बुधवार, ३ जून, २०२०

                      जाफराबाद मध्ये सापडले 5 रुग्ण 
जाफराबाद :- दिनेश जाधव (ता.प्रतिनिधी):- जाफराबाद मधील आदर्शनगर येथे आढळला कोरोनाच्या रुग्ण. जाफराबाद मधील आदर्श नगर कंटेंनमेन झोन घोषित.पुढील तीन दिवस कडकडीत बंद.जाफराबाद तालुक्यात कोरोनाच्या पाचवा रुग्ण मिळाला आहे जाफराबाद येथील वॉर्ड क्रमांक 1 व वॉर्ड क्रमांक 2 या भागातील आदर्श नगर येथे हा रुग्ण आढळून आला आहे मिळालेल्या माहितीनुसार हा रुग्ण एस टी महामंडळात चालक म्हणून कार्यरत आहे,हा रुग्ण दिनांक 18,19 तारखेच्या दरम्यान नांदेड येथे काही इतर राज्यातील लोकांना  घेऊन गेला होता त्याकाळात हा रुग्ण कुठेतरी कोरोना रुग्णाच्या संपर्कात आला आहे असा प्राथमिक अंदाज व्यक्त आहे.जाफराबादेत कोरोना रुग्ण आढळून आल्यामुळे तहसील प्रशासनाने लगेच शहरातील प्रमुख लोकांची पोलीस ठाणे जाफराबाद येथे बैठक घेऊन काय काय उपाय योजना केली आहे याची माहिती दिली जाफराबाद तालुका प्रशासनाच्या वतीने शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे पुढील 3,4, व 5 तारखेस तीन दिवस जाफराबाद शहरात प्रशासनाच्या वतीने संचारबंदी लागू करण्यात आली आहे,ज्या ठिकाणी म्हणजेच आदर्शनगर हा पूर्ण भाग कंटेनमेन झोन म्हणून घोषित केले आहे.
जो रुग्ण आढळला त्या रुग्णाच्या जवळून संपर्कात आलेल्याना हिंदुस्थान लॉन्स येथे तर दुरदूरण संपर्कात आलेल्या व्यक्तींना जिजाऊ इंग्लिश शाळेत कॉरिनटाईन केले आहे, कॉरिनटाईन केलेल्यांची संख्या ही 11आहे तसेच त्यांचे स्वब लवकरच घेण्यात येईल असे प्रशासनाणे सांगितले आहे ,संचारबंदीत फक्त दवाखाने व मेडिकल ही अत्यावश्यक सेवाच सुरू राहणार आहे तरी नागरिकांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा तहसीलदार सतीश सोनी,ए पी आय अभिजित मोरे यांनी केली आहे.

   यावेळी या बैठकीत नगरपंचायत मुख्याधिकारी पुजा दुधनाळे,तालुका वैद्यकीय अधीकारी प्रशांत टेकाळे,पी एस आय पोठरे ,नगराध्यक्ष दिपक वाकडे ,सुरेश दिवटे,सुरेश गवळी,बाळकृष्ण हिवाळे, अनिल बोर्डे,बाबुराव लहाने,प्रभु गाढे,अमोल पडघन,निवृत्ती बनसोड,विनोद हिवराळे,मोहन मुळे,गजानन उदावंत शहरातील व्यापारी,नगरसेवक,समाजसेवक,पत्रकार आदी उपस्थित होते.
                                              आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या प्रयत्नाला यश



                                      कोरोना चाचण्यांसाठी जालना येथे आरटी-पीसीआर प्रयोगशाळा सुरू 
                                             करण्यास मान्यता मराठवाड्यातील नागरिकांना दिलासा


