बुधवार, २९ एप्रिल, २०२०


          धर्माबाद तालुक्यात विविध कंपनीचा पंचवीस हजार                                रुपयांचा गुटखा साठा जप्त
धर्माबाद (भगवान कांबळे):- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशासह धर्माबाद तालुक्यासह लॉकडाऊनची स्थिती असतांनाही एक व्यक्ती प्रतिबंधित केलेला गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थाच्या साठा करून अनेक गावो  गावी विक्री करत असल्याच असल्याची माहिती सहाय्यक  पोलीस निरीक्षक अशोक उजगरे यांना मिळाली होती. 

याच माहितीच्या आधारे करखेली येथे दि.28.04.2020 रोजी धर्माबाद पोलीस ठाण्याचे  पोलीस निरीक्षक श्री सोहन माछरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री  अशोक उजगरे, पोलीस हवालदार भावनगीकर, पोलिस हवालदार नागरगोजे, पोलीस नाईक गिरी, पोलीस कॉन्स्टेबल ढगे, महिला पोलीस कॉन्स्टेबल सोळंके अश्यांना शोध घेतला असता इसम नामे शेख वाजीत शेख अहमद,सय्यद अनिस सय्यद मुदीन दोघे ही राहणार करखेली चे असून आर के , आर जे, सागर,नजर नावाचा कंपन्यांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा अंदाजे  25000/- किमतीचा अवैद्य पणे हस्तगत केल्याची
अवैधपने कब्जात बाळगून विक्री करताना मिळून आले. वरील प्रमाणे  जप्त करून त्या दोघांना ही अटक करून  पुढील कार्यवाही साठी अन्न व प्रशासन अधिकारी नांदेड यांना कळविण्यात आले.  सहायक पोलीस निरीक्षक अशोक उजगरे साहेब याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.


          भोकर नगरपरिषदेकडून पत्रकारांचा सत्कार

नांदेड (भगवान कांबळे ) :- मागील सतत एक महिन्यापासून कोरोना सारख्या महामारी मध्ये कसलीही सुविधा नसताना ग्राउंड लेव्हल वर जाऊन वार्तांकन करणाऱ्या भोकर येथील सर्व पत्रकारांचा नगर परिषदेकडून प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

पत्रकार हा समाजाचा आरसा असतो समाजामध्ये घडणाऱ्या चांगल्या व वाईट घटनांच्या बातम्या तो प्रकर्षाने जगापुढे मांडण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे त्यास अनेक संकटांना सामोरे जावे लागते, मागील एका महिन्यापासून संपूर्ण भारतामध्ये कोरोना कोवीड -19 हा आजार सर्वत्र पसरला आहे, त्यामुळे सर्व नागरिकांना सक्तीने घरी बसविण्यात आले असून, लॉक डाऊन करण्यात आले आहे, या आजाराविषयी माहिती, तसेच आपला जिल्हा, आपला तालुका यातील इत्यंभूत माहिती घरी बसलेल्या नागरिकांना पोहोचविण्याची मोठी जबाबदारी तेथील पत्रकार पारपाडत आहेत, तसेच या पत्रकारांकडे कसल्याही प्रकारची पी पी ई किट उपलब्ध नाही, त्यांच्याकडे कसल्याही प्रकारची सुविधा नाही, अशा परिस्थितीत येथील पत्रकार काम करत असल्याने त्यांची दखल घेऊन भोकर नगर परिषदेच्या वतीने मुख्याधिकारी प्रियंका टोंगे आणि माजी नगराध्यक्ष विनोद पाटील चिंचाळकर यांच्या हस्ते आज दिनांक 29 एप्रिल रोजी भोकर येथील नगर परिषदेमध्ये भोकर येथील पस्तीस पत्रकारांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले असल्याने सर्वत्र भोकर नगरपरिषदेचे कौतुक होत आहे. यावेळी ज्येष्ठ पत्रकार  एल ए हिरे , बी आर पांचाळ, बाबुराव पाटील संपादक रमेश गंगासागरे, मनोज गिमेकर, मनोज चव्हाण, राजेेश वाघमारे, जय भीम पाटील, शंकर कदम व इतर पत्रकार यांच्यासह नगर परिषदेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते.


