शनिवार, ९ मे, २०२०

       आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा पुढाकार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेतील चार महत्वाच्या खासगी रुग्णालयात होणार महात्मा फुले जनारोग्य योजनेंर्गत उपचार


मराठवाड्यातील रुग्णांना मिळणार मोफत उपचाराचा लाभ



जालना,प्रतिनिधी:- औरंगाबाद येथील शेठ नंदलाल धूत, कमलनयन बजाज, एमजीएम आणि डॉ. हेडगेवार ही चार महत्वाची रुग्णालये राज्य शासनाच्या महात्मा फुले जनारोग्य योजनेत समाविष्ट आहेत. योजनेच्या यावर्षीच्या नविन करारा संदर्भात या रुग्णालयांच्या काही हरकती व शंकांचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी निरसन करून रुग्णालयांना योजनेंतर्गत समावेश असलेले उपचार देण्याविषयी आवाहन केले. त्याला प्रतिसाद  देत आज झालेल्या बैठकीत आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. त्यामुळे आता मराठवाड्यातील सामान्य जनतेला मोफत उपचार मिळू शकतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री श्री. टोपे यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे मराठवाड्यातील रुग्णांना दिलासा मिळणार आहे.औरंगाबादला कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांनी आज येथे भेट दिली. यावेळी त्यांनी एमजीएम रुग्णालयाला भेट दली. तेथील व्यवस्थापन अधिकाऱ्यांशी चर्चा केली.यावेळी त्यांनी शहरातील प्रमुख रुग्णालयांच्या व्यवस्थापन प्रमुखांसमवेत बैठक घेतली.
शहरातील धूत, बजाज, एमजीएम, डॉ. हेडगेवार ही मोठी रुग्णालये राज्य शासनाच्या महात्मा फुले जनारोग्य योजनेत सहभागी होते. मात्र यावर्षीच्या नविन कराराबाबत या रुग्णालयांच्या काही हरकती, शंका होत्या त्यावर  या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी या हरकती आणि शंकांचे निरसन केले आणि रुग्णालयांना आश्वासीत करतानाच सुधारीत करारानुसार नागरिकांना उपचार देण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत यावेळी करारावर रुग्णालय व्यवस्थापनाने स्वाक्षऱ्या केल्या. त्यानुसार आता या चार रुग्णालयांच्या माध्यमातून सामान्यांना उपचार मिळू शकतील.
या बैठकीस खासदार भागवत कराड, एमजीएम हॉस्पीटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुर्यवंशी, डॉ. हेडगेवार हॉस्पीटले डॉ. तुपकरी, डॉ. पांढरे, धुत हॉस्पीटलचे डॉ. गुप्ता, बजाज हॉस्पीटलचे डॉ.श्रीवास्तव, डॉ. पठाण आदी यावेळी उपस्थित होते.महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य  योजनेमध्ये राज्यातील १००० रुग्णालयांचा समावेश असून त्यामध्ये कोरोना आणि कोरोना शिवाय अन्य आजारांसह महाराष्ट्रातील १०० टक्के जनतेला लाभ देण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी बाळंतपण आणि सिझेरियन खासगी रुग्णालयात होत नव्हते. आता या योजनेंतर्गत त्याचाही समावेश करण्यात आला आहे. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करताना खासगी रुग्णालयांकडून आकारण्यात येणाऱ्या अवाजवी दराला चाप लावण्यासाठीही महत्वाचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला  असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सागितले.

     10 मे रोजी जालना शहराच्या हद्दीमध्ये संचारबंदी
      जिल्हाधिकारी रविंद बिनवडे यांचे आदेश जारी.
      

जालना,प्रतिनिधी :- जालना जिल्ह्यात लॉकडाउनमुळे  अडकलेल्या उत्तर प्रदेशातील कामगारांना जालना जिल्ह्यातून उत्तरप्रदेश राज्यात विशेष श्रमिक ट्रेनने उद्या दि.10 मे 2020 रोजी पाठविण्यात येणार असून त्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1)(३) नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करून दि. 10 मे 2020 रोजी सकाळी 10:00 ते साय. 6:00 वाजेपर्यंत जालना शहरातील हद्दीपर्यंत संचारबंदी लागू केली आहे.  या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवा, रुग्णालय, दवाखाने, औषधाची दुकाने, व उत्तर प्रदेश या राज्यातून मजूर किंवा कामगार ज्याना संबधीत तहसीलदार यांचे मार्फत ऑफलाईन पासेस निर्गमित केलेले आहेत या व्यक्ती तसेच अत्यावश्यक सेवेतील पास किंवा परवाना दिलेल्या व्यक्ती यांना सुट राहील.

