शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२०

       रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षाच्या वतीने अंबड येथे प्राथमिक नोंदणी अँड.ब्रह्मानंद चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीत संपन्न.
               
 अंबड़ (प्रतिनिधि) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) पक्षाच्या वतीने  अंबड़ येथे प्रथमिक सदस्य नोंदणी अँड.ब्रम्हांनंदजी चव्हाण साहेब यांची आज दिनांक 13 फेब्रुवरी 2020 गरुवार रोजी सकाळी 10.30 ते 5.00 ठिकान डॉ. बाबासाहेब अंबेडकर यांच्या पुतळया जवळ अंबड़  येथे संघर्षनायक केंद्रीय सामजिक न्याय मंत्री मा. रामदासजी आठवले साहेब  उपस्थिति संपन्न यांच्या आदेशाने व मा. ब्रम्हांनंद चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती मधे
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) पक्षाच्या वतीने प्राथमिक सदस्य नोंदणी संपन्न झाली. यावेळी उपस्थित जिल्हा उपाध्यक्ष मा. प्रकाश मामा रूपवते, मा. सुरेशभाऊ खरात (तालुका अद्यक्ष), मा. विष्णु खांडेभराड (तालुका सचिव), अँड.गणेश पटेकर (तालुका उपाध्यक्ष), राहुल खरात (यूवा तालुका अद्यक्ष), संतोष खरात (शहराद्यक्ष अंबड़), भीमराव खांडेभराड (सर्कल प्रमुख), लक्ष्मण धवळे, लक्ष्मण भालेराव, सिद्धार्थ उघड़े, भानुदास शिंदे,भीमराव मगरे,नितिन मगरे,शाहिर दिलीप खरात, पंडित येडे, आनंद म्हस्के,सिद्धार्थ कांबळे इत्यादि आदिउ उपस्थितहोते. व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) पक्षाच्या वतीने प्रथमिक सदस्य नोंदणी संपन्न झाली.

मनसे ने जालना बस स्थानकात लावले संभाजीनगरचे फलक

जालना ( प्रतिनिधी) : - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने औरंगाबाद ऐवजी संभाजी नगर म्हणावे असे जनआंदोलन हाती घेतले असून या आंदोलनाचा एक भाग म्हणून मनसे पदाधिकारी व मनसे सैनिकांनी आज जालना बसस्थानकात  एस. टी. बसेसना संभाजी नगर चे फलक लावले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी ( ता. १४)पदाधिकारी व मनसे सैनिक एकञ आले.जालना मध्यवर्ती बसस्थानकात  मनसेचा झेंडा व फलके  हाती घेऊन छञपती शिवाजी महाराज की जय,छञपती संभाजी महाराज की जय,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो..औरंगाबाद नको संभाजी नगर म्हणा मराठी ह्रदयसम्राट राज ठाकरे आगे बढो,अशा गगनभेदी घोषणा देत संपूर्ण बसस्थानकाचा परिसर दणाणून सोडला.तसेच औरंगाबाद कडे जाणार्या एस टी बसेस च्या काचांवर जालना ते संभाजी नगर अशी फलके लावली.अचानक झालेल्या या आंदोलनामूळे प्रवाशांची एकच गर्दी झाली. या वेळी मनसे चे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे, शरद पाटील मांगधरे, महेश नागरे, विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष संजय राजगूरे, प्रमोद म्हस्के, अजय मोरे, पंकज घोगरे, अमोल जाधव, गणेश धांडे, आकाश जाधव,मयूर बूजाडे,आकाश खरात यांच्या सह पदाधिकारी व मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान पक्षातील वरिष्ठांकडून आदेश येताच संभाजी नगर करण्यासाठी जनआंदोलन अधिक व्यापक करण्यात येईल असे मनसे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांनी सांगितले. 
अंबड येथील सौ.अनिता (अमृता) कारके यांची जालना जिल्हा तक्रार निवारण समिती वर समुपदेशक पदी निवड.

