शनिवार, ४ एप्रिल, २०२०

      कोरोनाच्या परिस्थितीत समाजामध्ये दुही माजविणाऱ्यांना                                   मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा
  मुंबई प्रतिनिधी : कृपा करून शिस्त
पाळा, सहकार्य करा असे मी जेंव्हा हात जोडून  म्हणतो ते माझ्या महाराष्ट्रातील तमाम बंधु, माता- भगिनींसाठी असते जे अतिशय संयमाने, जिद्दीने आणि आत्मविश्वासाने या कोरोना विषाणुविरुद्ध लढत आहेत.. पण समाजात आणखी एक समाजविघातक विषाणू पसरत आहे, सध्याच्या परिस्थितीचा दूरूपयोग करून जर कुणी माझ्या बंधू,माता-भगिनी आणि  महाराष्ट्राला अडचणीत आणत असेल तर  अशा समाजविघातक वृत्तींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असा सज्जड इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.आज मुख्यमंत्र्यांनी समाज माध्यमांवरील थेट प्रसारणाच्या माध्यमातून जनतेला संबोधित केले.
प्रारंभी त्यांनी सोलापूरच्या 7 वर्षाच्या आराध्या नावाच्या मुलीने वाढदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत केल्याचा  आवर्जून उल्लेख केला व तिला शुभेच्छा दिल्या.
एकजुटीला गालबोट लावू देणार नाही
कोणत्याही धर्माच्या, पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमांना मान्यता नाहीच
राज्यात पाडवा, रामनवमी, पंढरपुरची यात्रा यासारखे सर्व मोठे सण अगदी घरगुती स्वरूपात आयोजित झाले, कोणतेही मोठे उत्सव वा कार्यक्रम झाले नाहीत.ज्याप्रमाणे हे कार्यक्रम झाले त्याचप्रमाणे इतर धर्मियांनी सुद्धा आपले सण, समारंभ आणि कार्यक्रम करावेत, एकत्र येणे, गर्दी करणे टाळावे कारण राज्यात कोणत्याही धर्माच्या, राजकीय पक्षाच्या आणि कोणत्याही कारणासाठी कोणत्याही कार्यक्रमांना, खेळाच्या स्पर्धांना परवानगी दिली जाणार नाही म्हणजे नाहीच, तशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे असे कार्यक्रम आयोजित केलेच जाऊ नयेत असे कडक शब्दात स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की, या विषाणुशी सगळे एकजुटीने लढत आहेत. याला कुणी गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये, ते सहन केले जाणार नाही.
इलाज म्हणून नाईलाजाने घरी बसा
हा विषाणु कोणताही जातधर्म पहात नाही. याची बाधा सगळ्यांना सारखीच होते. त्यामुळे इलाज म्हणून नाईलाजाने का होईना घरी बसा, गर्दी टाळा. संयम, जिद्द आणि आत्मविश्वासारखे दुसरे आयुध नाही, या आयुधाच्या मदतीने आपण हे युद्ध नक्की जिंकू असे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी आज समाजविघातक कृत्ये करणाऱ्या प्रवृत्तींना आपल्या बोलण्यातून स्पष्ट इशारा आणि कडक कारवाईचे संकेत दिले आहेत.
दिल्लीहून परतलेल्या १०० टक्के लोकांचा शोध आणि विलगीकरण
परवा प्रधानमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरंसिगच्या माध्यमातून संवाद झाल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, दिल्लीतील कार्यक्रम करून घरी परतलेल्या लोकांची माहिती देणारी यादी दररोज केंद्रशासन आपल्याला पाठवत आहे. आतापर्यंत कळवलेल्या जवळपास १०० टक्के लोकांचा शोध घेऊन त्यांचे विलगीकरण करण्याचे काम आपण केले आहे. परंतू जर यातील कुणी शोधायचे राहिले असतील तर त्यानी स्वत:हून पुढे यावे, चाचणी करून घेऊन उपचार करून घ्यावेत, किंवा शेजारच्या नागरिकांनी अशा लोकांची माहिती द्यावी असे आवाहन ही मुख्यमंत्र्यांनी केले.
५१ लोक सुखरुप घरी गेले
राज्यात कोरोना बाधितांच्या केसेस वाढताहेत, मला ही माहिती लपवायची नाही हे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की, आपण महाराष्ट्रात आणि मुंबईत चाचणीची केंद्रे वाढवली आहेत. आपल्याकडे येऊन तपासणी करून घेणाऱ्यांपेक्षा आपण स्वत:हून पुढे जाऊन संशयितांचा शोध घेत आहोत. आज या रुग्णांची संख्या ५०० च्या वर गेली आहे पण ५१ रुग्ण बरे होऊन आपापल्या घरी सुखरूप गेले आहेत याचाही मुख्यमंत्र्यांनी आवर्जुन उल्लेख केला.
राज्यात ५ लाख स्थलांतरीतांची सोय
इतर राज्यातील तसेच महाराष्ट्रातील स्थलांतरीत कामगार-मजुरांची महाराष्ट्र शासनाने जबाबदारी घेतली असून जवळपास ५ लाख लोकांची सोय केली आहे. त्यांच्या दोन वेळेसचे जेवण, नाश्ता, राहण्याची आणि औषधोपचाराची मोफत सोय केली आहे. त्यामुळे कुणी कुठेही जायची गरज नाही हे ही मुख्यमंत्री म्हणाले. इतर राज्यात अडकलेल्या महाराष्ट्रीयन माणसांनाही त्यांनी दिलासा दिला. आहे तिथेच रहा हे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी अडचण आल्यास मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क करा असे आवाहन करून मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही दिले.
मुंबईकरांची एकजुट आणि जिद्द अतुलनीय
जिल्ह्याजिल्ह्यात आरोग्य सुविधा वाढवल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, सगळ्या जगाचे जसे मुंबईकडे लक्ष आहे तसेच विषाणुचेही. पण ही मुंबई आहे, या शहराने अनेक धक्के आणि अपघात पचवले आहेत. त्यांचे शौर्य नेहमीच अतुलनीय राहिले आहे. एकजुट आणि जिद्द हा या शहराचा स्थायीभाव आहे. या मुंबईचे  हा विषाणु काही बिघडवणार नाही असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईत कोविड-१९ साठी स्वतंत्र रुग्णालये सुरु करण्यात आली आहेत. सर्दी, पडसे, न्युमोनियाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी नेहमीच्या दवाखान्यात न जाता सरकारी रुग्णालयात, कोविड चाचणी केंद्रात जाऊन आपली तपासणी करून घ्यावी. त्यामुळे इतर दवाखाने सुरक्षित राहतील, बंद होणार नाहीत.
ज्येष्ठांना जपा
दुर्देवाने काही मृत्यू महाराष्ट्रात झाल्याचे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले की, मधुमेह, ह्दयविकार आणि इतर व्याधींनी ग्रस्त असलेल्याचा या मृत्यूत समावेश आहे. आपल्याला आपल्या घरातील ज्येष्ठ नागरिकांना विषाणुचा संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. यासाठी आपण सुरक्षित राहणे, गर्दीत,घराबाहेर न जाणे हा एक उपाय आहे. जेंव्हा केंव्हा जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी जाऊ तेंव्हा नाक, चेहऱ्याला रुमाल बांधून जाऊ यासारखा साधा उपायही आपल्यालाच करायचा आहे.
जीवनावश्यक वस्तुंची २४ तास उपलब्धता असतांना गर्दी का करता असा सवालही मुख्यमंत्र्यांनी जनतेस विचारला तसेच गरज नसेल तर घराबाहेर पडू नका, तुम्ही अंतर ठेऊन वागाल तर कोरोनाचा धोका ही तुमच्यापासून दूर राहील.  माझा माझ्या राज्यातील जनतेवर विश्वास आहे. माझ्या मनात आत्मविश्वास आहे. याबळावर एकजुटीने आपण कोरोनावर मात करू, संयमाची, जिद्दीची आणि आत्मविश्वासाची ही भिंत मनात अशीच मजबूत ठेवा, कोरोना तुमचं काही ही बिघडवू शकणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले तसेच या लढाईत आपणच जिंकणार हा विश्वास देखील व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी मदत करणाऱ्या सर्व हातांचे आभार व्यक्त केले .