हातभट्टीची दुचाकीवरुन वाहतूक

बीड :  गेवराई तालुक्यातील जातेगाव रोडवर एका दुचाकीवरुन हातभट्टीची वाहतूक करताना दोघांना पकडण्यात आले. त्यांच्याकडील 60 लिटर हातभट्टी व दुचाकी जप्त करत दोघांवरही गेवराई पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली.
गावठी दारु

      कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावास प्रतिबंध घालण्यासाठी बीड जिल्ह्यातील सर्व मद्यविक्री अनुद्यप्त्या जिल्हाधिकारी, बीड यांच्या आदेशान्वये बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. अशावेळी अवैध मद्य निर्मिती व विक्रीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोहीम राबविली आहे. आठ मे शनिवार रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक बीड श्री शेख यांनी त्यांचे पथकासह गेवराई शहराच्या हद्दीत असलेले गेवराई-जातेगाव रोडवर संतोष अंकुश पवार (वय 32) व विकास साहेबराव राठोड वय 23 वर्षे दोन्ही राहणार कोल्हेर रोड गेवराई हे त्यांच्या दुचाकीवर प्लास्टिकचे कॅन वाहतूक करताना दिसून आले. राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने त्यांना थांबवून त्यांच्याजवळील कॅनची तपासणी केली असता त्यांचे ताब्यात 35 लिटर क्षमतेचे, 20 लिटर क्षमतेचे व 5 लिटर क्षमतेचे हातभट्टी दारूने भरलेले प्लास्टिक कॅन दिसून आले. ज्यात 60 लिटर हातभट्टी दारू अवैध विक्री करिता नेत असल्याचे आढळून आल्याने सदर दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क बीड एम.ए शेख, जवान सांगुळे व वाहन चालक सुंदर्डे यांनी केली.

वंचित बहुजन आघाडी तर्फे हॅन्ड ग्लोज  व मास्क वाटप



परतुर प्रतिनीधी :- परतुर तालुक्यातील आष्टी येथे वंचित बहुजन आघाडी चे  राष्ट्रीय नेते आदरणीय एॅड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमीत्त आष्टी शहरात  ग्रामपंचायत सफाई महिला कामगारांना हॅन्ड ग्लोज व मास्क चे वाटप करण्यात आले.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष  रोहन वाघमारे,आकाश वाघमारे,आकाश मुंडे  उपस्थित होते.

