बुधवार, २७ मे, २०२०

*पोलिस कर्मचाऱ्याने बेदमपणे बदडले मादळमोही येथील प्रकार* *बीड पोलीस*
 """"""""""""""""''''""""""""""""""""""
फिर्याद देण्यास गेलेल्या इसमास गेवराई पोलिस कर्मचाऱ्याने बेदमपणे बदडले
गेवराई तालुक्यातील मादळमोही पोलिस चौकीतील प्रकार ; गंभीर जखमी इसमाची पोलिस अधिक्षकांकडे तक्रार
गेवराई , :- भांडणानंतर पोलिस ठाण्यात फिर्याद घेतली जाते,मात्र फिर्याद देण्यासाठी गेलेल्या एका इसमाची कर्तव्यावरील पोलिस कर्मचाऱ्याने तक्रार तर घेतली नाही,उलट त्यालाच चांगलेच बदडून काढल्याचा प्रकार गेवराई तालुक्यातील मादळमोही चौकीत घडला आहे.यामध्ये सदरील इसम गंभीर जखमी झाला असून कानाला दुखापत झाल्याने ऐकूच येत नसल्याने बीड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.याप्रकरणी गंभीर जखमी इसमाने पोलिस अधिक्षक यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.दरम्यान या प्रकरणाची दखल घेत पोलिस अधीक्षक यांनी हे प्रकरण गेवराई पोलिस निरीक्षक यांच्याकडे वर्ग केले आहे.    संदिपान रामभाऊ सानप (वय ४० वर्षे) रा.सावरगाव असे पोलिस कर्मचाऱ्याच्या मारहाणीत जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे.संदिपान सानप यांची चिखली शिवारात जमीन असून ते दि.२५ रोजी ट्रँक्टरच्या सहाय्याने मोघडणी करत होते.यावेळी चिखली येथील संतोष वारे हा त्याच्या पत्नी व मुलासह शेतात येऊन सानप यांना शेत मोघडण्यास मज्जाव केला.यानंतर सानप यांनी वाद नको म्हणून जवळच असलेल्या मादळमोही चौकीत जाऊन घडलेला प्रकार सांगितला. यावेळी चौकीत कर्तव्यावर असलेले पोलिस कर्मचारी गुरखुदे यांनी तक्रार घेण्यास नकार दिला.दरम्यान तक्रार का घेत नाही ? म्हणून सानप यांनी जाब विचारल्याचा गुरखुदे यांना राग आला.यानंतर गुरखुदे यांनी संदिपान सानप यांना चौकीतील एका खोलीत नेऊन बेल्ट,काठी व बँटने जबर मारहाण करत शिव्या घालत चौकीबाहेर हाकलून दिले.दरम्यान मारहाणीत जखमी झालेल्या सानप यांच्या कानाला गंभीर दुखापत झाल्याने ऐकण्यास येत नाही.तसेच हात,पायाला देखील गंभीर मार लागला असून सानप यांचँयावर बीड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.याबाबत सानप यांनी पोलिस अधिक्षक यांच्याकडे लेखी तक्रार करुन पोलिस कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.दरम्यान पोलिस अधिक्षकांनी हे प्रकरण चौकशीसाठी गेवराई पोलिस निरीक्षक यांच्याकडे वर्ग केले आहे.
                 
*चौकशी करून कारवाई करणार   याप्रकरणी गेवराईचे पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम चोबे यांना विचारले असता ते म्हणाले की,सदरील प्रकार गंभीर आहे.या प्रकरणी चौकशी करण्यात येईल,यामध्ये जर सदरील पोलिस कर्मचारी दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल*
                