...    
जालन्यात भाजपाकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटपासाठी हजारोची गर्दी ची लाट भाजपच्या धान्य वाटपाच्या कार्यक्रमाचा फज्जा
जालना / प्रतिनिधी :-जालना शहरातील समभाजीनगर येथे गरिबांसाठी किराणा किट वाटप 
करण्यात येणार होती हे धान्य भाजपा कार्यालय येथे देण्यात येणार होती. मात्र धान्य वाटप करण्यासाठी नागरिकांना कार्यालयातच बोलवण्यात आलेले होते.देश भरात लोकडाऊन सचारबंदी सुरू आहे 144 कलम लागू असताना सुद्धा याठिकाणी परिसरातील सर्व नागरिकांना एकत्र धान्य वाटण्यात येणार होते.शासन हे सर्वत्र गर्दी होऊ नये यासाठी सोशल डिस्टन्स ठेवावे म्हणून विविध उपाययोजना करत आहे.कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे.शासन हे कठोर पाऊलही काही ठिकाणी उचलत असल्याचे दिसते.विविध संस्था व काही नगरसेवकांनी अन्न धान्य वाटप केलेले आहे परंतू त्यांनी घरपोच वाटप केले.यामुळे गर्दी होण्यास टाळलेले आहे.जालना भाजपा तर्फे ही आज रोजी अन्न धान्य वाटप करण्यात येणार होते परंतू त्यांनी घरपोच न देता सर्वांना कार्यालयातूनच घेऊन जाण्याचे सांगितले.यामुळे परिसरातील नागरिकांची एकच झुंबड उडाली सचारबंदी चे उल्लंघन केले आहे.जालन्यात भाजपच्या धान्य वाटपाच्या कार्यक्रमाचा फज्जा उडाला आहे.जालन्यात भाजपच्या धान्य वाटपाच्या कार्यक्रमाचा फज्जा पाहायला मिळाला.लाॅकडाऊन दरम्यान अनेकांवर उपासमरीची वेळ आली.त्यामुळं जालना शहरातल्या भाजप कार्यालयासमोर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते गरिबांना धान्य वाटपाचा कार्यक्रम आयोजन्यात आला होता.मात्र मोफत धान्य मिळणार असल्यानं नगरिकांनी याठिकाणी प्रचंड गर्दी केली.भाजपच्या वतीनं याठिकाणी नागरिकांना थांबण्यासाठी कोणत्याही प्रकारचं नियोजन करण्यात आलं नव्हतं. प्रचंड गर्दी केल्यानं पोलिसांच्या मदतीनं नागरिकांना हकलवण्यात आलं.त्यामुळं शेकडो नगरिकांना याठिकाणाहून रिकाम्या हाती परतावं लागलं. मात्र भाजपच्या नियोजन शून्यतेमुळं कायद्याचं उल्लंघन करण्यात आलं.या भाजपा कर्यालयासमोर गर्दीची लाट उसळली सदरची ही बाब पाहता अज्ञान व्यक्तीने पोलिसांना फोन केले तेव्हा सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी तातडीने या ठिकाणी पाचारण झाले व होणारी गर्दी ही रिकामी केली.व पोलिसांनी भाजपा कार्यकर्त्यांना चांगलेच बजावले.

