गुरुवार, २ एप्रिल, २०२०

गरीब मजुरांवर रसायन फवारणीचा बरेलीतील प्रकार मानवतेला कलंक फासणारा असून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

 मुंबई प्रतिनिधी- कोरोना व्हायरस च्या भीतीने
लोकडाऊन च्या काळात  शेकडो मैलांची पायपीट करून आपल्या गावी परतलेल्या गरीब दलित मजुरांवर जंतुनाशक रसायन फवारणी करण्याचा मानवतेला कलंक फासणारा प्रकार उत्तर प्रदेशातील बरेली येथे घडला आहे. या प्रकाराचा तीव्र निषेध करून या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार असलेल्या प्रशासनाच्या  अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली आहे.
पोलीस प्रशासन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चांगले काम करीत आहेत. त्यांची कामगिरी कौतुकास्पद ठरत आहे. मात्र काही ठिकाणी पोलीस चुकीचे वागत असल्याची उदाहरणे येत आहेत. उत्तर प्रदेशात बरेली येथील  मजुरांवर केमिकल फवारणी चा अमानुष प्रकार त्यातील एक प्रकार आहे. केंद्र सरकार गरीब मजुरांच्या पाठीशी असून त्यांना आहे तिथे अन्नधान्य भोजन मोफत देण्याची व्यवस्था करीत आहे.प्रशासनाने मजुरांना सहानुभूतीने वागणूक देण्याची गरज आहे. कोरोना भीतीने माणुसकी विसरू नका; हात मिळवू नका मात्र साथ कुणाची सोडू नका असे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले आहे.

     

लॉकडाऊन असतानासुद्धा आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर पोलीस  प्रशासनाकडून कारवाई.
जालना, प्रतिनिधी:- कोरोना विषाणुचा 
प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रशासनामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत . संपुर्ण देशभरात 14 एप्रिलपर्यंत लाकडाऊन करण्यात आले असुन अशा परिस्थितीमध्येही विनाकारण रस्त्यावर फिरणान्यांवर पोलीस प्रशासनामार्फत कारवाई करण्यात येत आहे .जालना जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी चेकपोस्टची स्थापना करण्यात आली असुन या चेकपोस्टच्या माध्यमातून अनावश्यक वाहतुक करणान्यांवर कारवाई करण्यात येत आहे .जालना जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये आदेशाचे उल्लंघन करणान्या 84 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर 15 जणांना अटक करण्यात आली आहे . तसेच आदेशाचे उल्लंघन करणान्यांकडून 26 हजार 808 रुपयांचा दंडही वसुल करण्यात आला आहे . जालना जिल्ह्यात 2 एप्रिल राजा 12 रुग्ण नव्याने दाखल झाले आहेत . आतापर्यत 104 रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल होते . त्यापैकी 104 रुग्णांचे स्वंब घेण्यात आले असुन त्यापैकी 89 रुग्णांचे अहवाल निगेटीक प्राप्त झाले आहेत , 03 रुग्णांचे अहवाल रिजेक्ट तर 12 अहवाल प्रलंबित आहेत . आजरोजी 16 रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल असुन त्यांची प्रकृती स्थिर आहे .रुग्णालयातुन डिस्चार्ज झालेल्या तसेच परदेशी प्रवासाचे पूर्व इतिहास असणा - या सर्व व्यक्तींचे घरी अलगीकरण करण्यात आलेले आहे . आजपर्यंत 114 परदेश प्रवास केलेल्या व्यक्तीपैकी 113 व्यक्तींचे घरीच अलगीकरण करण्यात आलेले आहे . तसेच इतर शहरे व राज्यातुन आपलेल्या 13 हजार 105 व्यक्तींची तपासणी करुन त्यांचे घरीच अलगीकरण करण्यात आले आहे . संस्थेत अलगीकरण केलेल्या सहवासितांची ( Contact ) संख्या 185 असुन संत रामदास मुलांचे शासकीय वसतीगृह येथे 49 . डॉ . बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल - 39 , मुलीचे शासकीय वसतीगृह - 58 व अंजता ब्लॉक पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे 6 जणांना दाखल करण्यात आलेले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली आहे .

भुकेने व्याकुळ नागरिकांच्या मदतीला न्यायदेवता ही सरसावली
                           बीड हॅलो रिपोर्टर चा दणका
बीड हॅलो रिपोर्टर च्या बातमीची न्यायमूर्ती ने घेतली दखल.