                          अडचणीत असलेल्या नाट्य, चित्रपट कलाकारांना आर्थिक मदत




मुंबई,ब्युरोचीफ :- कोरोनामुळे देशात लॉकडाऊन सुरू असून सर्व व्यवहार ठप्प झालेआहेत. चित्रपट, नाट्य व्यवसायावर ही त्याचा मोठा परिणाम झाला असून कलाकार आणि  रंगमंच कर्मांचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा दोनशेहून अधिक कलाकारांना आर्थिक मदत देण्यासाठी श्री अरविंदो मीरा ही संस्था पुढे आली आहे.* लॉकडाऊन काळात चित्रपट आणि नाट्यगृह बंद करण्यात आली आहे. त्यामुळे हातावर पोट असणारे अनेक कलाकार,रंगमंच कामगार बेरोजगार झाले आहेत. तंत्रज्ञान,  रंगभूषा, वेशभूषा करणारे तसेच नेपथ्यकार, तिकीट तपासनीस, बॅनर लावणाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. अशा लोकांना मदतीचा हात देण्यासाठी श्री.अरविंदो मीरा ही संस्था पुढे आली आहे. या संस्थेने नाट्य,चित्रपट क्षेत्रातील दोनशे कलाकार आणि कर्मचाऱ्यांची यादी तयार केली असून त्यापैकी काही जणांना आर्थिक मदत केली आहे तर इतर कलाकार, कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यात मदत करण्यात येणार असल्याचे श्री अरविंदो मीरा संस्थेच्या अध्यक्षा तसेच चित्रपट नाट्य, अभिनेत्री नयन पवार यांनी सांगितले. ही संस्था दरवर्षी नवनवीन उपक्रम राबवत असते. आतापर्यंत अनेक गरीब, गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक, वैद्यकीय, मोफत शिक्षणाचा लाभ देण्यात आला आहे. नवी मुंबईत संस्थेमार्फत अनेक मुलांना मोफत नृत्य शिक्षणही दिले जाते. संस्थेने आतापर्यंत अनेक मराठी नाटकांची निर्मिती केली असून त्यात मार्ग युद्धाचा कि बुद्धाचा, पहिली भेट, आई ग कुछ कुछ होता है तर चिंगीचे प्रश्न, अंधारातून प्रकाशाकडे या लघुपटाची निर्मिती केली आहे. नयन पवार यांची कन्या लावण्या पवार हिने वयाच्या सोळाव्या वर्षी नाटकाचे दिग्दर्शन केले आहे.ती एक चांगली नृत्यदिग्दर्शिका असून तिने भरतनाट्यम मध्ये विशारद घेतली आहे. सामाजिक उपक्रमात तिचाही सहभाग असतो.

आय.जे.ए. च्या परतूर तालुका महासचिवपदी जनार्दन जाधव
"""""""""""""""""""""""""''''"""""""
*परतुर*
परतूर प्रतिनिधी/इम्रान कुरेशी
इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनच्या परतूर तालुका महासचिवपदी मराठवा डा साथी व झी 24 न्यूज लाईव्हचे आष्टीचे प्रतिनिधी जनार्दन जाधव यांची नियुक्ती जिल्हाअध्यक्ष असलम कुरेशी यांनी केली आहे.
इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सिराज अहमद कुरेशी व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सतीश मधुकरराव महामुनी यांच्या सहमतीने जिल्हा अध्यक्ष असलम कुरेशी यांनी ही नियुक्ती केली.

जनार्दन जाधव यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनमध्ये ग्रामीण व लेकर शहराच्या पत्रकारांना संघटनेशी जोड़ून संघटना मजबूत करण्याचे कार्य करावे. तसेच पत्रकारावर होणा-या अन्याया विरोधात आवाज उठवण्यासाठी. सदैव तत्पर रहावे. जनार्दन जाधव यांच्या नियुक्तीबद्दल मोहन सोळंके (सकाळ) आनंद आढे (बंजारा लाईव्ह रिपोर्टर), गणेश आगलावे (देशोन्नती), राहुल आवटे (सी.एन.आय. महाराष्ट्र रिपोर्टर), सतिश पवार (लोकप्रश्न), पांडुरंग शेजुळ (गाव माझा रिपोर्टर), अंगद मुंढे (आताच एक्सप्रेस), इमरान कुरेशी (मराठवाडा केसरी), मुनीर खान पठाण (पोलिस नवरंग), सैय्यद अकबर ( दिव्य मराठी), सैय्यद वाजिद ( राज्यवार्ता), नजीर कुरेशी (लोकमत), तरंग कांबळे (हैलो रिपोर्टर), ऊद्धव डोळस (आनंद नगरी) आदींनी त्यांचे अभिनंदन केले.


परदेशी शिष्यवृत्तीला मुदतवाढ देण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी.