बीड हॅलो रिपोर्टर

जम्मुचे दोन यात्रेकरू नांदेडला कोरोनाग्रस्त! - नांदेडमधील बाधितांची संख्या ४४


नांदेड (भगवान कांबळे ) :- जम्मू येथून नांदेडला आलेल्या दोन यात्रेकरूंना कोरोना ची बाधा झाल्याचे शनिवारी सकाळी समोर आले. नगिनाघाट परिसरातून गुरुवारी सायंकाळी काही यात्रेकरूंचे स्वब तपासणीसाठी घेतले असता त्यातील हे दोघे बाधित असल्याचे समोर आले आहे. यामुळे नांदेडला कोरोना बाधितांची संख्या आता ४० झाली असून यातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान शुक्रवारी रविनगर कौठा येथील आढळलेला कोरोना बाधित ट्रक चालक अनेक महिन्यापासून घरीच गेला नसल्याची माहिती मिळाल्याने तूर्तास त्या परिसराला कंटेंटमेंट झोन घोषित करण्यात आला नसल्याची माहिती मिळत आहे.होळी सणादरम्यान नांदेडमधील होला महल्ला उत्सवासाठी देशातील वेगवेगळ्या भागातून शीख यात्रेकरू नांदेडमध्ये दाखल झाले. टप्याटप्प्याने हे यात्रेकरू नांदेडला दाखल होत असताना तिकडे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ मार्चपासून देशभरात  लॉक डाऊन सुरू झाले. प्रवासी वाहतुकीची खाजगी व सरकारी साधने बंद करण्यात आली. दळणवळण ठप्प झाल्यामुळे सुमारे चार हजार यात्रेकरू नांदेडला अडकून पडले. काही दिवसापूर्वी पंजाब राज्यातील यात्रेकरू शासनाच्या परवानगीने त्यांच्या गावी पोहचले असले तरी इतर बऱ्याच राज्यातील यात्रेकरू अजूनही नांदेडला अडकून आहेत.दरम्यान, नांदेडला अडकलेल्या यात्रेकरूंची स्क्रिनिंगद्वारे वेळोवेळी  वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले. परंतु येथून पंजाबला गेल्यानंतर बरेच प्रवासी कोरोनाग्रस्त निघाल्याने आढळल्याने नांदेडला त्यांच्या संपर्कात आलेल्या व येथे थांबलेल्या यात्रेकरू व इतर व्यक्तींचे स्वब घेणे सुरू आहे. नगिनाघाट व आसपासच्या परिसरातून आतापर्यंत शंभरहून अधिक व्यक्तींचे स्वब घेण्यात आले असून या परिसरात थांबलेले जवळपास ३० जण आतापर्यंत कोरोना संक्रमित झाल्याचे आढळले. त्यामुळे प्रशासनाकडून या परिसरात बाधितांच्या संपर्कात आलेल्या सर्वांचे स्वब घेणे सुरू झाले आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी संत बाबा बलविंदर सिंघजी यांची भेट घेऊन सर्वांना स्वब देण्याचे आवाहन त्यांच्यावतीने करण्याची विनंती केली. दुसऱ्या दिवशी दस्तुरखुद्द विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनीदेखील नगिनाघाट येथे जाऊन बाबाजींशी चर्चा केली. त्यानंतर जम्मू येथील १४ व हरियाणा येथील दोन यात्रेकरुंनी आपले स्वब आरोग्य कर्मचाऱ्यांना दिले. याच परिसरात असलेल्या वेगवेगळ्या इमारतीत आरोग्य सेवा पुरवून बाधित व त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्याची तयारी प्रशासनाने दर्शविली आहे. त्यामुळे स्वब घेण्यापासून देखभाल करणे व पुढील उपचाराचे काम आणखी सुलभ होणार आहे.

बीड हॅलो रेपोर्टेर

उमरी तालुक्यातल्या मौ.शिरुर येथील वयोवृध्द महिलेच्या हत्येतील आरोपी निष्पन्न...



उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केला यशस्वी तपास

नांदेड(भगवान कांबळे) :- उमरी तालुक्यातल्या मौ.शिरुर येथे दि.२५ फेब्रुवारी २०२० रोजी ८५ वर्षीय वयोवृध्द महिला किशनबाई पुंडलीक पडोळे यांची दुपारी ०२-०० वाजल्याचे सुमारास कोणीतरी अज्ञात इसमाने तिचे डोक्यात लाकडी धीपली मारून गंभीर जख्मी करून निर्घृण खुन केल्याची व गळ्यातील सोन्याची पोत व कानातील मुद्या काढून घेतल्याची दुर्दैवी घटना घडली होती या घटने संदर्भात मयत वृध्द महिलेचा नातु साईनाथ गंगाधर पडोळे रा.शिरुर ता.उमरी यांनी दिलेल्या फिर्यादी वरून उमरी पोलीस स्थानकात अज्ञात आरोपी विरोधात दि.२६ फेब्रुवारी २०२० रोजी गुरक्र.३९/२०२० कलम ३०२,३९४ भादपी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.या वृध्द महिलेच्या खुनाच्या गंभीर गुन्ह्याचा तपास लावण्यात उमरी पोलीस प्रशासनाला यश येत नसल्यामुळे सदरील गुन्ह्याचा तपास जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सुरेश पाटील यांच्याकडे देण्यात आला.या गभीर घटनेचा तपास जिल्हा पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर,अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली धर्माबादचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या खुनाचा तपास विविध पध्दतींचा अवलंब करून तसेच तांत्रिक पुरावे हस्तगत करून दि.०६ में २०२० रोजी आरोपी शिवाजी रावसाहेब पडोळे वय ३० वर्षे रा.शिरुर ता.उमरी यास अटक केली सदरील आरोपीला न्यायालयात हजर केले असता सन्माननीय न्यायालयाने आरोपीस ३ दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली यावेळी तपासा दरम्यान आरोपीने मयत वृध्द महिलेच्या अंगावरील काढून घेतलेले गळ्यातील सोन्याची पोत व कानातील सोन्याच्या मुद्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून पुढील तपास चालु असल्याचे सभामजते.