जालना,ब्युरोचीफ :-* कोरोना चाचण्यांसाठी जालना येथे आरटी-पीसीआर प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी  राज्याचे आरोग्यमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या प्रयत्नाला यश आले असून जालना जिल्हा रुग्णालयात ही प्रयोगशाळा सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात जालना येथे कोरोना चाचण्यांची सुविधा निर्माण होणार आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर या निर्णयामुळे जिल्हावासियांसह मराठावाडा भागातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
        याबाबत सविस्तर माहिती देतांना आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले की, जालना येथील रुग्णांचे नमुने औरंगाबाद येथे तपासणीसाठी पाठवावे लागतात. जालना जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा वाढता प्रादर्भाव लक्षात घेता आणि औरंगाबाद येथील प्रयोगशाळेवरील ताण पाहता जालना येथे प्रयोगशाळा होणे गरजेचे होते. त्यासाठी आता मान्यता मिळाली आहे.
        या प्रयोगाशाळेसाठी अंदाजीत खर्च सुमारे १ कोटी रुपयांच्या आसपास असून त्याला मान्यता मिळाल्याने प्रयोगशाळा उभारणीस वेग येईल. आयसीएमआरच्या निर्देशानुसार प्रयोगशाळेची निर्मिती केली जाणार असून लागणारी यंत्रसामुग्री, मनुष्यबळाची उपलब्धता करून देण्यात येत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे.

        जालना जिल्ह्यात आरटी-पीसीआर प्रयोगशाळा सुरू होणार असल्याने कोरोना रुग्णांचे नमुने तातडीने मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांना तातडीने उपचार देखील मिळण्यास मोठी मदत होणार आहे. याप्रयोगशाळेमुळे भविष्यातही स्वाई फ्लू, डेंग्यू सारख्या विषाणूसंसर्ग आजारांच्या चाचण्या करण्यासाठी मदत होणार असल्याने जालना जिल्हावासियांसाठी दिलासा देणारी बाब ठरणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
         सलग अडीच महिन्यांपासून अंबरनाथ मध्ये गरजूंना मदत वंचितकडून मदतीचा ओघ सुरूच



अंबरनाथ,ब्युरोचीफ :- कोरोना काळात लॉकडाऊन असल्याने अंबरनाथ भागात अनेक गरजूंना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. त्याच बरोबर दैनंदिन जीवनासाठी लागणारे साहित्य रोगप्रतिकार औषधे इतर राज्यात जाणाऱ्या मजुरांना तयार जेवण, इतर साहित्य, पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. गेल्या अडीच महिन्यांपासून वंचित बहुजन आघाडीचे अंबरनाथ पूर्वचे शहराध्यक्ष प्रवीण गोसावी यांनी हा उपक्रम राबवला आहे.** अंबरनाथ परिसरात कामानिमित्त  येऊन तात्पुरता निवारा घेणारे कामगार मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात कारखाने, लघु उद्योग बंद झाल्याने अनेक कामगार व त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली होती. ज्यांच्याकडे पैसे होते त्यांनी कसेही करून त्यांच्या स्थलांतर केले. मात्र इतर कामगारांचे हाल झाले. अशा लोकांना वंचित बहुजन आघाडीचे अंबरनाथ पूर्वचे शहराध्यक्ष प्रवीण गोसावी, गुंजाई फाउंडेशन, शिवराय फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने पाच हजार कुटुंबांना रोगप्रतिकारक औषधांचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर अन्नधान्यांचे किट, भाज्या, तयार जेवण, मास्क, स्यानेटायझरचे मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले. तसेच जे मजूर अंबरनाथवरून त्यांच्या गावी जाण्यासाठी निघाले होते, अश्या लोकांसाठी महामार्गावर तयार जेवण, पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. तसेच त्यांच्या विश्रांतीची सोय देखील करण्यात आली होती. गेले अडीच महिने या साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. अद्यापही अंबरनाथ भागात वंचित बहुजन आघाडीकडून गरजूंना मदत करण्यात येत असल्याचे प्रवीण गोसावी यांनी सांगितले.
               देशाची ढासळलेली आर्थिक स्थिती बदलण्यात मोदी अकार्यक्षम - प्रकाश आंबेडकर