मुंबई,ब्युरोचीफ :- अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना मास्टर्स व पीएचडी करीता राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्तीच्या आवेदन प्रक्रिया पूर्ण करण्याची आज शेवटची तारीख आहे. मात्र कोरोनामुळे लॉकडाऊन आणि संचारबंदी असल्याने विद्यार्थ्यांना जात पडताळणी, उत्पन्नाचा दाखला व पुर्व अटींचे ऑफर लेटर (प्रस्ताव पत्र) यांची पूर्तता करता आलेली नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना ३० जून पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी केंद्रीय सचिव योगेश धिंग्रा यांच्याकडे केली आहे.अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना मास्टर्स व पीएचडी करीता राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्तीसाठी कागदपत्रांची पूर्तता करण्याची आज शेवटची तारीख आहे. मात्र कोरोनामुळे सर्व जिल्ह्यात लॉकडाऊन आणि संचारबंदी आहे. त्यामुळे  शासकीय कार्यालये ओस पडली असून सेतू केंद्र, महा ई सेवा केंद्र, तसेच जात पडताळणी कार्यालये देखील बंद आहेत. परिणामी अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्याची जात पडताळणी, उत्पन्नाचा दाखला व इतर कागदपत्रांची पूर्तता करणे शक्य नाही. त्यामुळे अनेक होतकरू व गरजू विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.भारतात जे विद्यार्थी पदव्युत्तर किंवा डॉक्टरेटचे शिक्षण घेत आहेत किंवा घेणार आहेत.त्यांना पुन्हा शिष्यवृत्तीसाठी फॉर्म भरण्यास मनाई करण्यात आली आहे, शासनाची ही अट म्हणजे विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक उच्च शिक्षणा पासन दूर ठेवण्यासारखी असून हा त्यांच्यावर अन्याय आहे. ही अट त्वरित रद्द करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. या आधी ही सहा लाख रुपयांची उत्पन्न मर्यादा घालण्यात आली होती.परंतु मोठ्या प्रमाणात विरोध झाल्याने राज्य सरकारने याअटीला तात्पुरती स्थगित दिली आहे.असे असली तरी नव्याने वेगवेगळ्या अटी  घालण्यात आल्या असून त्यामुळे अनुसूचित जाती जमातीवर जाणीवपूर्वक अन्याय केला जात आहे.अनेकदा परदेशी विद्यापीठे ही कुठल्याही अटी शिवाय ऑफर लेटर देत असले तरी आता सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे परदेशी शिक्षण घेण्याच्या मार्गात हा देखील एक मोठा खोडा आहे. सबब ही अट रद्द करून विद्यार्थ्यांना कुठल्याही अटी शिवाय पुर्व अटींचे ऑफर लेटर स्वीकारून त्यांना देखील या शिष्यृत्तीसाठी पात्र ठरवण्यात यावे,  जागतिक पातळीवर कोरोनाची परिस्थिती पाहता सर्व कुलूपबंद असल्याने परीक्षा व प्रवेश प्रक्रिया रद्द करण्यात आल्या आहेत किंवा त्यात सवलती देऊन विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने देखील ३० जून पर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. शेकडो विद्यार्थ्यांनी देखील ई मेल आणि व्यक्तिगत पद्धतीने सामाजिक न्याय मंत्री, त्यांचे स्वीय सहाय्य्क यांना दूरध्वनीवरून संपर्क करून ही मुदतवाढ देण्याची व अटी शिथिल करण्याची मागणी करण्यात आली आहे. अशी माहिती राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली आहे.

,परतूर तालुक्यातील कापूस विक्रीसाठी चार हजार शेतकरी वेटींगवर,

परतूर प्रतिनिधी/इम्रान कुरेशी
परतूर तालुक्यातील कापूस विक्री करिता जवळपास पाच हजार शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे या ठिकाणी रोज फक्त 40 ते 50 शेतकऱ्यांचा कापूस मोजला जातो. पाऊस काही दिवसावर येऊन ठेपला आहे परतूर तालुक्यात कापूस उत्पादकांची जवळपास सीसीआय कडे ऑनलाइन पाच हजारपेक्षा जास्त नोंदणी आहे आतापर्यंत अकराशे बाराशे लोकांचाच कापूस खरेदी केलेला आहे. दररोज केवळ चाळीस-पन्नास शेतकऱ्यांचा कापूस घेतल्या जात आहे.

सीसीआय व त्याचे अधिकारी पाऊस पडण्याची वाट पाहत आहेत की काय ? असा शेतकऱ्यांना प्रश्नः पडत आहे. पाऊस पडला म्हणजे कापूस घ्यायचा प्रश्नच उरत नाही आणि मग परतूर तालुक्यातील तीन हजारपेक्षा जास्त शेतकऱ्याची नोंद तशीच बाकी राहील असे चिन्ह सध्याची परिस्थितीवरून पाहायला मिळते तरीही कोणतेही अधिकारी याबाबत गंभीर दखल घेतील असे वाटत नाही ? तरी संबंधित प्रशासनाने नोंदणीकृत शेतकऱ्यांचा कापूस हा 7 जून अगोदर घेतला पाहिजे. आजच्या घडीला कोरोनापेक्षा शेतकऱ्यांना कापूस घरात राहतो की काय याची भीती आहे आणि पावसाळा तोंडावर येऊन ठेपलेला आहे ,तरी संबंधितांनी जास्तीचे खरेदी केंद्र तात्काळ सुरु करावेत आशी शेतकऱ्याकडून मागणी जोर धरत आहे.

प्रतिक्रिया भाऊसाहेब देविदासराव मुके पाटील रा. परतूर ( शेतकरी )
लॉकडाऊनच्या काळात खरेदी केंद्र बंद असल्याने शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून आहे कापूस घरात राहिल्यामुळे त्यात किडे झाल्याने घरात राहणे मुश्किल झाले आहे. कित्येक शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या अंगावर बारीक बारीक लाल पुरळ ( गुथी ) आल्या सारखे दिसते व काहीच्या कानात रात्री झोपेतअसताना गेलेले आहेत हे असा मानसिक व आर्थिक त्रास अजुन काही दिवस असाच राहिला तर कोरोना राहील बाजूला अन् त्या किड्यांमुळे वेगळीच रोगराई पसरेल.व शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडेल आणि मग शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारेल की काय यांची भीती वाटते.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...