नांदेड (भगवान कांबळे ):-  कोरोना सारख्या
महामारीत संपूर्ण भारतभर लॉक डाऊन असल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या व मोलमजुरी करून उपजीविका करणाऱ्या कुटुंबाची हेळसांड होत होती त्यावेळी हॅलो रिपोर्टर मध्ये दि.31 मार्च  2020 रोजी भोकरमध्ये १५० मजुरांची लॉकडाऊनमुळे फरफट;पोटापाण्याचा प्रश्न बनतोय गंभीर हि बातमी प्रकाशित करण्यात आली होती. व त्या बातमी ची दखल घेऊन भोकर येथील न्यायदेवतानी  गरजू लोकांच्या मदतीला उतरलेली दिसून आली.
  बूधवार दिनांक 1एप्रिल   रोजी भोकर शहरात बाहेरील जिल्ह्यातून येऊन उपजीविका करणारे व मोलमजुरी करणारे असंख्य नागरिक तंबू ठोकून असल्याचे व त्याची उपासमार होत असल्याचे दिसून आल्यावरून भोकर येथील जिल्हा न्यायाधीश

श्री मुजीब शेख यांनी अशा 35 ते 40 गरजू कुटुंबांचा शोध घेऊन त्यांना एक आठवडा पुरेल एवढे तांदूळ, गहू, तेल, साखर, तुरदाळ, चहापत्ती, बिस्कीटचे पुडे, अशा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करून मानवतेचा संदेश दिला आहे. भोकर शहरातील बटाळा रोड,उमरीरोड,किनवट रोड, नांदेड रोडवरील मोलमजुरी करून नागरिक असल्याची कुणकुण न्यायाधीश महोदयांना लागताच त्यांनी तात्काळ आपला ताफा घेऊन प्रत्यक्ष तंबू ठोकून असलेल्या मजूरा पर्यंत जाऊन त्यांना मदत दिल्याने मजुरी करून जीवन जगणाऱ्या नागरिकांचे डोळे पाणावले होते, प्रत्यक्षात न्यायदेवता आमच्या घरी येऊन आम्हाला न्याय दिल्याची भावना अनेक नागरिकांनी हॅलो रिपोर्टर शी बोलताना व्यक्त केल्या. यावेळी न्यायाधीश श्री मुजीब शेख यांच्यासोबत  न्यायाधीश श्री पांडे सर, तहसीलदार मुंढेसर सहाय्यक पोलीस निरीक्षक गजभारे मॅडम यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
या देशातील आम्ही पूर्वीचे राज्यकर्ती जमात 
                    मास राजाभाई सूर्यवंशी
                   🙏M🙏A🙏S🙏S
आमच्या कुळातील राज्यांनी या देशावर राज्य केलं आणि अनेक राजवाडे उभे केले ह्या देशाच्या आठ संस्थानांमध्ये मातंग कुळाचे राज्य होते आणि कालांतराने ही राज्यकर्ती जमात देशोधडीला लागले आहे  आज तुम्ही राजवाड्यात तर राज्य करू शकत नाही परंतु मातंग समाजाच्या हिताचे काम करून मातंग समाजाच्या मांगवाड्यात मांग वाड्यातील मांगाच्या हृदयावर राज्य नक्कीच करू शकता
राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये येल्या  मांग सर्जा मांग व अनेक मांग  जातीतील शूरवीर योद्धे गड किल्ल्याचे संरक्षण करायचे
तुम्ही आजच्या युगामध्ये कमीतकमी मागांचे व मांगवाड्याचे तर संरक्षण करा
देश (संस्थान) स्वातंत्र्य व  रक्षणासाठी अनेक देशभक्त घडवले क्रांतिकारक निर्माण करून पारतंत्रा तुन स्वातंत्र्य मिळऊन दिले   व महिलाना तसेच दलितांना शिक्षण  मिळऊन देण्यासाठी खऱ्या अर्थाने ज्यांनी स्वरक्षण व शिक्षणाची चळवळ चालवली ते आपले क्रांतिपिता वीर लहुजी साळवे
 किमान त्यांचा आदर्श डोळ्या समोर ठेवून तरी समाज हिताचे काम केले पाहिजे मला माहिती आहे आताच्या युगात  तुम्ही इतर जातिधर्मातील क्रांतिकारक घडवू शकत नाही शैक्षणिक क्रांती घडऊ शकत नाही
 परंतु मातंग जातीतील अनेक युवकानं मध्ये शिक्षणाची आवड निर्माण करू शकता  मातंग युवक वीर योद्धा जातीसाठी माती खाणारे तुम्ही निर्माण करू शकता या जातीय गुलामीतून मुक्त करू शकता या  जाती  जाती च्या उतरंडीतून होणाऱ्या अन्याय अत्याचारा विरोध बंड करण्याची उर्मी समाजातील युवकांन मध्ये तुम्ही  निर्माण करून आज ही या देशा मध्ये आपले  स्वतःचे अस्थित्व आहे हे प्रस्थापित व्यवस्थेला दाखऊ शकता
वीर फकिराने इंग्रजांचा खजिना लुटून या देशातील सर्व वंचित घटकांच्या पोटाची खळगी भरली
