सोमवार, २७ जुलै, २०२०

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रकल्पात येणाऱ्या बौद्ध लेण्यांचे भारतीय पुरातत्व खात्यातर्फे संरक्षण करणार - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले



सिडको ने पाडलेल्या केरुमाता बौद्ध लेणी ला ना रामदास आठवलेंनी दिली भेट

बौद्ध लेण्यांच्या पुरातन अवशेषांचे लेण्यांचे जतन करण्यासाठी भव्य बौद्ध स्तूप उभारण्याची ना रामदास आठवले यांची सिडको ला सूचना;मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठविणार



मुंबई,ब्युरो चीफ  :- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीसाठी 1हजार 100 हेक्टर जागेत पनवेल तालुक्यातील 10 गावांचे पूर्वसन करण्यात आले असून त्यात  येणाऱ्या बौद्ध लेण्यांचे संरक्षण करावे.  विमानतळाला आमचा विरोध नाही मात्र  बौद्ध लेण्यांचे संरक्षण झाले पाहिजे. त्यासाठी 
भारतीय पुरातत्व खात्यामार्फत आपण प्रयत्न करू. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ 5 एकर जागेत भव्य बौद्ध  स्तूप उभारून बौद्ध लेण्यांचे अवशेष जतन करावे या मागणी साठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र पाठविणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजीक न्याय राज्य मंत्री ना.रामदास आठवले यांनी केले. 

उलवे पनवेल येथून जवळ असणाऱ्या वाघिवली वाडा येथील कोंबडभुजेमधील केरुमाता बौद्ध लेणी सिडको ने पाडल्यानंतर तेथे आज ना रामदास आठवले यांनी भेट देऊन पाहणी केली.

पाडण्यात आलेल्या केरुमाता  बौद्ध  लेणीचे पुरातन अवशेष सुरक्षितरित्या उत्खनन करून जतन करावेत. त्यासाठी प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ  भव्य बौद्ध स्तुप उभारावा अशी सूचना सिडको प्रशासनाला ना.रामदास आठवले यांनी दिली आहे.यावेळी पनवेल चे उपमहापौर आणि रिपाइं चे रायगड जिल्हा अध्यक्ष जगदीश गायकवाड; सुरेश बारशिंग; नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष सिद्राम ओव्हाळ; महेश खरे; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. 

  नवी मुंबई विमानतळ उभारण्यात येणाऱ्या परिसरात केरुमाता बौद्ध लेणी तसेच कुंडेवहाळ येथील कुलुआई मंदिर; ओवळा पाणेरी आई लेणी आणि दापोली येथे राणू आई  लेणी या बौद्ध लेण्यांचे संरक्षण करावे. त्यासाठी भारतीय पुरातत्व खात्याला मार्फत प्रयत्न करणार असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले.
डॉ.कफिल खान यांची तात्काळ सुटका करा- राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा

         राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाच्या वतीने निवेदन सादर.


हिंगणघाट,ब्युरो चीफ :- राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, भारत
मुक्ती मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चा च्या माध्यमातून डॉ कफिल खान यांच्या सुटकेसाठी दिनांक 27-07-2020 सोमवार रोजी राष्ट्रपतीला हिंगणघाट तहसीलदार द्वारा निवेदन देण्यात आले.
लोकशाही मध्ये सरकारच्या जनविरोधी नीतीच्या विरोधात आंदोलन करणे हा देशातील प्रत्येक नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे, या अधिकारांतर्गत संविधानिक मार्गाने एनआरसी, सिएए या कायद्या विरोधात देशभर आंदोलन झाले होते, लोकडाऊन च्या काळात केंद्र सरकार द्वारे विशेषतः एनआरसीचा विरोध करणाऱ्या आंदोलनकर्त्याला व विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे.
या कायद्याचा विरोध करणारे डॉ कफिल खान वर खोट्या आरोपात कारागृहात टाकण्यात आले, या अगोदर गोरखपूर अपघात घटनेत डॉ कफिल यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता मुलांचा जीव वाचविला होता, त्याठिकाणी उत्तरप्रदेश सरकारच्या हलगर्जीपणामुळे ७० मुलांचे जीव गेले, त्यावेळी सुद्धा त्यांच्यावर खोटे आरोप लावून कारागृहात टाकल्या गेले होते त्यानंतर डॉ कफिल खानची सुटका झाली.आताही डॉ कफिल खानला नाहक त्रास देऊन कारागृहात टाकण्यात आले आहे जिथे डॉ कफिलच्या जीवाला धोका आहे.त्याचप्रमाणे एनआरसी,सिएए चा विरोध करणारे जेएनयु, जामिया इस्लामीया आणि अलिगढ मुस्लिम विश्वविद्यालय च्या विद्यार्थ्यांवर खोट्या केसेस टाकल्या गेले आहे, नुकत्याच झालेल्या दिल्लीतील दंग्यांमध्ये पोलीसद्वारा हाच मार्ग आजमावल्या जात आहे,   
याविरोधात संपूर्ण भारतात राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून ३५राज्य,५००जिल्हे आणि ४००० तहसील मध्ये मा.राष्ट्रपती ला मा.तहसीलदार द्वारे निवेदन देण्यात आले, सर्व विद्यार्थ्यांवरच्या खोट्या केसेस तात्काळ मागे घेऊन डॉ कफिल खान यांची सुटका करावी असे निवेदन देत राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा चे राज्य उपाध्यक्ष हाजी मिर्जा परवेज बेग, तालुका अध्यक्ष तालिब शेख, शहर अध्यक्ष महम्मद शाकिर, बहुजन क्रांती मोर्चा संयोजक इंजि.निखिल कांबळे, मयूर पाटील, गेमदेव म्हस्के, नम्रता नरांजे बिविसीपी, गजानन माऊसकर, लक्ष्मीकांत जवादे, चंद्रहास कांबळे,गजानन वऱ्हाडे, संजय डोंगरे इत्यादी सहयोगी संघटन उपस्थित होते.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...