मंगळवार, २८ जानेवारी, २०२०

वाळुज बजाज नगर येथे लोकनेते गोपीनाथराव मुंडे चौक लोकार्पण सोहळा पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत पार पडला
वाळुज महानगर :-आज वाळूज बजाज नगर येथे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब  चौक चा लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी उपस्थित माजी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे,संघटन मंत्री प्रविण दादा घुगे,

जय भगवान महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप, डॉ भागवत कराड साहेब,सतिष भाऊ नागरे,दिपक भाऊ बडे,रमेश गायकवाड,या मान्यवर च्या हस्ते सकाळी 11:00 वाजता पार पडला यावेळी आयोजक लोकनेते फाऊंडेशन व जय भगवान महासंघा पदाधिकारी यांनी मान्यावराचे स्वागत केले व  सर्व जमलेल्या मुंडे भक्तचे आभार मानले व लोकनेते फाऊंडेशन चे उपाअध्याक्ष भगवान नागरे यांनी जमलेल्या मुंडे भक्तचे आभार मानले यावेळी उपस्थित आप्पासाहेब खेडकर,बाबासाहेब घुगे,भगवान नागरे,समाधान घुगे,बाबाराम मिसाळ,विजयकुमार खेडकर,सुभाष केदार, सुदर्शन वाघ,गणेश आव्हाड, अक्षय पालवे,डि एम घुगे,किरण बारगजे, नारायण घुगे,पत्रकार केशव मुंडे आदी उपस्थित होते.

*अंबड - प्रतिनिधि *  *नगर परिषद अंबड़  भारतीय प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण करण्यात आला.* भारतीय संविधान घेण्यात आले  व  मोठ्या उत्साहात पार पडला . यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी घोलप साहेब व इतर नगर सेवक, पदादिकारी अवर्जून उपस्तिथ होते_
प्रजाकसत्तादिन26_जानेवारी_2020.प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज नगर परिषद स्वच्छता कर्मचारी, यांना स्वच्छता बूट,कपड़े,मास्क,गम बूट, जॉकेट वाटप करन्यात आले,तसेच दिव्यांग बांधवांना,व्हिलचेअर,कुबड़ी, वाटप करन्यात आले, तर रमाई आवास,पंतप्रधान आवास योजना,बचत गट अश्या सर्वच लाभर्थ्यांना नीधि, चेक,कपड़े साहित्य वाटप करन्यात आले,

 🇮🇳सारे जहाँ से अच्छा, हिंदुस्तान हमारा !
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

अंबड़ येथे ग्लोबल इंग्लिश स्कूल गणतंत्र दिवस मोठ्या उत्साहात साजरा*.

अंबड प्रतिनिधि**ग्लोबल इंग्लिश स्कूल येथे गणतंत्र दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ग्लोबल इंग्लिश स्कूल चे अध्य्क्ष खुर्शित जिलानी साहेब तसेच कर्यक्रमाचे अध्य्क्ष पंचायत समितिचे विपुल रमेश भागवत सर हे होते. व या कार्यक्रमास प्रमुख पाहुने म्हणून लागलेले केदारदादा कुलकर्णी, गंगाधर वराडे, जाकेर डावरगांवकर, अशोक लांडे, शकील शहा मोहम्मद, शेख केसर, हे अवर्जून उपस्थित होते. तसेच ग्लोबल इंग्लिश स्कूल चे प्रिंसिपल खान मँडम,  सिरान सर, व सर्व शिक्षण वृंद यांच्या सह्याने कर्यक्रम यशस्वी रित्या पार पडला.

शनिवार, २५ जानेवारी, २०२०


अंबड़ शहरात वाहतूक कोंडवाडा*  जालना-बिड रोड वरील अंबड़ मंडी बाजार या रूठ वरील येणाऱ्या जाणाऱ्या ओकांची गर्दी व वाहतूक कोंडवाडा  शहरातील दर हाप्ति असलेल्या गुरुवार मंडी बाजार ......(छायाचित्र)

गुरुवार, १६ जानेवारी, २०२०

सावित्री बाई फुले यांची जयंती व बालिका दिन मोठय़ा उत्साहात मानेवाडी जि.प.प्रा.शाळा येथे साजरा :- पांडुरंग आवारे-पाटील
बीड.(प्रतीनिधी)दि.3/01/ रोजी सकाळी 9.45 वाजता जि.प.प्रा.शाळा.मानेवाडी.ता.जि.बीड येथे जि.प.प्रा.शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती व बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
व चावडी वाचन घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी शिवसंग्राम युवा नेते मा.पांडुरंग आवारे-पाटील होते व प्रमुख अतिथी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष मा.अनुरध माने हे होते. सावित्रीबाई फुले यांचे कार्य व महिला शिक्षणांची चळवळ या विषयी पांडुरंग आवारेंनी यांनी मार्गदर्शन केले त्यांनी आपल्या भाषणातून मुलींना जगू द्या आणि शिकू दया हे सावित्रीबाईचे विचार समाजा पर्यंत पोहोचवले व महिला म्हनजे दोन्ही घराचा ऊदघार करणारी माऊली आहे तिचे रक्षण हेच आपले कर्तव्य असे स्पष्ट केले.व सावञीबाई फुले यांच्या जयंती निमीत्त सर्व विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना आवारेंनी शुभेच्छा दिल्या यावेळी समाजसेवक मा. डिंगाबर (तात्या) आवारे,मा.सरपंच पोपट माने,साहेबराव माने,दत्ता माने,अंकुश माने,संदिपान माने,बाबु इंगोले,महादेव माने व अन्य मानेवाडी ग्रामस्थ,शिक्षणप्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.शाळेचे मुख्यध्यापक श्री जाधव सर यांनी पांडुरंग आवारे पाटील यांचे कवतूक करून व उपस्थितांचे आभार व्यक्त केले आणि कार्यक्रमाची सांगता चावडी वाचनाने करण्यात आली.

