रविवार, १० मे, २०२०

15 लाख 18 हजाराचा किमतीचा गुटखा  ४ आरोपीसह स्थानिक गुन्हे शाखा जालना यांचे ताब्यात
      




जालना / प्रतिनिधी :- जालना स्थानिक गुन्हे शाखेने आज रोजी जालन्यात 15 लाख 18 हजार रुपयांचा गुटख्यासह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.यात 4 आरोपी ना अटक करण्यात आली आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना त्यांचे गुप्त बातमीदारमार्फत माहीती मिळाली की , एका इसमाने त्याच्या जाफ्राबाद रोडवरील शेत वाडयावरील घरात व घराच्या परीसरातील जागे मध्ये महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला गुटखा व सुगंधी तंबाखू पदार्थाचा साठा करुन त्याची चोरटी विक्री करीत आहे अशी खात्रीशिर माहीती मिळाल्याने पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर हे त्यांचे स्टाफ सह तात्काळ सकाळीच 6 वा मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जावुन अचानक छापा टाकला . त्याठिकाणी 4 इसम हे मालाची वाहनातन चढउतार कारत असतांना मिळुन आले त्यांना ताब्यात घेवून त्यांचे नावे गावे व इतर अधिक माहीती विचारली . त्यांनी त्यांचे नाव अन्ना गजानन जगताप वय 21 वर्ष रा . राजूर ता . भाकरदन जि . जालना,अक्षय पुंडलिक मगरे वय 18 वर्ष रा . राजुर ता . भोकरदन जि . जालना,मोहमंद तन्वीर अब्दुल खालेद मोमीन वय 21 वर्ष रा . बद्रुददीन हॉस्पीटल जवळ जालना,अहमद रझा अशपाक शेख वय 22 वर्ष रा . रा . बद्रूदीन हॉस्पीटल जवळ जालना अशी सांगितली . सदरचा शेत वाडा व गुटख्याचा माल हा संदिप दत्तात्रय भुमकर रा . राजुर याचाच असल्याचे त्यांनी सांगितले . सदर शेतवाडया मधुन व वाहनातुन एकुण 9 लाख 18 हजार रुपये किंमतीचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गोवा व राजनिवास गुटखा मिळुन आला . तसंच गुटख्याची वाहतूक करण्यासाठी एक महिंद्रा कंपनीचे बोलेरो पिक अप वाहन व दोन मोटर सायकल असा एकण 15 लाख 18 हजार रुपायचा मुददेमाल जप्त करुन अन्न औषध प्रशासन विभाग जालना येथील अधिकारी यांना पाचारण करुन त्यांचे मार्फतीने पुढील कार्यवाही करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एस चैतन्य यांनी दिली. सदरची कार्यवाही  ही पोलीस अधिक्षक  एस .चतन्य , अपर पोलीस अधिक्षक समाधान पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजद्रसिंह गौर , पोलीस उपनिरीक्षक दाशा राजपत ,संम्युअल कांबळे ,फुलचंद हजार ,प्रशांत देशमुख,कृष्णा तंगे , सचिन चौधरी ,हिरामण फलटणकर यांनी केलेली आहे .

लॉकडाऊन च्या काळात मग्रारोहयोच्या माध्यमातुन 19 हजार 758 मजुरांना  रोजगार


 