पुणे,ब्युरोचीफ :-  देशाची ढासळलेली आर्थिक स्थिती बदलण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अकार्यक्षम असून नेमके काय करायला पाहिजे जेणेकरून आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल, हेच कळत नसल्याने केंद्र सरकार त्रस्त झाले आहे. त्यामुळे त्यांच्या मार्फत येणार्‍या अफवांना बळी पडू नका, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
      जागतिक संघटनेने भारताला पूर्णपणे कंगाल म्हणून घोषित केले आहे. तशीच परिस्थिती चीनची झाली आहे म्हणून लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देता देता यांच्या नाकी नऊ आले आहे. चीन आणि भारत या दोघांची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. कोरोना पसरविला म्हणून चीनवर जगभरातून आरोप केला जात आहे. तर भारतात कोरोनाची परिस्थिती कशी हाताळावी हे पंतप्रधान मोदी यांना कळत नाही म्हणून देशातील आर्थिक व्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. दोघांनाही त्यांच्या देशातील लोकांना फसवायचे आहे आणि म्हणून जशी गावांमध्ये लुटुपुटूची लढाई होते तशाच पद्धतीने चीनचे अध्यक्ष आणि भारताचे पंतप्रधान या दोघांची लुटूपुटूची लढाई सीमेवर सुरु झाली आहे. कधी लडाख तर कधी आसाम  तर कधी सिक्कीम, अरुणाचल प्रदेश मध्ये ही लढाई दिसून येते. दोन्ही देशांची परिस्थिती अजून ही युद्धा सारखी झालेली नाही, किंवा दोन्ही देश युद्ध करू शकतात अशी परिस्थिती नाही. त्यामुळे भाजप आणि आर.एस.एस यांनी जो खेळ चालवलाय की चीनकडून आपल्याला धोका आहे. तर त्यांच्या अफवांना बळी पडू नका. मात्र चीनकडुन भारताला धोका निश्चित आहे. पण ते वेगळ्या कारणांमुळे, दोन्ही देश ढासळलेल्या आर्थिक परिस्थिती मुळे त्रस्त झाले असून आर्थिक स्थिती कशी सुधारावी हे या लोकांना कळत नाही. त्यामुळे दोन्ही देश त्रस्त झाले आहेत, त्यामुळे त्यांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे  यांनी दिली.

              गरजूंना अन्नधान्याची मदत तर लाईट बिल माफ करण्यासाठी वंचितकडून निवेदन.



बीड,ब्युरोचीफ :- कोरोना काळात लॉक डाऊन असल्याकारणाने अनेकांना आपल्या गावी स्थलांतर करावे लागले. शिवाय काम बंद झाल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली. अशा लोकांना बीड, गेवराई मधील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अन्नधान्याचे किट तसेच मास्कचे वाटप केले. त्याच बरोबर गेवराई मध्ये मागील तीन महिन्यांचे वीज बिल माफ करावे म्हणून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले होते की गरजू लोकांना शक्य ती मदत करण्यात यावी, त्याच बरोबर महामार्गावरून गावी जाणाऱ्या लोकांना जेवण, पाणी आणि विश्रांतीची सोय करण्यात यावी. या आवाहनाला राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला. बीड मधील गेवराई तालुक्यातील कार्यकर्त्यांनी ही प्रतिसाद देत महामार्गावर अन्नदान केले, शिवाय लॉकडाऊन असल्याने गरजूंना अन्नधान्याचे कीट आणि मास्कचे वाटप करण्यात आले. वंचितचे गेवराई तालुका अध्यक्ष सय्यद सुभान यांनी हा उपक्रम राबवला असून तालुक्यात अनेकांकडे लाईट बिल भरायला पैसे नाहीत म्हणून गेल्या तीन महिन्याचे लाईट बिल माफ करण्यात यावे, यासाठी गेवराई तहसीलदार प्रशांत जाधवर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष सय्यद सुभान, युवक तालुकाध्यक्ष बंटी सौंदरमल, सतीश प्रधान, सुधाकर केदार, शरद खापरे उपस्थित होते.
                                   परतूर तालुक्यातील दुधना नदीपात्रातून अवैध वाळु वाहतूक.