सदरील खुनाचा तपास यशस्वीपणे करणाऱ्या उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या पथकात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे वाचन पोलीस उपनिरिक्षक गणेश राठौड,उमरी पोलीस स्थानकाचे पो.नि.अनंत्रे,सपोनि.शेवाळे,स्थानिक गुन्हे शाखा नांदेड येथील सपोनि.नाईक व त्यांच्या पथकातील कर्मचारी,धर्माबाद पोलीस स्थानकाचे पोउपनि.सनगल्ले,पोना.शितळे,पो.शिपाई फिरोज शेख,पो.शिपाई घोंसले,या सर्वांच्या मदतीने कोवीड-१९ प्रतिबंध बंदोबस्ताचे आव्हान सांभाळत सदरील गंभीर गुन्ह्याचा तपास जलद गतीने यशस्वीपणे करून घटनेतील आरोपीला जेरबंद केल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील व त्यांच्या पथकाचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.....

बीड हॅलो रेपोर्टेर

छत्रपती अन्न सहाय्यता छत्राच्या माध्यमातून मोतीगव्हाण येथे गरजुंना धान्य वाटप


 जालना (प्रतिनिधी) :- कोरोना या संसंर्गजन्य रोगाने थैमान घातले असल्याने संपुर्ण देशासह महाराष्ट्रामध्ये सुद्धा लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यावर नाही तर खेड्यापाड्यांवर सुद्धा मोठे संकट आले आहे. मोलमजुरी करून खाणारे लोकांच्या हाताला कामधंदा नसल्याने जालना जिल्ह्यातील बाजीउम्रद, माणेगाव (जा), माणेगांव (खा), राममुर्ती, सावरगाव, सावंगी तलाव, ब्राम्हणखेड, सिंधीकाळेगाव, मोतीगव्हाण,  येथे धैर्यशील अरविंदराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून उभा राहिलेल्या छत्रपती अन्न सहाय्यता छत्रच्या माध्यमातून गोर-गरीब गरजुंना धान्य वाटप करण्याचे काम मोठया प्रमाणात सुरू आहे.
याप्रसंगी बोलतांना धैर्यशील चव्हाण म्हणाले की, सद्या लॉकडाऊन असल्यामुळे ज्या गरजुंना धान्यांची गरज भासेल त्यांनी संपर्क साधावा त्यांना छत्रपती अन्न सहाय्यता छत्रच्या माध्यमातून धान्य उपलब्ध करून दिले जाईल. मोतीगव्हाण येथे छत्रपती अन्न सहाय्यता छत्रचे सहकारी उमेश मोहिते यांच्या हस्ते गरजुंना धान्य वाटप करण्यात आले आहे. यावेळी त्यांच्या सोबत विठ्ठल मोहिते, गणेश मोहिते, महादेव मोहिते, प्रवीण मोहिते, निवृत्ती घडलींग, आदित्य मोहिते आदींनी परिश्रम घेतले. या उपक्रमाबद्दल सर्व गावातील नागरीकांतून आभार व्यक्त करण्यात येत आहे. 

