रविवार, १७ मे, २०२०

ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांचा सर्व कापूस खरेदी करावा - प्रकाश आंबेडकर




 पुणे,ब्युरो चीफ :-  महाराष्ट्रात कापसाचे उत्पन्न घेणारा शेतकरी ग्रासला असून आतापर्यंत ६० टक्के कापूस सीसीआय (पणन महामंडळ) यांनी खरेदी केला आहे. तर ४० टक्के कापूस अजूनही शेतकऱ्यांकडे आहे. ११ जून पूर्वी सर्व कापूस खरेदी करून ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना द्यावी, अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.                
         राज्यात ११ जून पर्यंत पावसाचे आगमन होण्याची शक्यता असल्याचे वेधशाळेने म्हटले आहे. त्यापूर्वी शेतकऱ्यांकडे राहिलेला ४० टक्के कापूस फेडरेशनने विकत घ्यावा, यासाठी शासनाने त्यांना पत्र लिहून विनंती करावी, हमीभाव आणि व्यापाऱ्यांनी विकत घेतलेला कापूस यातला जो फरक आहे, ते पैसे शासनाने थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करावे. असे झाले तर शेतकर्‍यांचा राहिलेला ४० टक्के कापूस विकत घेतला जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, अशी विनंती प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

सुरेश नंदिरे 
प्रसिद्धी प्रमुख 
वंचित बहुजन आघाडी
9867600300

कोरोना अलर्ट : बुलढाणा जिल्हयात आज प्राप्त ०४ कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर ३ पॉझिटिव


बुलडाणा,प्रतिनिधी :- जिल्ह्यात आज प्राप्त ०७ रिपोर्ट पैकी ०४ रिपोर्ट निगेटिव्ह असून ०३ रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे.  आतापर्यंत ६८५ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात या तीन बाधीत रुग्णांसह २९ रुग्ण कोरोनाबधित आहेत. त्यापैकी एक मृत आहे. आतापर्यंत २३ कोरोनाबधीत रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे कोविड रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या २३ आहे.  सध्या रूग्णालयात पाच कोरोनाबाधीत रूग्ण उपचार घेत आहे. तसेच आज १७ मे रोजी ०७ अहवाल प्राप्त झाले आहेत.  तीन अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये खामगांव येथील ६० वर्षीय महिला, शेगाव येथील ३५ वर्षीय पुरुष आणि नरवेल, ता.  मलकापूर येथील ७ वर्षीय मुलीचा समावेश आहे.  तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने ६८ आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.        

एपीआय कै.अमोल कुलकर्णी यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांची भावपूर्ण श्रद्धांजली


मुंबई,ब्युरो चीफ :- कोरोना विषाणूशी लढताना धारावी शाहूनगर पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. अमोल कुलकर्णी यांचे दुर्दैवाने निधन झाले. धारावी येथील शाहूनगर पोलीस स्टेशन येथे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज या पोलीस योद्ध्यास श्रद्धांजली अर्पण केली.यावेळी  शालेय शिक्षण मंत्री श्रीमती वर्षा गायकवाड, मुंबई पोलीस आयुक्त परमबिर सिंग, अपर पोलीस आयुक्त विनय चोबे उपस्थित होते. एपीआय कै.अमोल कुलकर्णी यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांची भावपूर्ण श्रद्धांजली एपीआय कै.अमोल कुलकर्णी यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांची भावपूर्ण श्रद्धांजली मुंबई, दि. १६ : कोरोना विषाणूशी लढताना धारावी शाहूनगर पोलीस स्टेशनचे ए.पी.आय.अमोल कुलकर्णी यांचे दुर्दैवाने निधन झाले. 


धारावी येथील शाहूनगर पोलीस स्टेशन येथे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज या पोलीस योद्ध्यास श्रद्धांजली अर्पण केली.यावेळी  शालेय शिक्षण मंत्री श्रीमती वर्षा गायकवाड, मुंबई पोलीस आयुक्त परमबिर सिंग,अपर पोलीस आयुक्त विनय चोबे उपस्थित होते.कोरोना विरुद्ध असलेल्या लढाईत आपले पोलीस बांधव मृत्युमुखी पडत आहेत. त्याचे दुःख होत आहे. हे युद्ध संपूर्ण जगात मानवाला वाचवण्यासाठी सुरू आहे. याचा मुकाबला आपल्या सर्वांना मिळून करायचा आहे. पोलिसांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार खंबीरपणे उभे आहे. असे गृहमंत्री यावेळी म्हणाले. यावेळी कुलकर्णी यांच्या सोबत काम करणारे कर्मचारी भाऊक झाले होते. अमोल कुलकर्णी यांच्या विषयी सांगताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले होते. या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना अनिल देशमुख यांनी हिंमत दिली.यावेळी श्री. देशमुख यांनी तेथे उपस्थित पोलीस कर्मचारी, राज्य राखीव दलाचे जवान यांच्याशी संवाद साधून  सर्वांना धीर दिला. दरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी धारावी पोलीस स्टेशनला सुद्धा भेट देऊन तेथील कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधला. यानंतर त्यांनी धारावीच्या विविध भागांमध्ये जाऊन पाहणी केली. तेथे बंदोबस्तात असलेल्या कर्मचाऱ्यांसोबत सुद्धा त्यांनी संवाद साधला.तसेच रस्त्याने जात असताना जमलेले सफाई कामगार यांच्याशी देखील थांबून संवाद साधला. काम करताना काही अडचणी येत असतील तर त्या स्पष्टपणे शासनास सांगा. शासन आपल्या पाठीशी आहे. असे गृहमंत्री म्हणाले.


