मंगळवार, २४ नोव्हेंबर, २०२०

 राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.


 महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर परिषद अंबड येथे दि. २५/०९/२०१७ रोजी शौचालय मिळण्यासाठीचा अर्ज दिला होता. यासाठी मि बांधकामाला सुरुवात केली. ज्यात खड्डे करून टॅकचे बांधकाम केले. नगर परिषद अंबडचे कर्मचारी यांनी या कामांची वेळो वेळी पाहणी केली व तसा अहवाल वर माझी सही देखील घेतल्या. व आपले अनुदान लवकरच आपल्या खात्यावर टाकण्यात येईल असे मला वेळो वेळी सांगण्यात आले. यासाठी मि अंबड नगर पालिका कार्यालयात ३०/१/२०२० रोजी अनुदान मिळावे यासाठी अर्ज केला होता यात मला टाळाटाळ होत असल्याने जिल्हा अधिकारी कार्यालयाकडे दि. १७/०२/२०२० अर्ज करून मला न्याय देण्याची विनंती केली होती. यावर आपल्या कार्यालयाने मुख्याधीकारी न.प. अंबड ला दि. २५/२/२०२० रोजी अर्ज निकाली काढण्याचे आदेशीत केलेले असताना अद्यापपर्यन्त माझ्या  অই তু কথা! বীজ জালা ব্যক্তি কি সঙ্গী বাছী অথাবর নাফ আলী ওখক দাঙ্গা दिला नाही. या करिता मि आज पर्यन्त पालिकेत संबंधीत विभागापासुन ते स्वच्छता विभागात  




अनेकदा चकरा मारल्या मात्र मला कोणताही प्रतिसाद दिला नाही कि अनुदान दिले नाही. मला पालिकेने माझ्या वडिलांचे नावे आधार कार्ड ची मागणी केली मात्रा वास्तवात माझ्या वडीलांचे २०१६ साली निधान झाले आहे. असे असताना त्यांचे आधारकार्ड मागणणे चुकिच्चे आहे शिवाय त्यांचे आधारकार्ड है जनवलेले लल्याने ते आजरोजी उपलब्या वास्तवात अर्जदार मि स्वताः असताना माझ्या वडीलांच्या नावे आसलेले आधारकार्डची आवाश्यकता काय आहे? हे न कळण्यासारखे आहे. तसेच मि शौचालायाच्या योजनेसाठी २०१७ रोजी अर्ज केला असताना आज पर्यन्त मला कोणतेही अनुदान तर मिळालेच नाही उलट पालिका, এয়ারল ওথয়তঃ ওহিদ্ধাস্থালী আভুয়া এর্থী, ফালৰ্বীদ্ধ, জ্বালাভজ্জ গুড় জ্বলঃ ওলুল সাত্যাবস্ত্রেী তানজ अर्जदार आजही पालिकेस हाकरा मारताना दिसुन येतात. तसेच काहींकडे अनेक कागदपत्रांची पुर्तता नसताना त्यांना एका महिण्यांच्या आत अनुदान घरपोच देण्यात आले हा कोणता न्याय ? तरी मे. साहेबांना जिनंती की आपण अंबड पालिकेच्या शौचालय अनुदानाची चौकशी केल्यास यात चाललेला भ्रष्टाचार ওঃত্বদ্যোলয় ঝিল থান্ত ভীী থিম্ফাম্যাবৎ থাইং জাবী ফষাদ্বী ভি আত্মস্থান্ধী মায়াবী, ওথা लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी अंबड पालिका प्रशासनाची राहील.







शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२०

 Title शास्त्रशुद्ध पद्धतीने कीटकनाशक फावरणी Content


गाव टाकळगव्हान ता गेवराई जि बीड येथे कृषीदूत रोहित नरवडे यांनी शेतकऱ्यांना शास्त्रशुद्ध पद्धतीने कीटकनाशक फावरणी बद्द्ल मार्गदर्शन केले

शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०

 साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या चरित्र लेखनपर पुस्तकाचे  विद्यापीठ कुलगुरूंच्या हस्ते प्रकाशन