परतूर प्रतिनिधी/इम्रान कुरेशी
परतूर ठाणे अंतर्गत रोहीना येथून दुधना नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक उत्खनन करून परतुर रोहीना मार्गी ट्रॅक्टर व हायवाने सुरू आहे मात्र याकडे परतुर महसूल विभागाचे दुर्लक्ष दुसून येत आहे नदीपात्रातून दिवस रात्र अवैध वाळू उत्खनन व चोरी करून वाळू माफिया मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा करून त्याची वाहतूक केली जात आहे,या वाळू भरलेल्या ट्रक, ट्रॅक्टरची सर्रासपणे वाहतूक सुरू असून वाळू माफियांवर कुठलेच कार्यवाही केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे त्या मुळे वाळू माफिया याचा फायदा घेत असल्याचे दिसून येते तालुक्यातील रोहिना, मसला, डोलारा,बाबूलतार, दुधना पत्रातून दररोज दिवस रात्र सुमारास १० ते 15 ट्रक व ट्रॅक्टर ने अवैध वाळू वाहतूक करून विक्री केली जात आहे,अवैध वाळू उपसा करून त्याची वाहतूक करून देण्या साठी सबकूच मॅनेज असल्याची चर्चा या परिसरात आहे,त्या मुळे दररोज सुमारास १५ ते २० ट्रॅक्टर व हायवा ने अवैध वाळू वाहतूक सुरू असताना कुठलीच कार्यवाही केली जात नसल्याची माहिती आहे,त्यामुळे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी धाड टाकून वाळू माफियांचे मुस्के आवळण्याची गरज आहे
                 शेतकरी गटांनी बांधावर खत वाटपासाठी घेतला पुढाकार कृषी विभागाच्या पुढाकारातून
                                                     3 हजार शेतकरी गटाची स्थापना.

नांदेड (भगवान कांबळे )  :- खरीप हंगाम लक्षात घेता कोरोनाच्या या आव्हानात्मक काळात शेतकऱ्यांची खते-बियाण्यांसाठी शहरात गर्दी होऊ नये म्हणून शेतकरी गटांनी हे साहित्य एकत्रित खरेदी करुन शेतकऱ्यांना ते थेट बांधावर उपलब्ध करुन देण्याचा सुरक्षित मार्ग अवलंबिला आहे. कृषि विभागाच्या पुढाकाराने खते व बियाणांचे प्रातिनिधिक वाटप गुंडेगाव येथे आमदार मोहन हंबर्डे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना बांधावर करण्यात आले.
यावेळी उपविभागीय कृषि अधिकारी आर. टी. सुखदेव, कृषि अधिकारी सुनिल सानप, कृषि सहाय्यक चंद्रकांत भंडारे, गुंडेगावचे पोलीस पाटील भगवान हंबर्डे, नामदेव हंबर्डे व निवडक शेतकरी उपस्थिती होते.
शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गटामार्फत खते-बियाणे खरेदी केल्यास आर्थिक बचतीसह कोरोनाच्या संसर्गापासून त्यांना दूर राहता येईल' असे याप्रसंगी आमदार मोहन हंबर्डे म्हणाले.  उपविभागीय कृषि अधिकारी श्री सुखदेव यांनी शेतकऱ्यांना बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रयोग, बिजप्रक्रिया, बियाणे निवड, खरीप हंगाम पूर्व तयारी याविषयी मार्गदर्शन केले.
गुंडेगावचे कृषि सहाय्यक चंद्रकांत भंडारे यांनी माती, पाणी परिक्षणाचे महत्व विषद केले व शेतकऱ्यांनी मृद तपासणी करुनच पिकांची लागवड करावी असे सांगितले.
कोरोना संकटापासून बचाव करण्यासाठी नियमांचे पालन करुन शेतकऱ्यांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. कृषि सहाय्यक श्री. भंडारे यांनी आभार मानले.

