मंगळवार, ५ मे, २०२०

थोटे पिंपळगाव प्रकरणी कठोर शिक्षा करून साळवे परिवाराला तात्काळ संरक्षण द्या- दीपक डोके                                   



जालना (प्रतीनिधी) :- भोकरदन तालुक्यातील थोटे पिंपळगाव येथील नितीन साळवे या तरुणाला संlशयावरून गावातील गावगुंडांनी किडन्याप केले व सतत चार दिवस मारहाण केली तसेच हत्या करण्याचा कट सुध्दा करण्यात आला परंतु तो वाचला या प्रकरणी साळवे परिवाराला जिवे मारण्याच्या धमक्या केस मागे घेण्यासाठी दबाव आणला जात आहे तरी सदरील प्रकरणी  गावगुंडांना कठोर शिक्षा करून व साळवे परिवाराला तात्काळ संरक्षण देण्यात यावे नसता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी यांना ई-मेल द्वारे  निवेदनात वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी दीपक डोके, अँड.अशोक खरात, अकबर इनामदार, विष्णु खरात, दिपक घोरपडे, विनोद दांडगे, अँड.कैलास रत्नपारखे, प्रदीप जोगदंडे, अँड.हर्षवर्धन प्रधान,शेख लालाभाई आदींनी दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...