प्रतिनिधी/ जालना

कॅप्शन जोडा

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ प्रमोदजी येवले सर यांच्या हस्ते जगविख्यात विद्रोही बहुजन साहित्यिक अण्णाभाऊ साठे या नावाचे चंद्रकांत कारके यांनी लिहिलेल्या उत्कृष्ट चरित्र लेखनपर पुस्तकाचे प्रकाशन जन्मशताब्दी वर्षानिमित्त आज दि 7 आगस्ट रोजी दुपारी 1.30 वा विद्यापीठात संपन्न झाले यावर्षी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून चंद्रकांत कारके यांनी जगविख्यात विद्रोही बहुजन साहित्यिक  अण्णाभाऊ साठे या नावाचे एक चरित्र लेखनपर पुस्तक लिहिले असून या उत्कृष्ट पुस्तकाचे प्रकाशन आज दुपारी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ.प्रमोदजी येवले सर यांच्या हस्ते विद्यापीठात प्रकाशीत करण्यात आले यावेळी चंद्रकांत कारके यांच्या सह प्रा अभिजीत पंडित नेते भारत जाधव प्रा पंढरीनाथ रोकडे प्रा वसंतभाई संसारे अभिजीत शिरगोळे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. कुलगुरू मा डॉ.येवले सर यांनी पुस्तकाचे प्रकाशन करत श्री चंद्रकांत कारके यांना शुभेच्छा दिल्या व त्यांचे तोंडभरून कौतुक केले यावेळी सर्वांनी सोसीयल डिस्टंसेसचे पालन करत पुस्तक प्रकाशनाचा हा कार्यक्रम संपन्न केला

गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२०

 निर्णय न घेतल्यास 10 ऑगस्ट नंतर रस्त्यावर उतरू - प्रकाश आंबेडकर



पुणे,ब्युरो चीफ - राज्यातील कोरोना रुग्णांना चांगले औषध द्या,  उरलेल्या ९५ टक्के लोकांना का कैद करून ठेवत आहे. राज्यातील एसटी बस सेवा सुरु करा. टपरीवाले, फेरीवाले यांना स्वतःचे आयुष्य सुरू करू द्या, महाराष्ट्राला आता निर्णयाची गरज आहे. शासनाने 10 ऑगस्टपर्यंत निर्णय न घेतल्यास वंचित बहुजन आघाडी कोणत्याही वेळेला रस्त्यावर उतरेल ,असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला. पुणे येथील पत्रकार संघात आज झालेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली.


ज्यांना कोरोना झाला आहे, त्यांच्यावर चांगले उपचार करा, त्यांना चांगले औषध द्या, मात्र ५ टक्के लोकांसाठी तुम्ही ९५ टक्के लोकांना का कैद करून ठेवत आहेत, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. पुणे येथील पत्रकार संघात आज झालेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर बोलत होते. राज्यात दहा हजार राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा विचार प्रशासन करीत आहे. त्यापेक्षा राज्य परिवहन सेवेला सुरुवात केली तर कर्मचारी कपात करण्याची वेळ येणार नाही. मुंबईत अर्ध्यापेक्षा जास्त बस सुविधा सुरू करायला पाहिजे त्या अद्यापही झालेल्या नाहीत. मुंबईसह इतर मनपा क्षेत्रातही बस सेवा सुरू करण्याची आता गरज आहे. त्याचबरोबर टपरीवाले, फेरीवाले यांना आता स्वतःचे आयुष्य सुरू करू द्या. आज महाराष्ट्राला निर्णयाची गरज आहे. शासनाने दहा ऑगस्ट पर्यंत निर्णय घेतला नाही तर वंचित बहुजन आघाडी केव्हाही आणि कधीही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला. यावेळी त्यांनी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची आकडेवारी व कोरोना नसतांना मृत्युमुखी पडलेल्यांची आकडेवारी जाहीर करून हे दाखवून दिले की कोरोना नसताना अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत. म्हणजेच कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या कमी असल्याचे त्यांनी कागदोपत्री पुराव्यानिशी दाखवून दिले. अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली. 


शेट्टींच्या स्वाभिमानीचा  "सुधीर कथले" आता बाळासाहेबांच्या वंचितचा शिलेदार


बीड,ब्युरो चीफ - वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कार्यालय या ठिकाणी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आक्रमक आणि लढाऊ नेते सुधीर कथले यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाला सर्वोच्च मानत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला.

बीड जिल्ह्याचे कृतिशील जिल्हाध्यक्ष प्रा. शिवराज बांगर यांच्या कृतिशीलतेवर  विश्वास ठेवात वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानीचा झेंडा खाली ठेवून वंचित बहुजन आघाडीच्या संघर्षाचा झेंडा आपल्या खांद्यावर घेतला. "यापुढे जो संघर्ष आजपर्यंत मी शेतकऱ्यांसाठी केला तो संघर्ष येणाऱ्या काळामध्ये वंचितांसाठी करणार असून, अनेक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी हे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बीड जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे. अशी माहिती सुधीर कथले यांनी दिली.