ताड़हतगांव येथील 35 वर्षीय युवकास शेतीच्या वादातून मारहाण.
               अंबड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल

अंबड/राहुल कारके : अंबड़ तालुक्यातील ताड़हतगांव येथे असलेल्या अरुण सोनावणे वय 35 वर्ष शेती व्यवसाय करुण पोट भरत दिनांक 28/04/20202 रोजी दु.12.30 वाजेच्या दरम्यान अरुण सोनावणे हा आपल्या गायराण शेती मध्ये उभा असतांना आरोपी नामे
तुकाराम चांभार, अशोक चांभार, घन्शिराम चांभार हे आमच्या गायराण जमिनीच्या शेजारी असलेल्या व तसेच अरुण सोनवणे याला शेतात बोलावून हे गायराण आमचे आहे व तु इथे काय करतोस असे म्हणून शिविगाळ करुण तुकाराम चांभार याने काहीतरी बोथट वस्तुने अरुण सोनावणे च्या डाव्या हातावर मरल्याने डाव्या हताच्या मनगटा जवळ मार लागला आहे. तसेच अशोक व घन्शिराम याने थापडबुकीने मारहाण केली असून अशोक चांभार याने जीवे मरण्याची धमकी दिली. फिर्यादी अरुण सोनावणे याने पोलीस स्टेशन येथे जाऊन तक्रार दाखल केली आहे.


            दुर्दम्य इच्छाशक्ती व उपचाराच्या जोरावर
   कोरोनावर मात करत शिरोडा येथील महिला परतली स्वगृही

जालना,प्रतिनिधी:-संपुर्ण जगात कोरोना विषाणुने दहशत माजवत संपुर्ण जगाला आपल्या कवेत घेत आहे.  मृत्यूचे भय काय असते हे मी जवळुन अनुभवले. परंतु दुर्दम्य इच्छाशक्ती व वैद्यकीय उपचाराच्या जोरावर मी आज कोरोनामुक्त होऊन मी माझ्या स्वगृही परतत असल्याचा आनंद गगनात मावत नसल्याची प्रतिक्रिया परतुर तालुक्यातील शिरोडा या गावातील कोरोनामुक्त महिलेने व्यक्त केली आहे. मी कोरोना बाधित झाल्याचे आढळून आले तेव्हा माझ्यातील आत्मविश्वास कमी झाला होता. मला चार मुली आणि एक मुलगा असुन त्यांच्या भविष्याचे काय होईल, ही चिंता माझ्यासमोर उभी राहीली.  परंतु  येथील आरोग्य यंत्रणेने माझ्या आजारावर उपचार करण्याबरोबर मला मानसिकरित्या देखील सक्षम केले. त्यामुळेचं मी आज कोरोनासोबतचे युध्द जिंकू शकले आहे. त्यामुळे आजच्या माझ्या आनंदाचे श्रेय हे संपुर्ण आरोग्य यंत्रणेला असल्याची भावनाही महिलेने व्यक्त केली. परतुर तालुक्यातील मौजे शिरोडा येथील महिलेस दि. 13 एप्रिल,2020 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना येथे खोकला व ताप या आजाराचा उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. महिलेला 6 एप्रिलपासुन ताप व खोकला होता. 6 एप्रिल रोजी महिलेने परतुर व 10 ते 13 एप्रिल दरम्यान जालना येथील खासगी रुग्णालयात उपचार घेतले होते. 

 जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना येथे दाखल झाल्यास दि. 13 एप्रिल रोजी महिलेच्या स्वॅबचा नमुना प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात  आला होता.दि. 14 एप्रिल रोजी त्याचा अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाला मात्र महिलेच्या स्वॅबचा  दुसऱ्यांदा पाठविण्यात आलेल्या नमुन्याचा अहवाल दि.21 एप्रिल, 2020 रोजी रात्री 10.00 वाजता पॉझिटीव्ह प्राप्त झाला होता.  महिलेला तातडीने आयसोलेशन कक्षामध्ये दाखल करत उपचार सुरु करण्यात आले.राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी तातडीने पाऊले उचलत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांच्या नेतृत्वाखाली शिरोडा गावातील व्यक्तींच्या तपासणीसाठी आरोग्यपथके गठित करुन 80 कुटूंबातील 560 लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड व त्यांच्या अधिपत्याखाली सर्व डॉक्टर्स, नर्स, ब्रदर्स यांच्या अथक परिश्रमातुन महिलेवर उपचार केल्यामुळे शिरोडा गावातील महिलेचा अहवाल सलग दोनवेळेस निगेटीव्ह आल्याने आज दि. 29 एप्रिल रोजी जिल्हा शल्य चिकित्सक मधुकर राठोड यांच्यासह सर्व डॉक्टर्स, नर्सेस, ब्रदर्स यांनी टाळ्या वाजवून बरे झालेल्या महिला रूग्णांस स्वगृही पाठवले.कोरोनाच्या या जीवघेण्या आजारातून वाचलेल्या कोरोना निगेटीव्ह रुग्ण महिलेचा चेहरा आनंदीत होता. आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर्स, नर्सेस यांचे आभारही महिलेले यावेळी मानले. कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी अजूनही लॉकडाऊनचे पालन करावे, घरातून विनाकारण बाहेर पडू नये. सर्वांनी मास्क किंवा स्वच्छ हात रूमाल चेहऱ्यावर ठेवावा. अनावश्यक बाहेर न पडता घरातच रहावे, असे आवाहन कोरोनामुक्त महिलेने यावेळी केले.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...