जालना,प्रतिनिधी:- महात्मा गांधी राष्ट्रीय  ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत  दरवर्षी रोजगार हमीची कामे सुरु होतात. मात्र कोरोना विषाणुचा प्रसार व लॉकडाऊनच्या पार्श्वभुमीवर  जालना जिल्हा प्रशासनाने मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे सुयोग्य नियोजन केलेले आहे. लॉकडाऊनच्या काळात बहुतांश मजुर हे स्वगृही परतले असलया कारणाने वित्तीय वर्ष 2020- 21 मध्ये सर्व मजुरांना त्यांच्या काम मागणी प्रमाणे कामे उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्ह्यातील  प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पुरेशा प्रमाणात शेल्फवर कामे उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक काम मागणा-या मजुरांना त्यांच्या काम मागणी प्रमाणे कामे उपलब्ध करुन देण्याचे निर्देश  जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली  उपजिल्हाधिकारी (रोहयो) रवींद्र परळीकर  यांनी सर्व  तालुकास्तरीय यंत्रणा प्रमुखांना निर्देश दिलेले आहेत. योजने अंतर्गत जालना जिल्ह्यात आज रोजी 349 ग्रामपंचायतीमध्ये 1213 विविध प्रकारची कामे सुरु असुन त्यावर 19758 मजुर प्रतिदिन काम करीत आहेत. यात बदनापुर तालुक्यात सर्वाधिक  241 कामे, भोकरदन तालुक्यात 210, घनसावंगी तालुक्यात 182, जालना तालुक्यात 185, परतुर तालुक्यात 133, जाफ्राबाद तालुक्यात 122, अंबड तालुक्यात 75, तर मंठा तालुक्यात 65 कामे सुरु आहेत.दि. 2 मे 2020 रोजी  843  कामे सुरु झाली असुन  8 हजार 661 मजुरांची  उपस्थिती आहे.  दि. 3 मे 2020 रोजी  878  कामे सुरु झाली असुन  तेथे 9 हजार 775 मजुरांची  उपस्थिती आहे. दि. 4 मे 2020 रोजी  850  कामे सुरु झाली असुन  तेथे 9 हजार 89 मजुरांची  उपस्थिती आहे. दि. 5  मे 2020 रोजी 973   कामे सुरु झाली असुन  तेथे 12 हजार 143 मजुरांची  उपस्थिती आहे. दि. 6  मे 2020 रोजी   1 हजार 21   कामे सुरु झाली असुन  तेथे 14 हजार 174 मजुरांची  उपस्थिती आहे. दि. 7  मे 2020 रोजी   1 हजार 66 कामे सुरु झाली असुन  तेथे 15 हजार 430मजुरांची  उपस्थिती आहे. दि. 8 मे 2020 रोजी   1 हजार 64   कामे सुरु झाली असुन  तेथे 15 हजार 818 मजुरांची  उपस्थिती आहे. दि. 9 मे 2020 रोजी   1 हजार 146 कामे सुरु झाली असुन  तेथे 17 हजार 241 मजुरांची  उपस्थिती आहे. दि. 10  मे 2020 रोजी   1 हजार 213   कामे सुरु झाली असुन  तेथे 19 हजार 758 मजुरांची  उपस्थिती आहे.

जाफराबाद तालुक्यात लॉकडाऊन मध्ये शेतकर्यांचे हाल....! तरीही जगाचा पोशिंदा राब राब राबतोय...!!

डावरगाव देवी ता. जाफराबाद येथील विष्णू बैनाडे यांचे कुटुंब मिरची लागवड करताना टिपलेले हे छायाचित्र.

जाफराबाद / प्रतिनिधी :- तालुक्यामध्ये गत वर्षी झालेल्या परतीच्या पावसाने शेतकर्यांच्या पिकांचे आतोनात नुकसान झाले होते. त्यानंतरही शेतकर्यांनी स्वतःला सावरत मका, गहू, ज्वारी, बाजरी, हरबरा, कांदा, लसूण, भाजीपाला, द्राक्ष, पपई, टरबुज, खरबूज यांसारखी उत्पादने घेतली. परंतु आता संपूर्ण जगात कोरोना या संसर्गजन्य विषाणूने अक्षरशः थैमान घातलेले असल्यामुळे देशामध्ये लॉक डाऊन घोषित करण्यात आलेले आहे. यामध्ये सर्वत्र वाहने, व्यापार, बाजारपेठ, विशेष म्हणजे गरीबांचे मार्केट अर्थातच आठवडी बाजार बंद असल्याने यात शेतकर्यांचे हाल होत आहेत.

शासनाने वेळेचे बंधन ठेवून व सोशल डिस्टंसींगचा वापर करून जीवनावश्यक वस्तूंची खरेदी / विक्री करण्याची मुभा दिलेली आहे. तरी सुद्धा जाफराबाद, टेंभुर्णी, खासगाव अशा काही मोजक्या ठिकाणीच आठवडी बाजार भरत असून. तेथे गर्दीही कमी राहत आहेत. यामुळे बाजारात विक्री कमी होत असल्याने शेतकर्यांना जवळपासच्या गावांमध्ये जाऊन भाजीपाला व फळे विक्री करावे लागत आहे. येथेही कोरोनाच्या धास्तीने अनेकजण खरेदी करण्यास घाबरत आहेत. यातही समाधान कारक विक्री होत नसल्याने शेतकर्यांची दैना होत आहे. शिवाय लॉक डाऊन पूर्वी मका ला प्रति क्विंटल दोन हजार रु. पेक्षाही जास्त भाव होते, आता व्यापारी हजार / बाराशे रु. प्रति क्विंटल भावाने खरेदी करीत असल्याने शेतकरी द्विधा मन स्थितीत आहेत. याच बरोबर गहू, ज्वारी, बाजरी, हरबरा या मालाला ही योग्य भाव नसल्याने ते ही पडून आहेत.