अंबड शहरात सोशल डिस्टन चा फज्जा, संचारबंदीचे उल्लंघन शासनाच्या आदेशाला केराची टोपली.


ऑल फ्रेंड वाइन मार्ट च्या समोर ग्रहाकांनी केली तोबा गर्दी.

 

अंबड/अरविंद शिरगोळे : जगभरात तर कोरोनाने  धुमाकूळ घातलेला आहे.आणि भारतात लोकडाऊन सुरू आहे.त्यातली त्यात अंबड शहरामध्ये तहसील कार्यालयाच्या बाजूला असलेले वाईन शॉप मालकाचे नाव संगेवार शेठ असून त्यांच्या दुकानांचे नाव ऑल फ्रेंड वाइन मार्ट आहे.या वाइन समोर ग्रहाकांनी तोबा गर्दी केली आहे.येथे सोशल डिस्टन्स फज्जा उडवला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या  लॉकडाऊनमध्ये मद्य विक्री बंद आहे दरम्यान काही अटी आणि शर्ती लागू करूनही अंबड शहरात सोशल डिस्टन्स फज्जा उडालेला दिसुुुन येेेत आहे.जिल्ह्यात व तालुक्यात  केवळ  घरपोच मद्य विक्री करण्याच्या परवानगी देण्यात आली होती मात्र आज  दिनांक 17  मे 2020 रविवार रोजी अंबड शहरातील ऑल फ्रेंड वाइन मार्ट येथे दारूविक्री त्यांनी धुमाकूळ माजवल्यामुळे याकडे शासनाचे दुर्लक्ष होताना दिसून येेत आहे.महामारी मुळे कोरोना च्या पार्श्वभूमी वर उखळेले असून जनता त्रस्त झााली आहे. दारू विक्री करणाऱ्या दुकानदारांनी थेट दुकानामधून मद्य विक्री सुरू केली आहे.ग्राहकांनी दुकाना समोर तोबा गर्दी केली आहे.संचारबंदीचे उल्लंघन करुण शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. याबाबत माहिती अशी की आज रविवार रोजी सकाळपासून अंबड शहरातील ऑल फ्रेंड वाइन मार्ट बिअर वाईन शॉप समोर नागरिकांची तोबा गर्दी करीत रांगा लावल्या होत्या. यावेळी काही मज्जा विक्रेत्यांनी देखील थेट दुकानामधून मद्यविक्री सूचनेचे काही नागरिकांनी सांगितले. शहरामध्ये संचारबंदी चे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने दखल घेतली पाहिजे.


शिवसेना उपविभाग प्रमुख विकी लोखंडे यांच्या वतीने मा.पोलिस आधिक्षक औरंगाबाद निवेदन सादर.




औरंगाबाद,ब्युरो चीफ :- आज जगभरात कोरोनो (कोविड 19) या संसर्गजन्य रोगाने धुमाकूळ घातला असून अनेक जण मरत आहेत, तसेच केंद्र सरकार व राज्य सरकारने यांनी अनेक कठोर पावले उचलली आहेत,परंतु त्याचे गांभीर्य मिसर् वाडी भागातील काही लोक घेत नाहीये व बेशिस्त वागत आहेत,तसेच इतकी महामारी असतानी आपल्या भागात पोलिस प्रशासन यांचा दिवसात फक्त एक किंवा दोनच राऊंड होतात, त्यामुळे नागरिक पण त्याविषयी गांभीर्य घेत नाहीये म्हणून मिसरवाडी भागासाठी चौक मधे पाच किंवा आधिक पोलिस प्रशासन यांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी शिवसेना उपविभाग प्रमुख मिसारवाडी संभाजीनगर विकी लोखंडे यांनी निवेदनात केली आहे.

 मांग वडगाव तिहेरी हत्याकांड तील आरोपींना कडक शासन करा -  प्रदेश प्रवक्ते धम्मपाल कांडेकर


गेवराई, महा.ब्युरो चीफ :- मांग वडगाव ता केज येथील गायरान जमीन करणाऱ्या पारधी समाजाच्या एकाच कुटुंबांतील तिघांची हात्या करण्यात आली या घटनेचा तिव्र निषेध पँथर्स रिपाइं (मा मंत्री गाडे गट) कडून प्रदेश प्रवक्ते धम्मपाल कांडेकर यांनी केला.आरोपींना कडक शासन करावे तसेच हत्याकांडातील कुटुंबियांचे पुनर्वसन करावे याचा विचार शासनाने करावा वंचित समाजातील गोरगरीब गेल्या ४० ४० वर्षापासून गायरान जमीन कसुन आपला उदरनिर्वाह करत आहे त्यात ली त्यात शासनाने गायरान जमीन कायदा करुनही ते गायरान जमीन धारकांच्या नावे होत नसल्याचा आरोप पँथर्स रिपाइं म प्रदेश प्रवक्ते धम्मपाल कांडेकर यांनी केला आहे.

बीड जिल्ह्यातील तसेच मराठवाड्यातील गायरान जमीन करणार्यांना न्याय कधी मिळणार प्रशासनाने यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावामांग वडगाव ची घटना दुदैवी आहे आरोपींना कडक शासन करावे अशी मागणी पँथर्स रिपाइं म प्रवक्ते धम्मपाल कांडेकर पँथर्स रिपाइं तालुकाध्यक्ष भास्कर उघडे युवा तालुकाध्यक्ष संकेत गांगुर्डे विद्यार्थी तालुकाध्यक्ष प्रकाश पवार युवा उपाध्यक्ष विकास वारे शहराध्यक्ष अविनाश आडागळे युवा सचिव कृष्णा हतागळे बाबासाहेब दाभाडे आकाश मोरे शेख नजीर आकाश लोखंडे इत्यादींनी केली आहे.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...