बुधवार, १८ मार्च, २०२०

तहसीलदार व मंडळअधिकारी यांच्या पथकावर केली वाळू माफियांनी दगडफेक
जालना प्रतिनिधी :- जालना जिल्ह्यामध्ये महसूल पथकांवर हल्ल्याच्या घटानांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.साष्ट पिंपळगाव व आपेगाव येथील गोदावरी नदीपात्रातील वाळू माफियांची गुंडगीरी दिवसेंदिवस वाढतच असून आज दि.17 मार्च रोजी दुपारी तहसीलदार राजिव शिंदे यांच्या पथकावर गेवराई तालुक्यातील वाळू माफियांनी तुफान दगडफेक केली. पथकाच्या ताब्यातील वाळूने भरलेले तीन ट्रॅक्टरही या माफियांनी पसार केले असून याप्रकरणी गोंदी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, तहसीलदार राजिव शिंदे, मंडळ अधिकारी दिवाकर, जोगलादेवीकर, मंडळ अधिकारी प्रवीण रुईकर, तलाठी अभिजित देशमुख, संतोष जयस्वाल, रमेश कोनळवार, किरण जाधव, रामकिसन महाले यांच्या पथकाने आज दुपारी एक वाजता साष्ट पिंपळगाव, आपेगाव येथील गोदावरी नदी पात्रातील वाळू पट्ट्याची पाहणी केली. दरम्यान हे पथक दुपारी साडेतीन वाजता गोंदी येथील गोदावरी नदीच्या पात्रात पोहोचले. त्या ठिकाणी वाळूची चोरटी वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी वाळू भरत असलेले तीन ट्रॅक्टर ताब्यात घेऊन कारवाई केली. पकडलेले ट्रॅक्टर सोडून द्या असे सांगत जीवे मारण्याची धमकी व अर्वाच्च भाषेत संबंधित वाळू माफियांनी शिवीगाळ केली. यावेळी जमलेल्या 15  ते 20 जणांच्या टोळक्याने पथकावर जोरदार दगडफेक केली. यात पथकाच्या चालकाला मार लागला. दगडफेकीचा फायदा घेत माफियांनी  वाळूने भरलेले तिने ट्रॅक्टर पसार केले. घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलिस ठाण्यातील पोलिस तात्काळ दाखल झाले. या प्रकरणी तलाठी अभिजीत देशमुख यांच्या तक्रारीवरून कृष्णा बेदरे रा. गेवराई, बाळू यादव व संतोष गवळी दोघे रा. बेलगाव ता. गेवराई, नारायण भुसारे व भैय्या जराड दोघे रा. खामगाव ता. गेवराई यांच्यासह दहा ते पंधरा जणांविरुद्ध गोंदी पोलिसात शासकीय कामत अडथळा व गौण खनिज कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. *ह्या घटने मुळे महसूल पथकातील अधिकारी व कर्मचारी वर्गामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आसून,वाळू माफीयांना कायद्याचा धाक राहीलेला नाही हेच सिध्द होते.सदरील घटनेचा आधिक तपास पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वारे हे करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...