रविवार, २२ मार्च, २०२०

                                जिल्ह्यात कलम 144 लागू  
      "जनता कर्फ्यू " 23 मार्चच्या सकाळी पाच वाजेपर्यंत वाढ.
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना व दुकाने 31 मार्च पर्यंत बंद
       जालना प्रतिनिधी :- शासना करोना विषाणूचा (कोव्हीड १९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दिनांक १३ मार्च २०२० पासून लागू करून
खंड १,३ व ४ मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे.  जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रात (कोव्हीड १९) नियंत्रण आणण्यासाठी व त्यांच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत. जालना जिल्ह्यात सर्व प्रकारचे दुकाने, हॉटेल, धाबे, परमिट रूम, बेकरी, स्वीट मार्ट, चाट भांडार, इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत आहे. महाराष्‍ट्र शासनाने महाराष्‍ट्र कोव्‍हीड १९ उपाययोजना नियम, २०२० लागू केले आहे.
        महाराष्‍ट्र राज्याचे मुख्यमंत्री  निर्देशाने जालना जिल्‍हयातील महाराष्‍ट्र राज्‍य मार्ग परिवहन महामंडळ च्‍या सर्व बसेस व खाजगी बससेवा आज दिनांक २२ मार्च २०२० रोजी रात्री १२.०० पासुन ते दिनांक ३१ मार्च २०२० रोजी पर्यंत बंद करण्‍यात येत आहे. आणि संदर्भ क्र. ६ अन्‍वये रविवार, दिनांक २२ मार्च २०२० रोजी पाळण्‍यात आलेला "जनता कर्फ्यू", मा.मुख्‍यमंत्री यांचे निर्देशान्‍वये दिनांक २३ मार्च २०२० रोजी सकाळी ०५.०० वाजेपर्यंत लागू राहील.
          जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालना रवींद्र बिनवडे यांनी जिल्ह्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहीता १९७३ चे कलम १४४ नुसार संपुर्ण जालना जिल्ह्यातील क्षेत्रात ०५ किंवा त्‍यापेक्षा अधिक व्‍यक्‍तींना एकत्र जमण्‍यास दिनांक २३ मार्च २०२० रोजी सकाळी ०५.०० वाजेपासुन ते दिनांक ३१ मार्च २०२० रोजीपर्यंत प्रतिबंध करीत आहे. तसेच प्रतिबंधात्‍मक आदेश खालील १ ते १० बाबीस लागू होणार नाहीत.  शासकीय / निमशासकीय कार्यालये (अत्‍यावश्‍यक सेवा वगळता इतर कार्यालये ५% कर्मचारी सह), सर्व बँका व वित्‍तीय  सेवा व तद्संबंधीत आस्‍थापना, अन्न, दुध, फळे व भाजीपाला, किराणा पुरविणा-या आस्थापना, दवाखाने, वैद्यकीय केंद्र व औषधी दुकाने व तद्संबंधीत आस्‍थापना, प्रसार माध्यमे, मिडिया व तद्संबंधीत आस्‍थापना,दूरध्वनी व इंटरनेट सेवा पुरवठा करणा-या आस्थापना, मोबाईल कंपनी टॉवर व तद्संबंधीत आस्‍थापना,विद्युत पुरवठा, ऑईल व पेट्रोलिअम व उर्जा संसाधने व तद्संबंधीत आस्‍थापना,पिण्याचे पाणी पुरवठा व सांडपाणी निचरा व्यवस्थापन करणा-या आस्थपाना, वरील सर्व अत्यावश्यक सेवा देणा-या संबंधातील आय. टी. आणि आय.टी.ई.एस. आस्थापना,. वरील सर्व अत्‍यावश्‍यक सेवा संबंधीत वस्‍तु आणि मनुष्‍यबळ, वाहतूक करणा-या ट्रक/वाहन (आवश्‍यक स्‍टीकर लावलेले), जालना जिल्‍हयातील उर्वरीत सर्व आस्‍थापना व दुकाने दिनांक ३१ मार्च २०२० पर्यंत बंद करणे बाबत आदेशीत करीत आहे.
       पोलीस अधिक्षक, जालना यांनी वर नमुद १ ते १० बाबीशी संबंधीत वाहतुक वगळता इतर सर्व प्रकारच्‍या वाहनास जिल्‍हयाच्‍या हद्दीत येण्‍यास प्रतिबंध करुन परत पाठवावे. या जिल्‍हयातील सर्व धार्मिक स्‍थळे, जनतेसाठी बंद राहतील परंतू सदरील धार्मिक स्‍थळी दैनंदीन प्रार्थना सुरु राहतील. त्‍याचप्रमाणे जिवनावश्‍यक वस्‍तुंची अवैध साठेबाजी व काळाबाजारी होणार नाही याची दक्षता पोलीस विभाग, पुरवठा विभाग आणि अन्‍न व औषध प्रशासन विभाग यांनी घ्‍यावी. तसेच करोना विषाणू च्‍या प्रतिबंधात्‍मक उपाययोजना संदर्भात घरात अलगीकरण केलेल्‍या व्‍यक्‍तीं व त्‍यांच्‍या संपर्कात आलेल्‍या सर्व व्‍यक्‍ती यांचे वैद्यकिय निरीक्षण काटेकोरपणे करण्‍याची आणि त्‍यांना इतरांपासुन विलग ठेवण्‍याची तसेच घरात अलगीकरण केलेल्‍या संशयी‍त रुग्‍णाच्‍या हातावरील शिक्‍के १४ दिवस राहतील याची खात्री जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक व जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी,जि.प.जालना यांनी करावी.अ आदेशाचे पालन न करणा-या कोणतीही व्‍यक्‍ती, संस्‍था, अथवा समूह आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ तसेच भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ नुसार निक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्‍यात येईल आणि पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी यांनी आदेशानुसार कळविले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...