शुक्रवार, ६ मार्च, २०२०

औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव.
गणेश आठवले | औरंगाबाद आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्याचा निर्णय घेतला आहे.
मागील कित्येक वर्षांपासून औरंगाबादच नाव संभाजीनगर करण्याची मागणी होत आहे. शिवसेनेचे सरकार आल्यानंतर या मागणीने जोर धरला आहे. त्यापूर्वी औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे.
औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलून छत्रपती संभाजी राजे महाराज करण्यात आले याची घोषणा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केली .
आज कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता औरंगाबाद विमानतळाचं नाव हे बदलून छत्रपती संभाजी राजे महाराज विमानतळ असे झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...