रविवार, २८ जून, २०२०

जिल्ह्यात 42 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह तर 19 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज - जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

जालना,ब्युरोचीफ :- शहरातील लक्ष्मीनारायणपुरा 02, संभाजी नगर 02, रामनगर विनकर कॉलनी 01, नरिमननगर 01,रहेमान गंज 01,आनंदनगर 03, समर्थनगर02, लक्कडकोट04,खडकपुरा 03 अशा एकुण 19 रुग्णांवर यशस्वी उपचार करुन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला तर जालना शहरातील नळगल्ली 01, संजोग नगर 01, क्रांती नगर 01,यशोधरा नगर 01, खडकपुरा 05,अंबड रोड जालना 01, मंगळबाजार 02,रहेमान गंज 15, योगेश नगर 01, सत्यनारायण चाळ 01,मस्तगड 01,दानाबाजार 10,पानशेंद्रा ता. जालना येथील 01,भारज बु ता जाफ्राबाद येथील 01, अशा एकूण 42 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.
जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण–4012 असुन  सध्या रुग्णालयात-130,व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-1563, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या–46, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या -5063 एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने–42 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-504, एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-4503 रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-408 एकुण प्रलंबित नमुने-52, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-1420.
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती–03, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती –1255, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-33, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-213, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-43, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-130, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-58, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-19, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-336, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-142 तर संदर्भित रेफर केलेली रुग्ण संख्या-13, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-13087, तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 13 एवढी आहे.आजसंस्थासत्मवक अलगीकरणात असलेल्या0 व्यखक्तींबची संख्या  213 असून /संस्थारनिहाय माहिती पुढील प्रमाणेःपोलीस प्रशिक्षण केंद्र जालना-02,शासकीय मुलींचे वसतिगृह  मोतीबाग जालना_03,संत रामदास वसतिगृह जालना-36,डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह जालना-18, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह जालना-37,बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय जालना-13,मॉडेल स्कूल परतुर-10,डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह अंबड-01,शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-16,शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर-03,मुलींचे शासकीय वसतीगृह भोकरदन-03,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी _02,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह भोकरदन इमारत क्र 02-17,पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -00,हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद-20, राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कुल टेंभुर्णी ता.जाफ्राबाद 20,जे बी के विद्यालय टेंभुर्णी 00,शेठ इ बी के विद्यालय टेंभुर्णी 00,आय टी आय  महविद्यालय जाफ्राबाद 12.लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत - 171 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन 888 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 828 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली  4 लाख 49 हजार 530 असा   एकुण 4 लाख 76 हजार 338 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.  

जालना शहरातील लक्कडकोट, मस्तगड, रामतिर्थ व राजमहाल टॉकीज येथील पुल नागरिकांच्या रहदारीसाठी बंद - जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे आदेश जारी


जालना,ब्युरोचीफ :- कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालना रवींद्र बिनवडे यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व महाराष्ट्र कोव्हीड-19 उपायययोजना नियम 2020 मधील तरतुदीनुसार जालना शहरातील नवीन जालना ते जुना जालना येथे होणारी नागरिकांची वाहतुक बंद करण्याच्या अनुषंगाने जालना शहरातील लक्कडकोट, मस्तगड, रामतिर्थ व राजमहाल टॉकीज येथील पुल नागरिकांच्या रहदारीस पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, अधिकारी, कर्मचारी, संस्था अथवा समुह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 आणि भा.द.वि. 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे समजण्यात येऊन पुढील दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.

बाजार गेवराई येथील नवतरूण शेतकऱ्यांची आत्महात्या..!


बदनापूर,ब्युरोचीफ :- बदनापूर तालुक्यातील बाजार गेवराई येथे दिनांक 28 सकाळी 03:00 दरम्यान जोरदार पावसामुळे सदर शेतकऱ्याच्या कापुस बाजरी आदी पिके वाहुन गेल्यामुळे दुबार पेरणीच्या संकटामुळे निराश होऊन सदर शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलले  व आपल्या राहात्या घरी विषारी औषध प्राशन केले नातेवाईकांनी उपचारासाठी औरंगाबाद रूग्णालयात नेत असताना  रस्त्याच प्राणज्योत मावळली सदर शेतकऱ्यांच्या  नवतरूण शेतकरी बळीराम ज्ञानेश्वर कान्हेरे वय 24 राहात्या  दिनांक 28 संकाळी: 11:00 वाजेदरम्याण घरी असलेल्या मोनोसिल नावचे मागिल वर्षीची आणलेल्या औषध प्राशन केले सदर शेतकऱ्यांचे  वडील  अशिक्षित असल्याने सदर बळीराम हा  शेती व अथिंक  व्यवहारात हा नवतरूण शेतकरी करत होता सदर  त्याच्या पश्चात आई वडील भाऊ आजी असा परिवार आहे.