बीड हॅलो रिपोर्टर

आ.कैलास गोरंट्याल यांनी केली मान्सूनपूर्व कामांची पाहणी

जालना (प्रतिनिधी) :- नगर पालिकेच्या वतीने शहरात  मान्सून पूर्व मोठ्या  नाल्यांची साफसफाई  कामांची सुरूवात करण्यात आली असून शनिवारी ( ता. ०९) आ.कैलास गोरंट्याल यांनी या कामांची पाहणी केली.आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नगर पालिकेच्या वतीने मोठ्या नाल्यांची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली असून भाग्यनगर भागातील मोठ्या नाल्यांची साफसफाई सुरू आहे. आ. कैलास गोरंट्याल यांनी कामास भेट देऊन पाहणी केली.या वेळी  बबलू चौधरी,राम सावंत, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष शेख मेहमूद ,नगरसेवक जीवन सले,राष्ट्रवादी काँग्रेस चे शहराध्यक्ष  नंदकिशोर  जांगडे , स्वच्छता विभाग प्रमुख, संजय वाघमारे , स्वच्छता निरीक्षक सॅमसन कसबे ,,अरुण, वानखेडे, संदीप वानखेडे.यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच  मुख्याधिकारी यांच्या नेतृत्वाखाली नाले साफसफाईसाठी तीन जेसीबी ,पाच ट्रॅक्टर, पाच टिप्पर व सफाई कामगार असा मोठा लवाजमा तैनात करण्यात  करण्यात आला आहे. सदरील काम हे एक महिना चालणार असून यामध्ये शहरातील विविध ठिकाणचे एकूण 35 नालेसफाई करण्यात येणार असल्याचे स्वच्छता विभाग प्रमुख संजय वाघमारे यांनी सांगितले. या वेळी प्र.स्व.निरिक्षक रवींद्र कल्याणी, दफेदार श्रावण सराटे, सागर कदम आदी उपस्थित होते.






नगर पालिकेच्या वतीने मान्सूनपूर्व कामांची आ.कैलास गोरंट्याल यांनी पाहणी  केली. या वेळी बबलू चौधरी, शेख मेहमूद, राम सावंत, नंदकिशोर जांगडे, जीवन सले, आदी.


लाँकडाऊनच्या काळात विद्यार्थी आपल्या आवडत्या विषयाला देतात वाव

सिंधीकाळेगाव (प्रतिनिधी ):- सर्व परिक्षा झालेल्या असुन निकालाची वाट पाहणे सुरू आहे. माञ कोरोना ने खुप उग्र रूप धरले आहे.निकाल कधी आणी कसा येणार आणि आपन पुढे काय करावे आणि कसे करावे हि चिंता विद्यार्थी यांच्या मनात आहे. आणि त्यातुन दिलासा भेतन्यासाठी ते आपल्या आवडत्या विषय कडे वळले. असुन चिञकला हा विषय तासन तास हाताळत आहे. जालना तालुक्यातील सिंधीकाळेगाव येथील नंदकिशोर नारायण गिराम. या विद्यार्थीयाने B. A. ची परिक्षा दिली असुन चिञकला या विषय कडे आपली चांगली आवड म्हणुन पाहतो  .गणपती ,साई बाबा, आणि थोर पुरूष यांचे सुबक चिञ  हुबेहुब काढण्याचा छंद जोपासत आहे.असे नंदकिशोर गिराम याने सांगितले. जालना तालुक्यातील सिंधीकाळेगाव येथील नंदकिशोर गिराम याने हुबेहुब साईबाबा यांचे चिञ काढताना दिसत आहे.





बीड हॅलो रेपोर्टर

रेल्वे अपघात १६ कामगार मृत्युमुखी पडले या अपघाताला जबाबदार जालना तहसीलदार यांना निलंबित करून   कंपनी मालक याच्यावर ३०२ कलमांतर्गत गुन्हे नोंद करण्यात यावे - प्रकाश सोळंके


मनसे च्या वतीने मुख्यमंत्री मोहदय यांना निवेदन.



 जालना,प्रतिनिधी :- जालना एमआयडीसी येथे एका स्टील कंपनी कामगार काम करीत होते, लॉकडाऊन मुळे आपल्या मूळ गावी जाण्यासाठी जालना येथून औरंगाबादच्या दिशाने जाण्यासाठी निघाले होते,१९ कामगारांपैकी १६ कामगार रेल्वे अपघात मृत्युमुखी पडले, या कामगारांनी आपल्या गावी जाण्यासाठी शासकीय यंत्रणेसोबत संपर्क केला होता का नाही, जर संपर्क केला असेल तर ते पाई का निघाली होते, त्यांना जालना तहसीलदार त्यांनी योग्य मार्गदर्शन का केले नाही या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या जालना तहसीलदार यांना निलंबित करून, या संबंधित कंपनी मालकावर निष्काळजीपणा केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावे.