     शेतांमध्ये हरीण व माकडे, पिकांची व भाजीपाला, फळावळांची नासधूस करीत असल्याने शेतकर्यांना दिवस-रात्र त्यांची राखण करावी लागत आहे. याशिवाय पुढील महिन्यात मान्सूनचे आगमन होणार असल्यामुळे शेतांची नांगरटी व मशागत करून ते खरीप पिकांसाठी शेत तयार करीत आहेत. आता रासायनिक खते व बी-बियाण्यांसाठी पैशे कुठून आणावे? हा मोठा यक्ष प्रश्न त्यांना भेडसावत आहे.
     एक विशेष...!
     कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे जग मात्र थांबलेले आहे, तरीही हा जगाचा पोशिंदा राब राब राबतोय...!!

-----------------------------------  
     जाफराबाद तालुक्यातील आमच्या प्रतिनिधीने लॉकडाउन काळातील समस्या जाणून घेण्यासाठी अनेकांशी संपर्क साधले असता येथील शेतकरी, भाजीपाला-फळे विक्रेते, भूमिहीन मजूर, कलावंत व प्रतिष्ठित नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या.

"आम्ही कामानिमित्त औरंगाबाद ला असतो. सध्या लॉकडाऊन मध्ये गावातच असून, आई-वडिलांना परिवारांसह शेती कामी मदत करीत आहोत. शेतकर्यांना किती हालअपेष्टा सोसावे लागते, याचा आम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतोय. शासनाने शेतकर्यांच्या मालाला योग्य भाव देऊन, सर्वतोपरी सहकार्य करावे. तरच त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल व देशाची उज्जवल भविष्या कडे वाटचाल होईल."
- विष्णू बैनाडे (प्रतिष्ठित नागरिक) डावरगाव देवी ता. जाफराबाद.
********************************************
"बाजारांमध्ये ४ वाजे नंतरच ग्राहकांचा ओघ वाढतो, मात्र शासनाने २ वाजे पर्यंतचीच वेळ दिल्याने समाधान कारक विक्री होत नाही. यात २०० रुपये सुद्धा हाती पडत नाही. आसपासच्या गावांत गेलो तर पेट्रोल खर्च ही निघत नाही. सध्या रमजानचा पवित्र महिना चालू असल्याने शासनाने बाजाराला दुपार नंतरची वेळ द्यावी."
- बालाजी मुळे (भाजीपाला व फळे विक्रेते.) टेंभूर्णी ता. जाफराबाद.
***********************************************
"अति पावसामुळे आमच्या खरीप पिकांचे नुकसान झाले होते. आता लॉक डाऊनमुळे मका, कांदा व भाजीपाला यांना योग्य भाव मिळत नाही. आज रोजी मका चे भाव फक्त हजार रु. प्रति क्विंटल असल्याने शेतकरी बिकट अवस्थेत आहे.
     शासनाने याकडे लक्ष द्यावे व सहकार्य करावे."
- अनवर पठाण (सामान्य शेतकरी) गोंधनखेडा ता. जाफराबाद.*
***********************************************
"कोरोना व्हायरसमुळे आपल्या देशावर जे संकट आलेले आहे, त्यावर मात करण्यासाठी सरकारने घेतलेली महत्वाची भूमिका म्हणजे 'लॉकडाऊन'.
     परंतु यामध्ये जे 'भूमिहीन मजूर' पोट भरण्यासाठी गावातून शहरांत गेले होते, ते कोरोनाच्या भीतीने गावाकडे परतत आहेत. आता त्यांच्या पोटापाण्याचे काय?
     शासनाने भूमिहीन मजूरांसाठी काही तरी सोय करावी. हीच आमची विनंती आहे."
- अनिल चौधरी (भूमिहीन मजूर) देऊळ झरी ता. जाफराबाद.
***********************************************