बदनापूर शहरासहित लागत असलेल्या गावावर पुन्हा धोधो पाऊस


नुकतेच पेरणी करून मोकळा झालेला बळीराजा आता चिंतेत भर


बदनापूर,ब्युरोचीफ :-  बदनापूर शहरासह लगत असलेले गावावर पावसाचा पुन्हा मारा आज दु. 03: 45 वाजेला पावसाची सुरुवात झाली असून आधीच अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झालेले आहे त्यात पुन्हा पावसाचा भर पडला पुन्हा नदीनाले एक झाल्याचे चित्र निर्माण झाले शेतामध्ये पाणी साचल्याने तलावाच स्वरूप निर्माण झाले. दुधा नदीचा आणखीन ओघ वाढला तर अधिक पाऊस झाल्याने आता शेतकऱ्यांना थोडी पावसाने दिलासा द्यायला हवा जेणेकरून शेतकरी हा शेतात पेरलेल्या पिकांचं नुकसान होणार नाही अशीच चर्चा सर्वसामान्य शेतकऱ्यांची गावागावातून व चव्हाट्यावर होत आहे.काळ्या आईच्या गर्भात नुकतेच पेरणी करून मोकळा झालेला बळीराजा आता चिंतेत आहे.की पेरलेलं पीक उगतका नाही जमिनीतच सोडून जाते असे चिंता शेतकरी बांधवांना लागली आहे. म्हणून तरी पावसाने थोडा दिलासा द्यायला हवा अशी ही आता चर्चाला उधाण आल आहे.

अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून मनसेचे जिल्हा अध्यक्ष गजानन गीते यांनी दिले रोहयो मंत्र्यांना निवेदन.


बदनापूर,ब्युरोचीफ:- तालुक्यातिल अतिवृषटी झालेल्या गावाना रो.ह.यो.मंत्री मा.संदीपानजी भुमरे साहेब भेट दिली अस्ता मनसे जालना जिल्हया च्या वतिने निवेदन दिले व तालुक्यातिल सर्व शेतकरया चे नुक़सान झालेली माहीती सांगीतली व मंत्री महोदयानी पूर्ण निवेदन वाचले व उद्याच्या क़ॅबीनेट मधे ही सर्व माहीती देउन तत्क़ाळ मदत जाहीर करतो या  दौरया वेळी सोबत मा. माज़ी मंत्री सन्नमांनिय अर्जुनरावजी भाऊ खोतकर ,आमदार नारायणरावजी कुचे साहेब,मा.आमदार संतोष जी सांबरे साहेब ,शिवसेना जिल्हा प्रमुख मा.भास्कररावजी अंबेकर साहेब,जिल्हाप्रमुख ए.जे. बोराडे साहेब,मनसे चे ज़िल्हाध्यक्ष गजानन गिते ,कॅाग्रेंस चे जेष्ट नेते भिमराव जी आबा डोंगरे साहेब , भानुदासरावजी घुगे नाना,सभापती जयप्रकाश दादा चव्हान ,भाऊसाहेबजी पाऊलबुधे ,सरपंच राजुबापू जर्हाड,शिवसेना तालुका संघटक नंदुभाउ दाभाडे,बालाभाऊ परदेशी,निव्रती महाराज डाके,शेतकरी संघटनेचे संतोष आबा चव्हान,राष्ट्रवादी चे नारायण राव अवघड़,शिवाजीराव कराड़ ,मनसे चे गोविंद काळे,तहसीलदार छ्याया ताई पवार ,व शासन प्रशासनातील सर्व अधिकारी आणि सर्व राजकीय पक्षाचे नेते व पत्रकार बांधव उपस्थित होते..


जालना औरंगाबाद रोडवर सारथी पेट्रोलपंप समोर बाप लेकाचा अपघात


बापचा जाग्यावर मृत्यू तर मुलगा जखमी.