         मुख्यमंत्री सहायता निधीतून या कामगारांना ५ लाख रुपये मदत जाहीर केल्याबद्दल श्री .प्रकाश सोळंके यांनी मुख्यमंत्री मोहदय यांचे मनापासून आभार मानले.

या रेल्वे अपघातातील १६ कामगारांच्या मृत्यूला जबाबदार जालना तहसीलदार व कंपनी मालक असल्यामुळे तहसीलदार यांना निलंबित करून कंपनी मालकावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावे अशी मागणी श्री.प्रकाश सोळंके मनसे जिल्हाध्यक्ष जालना यांनी निवेदनात केली आहे.

अंबड़ तलुक्यातील वाड़ी शिराढोण येथील पिण्याच्या पाण्याची नागरिकांचे प्रश्न सुटले


संरप शेफ़ि पटेल, ग्रामसेवक मॅडम यांचे गावकारी व विद्यार्थी सेनेचे अद्यक्ष बाबू घुले, इतर कार्यकर्ते यांनी आभार व्यक्त केले


अंबड़/ प्रतिनिधि : लॉक डाऊन च्या काळात नागरिकांना पिण्याच्या पाण्याची वेवस्था मुळीच नव्हती अंबड़ तालुक्यातील वाडी शिराढोण येथील महाराष्ट्र शासन कडून  संरप शेफ़ि पटेल, ग्रामसेवक मॅडम  आडव, बाबु घुले , (विद्यार्थी सेना आध्यक्ष )  असलम पटेल , संदिप उघडे ,संमदर पटेल ,मंजर पटेल, अखेप पटेल , सोनु घुले, राजु घुले,राजु उघडे इत्यादि यांनी गावात पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सोडविले  पाणीपुरवठ्याची यवस्था करुन दिली व त्या गावातील नागरिकांनी आभार व्यक्त केली.

पोलीस ठाणे परतुर येथे कार्यरत असलेले पोलीस अधीकारी निलेश ताबे यांची मुदतवाढीची मागणी 

परतुर /प्रतिनिधी :-प्रशांत वाकळे
          परतुर तालुक्यातील पोलीस ठाणे परतुर येथे कार्यरत असलेले पोलीस अधीकारी निलेश ताबे यांची मुदत वाढीची मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना निवेदनाव्दारे करण्यात आली. निवेदनात असे म्हटले आहे की,पोलीस स्टेशन परतुर येथे कार्यरत असलेले पोलीस अधिकारी निलेश तांबे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी असुन त्यानी सिंघम स्टाईल ने परतुर तालुक्यातील अवैध धंध्दांना आळा घातला.असुन मटका,दारु,रेती माफीया परतुर शहरात हाहाकार माजवला होतो त्याच वेळी तांबे यानी ह्या माफीयांनवर अंकुश घातला आहे.तसेच अनेक गंभीर स्वरुपाच्या गुन्हांचा तपास व अनेक गुंडावर दहशत निर्माण करून परतुर शहरात शांततेचे वातावरण निर्माण केले आहे.म्हणुन सर्व सामान्य व्यक्ती निर्भयपणे जगत व वावरत आहे.म्हणुन अशा कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी यांची अजुन काही काळ परतुर येथे कार्यरत ठेवावे अशी मागणी नीवेदन देवुन नागरीकांणी केली आहे .यावेळी निवेदनावर शे.खालेख शे.अहमद कुरेशी,अँड आर एल पाईकराव ,एस एम आखाडे,सनि गायकवाड ,ईन्सान कुरेशी,राजु सोनटक्के,शहेबाज अन्सारी आदी च्या स्वासऱ्या आहे.

