सोमवार, १५ जून, २०२०

कृषि विभागाचे भरारी पथकाकडुन भोकरदन येथील बोगस

कापुस बियाणे विक्री प्रकरणी गुन्हा दाखल.


जालना,ब्युरोचीफ:- कृषि विभागाच्या जिल्हास्तरीय गुणनियंत्रण भरारी पथकाने रविवारी दि. 14 जुन 2020 रोजी भोकरदन येथील तेजल कृषि सेवा केंद्रावर अचानक छापा टाकला असता बोगस कापुस बियाणे Honey 4-G आणि RC- 659 BT-4G रिर्सच हायब्रीड कॉटन सीड असा उल्लेख असलेले कापुस बियाणांचे 6 पॅकेट आढळुन आले. त्या पॅकेटवर उत्पादक कंपनी, उत्पादन तारीख, लॉट नंबर व एम. आर. पी. किंमत छपाई केलेले आढळुन आले नाही. त्यामुळे पथकाने सदर विक्रेत्याकडे खरेदी केलेल्या बियाणाचे बिलाची मागणी केली असता विक्रेत्याने कोणतीही माहिती दिली नाही. हे बियाणे बोगस आढळुन आल्यामुळे तेजल कृषि सेवा केंद्र भोकरदनचे मालक अनिल खेमचंद पारिख यांनी बोगस संशयीत कापुस बियाणे शेतक-यांना विक्रि करत असल्याने बियाणे कायदा  1966 व अत्यावश्यक वस्तु अधिनियम 1955 मधील नियमांचे उल्लंघन केल्यामुळे जिल्हा परिषद जालनाचे मोहिम अधिकारी सुधाकर कराड यांनी विक्रेत्या विरुध्द भोकरदन पोलीस स्टेशन येथे दि. 14 जुन 2020 रोजी FIR क्रं. 347 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या भरारी पथकामध्ये जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी भिमराव रणदिवे, कृषि अधिकारी राजेश तांगडे व भोकरदन पंचायत समितीचे कृषि अधिकारी धर्मराज काकडे हे सहभागी होते.

जिल्ह्यात चौदा व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह  तर सहा रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज - जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती.


जालना,ब्युरोचीफ :- जिल्हा सामान्य रुग्णालयातुन जालना शहरातील पंचमुखी हनुमान मंदीर मोदीखाना परसिरातील 75 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, 47 वर्षीय पुरुष, 24 वर्षीय पुरुष, 17 वर्षीय तरुणी, मोदीखाना परिसरातील 29 वर्षीय पुरुष असे एकुण 6 कोरोनाबाधित रुग्णांवर यशस्वी उपचार करुन व त्या सर्वांच्या दुस-या स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्यानंतर  त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तसेच दि. 15 जुन 2020 रोजी 14 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे. पॉझिटिव्ह सापडलेल्या व्यक्तींमध्ये  जालना शहरातील  राज्य राखीव पोलीस बल गट क्रं. 03 च्या 04 जवान, जालना शहरातील दर्गावेस परिसरातील 01, वाल्मीकनगर परिसरातील – 01, काद्राबाद परिसरातील-03,समर्थनगर - 01, भाग्यनगर- 02, शंकरनगर -01, अंबड शहरातील - 01 असे एकुण 14 व्यक्तींचा  समावेश आहे.जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण – 3435 असुन सध्या रुग्णालयात -84, व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती -1286, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या – 150, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या -3967, एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने – 14 ,असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -291, एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या -3504, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-399, एकुण प्रलंबित नमुने -168, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-1194,**
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती – 11, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती – 1085, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -60, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -553, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत–08,  सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 84, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती -17, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-06, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या -171,  सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या- 104, तर संदर्भित रेफर केलेली रुग्ण संख्या -08,  पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या- 8125, तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 08 एवढी आहे. 
कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण -553 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये : संत रामदास वसतीगृह जालना – 39, डॉ. बाबासाहेब आंबेडकर होस्टेल, जालना-24,  मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह -38,शासकीय मुलींचे वसतीगृह मोतीबाग जालना-32, पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना -192,हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद- 06,जिजाऊ इंग्लिश स्कुल जाफ्राबाद- 31, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, अंबड -08, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड – 38, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, घनसावंगी येथे –04, अल्पसंख्यांक गर्ल्स होस्टेल, घनसावंगी -23, मॉडेल स्कुल मंठा-03,कस्तुरबा गांधी बालिका वसतीगृह मंठा- 04, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर -14, , पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद-11, ज्ञान सागर विद्यालय जाफ्राबाद -22,आय टी या महाविद्यालय जाफ्राबाद-58,डॉ बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह भोकरदन इमारत क्र.06 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 169 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन 803 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 825 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली   3 लाख 33 हजार 430 असा एकुण 3 लाख 60 हजार  238 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मग्रारोहयोअंतर्गत जिल्ह्यात 854 कामांवर 13 हजार 24 मजुरांची उपस्थिती मग्रारोहयोमध्ये जालना जिल्हा मराठवाड्यात अग्रेसर


उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर यांची फेसबुकलाईव्ह मध्ये माहिती


जालना,ब्युरोचीफ :- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जालना जिल्ह्यातील 779 ग्रामपंचायतीपैकी 307 ग्रामपंचायतीमध्ये 854 कामे सुरु असुन या कामांवर 13 हजार 24 एवढे मजुर काम करत असुन या योजनेमध्ये जालना जिल्हा मराठवाड्यात यामध्ये अग्रेसर असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (रोहयो) रवींद्र परळीकर यांनी दिली.  **
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसंदर्भात उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर यांनी तर तसेच भुसंपादन कायद्यासंदर्भात उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातुन फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधत त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधताना उपजिल्हाधिकारी श्री परळीकर म्हणाले,  जिल्ह्यात 16.87 लक्ष मनुष्यदिन निर्मितीचे  उद्दिष्ट असुन 27 हजार कामे सेल्फवर मंजुर करण्यात आली आहेत.  जिल्ह्यात रोहयोची 15 हजार कामे अपुर्ण असुन ही कामे पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.  तसेच जिल्ह्यात सामुदायिक विहिरींचे उद्दिष्ट जिल्ह्याला देण्यात आले होते.  त्यापैकी 425 विहिरींचे काम सुरु असुन 24 विहिरींचे काम पुर्ण झाले आहेत.  तसेच उर्वरित विहिरींचे कामही प्रगती पथावर आहे.  रोहयोअंतर्गत सामुदायिक तसेच वैयक्तिक स्वरुपाची कामे करु शकतात.  जिल्ह्यात रोहयोअंतर्गत रेशीमची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात येत असुन ग्रामीण भागात आर्थिक उन्नती करण्यासाठी सिल्क व मिल्क अशा दोन बाबींवर अधिक भर देण्यात येत असल्याची माहितीही श्री परळीकर यांनी यावेळी दिली.
100 दिवस रोजगाराची हमी देणारी ही योजना असुन या योजनेमध्ये शासनाने वेळोवेळी मजुरीमध्ये वाढत करत आजघडीला 238 रुपये  प्रतीमजुर मजुरी देण्यात येते. ग्रामीण भागातील जनतेला रोजगार मिळुन त्यांचे  जीवनमान उंचावण्यासाठी 1 एप्रिल, 2008 पासुन ही योजना राज्यात लागु करण्यात आली.  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत काम मिळण्यासाठी मजुराचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असणे गरजेचे असुन काम मिळण्यासाठी जॉबकार्डची आवश्यकता असते.  ग्रामीण पातळीवर ग्रामसभा कामाचे नियोजन करण्याबरोबरच कामावर नियंत्रण ठेवण्याचे काम करते.  ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन ग्रामरोजगार सेवकाची भुमिका अत्यंत महत्वाची असते.  मजुरांचे आवेदन स्वीकारने, कुटूंबाची नोंदणी, जॉबकार्डचे वाटप, काम उपलब्ध करुन देणे आदी काम ग्रामरोजगार सेवकामार्फत करण्यात असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
कोव्हीड 19 च्या अनुषंगाने प्रत्येकाने सामाजिक अंतराचे पालन करावे, मास्क, सॅनिटायजरचा वापर करण्याबरोबरच आवश्यकता असेल तर घराबाहेर पडा. प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सुचनांचे तंतोतंन पालन करण्याचे आवाहन करत नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही श्री परळीकर यांनी यावेळी दिली.
भु-संपादन या विषयावर माहिती देताना उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळापासुन शासना सर्वांगिण विकासाच्या विविध प्रकल्पासाठी जमिनीची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासत होती.  त्यामुळे ब्रिटीश प्रशासनाने भुसंपादन अधिनियम 1894 हा कायदा केला आणि त्यानंतर प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनासाठी 1954 साली कायदा करण्यात आला आणि 1956 साली राष्ट्रीय महामार्ग अधिनियम तयार करुन त्यात वेळोवेळी बदल करण्यात आले असल्याचे सांगत जिल्ह्यात जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट अंतर्गतच्या ड्रायपोर्ट प्रकल्प, हिंदुऱ्हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग त्याचबरोबर भोकरदन, अंबड, परतुर या उप विभागामध्ये जमीनीचे भुसंपादन करण्याबरोबरच प्रस्तावितही करण्यात आल्या असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
यावेळी श्री निऱ्हाळी यांनी नागरिकांनी भुसंपादन कायद्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही दिली.