बदनापूर ब्युरोचीफ :- बदनापूर मधील पाडळी येथील साधारण कुटुंबातील आप्पा लक्ष्मण सिरसाठ व परमेश्वर आप्पा साहेब सिरसाठ हे दोघे बाप लेक जालना औद्योगिक वसाहतीत रुपम स्टील कंपनी मध्ये अनेक वर्षांपासून मजुरी कामानिमित्त दुचाकीवरून जाय ये करत असे परंतु  काल काळाने घाला घातला आणि होत्याच नव्हतं झाल.
  दि.27: वार शनिवार रोजी दोघे बाप लेक कामा वरून घराकडे येत असताना सायंकाळी 8:00 वाजता  औरंगाबाद- जालना रोडवरील महिको कंपनी च्या लगत असणारा सारथी पेट्रोपम वर दुचाकीत पेट्रोल टाकून निघाले आणि काही हाकेच्या आंतरावर हावे रोड वरती अचानक पाठीमाघून येणाऱ्या अनोळखी गाडीने धडक दिली त्यात  अप्पासाहेब लक्ष्मण सिरसाठ यांना डोक्याला जबर मार लागल्याने गंभीर  अवस्थेत जाग्यावर मृत्यू झाला तर मुलगा परमेश्वर आप्पासाहेब शिरसाट हा  जखमी अवस्थेत असताना जालना हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते.
अप्पासाहेब लक्ष्मण शिरसाट यांना जालना सिविल हॉस्पिटल  येथे दाखल करण्यात आले परंतु डॉ यांनी मृत्यू झाले असे सांगितले येथे पीएम करण्यात आले असता दि.28 रोजी आज सकाळी 11:30 वाजता पाडळी गावी येथे त्यांच्या पार्थिवर अंतिम संस्कार करण्यात आला.
त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी पत्नी दोन सुना आहे..
तर संपूर्ण पाडळी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे..

जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांची पत्रकार परिषद संपन्न


कोरोनाला जिल्ह्यातुन हद्दपार करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा


जालना,ब्युरोचीफ :-  जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आज कोरोना विषाणुच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पत्रकारांशी संवाद साधत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या उपायोजनांची माहिती देत कोरोनाला जालना जिल्ह्यातुन हद्दपार करण्यासाठी जनतेने प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, अनावश्यक घराबाहेर जाणे टाळावे, मास्क, सॅनिटायजरचा सातत्याने वापर करण्याबरोबर सामाजिक अंतराचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

            यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रवींद्र परळीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम.के. राठोड, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष कडले आदींची उपस्थिती होती.

पत्रकार परिषदेमधील मुद्दे

·         जालना जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांची एकुण संख्या 504 एवढी झाली असुन आजपर्यंत 317 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.  13 रुग्णांचा मृत्यू झाला असुन आजघडीला जिल्ह्यात 174 रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.

·         केवळ अर्ध्या तासामध्ये कोरोनाविषाणुने व्यक्ती बाधित आहे किंवा नाही हा अहवाल देणाऱ्या अँटीजेन टेस्टसाठी 50 हजार किटसची मागणी नोंदविण्यात आली आहे.

·         जिल्ह्यामध्ये अँटीबॉडी टेस्टसाठी 100 किटस उपलब्ध असुन या माध्यमातुन शास्त्रोक्त पद्धतीने  व्यक्तींची तपासणी करण्यात येणार आहे.

·         नवीन जालन्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या अधिक असुन त्यामानाने जुन्या जालन्यामध्ये संख्या कमी आहे. विनाकारण नागरिक नवीन जालना व जुन्या जालनमध्ये गर्दी करत असल्यामुळे होणारी  गर्दी टाळण्यासाठी जुन्या व नवीन जालन्याला जोडणारे पुल काही काळासाठी बंद करण्यात येत असुन या पुलावरुन केवळ रुग्णवाहिकेला वाहतुकीची परवानगी असणार आहे.

·         पालकमंत्री राजेश टोपे यांच्या पुढाकाराने जालना जिल्ह्यात आरटीपीसीआर लॅब उभारणीस मंजुरी दिली असुन या लॅबचे काम युद्ध पातळीवर करण्यात येत आहे.  येत्या काही दिवसात लॅबचे काम पुर्ण होऊन सुसज्ज व अद्यावत अशी लॅब सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले असुन या लॅबसाठी लागणारे तांत्रिक मनुष्यबळही उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

·         कोरोनाबाधितांवर उपचार करणारे डॉक्टर्स, आरोग्य सेविका यांचे मनोबल कायम रहावे यासाठी मानसोपचार तज्ज्ञांमार्फत या कर्मचाऱ्यांचे समुपदेश करण्यावर भर देण्यात येत आहे.

·         पालकमंत्री राजेश टोपे यांच्या प्रयत्नातुन जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी 29 दिवसामध्ये कोव्हीड हॉस्पीटलची उभारणी करण्यात आली असुन या ठिकाणी 40 व्हेंटीलेटर बरोबरच सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्या आल्या आहेत.  पुरेशा प्रमाणात वैद्यकीय अधिकारी, कर्मचारीही उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

·         ग्रामीण भागात आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

·         60 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या व मधुमेह, ऱ्हदयरोग, रक्तदाब यासारखे आजार असणाऱ्या व्यक्तींचे घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. यामध्ये कोरोना संक्रमितांच्या संपर्कात आलेला अथवा कंन्टेन्टमेंट झोनमध्ये असतील अशा व्यक्तींना तातडीने उपचार करण्यात येणार आहेत.