"यावर्षी आम्ही खरबूज लागवड केली आहे. परंतु सध्या लॉकडाऊन असल्यामुळे मालाचे नुकसान होत असून त्याचा खर्च पण निघत नाही. आणि आता काही दिवसांनी पेरणीचे दिवस येणार आहे. तर सरकारने शेतकर्यांचे कर्ज माफ करून नवीन कर्जाची लवकरात लवकर वाटप करावी. जेणेकरून शेतकर्यांना आधार मिळेल."
.- समाधान पाटील दुनगहू (शेतकरी) पिंपळखुटा ता. जाफराबाद

***********************************************

"लॉकडाऊन मध्ये शेतकर्यां बरोबरच कलावंतचेही हाल होत आहेत. या काळात कुठेही कार्यक्रम होत नसल्याने कलावंतावर उपासमारीची वेळ आली आहे.
     मायबाप सरकारने शेतकरी, कामगार, भूमिहीन शेतमजूर यांच्याबरोबरच कलावंतानाही न्याय द्यावा, ही विनंती."
- शाहीर अनिल भदर्गे (राष्ट्रीय पंचशिल कला पथक मंडळ) अकोलादेव ता. जाफराबाद.
*************************************************



         वर्दीतला देवमाणूस आला धावुन मदतीला

कोरोना; एकीकडे कतृव्य बजावणे,त्याचबरोबर गरजूंना मदत करणे.




जालना,प्रतिनिधी :- जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस हवलदार श्री.सतिष ढिलपे हे कोरोना पासून जनतेचे रक्षण करण्यासाठी आपले कर्तव्य बजावत आहेत.त्याच बरोबर गोरगरीब व गरजू व्यक्तींना पोटापाण्याचा प्रश्न मिटविण्यासाठी वेळोवेळी आपल्यापरीने  गरजूंना मदत करीत आहेत.संपूर्ण जगामध्ये थैमान घातलेल्या कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव भारतामध्ये सुद्धा दिसून येत आहे. त्यातच महाराष्ट्रामध्ये कोरोना ने जास्तच थैमान घातले आहे.माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 मे पर्यंत संपूर्ण देश लाॕक डाऊन वढवण्याचे निर्देश दिले आहेत. देशात व महाराष्ट्रात संचारबंदी लागू झाल्यानंतर सर्व छोटे-मोठे उद्योगधंदे, व्यापार बंद झालेले आहेत. अशा स्थितीत मोलमजुरी करून ऊदरनिर्वाह करणाऱ्यांची बिकट स्थिती होत आहे.
त्याच प्रमाणे जालना शहरातील बऱ्याच  भागामध्ये कामगार,मजूर व हातावर काम असणारे बरेच कुटुंब आपला उदरनिर्वाह करीत आहेत. परंतु लाॕक  डाऊन मुळे या सर्वांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.त्या अनुषंगाने वाहतूक शाखेमध्ये कार्यरत असलेले पोलीस हवलदार श्री.सतीष ढिलपे,सोबत त्यांची पत्नी कविता ढिलपे,मुले नेहा,नितिश,यश तसेच आई-वडील व सासू-सासरे यांच्या ऊपस्थिती मध्ये रामनगर पोलीस काॕलनी माध्ये तांदुळ वाटप करण्यात आले.

जालना जिल्ह्यात 10 मे रोजी तीन व्यक्तींच्या स्वॅबचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती.