नांदेड जिल्हयात सुमारे 3 हजार शेतकरी गट स्थापन करण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला. आतापर्यंत 1 हजार 53 गटांनी 8 हजार 100 टन खते आणि 3 हजार 300 क्विंटल बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवले आहेत. या गटांना कृषि विभाग सहाय्य करीत आहे. शेतकऱ्यांच्या वाहतुकीच्या खर्चात यामुळे बचत होण्यास मदत होत आहे. मोठ्या प्रमाणावर एकत्रित खरेदी केल्यामुळे किंमतीमध्ये बचत होत असून सध्या बाजारात मुबलक खते आणि बियाणे उपलब्ध आहेत.  चांगला पाऊस झाल्यावर पेरणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे.
                                      महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ सर्व घटकांना.
                                                         महाराष्ट्र शासनाचा महत्वपूर्ण निर्णय


नांदेड( भगवान कांबळे ) :- कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत राज्यातील सर्वच कुटुंबाना उपचारासाठी मोफत लाभ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. कोरोनाबाधित रुग्ण व कोरोनाची लागण नसलेल्या इतर आजाराच्या सर्व लोकांना या निर्णयामुळे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत असलेल्या सर्व रुग्णालयात उपचार घेता येणार आहेत.
सुधारीत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेशी प्रधानमंत्री जनआरोग्य योजना संलग्नीकरण करून एकत्रित स्वरुपात 1 एप्रिल 2020 पासून अंमलात आली आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी व सनियंत्रण राज्य आरोग्य हमी सोसायटी मार्फत केली जाते.
शासकीय व पालिका रुग्णालयाचे सध्या कोरोना रुग्णालयात रुपांतर करण्यात येत असल्याने शासकीय रुग्णालयांसाठी राखीव असलेल्या 134 उपचारांपैकी 120 उपचारांचा लाभ यापुढे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतील अंगिकृत खाजगी रुग्णालयात 31 जुलै 2020 पर्यंत घेता येणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत काही किरकोळ, मोठे उपचार व तपासण्या समाविष्ट नाहीत असे उपचार व तपासण्या सदरील योजनेंतर्गत अंगीकृत रुग्णालयांमध्ये सर्व लाभार्थ्यांना सीजीएचएसच्या दरानुसार (NABH / NABL ) उपलब्ध करुन देण्यात येतील. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत 996 आजारावरील उपचाराची सोय असून, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत 1 हजार 209 आजारावर उपचार केले जातात.राज्यातील जवळपास 85 टक्के नागरिक या योजनेचे लाभार्थी आहेत. 23 मे 2020 रोजी शासनाने काढलेल्या आदेशानुसार राज्यातील आता प्रत्येक व्यक्तीला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत उपचार घेण्याची सुविधा मिळणार आहे. आतापर्यंत योजनेचा लाभार्थी नसलेल्याना सुद्धा आता महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत लाभ मिळणार आहे.

या योजनेचा जास्तीतजास्त लाभ घ्यावा व योजनेच्या अधिक माहितीसाठी अंगीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्राशी संपर्क साधावा. दूरध्वनीद्वारे टोल फ्री नंबर 155388  किंवा 1800 233 22 00  या क्रमांकवर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य आरोग्य हमी सोसायटी नांदेडचे जिल्हा समन्वयक डॉ दिपेशकुमार शर्मा  यांनी केले आहे.
          उभ्या ट्रॅक्टरवर आयशर धडकले,बेराला फाट्याजवळ या अपघातात एक जागीच ठार, तिघे गंभीर.