·         कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी प्रत्येकाने सामाजिक अंतराचे पालन करणे, मास्कचा वापर करणे, सॅनिटायजरचा वापर अथवा साबणाने वारंवार हात धुणे या बाबींची सवय अंगिकारावी.

·         समाजातील प्रत्येक नागरिकाने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी पौष्टीक आहाराबरोबर प्राणायाम, व्यायाम  सारख्या बाबींचा अवलंब करण्याबरोबरच मानसिक स्वास्थ टिकुन राहण्यासाठीही प्रयत्न करण्याची गरज.

·         पल्स ऑक्सीमीटरच्या माध्यमातुन एसपीओ2, ब्लड सॅच्युरेशनचे प्रमाण कळत असल्याने प्रत्येक नागरिक घरातल्या घरात तपासणी करु शकतो.  94 पेक्षा लेव्हल असेल व आपल्याला सर्दी, खोकला किंवा ताप यासारखी लक्षणे असल्यास तातडीने जवळच्या रुग्णालयास संपर्क साधावा.

·         सर्व्हेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपली खरी माहिती द्या. जेणेकरुन आपल्याला काही त्रास असल्यास त्यावर तातडीने उपचार करणे शक्य होईल.

·         जालना जिल्हयात एकुण 119 कंन्टेन्टमेंट झोन होते. त्यापैकी 37 झोन ॲक्टीव्ह असुन या झोनमधुन एकही व्यक्ती बाहेर जाणार नाही अथवा या झोनमध्ये येणार नाही याची खबरदारी घेण्यात येत आहे.

·         प्रत्येक कंन्टेन्टमेंट झोनमध्ये 24 तास पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलेला असुन या ठिकाणी पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी बारीक लक्ष ठेऊन आहेत.

·         सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणे तसेच सामाजिक अंतर न पाळणाऱ्या व्यक्तींवर पोलीस तसेच नगर पालिकेमार्फत कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तींकडून १२ लक्ष रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.  तसेच सामाजिक अंतर न पाळणाऱ्या 309 व्यक्तींवर तर दुकानांमध्ये सामाजिक अंतराचे पालन न करणाऱ्या 263 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे.

·         जिल्ह्यामध्ये ग्रामीण व शहरी भागामध्ये हाय व लोरिस्क सहवासितांचा अचुकपणे शोध घेण्यात येत आहे.

7/12,8-अ किंवा फेरफार जोडलेला नाही या त्रुटीच्या। सबबीखाली शेतकऱ्यांचे पीककर्ज प्रस्ताव नाकारु नयेत- जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे आदेश जारी.


जालना,ब्युरोचीफ :- जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून पीककर्ज मिळण्यासाठी बँकांकडे प्रस्ताव सादर करण्यात येत आहेत.  परंतू संबंधितास तहसिल कार्यालयाकडून 7/12,8-अ व फेरफार नक्कल सादर करण्यासाठी बँकांकडून कळविण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित शेतकरी तहसिल कार्यालयात नक्कल मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असुन सद्य:स्थितीत कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असुन अशा परिस्थितीत होणाऱ्या गर्दीमुळे रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आदेश निर्गमित करुन सर्व सर्व राष्ट्रीयकृत, ग्रामीण, व्यापारी व जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या शाखाधिकाऱ्यांनी पीककर्जासाठी बँकेत आलेल्या शेतकऱ्यांचे 7/12,8-अ किंवा फेरफार जोडलेला नाही या त्रुटीच्या सबबीखाली त्यांचे पीककर्ज प्रस्ताव नाकारु नयेत, तसेच अशा शेतकऱ्यांचे कागदपत्रे मिळण्यासाठी गावनिहाय यादी करुन संबंधित बँक शाखेने संबंधित तहसिल कार्यालयास खास दुतामार्फत किंवा शाखा समन्वयकामार्फत दररोज सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच जिल्ह्यातील सर्व तहसिलदारांनी तालुक्यातील सर्व राष्ट्रीयकृत, ग्रामीण, व्यापारी व जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत अथवा समन्वयकामार्फत 7/12,8-अ व फेरफार नक्कलसाठी प्राप्त यादीनुसार आवश्यक ती कागदपत्रे  संबंधित बँकांना संबंधित तलाठ्यामार्फत प्राप्त करुन घेऊन नि:शुल्क उपलब्ध करुन देण्याचेही निर्देश दिले आहे.