वंचित बहुजन आघाडी,बहुजन समाज पार्टी, व ऑल इंडिया पँथर सेना पक्ष व संघटने तर्फे बदनापूर तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री महोदय यांना निवेदन.


बदनापूर,ब्युरोचीफ :- आज बदनापूर तहसील व पोलीस ठाणे बदनापूर येथे वंचित बहुजन आघाडी,बहुजन समाज पार्टी, व ऑल इंडिया पँथर सेना, या सर्व पक्षा तर्फे निवेदन देण्यात आले आहे.विराज_जगताप_व_अरविंद_बनसोडे यांच्या_हत्या_करण्यारेला_फाशीची शिक्षा झाली पाहिजे.व सोशल मीडिया वर्तीमहिलांची व महापुरुषांची बदनामी करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी. जातीय_तेढ निर्माण करण्याला कायदेशिर कारवाई करण्यात यावी. महाराष्ट्र मध्ये दिवसान दिवस जातीवाद वाढत चालेला आहे कायद्याचा धाक गावगुंडांना राहिलेला नाही.पिंपरी चिंचवड पिपरी सौदगर येथील बोद्ध तरुण विराज जगताप याला प्रेम प्रकरणातुन जीवे मारण्यात आले.नागपूर येथील अरविंद बनसोड यांची सुध्दा विष पाजून हत्या करण्यात आली. या प्रकारनातील आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.या पुरोगामी महाराष्ट्र मध्ये माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना घडली आहे तसेच सोशल मीडियावर वर महिलांनची व महापुरुषाच्या नांवाची बदनामी केली जात आहे. त्यामुळे समाजमध्ये तेढ निर्माण होत आहे.बदनामी करणाऱ्यार शासनाने गुन्हा नोंद करून कार्यवाही करावी जेणे करून सामजिक वातावरण बिघडणार नाही अशी मागणी

वंचित बहुजन आघाडी,बहुजन समाज पार्टी, व ऑल इंडिया पँथर सेना पक्ष व संघटने तर्फे बदनापूर तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री महोदय यांना निवेदन.मार्फत करण्यात आली आहे.
 यावेळी निवेदन देताना ज्ञानेश्वर गरबडे,संतोष शेळके,विवेके दहीवल,प्रकाश मगरे वाहुळे,विनोद मगरे,हरीश बोरुडे,रवी शेंडगे,दादू गरबडे. उपस्थित होते.

अमीत भाऊ भुईगळ यांची बदनामी करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करा

                 वंचित बहुजन आघाडी ची मागणी


जालना,ब्युरोचीफ :- वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते अमीत भाऊ भुईगळ यांचा फेसबुक वर डान्स करतांना व्हि.डी.ओ. टाकुन महाराष्ट्रात दलितांचे हत्या घडत असताना अमितभाऊ भुईगळ दारू पिऊन डान्स करत आहेत असा बदनामी कारक उल्लेख करून त्याची बदनामी करण्यात आली याप्रकरणी बंटी सदाशिवे व विकास राऊत यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अशी लेखी तक्रार पोलिस अधीक्षक यांना कडे करण्यात आली आहे  यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व भारिप बहुजन महासंघाचे मा.जिल्हाध्यक्ष दीपक डोके,अशोक खरात, अकबर इनामदार, विष्णु खरात, दिपक घोरपडे, विनोद दांडगे, अँड.कैलास रत्नपारखे, सचिन कांबळे, कैलास रत्नपारखे,अर्जुन जाधव, राजेंद्र खरात, संतोष आढाव, गौतम वाघमारे, भैय्यासाहेब पारखे,  सचिन पट्टेकर आदींची उपस्थिती होती.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...