बीड हॅलो रिपोर्टर

स्टार मराठी न्युजचे संपादक गणेश कांबळे यांच्या वर दारू संबंधित बातम्या प्रसिद्ध करत असल्यांचा राग मनात धरून गणेश कांबळे यांच्यावर प्राणघातक हल्ला 



इंदापूर,प्रतिनिधी:- कोरोना वायरस पाश्वभमीवर संपूर्ण भारतात लोकडाऊन सुरू आहे,कोरोना वायरस संदर्भात जनजागृती करण्याचे काम हे पत्रकार आपल्या बातम्या करून लोकांन पर्यत पोहचवण्याचे काम हे पत्रकार आपल्या जीवाची पर्वा न करता वृत्तसंकलन करतात.अश्या परस्तीमध्ये दैनिक तुफान क्रांती वुत्तपत्राचे पुणे जिल्हा प्रतिनिधी तसेच स्टार मराठी न्युजचे संपादक गणेश कांबळे यांच्यावर बावड्यातील अवैद्य दारू विक्री करणार्याच्या सांगण्यावरून धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आला.पोलीसांना खबरी त्याचप्रमाणे सातत्याने दारू संबंधित बातम्या प्रसिद्ध करत असल्यांचा राग मनात धरून गणेश कांबळे व त्यांच्या साथीदारावरती धारदार शस्त्र हातात घेऊन जिवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला करण्यात आला यासंदर्भात भारतीय दंड संहिता १४३,१४७,१४८,१४९,३२३,५०४,५०६, यानुसार इंदापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश कांबळे यांच्यावर प्राणघातक हल्ला मुळे संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार संघटने वतीने ह्या घटनचा निषेध व्यक्त केला आहे व निवेदन सादर करण्यात आले
वाहन चालक मालक सामाजिक संघ,( कार्यक्षेञ - भारत )
 आविनाश तांदळे | बीड (बीड हँलो रिपोर्टर)
संपूर्ण भारतात कोरोना विषानुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठे प्रयत्न केले जात आहे मी माझ्या व माझ्या बांधवांच्या स्वास्थासाठी जरी कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन मध्ये सहभागी झाले आहे, तरीपण घेतलेले वाहन कर्जाच्या या अडचणीच्या वेळी कर्जपुरवठा करणाऱ्या फायनान्स कंपन्यांकडून नियोजित व थकित कर्जाच्या हप्त्यासाठी येणाऱ्या वसुलीच्या फोनला उत्तर देणे कठीण आहे, असे प्रत्येक ठिकाणी छोट्या-मोठ्या तसेच टुरिस्ट गाड्या व मालवाहतुकीच्या व्यावसायिकांस वाहन कर्ज धारकास प्रश्न निर्माण झाला आहे, कारण जरी सरकारने बँकांना सूचना दिल्या तरी संबंधित व्याज व्यतिरिक्त हप्ता चुकल्यावर लागणाऱ्या वाजवी 500 ते 2000 रुपये किंवा अधिक दंडास ही बळी पडावे लागणार आहे, तरी यावर सरकार व प्रशासनाने उपाययोजना करावी व भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी बर्‍याचश्या वाहन चालक मालक संघ व संघटना करीत आहे, तसेच वाहन चालक मालक सामाजिक संघ,( कार्यक्षेत्र भारत ) यांची ही आग्रही मागणी आहे,तरी सरकार व प्रशासन यांनी याची त्वरित दखल घेऊन  आम्हा सर्वांना योग्य दिलासा द्यावा ही नम्र विनंती,व तसेच गेली बर्याच दिवसापासुन आमची सर्व वाहन चालक व मालक यांची सर्व वहाने उभ्या स्थितीत आहेत,कुठलेही गाडी भाडे अथवा कुठल्याही प्रकारची दळनवळन होण्यास मार्ग नसल्यामुळे तमाम महाराष्ट्रातील चालक व मालक यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे,कृपया महाराष्ट्र शासन व प्रशासन याची त्वरीत दखल घ्यावी आम्हा सर्वांना योग्य दिलासा देण्यात यावा हि आग्राहाची परत एकदा नम्र विनंती करत आहोत,
 प्रकाश राक्षे मराठवाडा सचिव
 वाहन चालक मालक सामाजिक संघ,( कार्यालय भारत )
7798767279
जय,हिंद 
जयसंघ
जय सारथी,
🙏🙏🙏
बीड हँलो रिपोर्टर न्युज ब्लॉगवर आपले स्वागत आहे.
संपादक चंद्रकांत हक्कदार पाटील. आविनाश तांदळे .(कार्यकारी)संपादक.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...