जालना,प्रतिनिधी :- रंगनाथनगर इंदेवाडी परिसरातील 22 वर्षीय गर्भवती महिला तसेच कानडगांव  ता. अंबड येथील 29 वर्षीय तरुण व 52 वर्षीय महिला यांच्या स्वॅबच्या नमुन्याचे अहवाल दि. 10 मे 2020 रोजी पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक जालना यांनी दिली.
रंगनाथनगर इंदेवाडी पाण्याची टाकी, परिसर येथील 22 वर्षीय गर्भवती महिला सर्दी झाल्यामुळे शहरातील एका खाजगी दवाखान्यात झाली होती. तेथील डॉक्टरांनी तपासणीअंती सदरील महिलेस न्युमोनिया झाल्याचे लक्षात आले नंतर त्यांनी संबंधित महिलेची जिल्हा सामान्य रुग्णालयास रवानगी केली. दि. 8 मे 2020 रोजी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल  करण्यात आले होते. त्याच दिवशी स्वॅबचा नमुना प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल दि. 10 मे 2020 रोजी प्रयोगशाळेकडून पॉझिटिव्ह  प्राप्त आहे तसेच कानडगांव ता. अंबड येथील  29 वर्षीय तरुण मुंबई येथुन 52 वर्षीय आई व 58 वर्षीय वडील यांच्यासह गावाकडे आला होता. संबंधितांना गावातील नागरिकांनी तपासणीसाठी अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविले होते. तेथील डॉक्टरांनी या तिघांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालय, जालना या ठिकाणी पाठविले. या तिघांपैकी आई व मुलगा यांच्या स्वॅबच्या नमुना प्रयोगशाळेकडून दि. 10 मे 2020 रोजी पॉझिटिव्ह तर सदर तरुणाच्या वडीलांच्या स्वॅब निगेटिव्ह प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

कोरोनाग्रस्त आढळल्यानंतर जिल्हा प्रशासनाने खबरदारीची उपाययोजना म्हणुन तालुकास्तरीय पथकाने रंगनाथ नगर पाण्याची टाकी परिसर, जालना व कानडगाव ता. अंबड येथे घटनास्थळी भेट देऊन कन्टेटमेंट प्लानच्या अनुषंगाने सुचना दिल्या. सदरील रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सहवाशीतांच्या पाठपुराव्यासाठी पथके तयार करण्यात आलेले असुन तेथील कुटुंबाचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरु केले आहे.
   जालना जिल्ह्यातुन इतर राज्यात जाण्यासाठी आजपर्यंत  उत्तरप्रदेश – 4003,बिहार-2575, मध्यप्रदेश-877, राजस्थान-658, पश्चिम बंगाल- 422, यासह उर्वरीत बारा राज्यातील एकुण -9793 तर जालना जिल्ह्यातुन महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात जाण्यासाठी 3027 अशा एकुण 12820 नागरीकांना पास उपलब्ध  करुन देण्यात आले आहेत. 
आजपर्यंत जालना जिल्ह्यात इतर राज्यातुन 83 व राज्याच्या इतर जिल्ह्यातुन 1284 असे एकुण – 1367 नागरीक दाखल झाले आहेत. या सर्वाना 14 दिवस होम क्वांरटाईन करण्यात आले आहे.
जालना जिल्ह्यातुन  आजपर्यंत बिहार – 20, आंध्रप्रदेश -46, ओरिसा- 83, मध्यप्रदेश -687, छत्तीसगड -08, उत्तर प्रदेश- 1327,झारखंड -03, राजस्थान- 59, तेलंगणा- 2 असे एकुण 2225 नागरीकांना परराज्यात पाठविण्यात आले आहेत.
जिल्ह्यात एकुण 1367 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 31 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 800 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 08 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या 1144 एवढी आहे.दैनिक पॉझिटीव्ह नमुने -03 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -11 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 1121, रिजेक्टेड नमुने-04,पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 240, एकुण प्रलंबित नमुने-08 तर एकुण 769व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे.
14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या-17, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 571 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या -67, सध्या अलगीकरण  केलेल्या व्यक्ती -285, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित- 07, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या -31, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या -00, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या 261 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे.  
कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 285व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये संत रामदास मुलांचे शासकीय वसतीगृह, जालना– 02, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह-14,मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-28, पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना -91, मॉडेल स्कुल अंबा रोडपरतुर-27, जिजाऊ इंग्लिश स्कुल जाफ्राबाद- 15, हिंदुस्थान मंगल कार्यालय, जाफ्राबाद – 06, डॉ.बाबासाहेब  हॉस्टेल भोकरदन-23  डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन इमारत क्रं 1-64,    डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल अंबड – 06, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल घनसावंगी -09  येथे  अलगीकरण करण्यात आले आहे.
लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 516 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 83 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 571 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम 26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 2 लाख 81 हजार  300 असा एकुण  3 लाख 81 हजार   8 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