अंबड शहरातील ओमशांती कॉलनीतील मुख्य रस्त्याला तळ्याचे स्वरूप


अंबड नगरपालीकेचं पावसाळी पुर्व काम पाण्यातच 

अंबड प्रतिनिधी :- अंबड शहरातील ओमशांती कॉलनी मधील हा रस्ता शॉटकट मार्ग या नावाने प्रचीत आहे.या शॉटकट मार्गाने पोलीस ठाणे, उपविभागिय कार्यलय, न्यायालय, एसबीआय बँक, भाजीमंडी, नगरपालीका,ओमशांती विद्यालय,कॉलेज, महीला बचत गट भारत फायन्स आणी मुख्य बाजारपेठे कडे जानारा हा शॉटकट मार्ग आहे.महिला बचत गट भारत फायन्स हे जवळच असल्याने  येथे महिला पादचार्यांची रेलचेल असते.व ग्रामीण भागातील वाहनचालक याच शॉटकट मार्गाने जाण्यास पंसद करतात.पंरतु याच रहदारीच्या शॉटकट मुख्य रस्त्यावर पावसाचे पाणी जमा झाल्याचे दिसुन येत आहे.पाण्याला जायला वाटच नसल्यामुळे याठिकाणी तळ्याचे स्वरूप आलेले आहे.पादचार्यांना तर या घाणपाण्यातुनच जावे लागत आहे.याचा सर्वाधिक फटका लहान बालके,अबालवृध्द व महिंलाना बसत आहे.वाहनचालकही याच पाण्यातुन मार्गक्रमण करत आहेत.यांची फजिती होत असल्याचे दिसुन येत आहे.


या ठिकाणी रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे पाण्यातुणच जाण्यावाचुन पादचारी आणी वाहनचालकांना गत्यंतर राहत नाही.अंबड नगरपरिषदेच्या पावसाळी पुर्व नियोजनाचा अभाव व हलगर्जीपणा दिसुन येतो एका ठिकाणी जास्त काळ पाणी राहील्यास अस्वस्थता पसरून डासाचा प्रादुर्भाव वाढु शकतो.यातुन रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे या कोरोना च्या काळात जास्त स्वच्छतेवर भर देणे आवश्यक आहे.पंरतु अंबड नगरपालीका कडुन ठोस उपाय योजना केल्या जात नाही. याबाबत नगरपालीकाचा कारभार हाकणाऱ्यां पुढाऱ्यांनी वेळीच कार्यतत्परता दाखवून ओमशांती कॉलनीतील आरोग्य धोक्यात येणार नाही याची काळजी घ्यावी.अशी ओमशांती कॉलनीतील रहवासी जोरदार मागणी करत आहे


रविवार, २ ऑगस्ट, २०२०


पत्रकारांना हेतुपुरस्सरपणे गुन्ह्यात अडकावणाऱ्या पोलीस अधिकारी व प्रदुषण महामंडळ अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा - शीतल करदेकर