अंबड (प्रतिनिधी) :- अंबड येथील सौ.अमृता उर्फ अनिता चंद्रकांत                                      कारके यांची जिल्हाधिकारी कार्यालय,जालना येथे
अशासकीय सदस्य म्हणून समुपदेशक पदी निवड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा.रविंद्रजी बिनवडे साहेब यांनी केली असून निवडीनंतर सर्व स्तरातून त्यांचे स्वागत होत आहे. सौ.अमृता कारके ह्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला समुपदेशक केंद्राच्या उत्कृष्ट समुपदेशक म्हणून काम पहात आहेत, त्यांचा महिला अधिकार क्षेत्रात गाडा अभ्यास आहे, त्या अंबड तहसील कार्यालय देखील तालुका महिला तक्रार निवारण समितीत समुपदेशक
म्हणून काम बघत आहेत. त्यांची आता जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा स्तरावर समुपदेशक म्हणुन निवड झाली आहे. सर्व स्तरातून त्यांचे स्वागत होत आहे.
मातंग समाजाच्या आत्याच्यार प्रकरणाकडे लक्ष घालणार - मा.राज ठाकरे
साठे युवा मंचाचे अध्यक्ष डॉ.साबळे यांच्या वतीने मा.राज ठाकरे यांना निवेदन सादर
सिल्लोड (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्यात गेल्या अनेक वर्षा पासून राज्यातील अल्पसंख्याक हिंदू मातंग समाजाच्या महिला, पुरुष,  युवतीचे  खून,  बलात्कार , मारहाण अशा अत्याचाराचा घटना वाढत चाललेल्या असून मातंग समाज असुरक्षित झाला आहे. राज्यातील अकोला, नांदेड, जालना, औरंगाबाद आदीसह इतर जिल्ह्यात समाजाच्या महिला, पुरुषावर अन्याय अत्याचार करीत खून करण्यात आले आहे. मातंग समाजाच्या मनात असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे.  या संदर्भात विश्वसाहीत्यरत्न अण्णाभाऊ साठे युवा मंचच्यावतीने म्हणून डाँ. सचिन साबळे यांच्या नेतुत्वा खाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांना राज्यातील हिंदू मातंग समाजाच्या अन्याय अत्याचार प्रकरणी न्याय मिळवून देण्यासाठी लक्ष देण्याची मागणीचे निवेदन औरंगाबाद येथील सुभेदारी विश्राम गुह येथे देण्यात आले.
युवा मंचचे अध्यक्ष डाँ.सचिन साबळे हे मा.राज ठाकरे साहेब यांना निवेदन देताना .
यावेळी ठाकरे यांनी मातंग समाजाच्या विविध प्रश्नाकडे लक्ष घालनार असल्याचे शिष्टमंडळाला सांगितले.या निवेदनावर डॉ.सचिन साबळे,श्री.दौलतराव सिरसाट,प्रा.अनिल साबळे ,श्री.गजानन आव्हाड,श्री.सीताराम कांबळे , श्री.सचिन आव्हाड,श्री.विजय आव्हाड ,सौ.अंजली साबळे,राधा यंगड, स्नेहल साबळे, लताबाई सोनवने, दादाराव सिरसाट,श्री.अनिल सोळसे, श्री.संतोष थोरात, श्री.मनोज गायकवाड,आदीसह पदाधीकार्याच्या स्वक्षर्या आहेत.
            पोखरी शाळेत स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.
गेवराई ( प्रतिनिधी ) :- गेवराई तालुक्यातील शिरसमार्ग केंद्र अंतर्गत असलेल्या पोखरी येथील जिल्हा परिषद शाळा वार्षिक स्नेहसंमेलन मान्यवरांच्या उपस्थितीत दि.07  फेब्रुवारी 2020 रोजी उत्साहात संपन्न झाला.शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.राजेंद्र मोघे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती गेवराई चे ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्री.मिलिंदजी तारूकमारे साहेब यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून झाले. यावेळी प्रमुख
उपस्थिती म्हणून श्री.तालीब साहेब, श्री.खेत्रे सर (मा.अध्यक्ष गेवराई शि.प. स) श्री कुडके सर, श्री. दुधाळ सर,श्री.राठोड सर, श्री.खाडे सर, श्री.चौधरी सर, गावाचे सरपंच बिबीशन मोघे साहेब यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळ्याच्या वेळी श्री.तरूकमारे साहेब यांनी सांगितले की पोखरी गावातील प्रशालेचे विद्यार्थी हे सर्वगुण संपन्न असून भविष्यात ते आपल्या गावाचे नाव लोकिक करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या सुमारे 130 विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असणाऱ्या कलागुणांचा अधिकार सादर केला. यामध्ये देशभक्तीवर गीत,लावणी, गोंधळ, गीत, बालगीत,शेतकरी गीत, कव्वाली,बांगडा,विनोद, नाटिका,सादर करून उपस्थितांना चार तास मंत्र मुग्ध केले.या बहारदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.गणेश दहिवाळ यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक श्री. भाऊसाहेब घोंगडे सर, श्री.महेंद्र देशमुख सर, श्रीमती आयेशा पठाण मॅडम, श्रीमती रोहिणी बागडे मॅडम, यांच्यासह केंद्रातील शिक्षक व मित्रपरिवार, सरपंच उपसरपंच सर्व ग्रामस्थ यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी शाळेचे आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री.पवार सर यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...