घडीपुस्तिकेचे रोहयो मंत्री श्री भुमरे यांच्या हस्ते विमोचन रोहयो अंतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे


जालना,ब्युरोचीफ :- रोजगार हमी योजना विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत वृक्ष लागवड विषयी योजनांची माहिती देणाऱ्या घडीपत्रिकेचे विमोचन रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते अंबड तालुक्यातील पाहणी दौऱ्याप्रसंगी करण्यात आले. अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचविण्याची जबाबदारी प्रशासनाने योग्य रीतीने पार पाडण्याबरोबरच योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचे आवाहन रोहयो मंत्री श्री भुमरे यांनी यावेळी केले. यावेळी आमदार नारायण कुचे, माजी आमदार अर्जुनराव खोतकर, माजी आमदार संतोष सांबरे, भास्कर आंबेकर,उपजिल्हाधिकारी (रोहयो) रवींद्र परळीकर आदींची उपस्थिती होती.घडीपत्रिकेमध्ये दि. 12 एप्रिल 2018 च्या शासन निर्णयानुसार मग्रारोहयो अंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या शेताच्या बांधावर व शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर वनविभागाच्या सामाजिक वनीकरण शाखेमार्फत वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्याबाबत व दि. 30 जून 2011 च्या शासन निर्णयानुसार ग्रामपंचायतीमार्फत रोपवन संरक्षण व संगोपनाबाबत (बिहार पॅटर्न) विषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.  तसेच मग्रारोहयो अंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या शेताच्या बांधावर व शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर वृक्षलागवड करण्यासाठी पात्र लाभार्थी, वृक्षलागवड करण्यायोग्य प्रजाती, वृक्षलागवड मुदत, कलमे/रोपे पुरवठा तसेच लाभार्थ्यांची जबाबदारी इ. विषयी  व ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आलेल्या रोपवणाचे संरक्षण, देखभाल व संगोपन विविध पद्धतीने करून जिवंत रोपांची टक्केवारी वाढविण्याचा शासनाचा उद्देश असून संगोपनाचा कालावधी, कुटुंबाच्या गटाची निवड व त्यांची कामे,  मजुरीचे निकष, रोजगाराची गणना आदीविषयी  घडीपत्रिकेमध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे.मग्रारोहयो अंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या शेताच्या बांधावर व शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर वृक्षलागवड करण्याची योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी वन विभागाच्या सामाजिक वनीकरण शाखेकडून संपूर्ण तांत्रिक मार्गदर्शन केले जात आहे.अधिक माहितीसाठी तालुकास्तरावरील सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी तसेच विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण, जालना यांचे कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

बदनापुर व अंबड तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्याकडून पहाणी नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश.


जालना,ब्युरोचीफ :- बदनापुर व अंबड तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पहाणी राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी आज दि. 27 जुन रोजी प्रत्यक्ष गावांना भेट देऊन केली.  झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश यावेळी जिल्हा प्रशासनाला दिले. या पाहणी दौऱ्यात मंत्री महोदयांसमवेत आमदार नारायण कुचे, माजी आमदार अर्जुनराव खोतकर, माजी आमदार संतोष सांबरे, भास्कर आंबेकर, ए. जे. बोराडे,भाऊसाहेब पाऊल बुद्धे, अशोक बर्डे, दिनेश काकडे, सिद्धेश्वर उबाळे, उप विभागीय अधिकारी शशिकांत हदगल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, कृषी उपसंचालक माईनकर, तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी आदींची उपस्थिती होती.
यावेळी रोहयोमंत्री श्री भुमरे म्हणाले, मुख्यमंत्री महोदयांच्या सुचनेनुसार बदनापुर व अंबड तालुक्यातील गावांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पहाणी करण्यात आली असल्याचे सांगत पावसाच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असुन या नुकसानीचे पंचनामे तातडीने करुन अहवाल सादर करण्याच्या प्रशासनास सुचना देण्यात आल्या आहेत. अहवाल प्राप्त होताच मुख्यमंत्री महोदयांना सादर करण्यात येणार असुन शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचेही मंत्री श्री भुमरे यांनी यावेळी सांगितले.यावेळी मंत्री महोदयांनी अंबड तालुक्यातील हरतखेडा, बठाण खुर्द, बदनापुर तालुक्यातील नानेगाव, बाजार वाहेगाव वाकुळणी, धोपटेश्वर व रोशनगाव या गावांना भेटी देऊन पहाणी केली.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...