                147 पैकी 111 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह
            3 नमुने रिजेक्ट तर 33 नमुन्यांचे अहवाल प्रलंबित
जालना, प्रतिनिधी - कोरोना विषाणुचा (कोव्हीड-19) 
प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग  जालना जिल्ह्यामध्ये दि.4 एप्रिल 2020 रोजी 21  रुग्ण नव्याने दाखल झाले आहे आतापर्यंत एकुण 147 रुग्ण विलगीकरण कक्षात  दाखल होते. त्यापैकी 147 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले असुन त्यापैकी 111 रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले असुन ते निगेटिव्ह आले आहेत व 3 नमुने रिजेक्ट असुन 33 नमुन्यांची अहवाल प्रलंबित आहे.आज रोजी 43 रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल असुन 42 रुग्णांची प्रकृती स्थिर आहे व एका रुग्णांची   प्रकृती गंभीर असून त्यावर उपचार सुरु आहेत. सदर रुग्णाचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला असुन त्याचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे.रुग्णालयातुन डिस्चार्ज झालेल्या तसेच परदेशी प्रवासाचा पुर्व इतिहास असणा-या सर्व व्यक्तींचे घरी अलगलीकरण करण्यात आलेले आहे. आजपर्यंत एकुण 122 परदेश प्रवास केलेले व्यक्तींपैकी 115 व्यक्तींचे घरीच अलगीकरण करण्यात आलेले आहे. तसेच इतर  शहरे व राज्यातुन आलेल्या 15 हजार 458 व्यक्तींचे तपासणी अंती घरीच अलगीकरण करण्यात आले आहे.संस्थेत अलगीकरण केलेल्या सहवाशितांची (Contact) संख्या 124 असून संत रामदास मुलांचे शासकीय वसतीगृह येथे 47, बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहामध्ये 39, मुलींचे शासकीय वसतीगृह येथे 38 जणांना दाखल करण्यात आलेले आहे. प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि.13 मार्च 2020 पासुन लागु करण्यात आलेला असून त्याअनुषंगाने शासन निर्देशानुसार दि. 1 मार्च 2020 नंतर परदेश प्रवासावरुन आलेल्या नागरीकांची आरोग्य तपासणी  व आवश्यकतेनुसार अलगलीकरण किंवा विलगीकरण करणे अत्यावश्यक आहे. तरी सर्व नागरीकांनी परदेशात प्रवास केल्याची माहिती प्रशासनास देऊन स्वत:ची व आपल्या कुटुंबियांची तपासणी सामान्य रुग्णालय, जालना येथे करुन घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले.  दरम्यान  जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे  यांनी कोरोना विषाणु संबंधित सर्व मुख्याधिकारी नगर परिषद, पंचायत यांची आढावा बैठक घेऊन संशयीत रुग्ण व त्यांच्या सहवाशितांची स्थानिक आरोग्य पथकांमार्फत तपासणी करुन लक्षणानुसार अलगलीकरण किंवा विलगीकरणाबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देत सर्व सहवाशितांचा किमान 14 दिवस पाठपुरावा करण्यात यावा. या दृष्टीने कार्यक्षेत्राचा कृतिक्षेत्राचा कृति आराखड्याची रंगीत तालिम घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