उत्तर प्रदेश च्या 38 कामगारांना घेवुन महाराष्ट्र परिवहन मंडळाची बस झाली रवाना



निलेश लोहिया यांच्या कडून कामगारांच्या जेवन,बिस्कीट दुधाची व्यवस्था


अंबड/अरविंद शिरगोळे : येथून उत्तर प्रदेश च्या 38 कामगारांना घेवुन महाराष्ट्र परिवहन मंडळाची बस आज दि.10 मे रोजी दु.1 वा जालना येथे रवाना झाली असून जालना येथून सदरील कामगार रेल्वेने आपल्या गावी पोहचणार आहेत उपविभागीय अधिकारी शशिकांत हादगल व तहसीलदार राजीव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार एन.वाय दांडगे,मंडळ अधिकारी शिवाजी गाडेकर,कैलास राठी,तलाठी श्रीपाद देशपांडे,अव्वल कारकुन यु.डी.जाधव व शिरसाट यांनी उत्तर प्रदेशला जाणाऱ्या बसला रवाना केले सर्व कामगारांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना स्वाती ट्रेडर्सचे निलेश लोहीया यांनी जेवन,बिस्कीट, पाणीबाँटल तसेच लहान बालकांसाठी दुधाची व्यवस्था केली होती.

अवैद्य धंद्यावर अंबड पोलिसांची कारवाई दोन लाख ५३ हजाराचा मुद्देमाल जप्त १३ जनांवर गुन्हा दाखल


अंबड पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सी.डी शेवगण व पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली धडाकेबाज कारवाई

अंबड/प्रतिनिधि:- कोरोनो च्या पार्श्वभूमीवर लाँकडाऊनच्याकाळात अंबड शहरात व व आजूबाजूच्या परिसरात अवैद्य धंदे चोरीछुपे चालू असतानाच अंबड पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सी.डी शेवगण व पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली धडाकेबाज कारवाई विविध ठिकाणी विविध कंपन्या घुटका, सुगंधी, तंबाखू, हातभट्टी (गावठी दारू), व जुगार अड्ड्यावर छापा मारून तब्बल २ लाख  ५३ हजार ४३६ रुपयांचा मोठा साठा मुद्देमाल जप्त केला असून १३ जना विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, अंबड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांना गुप्त बातमीदार मार्फत अंबड शहरात तसेच आजूबाजूच्या परिसरात विविध ठिकाणी घुटका, सुगंधी, तंबाखू, हातभट्टी (गावठी दारू), व जुगार खेळत असणाऱ्या अड्डयाची माहिती मिळाल्यावरून नांदेडकर यांनी त्यांचे पोलिस पथकास मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी  कार्यवाही करणे कामे रवाना केले. पोलिसांना मिळालेल्या गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून शहरातील महबूब नगर मधील एका घरासमोरील गाडी क्रमांक. एम एच २७ ऐसी  ४५०१ या कामध्ये रत्ना जीवन घुटका, एम. सुगंधी तंबाखू, एन. पी.०१ जाफरानी दर्जा, व्ही.१ तंबाखू असा बंदी असलेला घुटका व सुगंधित तंबाखू सचिन पिता वीरेंद्र गुप्ता यांच्याकडे असून तो इसम सदरचा माल विक्री करण्याच्या तयारित असताना पोलिसांनी छापा मारून त्याच्या ओमिनि कार सह त्याच्या घरात घेतलेल्या झाडाझडतीत पोलिसांनी बंदी असलेला गुटखा व सुगंधी तंबाखूचा साठा रुपये १ लाख २८,४४६ व एक ओमिनी गाडी जिचे अंदाजे किंमत ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी सचिन वीरेंद्र गुप्ता यांचे विरुद्ध अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. याशिवाय अन्य विविध ठिकानाच्या  हातभट्टी (गावठी दारू), जुगार अड्डे यांचेवर छापे मारून दारूच्या रसायाना सह ४४ हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून अन्य १२ जना विरुद्ध अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची धडाकेबाज कार्यवाही अंबड येथील उपविभागीय पोलिस अधिकारी सी.डी.शेवगन, पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष घोडके, पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे, पो.कौ. महेश खैरकर, पो.कौ.साळवे,  पो.कौ गोफने, पो.कौ.गोतीस, पो.कौ.डोईफोडे, पो.कौ.दराडे वाहनचालक यादव यांनी केले आहे.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...