शुक्रवार, १२ जून, २०२०

अल्प भूधारक शेतकऱ्यांना  मोफत बियाणे वाटप करा- दीपक डोके



वचित बहुजन आघाडीची मागणी

जालना,प्रतिनिधी :- अकोला जिल्हा परिषद मार्फत अल्प भूधारक शेतकऱ्यांना मोफत बीयाणे वाटपाचा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून नियमितपणे राबविल्या जात आहे,याच धर्तीवर जालना जिल्हा परिषदने  अल्प भूधारक शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटपाचा उपक्रम राबविण्यात यावा. अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.गेल्या ३ महिन्यांपासून सुरू असलेले कोरोना महामारीचे संकट व लॉक डाऊनमुळे अल्प भूधारक शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलेला आहे. एप्रिल व मे महिन्यात अल्प भूधारक शेतकऱ्यांनी उसनवारी करून शेतातील नांगरणी सारखी मशागतीची कामे उरकून घेतली आहेत. मात्र आता त्याच्याकडे खरिपाची पेरणी करण्यासाठी खते,बीयाणे खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे सर्व अल्प भूधारक शेतकऱ्यांना जिल्हा परिषद मार्फत  मोफत बियाणे वाटपाचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात यावा अशी मागणी  निवेदनाद्वारे भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष दीपक डोके,अशोक खरात, अकबर इनामदार, विष्णु खरात, दिपक घोरपडे, विनोद दांडगे, अँड.कैलास रत्नपारखे, सचिन कांबळे, कैलास रत्नपारखे,अर्जुन जाधव, राजेंद्र खरात, संतोष आढाव, गौतम वाघमारे, भैय्यासाहेब पारखे,  सचिन पट्टेकर आदींनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...