नगरपरिषदेच्या वतीने हेल्पलाइन घरपोच सेवा, घरा बाहेर पडू नका आपल्या जीवाची  काळजी घ्या : अंबड़ नगरपरिषद चे मुख्याधिकारी डॉ. सागरजी घोलप, यांचे आव्हान

 आपल्यासाठी हेल्पलाइन नंबर.8805500867 वर फोन करुण घरपोच मागवा आवश्यक सामान

अंबड़/अरविंद शिरगोळे :  आता तर लोक लॉक डाऊन मुळे घराबाहेर पड़ने झाले मुश्किल संपूर्ण भारत देशामधे सद्या 
या कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी संचारबंदीमधे नागरिकांची ग़ैरसोय होऊ नये म्हणून अंबड़ नागरेपरिषदेच्या वतीने एक आपल्यासाठी हेल्पलाइन नंबर सुरु करण्यात आला आहे. आवश्यक सेवा सुविधांसाठी नागरिकांना घराबाहेर पडावे लागू नये म्हणून भाजीपला, फळे, किराना माल, मेडिकल औषध व आवश्यक वस्तु घरपोच पुरविण्यासाठी सेवा होम डिलिव्हरी सिस्टीम साठी या हेल्पलाइन नंबरचा 8805500867 वापर करवा. विविध तसेच वीक्रेत्येकांची यादि देखील व्हासोपग्रूप वर उपलब्ध आहे. झेराँक्स यादि मिळन्यासाठी शहरात जागो जागी जनजागृतिसाठी फिरणाऱ्या रिक्शा मध्ये संपर्क साधावा. व अंबड़ नगरपरिषदेची घंटागाडी, स्वच्छ्ता, पाणीपुरवठा, विद्युत लाइटची वेवस्था इत्यादि दैनदीन सेवसुविधासाठी या  हेल्पलाइन नंबर. चा वापर करवा. तसेच कोरोना आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी आपल्या परिसरामधील परदेशी, बाहेरुन आलेला पाहुना किवा कोरोना ग्रस्त मुंबई, ठाणे, पुणे व इतर ठिकानावरुन आलेले नागरिक किंवा सर्दी, खोकला, ताप, आणि  श्वास घेण्यास त्रास इत्यादि कोरोना आजाराची लक्षणे असणारे नागरिक यांची माहिती देण्यासाठी नागरिकांनि सदर या हेल्पलाइन नंबरचा वापर करावा. व तसेच लॉक डाऊनच्या आदेशामुळे अन्न पाणी मिळत नसल्यामुळे उपास मार होणारे नागरिक, उद्योग व्यसाय बंद झाल्यामुळे बेरोजगार झालेले कामगार, परराज्यातिल विस्थापित कामगार, बेघर झालेले आशा लोकांना अन्नधान्य आणि आर्थिक निधि मदत करण्यासाठी स्वत: हुन इछुक असणारे स्वयंसेवी संस्था सीएसआर निधी देणाऱ्या कंपन्या आणि दानशुर यांची माहिती देण्यासाठी या हेल्पलाइन नंबरचा  करावा या हेल्पलाइननंबर वर सकाळी आठ ते दुपारी दोन वजेपर्यंत कधीही कॉल करू शकता. दररोज हेल्पलाइन नंबर व्हासोअप मेसेज करुण सेवासुविधा उपलब्ध केल्या जातील.चला घरात बसूया आणि कोरोना विषाणु ला हरवू या घाबरु नका पन आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, असे आव्हान अंबड़ नगरपरिषद चे मुख्याधिकारी डॉ. सागरजी घोलप यांनी केले

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...