दूरध्वनी व ई-मेल या सुरक्षित संपर्क पर्यायांचा वापर करावा असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी वैशाली थोरात यांनी केले आहे.
जितेंद्र हाडूळे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक अनोखा उपक्रम तरुणांनी घ्यावा आदर्श -संजय परदेशी
बीड ता.प्रतिनिधी :-बीड तालुक्यातील मापपुरी  उपस्थित होते.
येथील भुमिपुत्र जितेंद्र हाडुळे यांच्या वाढदिवसा निमित्त 16 मार्च 2020 रोजी 2:00 वा.बीड तालुक्यातील स्नेहसावली बालघर -रामनगर येथे गरजु -विद्यार्थ्यांना अन्नदानांची वाटप करून केला वाढदिवस साजरा..।।बीड तालुक्यातील माळापुरी येथील स्वाध्यायाच्या माध्यमातून आपण शिकलेल्या गोष्टीटून व उच्च विचार आत्मसात असलेले एक तरूण ,जितेंद्र हाडुळे यांनी आपला वाढदिवस हा थाटामाटात साजरा न करता अनाथ मुलांना काहीतरी मदत व्हावी म्हणून त्यांनी,त्यानी बीड तालुक्यातील रामनगर येथील स्नेहसावली बालघर येथे वाढदिवस साजरा केला..स्नेहसावली बालघर रामनगर येथील संचालक-:अमर हाजारे यांनी बोलताना सांगितले की,देव हा माणसात आहे आणि माणुसकी ही प्रत्येकाच्या ह्रदयात...याचेच उदाहरण म्हणजे जितेंद्र हाडुळे यांच्या सारख्या तरूणांनी अनाथ मुलांन सोबत आपला वाढदिवस साजरा केला.खरंच आजच्या तरूणांनी त्यांचा आदर्श घ्यावा.तुमच्या सारख्या तरूणांनी जर अनाथ मुलांना मदत केली,तर या जगात आम्हाला जगण्याचे बळ मिळेल अशाप्रकारे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या व जितेंद्र हाडुळे यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या...जितेंद्र हाडुळे यांचा आदर्श वाढदिवस निमित्त त्यांचा मिञपरिवाराने ही उपस्थित लाभली होती.निलेश मोहीते सर,नितेश परदेशी,भागवत जंगले,अमोल तिपालेद,दशरथआरसुळ,परमेश्वर पडुळे,भागवत खुळे,राजेंद्र जंगले, दत्तात्रय गुंड,मयुर हाडुळे, आदींची

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...