 अमिरो को लुटताय और गरिबोको बाटताय  आमचा हा फकिरा अर्थातच इंग्लिश भाषेतील  रोबिंहूड ज्याने मरणाऱ्या माणसांना जगवलं शब्दाला जगला व वचनावर मेला
 तुम्ही ही इथल्या काळ्या  इंग्रजांचा अर्थात शासनाचा  सरकाराचा जो काही आपल्या हक्काचा खजाना ठेवला आहे तो लुटून मांग समाजाच्या पदरात टाका त्यांच्या पोटा ची खळगी भरा
 साहित्यसम्राट डॉ अण्णाभाऊ साठे यांनी या भारत देशातील नव्हे तर ह्या विश्वातील शेतकरी कष्टकरी कामगार व वंचित उपेक्षित घटकाचे जगणे कसे असते त्यांच्या व्यथा जगाच्या पटलावर मांडले.. या सर्व उपेक्षित घटकाचे प्रतिनिधीत्व एका पदतीने आपल्या साहित्याचा रूपाने केले आहे.
माझ्या समाज बांधवानो तुम्ही या देशातील सर्व उपेक्षित घटकांना नक्कीच न्याय देऊ शकता परंतु सध्या घडीला तुम्ही या शासन दरबारी मांग  मातंग समाजाचा व्यथा जरी मांडले तरी, मांग जातीतील लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील आणि तुम्हाला देखील एक मानसिक समाधान मिळेल की किमान मी माझ्या  समजा साठी काय तरी केल..... 
वरील सर्वच महापुरुष हे समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी व देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. आपलं जीवन  चंदना सारखे झिजवले आणि आपल्याला हा जगण्याचा सुगंधित मार्ग दिला*
 माझे सर्व मातंग समाजातील बांधवांना भगिनींना विनंती आहे की आपण किमान (मांग) मातंग जातीसाठी तरी काम केलं पाहिजे*
मास राजाभाई सूर्यवंशी
🙏M🙏A🙏S🙏S
वंचित बहुजन आघाडीचा वतीने कोरोना पार्श्र्वभूमीवर विविध उपक्रम राबविण्यात येणार-दिपक डोके
रेल्वे स्टेशन परिसरातील गरजुंना उल्पआहार व अन्नदान  वाटप
जालना(प्रतिनिधी) :-सध्या कोरोना
विषाणुच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या संचारबंदीमुळे गोर गरीब जनतेचे हाल होत असुन मोठ्या प्रमाणावर उपासमार होत आहे.बहुजन वंचित आघाडी या गोर गरिबांच्या मदतीसाठी पुढे आली असुन पक्षाचे नेते अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या सूचनेवरून जिल्ह्यातील विविध तालुकानिहाय मदत कार्याचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. जालना शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील गरजुंना उल्पआहार वाटप करण्यात आले आहे.
 कोरोना व्हायरस मुळे अखंड देश चिंतेत आहे प्रत्येक जिल्हाधिकारी यांनी जिल्हाबंदी,संचारबंदी लागू केल्यामुळे बांधकाम मजूर
भुमिहिन शेतमजुर तसेच एका वेळेच्या भाकरीवर
जगणाऱ्या लोकांचे जीवन कठीण बनले आहे.या गोर गरीब नागरिकांची रोजंदारी बंद झाल्याने रोजी रोटीचा प्रश्न भेडसावत आहे अशा या नागरिकांची बंद काळात  योग्य ती सोय व्हावी  यासाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी हे शक्य होईल त्या प्रमाणात मदत कार्यात उतरले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मदत करण्याचा उपक्रम हाती घेत रेल्वे स्टेशन परिसरातील गरजुंना उल्पआहार वाटप करण्यात आला आहे.यामुळे संचारबंदी काळात नागरिकांना मोठी मदत झाली.शासनाने घेतलेल्या खबरदारीच्या निर्णयाप्रमाणे व सर्व सुचनांचे पालन करत वंचित बहुजन आघाडीची टिम हे मदतकार्य करत आहे. वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी दिपक डोके, अशोक खरात, अकबर इनामदार, विष्णु खरात, दिपक घोरपडे, अँड.कैलास रत्नपारखे, सचिन कांबळे, विनोद दांडगे, कैलास रत्नपारखे, रमाबाई होर्शिळ, मैनाबाई खंडागळे, बाळासाहेब रत्नपारखे, राहुल भालेराव, दिपक रत्नपारखे, अर्जुन जाधव, संतोष आढाव, अनिल झोटे, गौतम वाघमारे, किशोर जाधव,खाजा खान,लखन चित्तेकर, राहुल रत्नपारखे,शिध्दु कनकुटे, विकास लहाने, संतोष मगर, अरविंद होर्शिळ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मदत कार्य करीत आहेत.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...