चिखली,प्रतिनिधी :- रस्त्यावर उभ्या ट्रॅक्टरला आयशर धडकून ट्रॅक्टरवरील एक जण जागीच ठार झाला तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात चिखली- जालना रस्त्यावरील बेराला फाट्याजवळ आज, 3 जून रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडला.सतीश जाधव (35, रा. वसंतनगर, ता. चिखली) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव असून, राहुल चव्हाण (25), गोपाळ राठोड (22), गोपाल चव्हाण (22 सर्व रा. वसंतनगर ता. चिखली) अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. सध्या रस्त्याचे काम सुरू असताना त्यासाठीच हे ट्रॅक्टर (क्र. एमएच 28, बी 6197) रस्त्याच्या कडेला उभे होते. त्याचवेळी भरधाव आलेल्या आयशरने (क्र. एमएच 05, डीके 9671) या ट्रॅक्टरला जोरात धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, धडक दिल्यानंतर आयशर लांब शेतात जाऊन पडले तर ट्रॅक्टरचीही तीच गत होती. ठार झालेला आणि गंभीर जखमी झालेले युवक ट्रॅक्टरवर बसलेले होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघातामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्या कामी पोलिसांना नागरिकांनी सहकार्य केले.
जेष्ठ नागरिकांच्या सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्यात
  उपजिल्हाधिकारी प्रविन मेंगशेट्टी यांची माहीती..

उदगीर ता.(जीवन भोसले ) कोरोना संसर्गामुळे म्रत्यू होण्याचा   धोका जास्त असलेल्या जेष्ठ नागरिकांचे काम अंतिम टप्यात आले आहे. सर्वे पुर्ण होताच त्यांच्यावर लक्ष ठेऊन दक्षती घेण्याची  प्रक्रिया सुरू करण्यात येनार  असल्याची माहीती उपजिल्हाधिकारी प्रविन मेंगशेट्टी यांनी दिली.
गेव्या काही दिवपुर्वी  विभागीय आयूक्त सुनिल केंद्रेकर यांच्या उपस्थीतीत पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत  55 वर्षावरिल नागरिकांचे सर्वेक्षन करुन त्यांची  तपासनी करण्याचे निर्देश देण्यात आले होते.त्यानंतर त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांना संसर्ग होण्यासंदर्भात दक्षता घेण्याचे ऩियोजन करण्याचे आदेशित केले होते.
या विभागीय आयूक्तांच्या निर्देशानंतर उदगीर तालूक्यातील 87 ग्रांमपंचायत अंतर्गत असलेल्या 98गावे व सहा वाडी  तांड्याचे  नियोजन गटविकास अधिकारी  अंकूश चव्हान यांनीग केले आहे.ग्रामिण भागात अंगणवाडीनिहाय अंगणवाडी  शिक्षिका आशा कार्यकर्ती व अरोग्य  विभागाचा कर्मचारी यांच्याकडे हि जबाबदारी सोपवून  त्यांच्यावर ग्रामसेवक व तलाठी यांचे नियंत्रन  ठेवन्यात आले आहे.
 उदगीर शहरामधे रेडझोन मधिल  नागरीकांची  सर्वे व तपासणी  झाली आहे त्यामुळे जवळपास  40टक्के काम या पुर्वीच झाले आहे. उर्वरित सर्व सहरामधे एकुन नऊ टिम तयार करुन काम करण्यात येत आहे .
यामधे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या  आरोग्यसेविका , अशा स्वयसेविका,व नगरपालिकेचे वसुलि निरीक्षक या तिघावर हि जबाबदारी  सोपविण्यात आली आहे, याचें ही जवळपास  90टक्के सर्वेक्षण तपासणीचे काम  पुर्ण  झाले  असल्याचि माहीती  नगरपालीकेचे मुख्यधिकारी  भरत राठोड यांनी दिली   विभागीय आयूक्त व राज्यमंत्री  यांनी निर्देशित क्ल्या प्रमाने 55  वर्षाच्या पुढील  प्रत्येकाची माहीती  विहित नमुन्यात भरून घेण्यात  येत आहे. ईतर आजार असणार्या रुग्नांना दररोज ठेवन्यासाठीचे नियोजन , वेळोवेळी त्यांची  करावी  लागनारी तपासणी आदिसाठी  सर्वेक्षणाचे काम पुर्ण होताच  नियोजन करण्यात येनार आहे असे श्री. मेंगशेट्टी यानी सांगीतले.
                          जिल्ह्यात एकाच दिवशी 25 व्यक्तींच्या स्वॅबचे अहवाल पॉझिटीव्ह
                                एका कोरोनाबाधित महिलेला यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज


   
जालना,प्रतिनिधी :- मापेगाव ता. परतुर येथील  आठ, सामनगाव ता. जालना येथील तीन, बदनापुर शहरातील दोन, जालना शहरातील मोदीखाना येथील एक, गांधी नगर येथील एक, लोधी मोहल्ला येथील एक, लक्ष्मीनारायणपुरा येथील एक, व्यंकटेश नगर येथील एक, मंगळ बाजार येथील एक, जाफ्राबाद येथील एक, पांगरी ता. घनसावंगी येथील एक, यावलपिंपरी ता. घनसावंगी येथील एक, पिरपिंपळगांव ता. जालना येथील एक, बेथल ता. जालना येथील एक, सिंदखेड राजा जि.बुलढाणा येथील एक असे एकुण 25 जणांच्या स्वॅबचा अहवाल प्रयोगशाळेकडुन पॉझिटिव्ह प्राप्त आहे. तसेच जिल्हा  सामान्य रुग्णालयातुन शिरनेर ता. अंबड येथील एका 38 वर्षीय कोरोनाबाधित महिला रुग्णावर यशस्वी उपचार करुन त्यांच्या दुस-या स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्याने महिलेस दि.2 जुन, 2020 रोजी  डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
जालना शहरातील 80 वर्षीय पुरुष अत्यावस्थ परिस्थितीत जिल्हा रुग्णालयात दि. 1 जुन 2020 रोजी दाखल झाला होता.  संबंधित रुणावर उपचार सरु असतांनाच त्याचा मृत्यु दि. 1 जुन 2020 रोजी झाला. मृत्युनंतर त्याच्या स्वॅबचा अहवाल प्रयोगशाळेकडुन  दि. 2 जुन 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.  एकुण संशयीत रुग्ण -2518 असुन सध्या रुग्णालयात 72 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती 1091,  दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या -27 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या 2811 एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने – 25असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -153 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 2647, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या -304, एकुण प्रलंबित नमुने -07, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-1017,14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती – 22, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती – 910,  आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 28, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-387, विलगीकरण कक्षात  भरतीसाठी पाठविलेले संशयीत – 17,  सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 72,  आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 24, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-01, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-52,  सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या- 99, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या- 5027 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या 02 एवढी आहे. 
दि. 1 जुन 2020 रोजी नजर चुकीने प्रेस नोट मध्ये सर्व दुकाने (मार्केट, शॉप्स, केशकर्तनालय, स्पा, सलुन , ब्युटी पार्लर) सकाही 9 ते सायं 5 वाजेपर्यंत या  कालावधीत चालु ठेवता येतील असे लिहिले होते. मात्र जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कलम 144 (1),(3) अन्वये  जालना जिल्ह्यातील मनाई आदेश लागु करण्यात आला आहे. त्यानुसार सर्व दुकाने (मार्केट, शॉप्स) सकाळी 9 वाजेपासुन ते सायं 5 वाजेपर्यंत या कालावधीत चालु ठेवता येतील परंतु केशकर्तनालय, स्पा, सलुन, ब्युटी पार्लर पुर्णपणे बंद राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 387 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये संत रामदास होस्टेल जालना-36, डॉ. बाबासाहेब आंबेडकर होस्टेल, जालना-02,  मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह -24, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-26, पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना -110, मॉडेल स्कुल, अंबा रोड, परतुर-27, हिंदुस्थान मंगल कार्यालय,जाफ्राबाद-01, जिजाऊ इंग्लिश स्कुल, जाफ्राबाद-03 राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कुल, टेंभुर्णी, जाफ्राबाद -00 डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, अंबड -19, शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-30, डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, घनसावंगी येथे –36 अल्पसंख्यांक गर्ल्स होस्टेल, घनसावंगी -08, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल इमारत क्र.2-02, मॉडेल स्कुल मंठा-35, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर -26, मेरीट हॉटेल-02  व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 719 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 145 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 658 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 3 लाख 1 हजार 330 असा एकुण 3 लाख 28  हजार 138 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...