जालना/प्रतिनिधी :- जालना येथील दैनिक गोकुळनीतीचे संपादक अर्पण गोयल, दैनिक तात्काळ राज्यवार्ताचे संपादक भरत मानकर यांचेसह चार पत्रकारांवर आकसाने गुन्हे दाखल केल्याबद्दल जालन्यासह राज्यभरातील पत्रकारांनी या कृत्याचा कठोर निषेध केला आहे.
हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरील अत्याचार आहे आणि ज्यांनी हे चुकीचे कृत्य केले आहे त्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसेच जालन्यातील प्रदुषण तातडीने थांबवावे अशी आग्रही मागणी नँशनल युनियन आँफ जर्नालिस्टस् महाराष्ट्रच्या अध्यक्ष शीतल करदेकर यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे  यांचेकडे केली आहे.
              याबाबत सविस्तर वृत्त असे की जालना येथील संपादक गोयल व मानकर  दि.२८ जुलै २०२० रोजी प्रदूषण महामंडळाच्या कार्यालयात जालना येथील वाढत्या प्रदूषणासंदर्भात माहिती घेण्यासाठी गेले असता तेथील अधिकारी सौ. योगिनी अविनाश बाळंके यांनी पत्रकारांना वेळ न देता कुठलीच माहिती उपलब्ध करून न देता उलट कार्यलयातील सेक्युरिटी मार्फत एका आठवड्या नंतर येऊन माहिती घेऊन जाण्याचा सल्ला दिला.वारंवार जालना येथील एमायडीसीमुळे प्रदुषण वाढते आहे. अनेकदा याबाबत  प्रदुषण महामंडळ अधिकार्‍यांचे लक्षात आणून दिले. बातम्या लिहिल्या याचा राग सौ. योगिनी अविनाश बाळंके यांचे मनात होताच. त्यामुळे उडवाउडवीची उत्तरे देणे, आपले कर्तव्य नीट न बजावणे, पत्रकारांना अपमानकारक वागणूक देणे आणि जे चुकीचं काम करतोय याबाबत जराही अपराधी भावना नसणे अशी मनमानी करण्याच्या त्यांच्या वागणुकीची तक्रार करण्यासाठी अर्पण गोयल आणि भरत मानकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे गेले असता त्यांची लेखी कैफियत निवासी जिल्हाधिकारी  मा. निवृत्ती गायकवाड यांच्याकडे मांडण्याचे सांगण्यात आले. त्यांनी पत्रकाराचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांनी दिलेल्या तातडीने प्रदूषण अधिकारी सौ. योगिनी अविनाश बाळंके यांना मोबाईलवर कॉल करून पत्रकारांना माहिती देण्याचे सांगितले शिवाय त्या औरंगाबाद येथून अप-डाऊन करीत असल्याने त्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश देखील देण्यात आले. प्रदूषण नियंत्रण अधिकारी सौ. योगिनी अविनाश बाळंके यांच्या औद्योगिक वसाहत कार्यक्षेत्रात प्रदूषण वाढले असल्याने याबाबत कुठलीच कारवाई ही होत नसल्याने सौ. बाळंके यांची लेखी तक्रार दि.२९ जुलै २०२० रोजी प्रदूषण महामंडळ विभागीय कार्यालय औरंगाबाद येथील कार्यालयात करण्यात आली होती. याबाबतची बातमी दैनिक गोकुळनीती आणि दैनिक तात्काळ राज्यवार्ता यांनी छापली होती. याशिवाय प्रदूषणच्या बाबतीत पर्यावरण मंत्री ना. अदित्य ठाकरे यांना देखील तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी या सर्व गोष्टीचा राग मनात धरून प्रदूषण अधिकारी सौ. योगिनी अविनाश बाळंके यांनी चंदनझिरा पोलिस ठाण्यात हेतुपुरस्सरपणे  दैनिक गोकुळनीतीचे संपादक अर्पण गोयल, दैनिक तात्काळ राज्यवार्ताचे संपादक भरत मानकर, प्रदूषण महामंडळाच्या कार्यलयात कधीच पाय न ठेणारे पत्रकार विष्णु कदम यांनी बातमी लिहिली यासाठी आणि विष्णु कदम त्यांचे मित्र नीलकंठ कुलकर्णी जे नेहमी त्यांच्या सोबत राहतात त्यांचे नावाने गुन्हा नोंदवण्यात आला.
चंदनझिरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कौठाळे यांनी देखील त्यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या अट्टल गुन्हेगारांना कधीच पकडले नाही परंतु पत्रकार गुन्हेगार असल्याप्रमाणे कुठली ही चौकशी न करता  गुन्हा नोंदविला खरं तर पत्रकार सुरक्षा कायद्याखाली एसीपी दर्जाच्या अधिकार्‍यांनी ही चौकशी करुन, मग गुन्हा दाखल करने आवश्यक होते. मात्र केवळ 'आधी माहिती द्या, मग इतर काम करा' असं म्हटलं  तर सरकारी कामात अडथळा निर्माण होतो का ?   हा मोठा प्रश्न या कार्यतत्पर अधिका-याच्या कार्यशैलीवर निर्माण झाला आहे. पत्रकारांनी बातमीसाठी माहिती विचारणे हा जर गुन्हा ठरत असेल तर भविष्यात शासकीय कार्यलयात जाण्यापुर्वी पत्रकारांना संबंधित पोलिस ठाण्यात अर्ज देऊन  पोलिस संरक्षणं आणि सोबत साक्षीदार  घेऊन जावे लागेल. प्रदूषण महामंडळच्या अधिकारी सौ. योगिनी अविनाश बाळंके  जालना येथे कार्यरत झाल्या पासून आजपर्यंत त्यांच्या कार्याचा आढावा  घेतल्यास सर्व सत्य बाहेर येईल. मा. मुख्यमंत्री महोदयांनी याची गंभीरपणे दखल घेऊन पत्रकारांना न्याय मिळवून द्यावा प्रदूषण नियंत्रण  महामंडळच्या अधिकारी सौ. योगिनी अविनाश बाळंके व चंदनझिरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कौठाळे यांचेवर कठोर कारवाई    करण्यात यावी अशी मागणी नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्रच्या वतीने करण्यात आली आहे. पत्रकारांवर गुन्हे व अटक केल्यानंतर तरी जालन्यातील वाढते प्रदुषण  नियंत्रणात येईल का ? हा सवाल आहेच.हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरील अत्याचार आहे आणि हे आता थांबायला हवेच अशी ही आग्रहाची मागणी करदेकर यांनी पत्राद्वारे करण्यात आलीआहे. एनयुजे महाराष्ट्र नेहमीच सक्षम समाजासाठी व पत्रकारांच्या सन्मानासाठी काम करीत असून यासाठी याची प्रत मा.गृहमंत्री अनिल देशमुख, मा.पर्यावरण मंत्री, आदित्य ठाकरे,मा. सदस्य सचिव महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना पाठवण्यात आली आहे अशी माहिती एनयुजे महाराष्ट्र कोषाध्यक्ष वैशाली आहेर यांनी दिली आहे


  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...