गुरुवार, ९ जानेवारी, २०२०

राजणगांव परीसरातील राजषी शाहू विदयालयात सावित्रीबाई फुले(३) रोजी जयंती साजरी करण्यात आली.
औरंगाबाद/प्रतिनिधी या वेळी संस्थेचे संचालक विकास सवाई यांनी सावित्रीबाई फुले याच्या जीवन कार्येवर प्रकाश टाकला.या जयंती निमित्ताने राजणगांव परीसरातील सामाजिक कार्यकर्ते ,नागरिक ,उद्योगपती, कामगार ,विद्यार्थी ,विद्यार्थ्यांनी आदीची मोठ्या संख्येने उपस्थिती होती .यावेळी राजणगांव परीसरातील प्रथम नागरीक
सरपंच साहेब दीपक सदावर्ते उपसरपंच अशोक शेजुळ ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर भाऊ महालकर ग्रामपंचायत सदस्य सुभाष सोनवणे ग्रामपंचायत सदस्य योगिताताई महालकर मोनिका सवाई स्वाती नवपुते ज्योती गाजरे ज्ञानदेव कदम पंकज हिवाळे ,विकास सवाई सर ,शरद जोशी सर,माधव निरणे सर,शुभम राईतकर सर, आकाश इंगळे सर, योगेश हराळ सर,राहुल कायंदे  सर, अतुल मोरे सर , गवई एस पी सर,अनिता मोरे मॅडम,दिपाली तांबेकर मॅडम,संध्या कोळसे मॅडम,वैशाली गोरे मॅडम, निकीता इंगोले मॅडम,ज्योती बनकर मॅडम,त्रिशाला डोंगरे  मॅडम,संगीता अंधारे मॅडम, मोनिका जाधव मॅडम,प्रतिक्षा शिवहरे मॅडम,काजल अग्रवाल मॅडम,अर्चना काकस मॅडम.आदीची उपस्थिती होती.

बुधवार, ८ जानेवारी, २०२०

संजीवनी इंग्लिश स्कुल जातेगावकङुन दर्पनदिनाच्या निमीत्ताने युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण यांचा गौरव सत्कार समारंभ आयोजन 
ङाॅ रामेश्वर चव्हाण याच्या पुढाकारातुन पञकारांचा सन्मान 
गेवराई प्रतिनिधी/ गेवराई तालुक्यातील जातेगावातील प्रसिद्ध इंग्लिश स्कुल जातेगाव संस्थापक अध्यक्ष ङाॅ रामेश्वर चव्हाण साहेब यांच्या पुढाकारातुन सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे मा युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण  व तसेच जातेगाव व परिसरातील पञकार बांधवाचा दर्पनदिनाच्या निमीत्ताने गौरव सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे

गेवराई तालुक्यातील जातेगाव येथील ङाॅ रामेश्वर चव्हाण साहेब यानी संजीवनी इंग्लिश स्कुल येथे दि 9 / 1 / 2020 गुरुवार रोजी सकाळी 9.30 वा सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक उपक्रमात सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे मा युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण यांचा व यमाई पञकार संघ व परिसरात पञकार बांधवाना प्रेरित करण्यासाठी दर्पनदिनाच्या निमीत्ताने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे तरी या सत्कार सोहळ्यात युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण, कालिदास काकङे ,आशिष कुलकर्णी ,दत्ता वाघमारे ,भास्कर सोळुंके, भागवत ढोरमारे ,विशाल पांढरे, सुनिल मिसळ याचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहीती आयोजक ङाॅ रामेश्वर चव्हाण साहेब यानी दिली आहे
यमाई याञेनिमीत्त जातेगावात रक्तदान  शिबीर , यमाई गौरव पुरस्कार वितरण व तसेच सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन
व भव्य कुस्तीचा आखाङ्याचे आयोजन
गेवराई प्रतिनिधी/ गेवराई तालुक्यातील जातेगावातील जाज्वल्य ग्रामदैवत यमाई माता याञे निमीत्ताने रक्तदान शिबीर, यमाई गौरव पुरस्कार वितरण आणी तसेच किर्तन, दही हंङी पालखी मिरवनुक व कुस्ती स्पर्धा आणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
यमाई देवी

गेवराई तालुक्यातील जातेगावातील जाज्वल्य ग्रामदैवत यमाई माता असुन  दरवर्षी शंकभरी पौर्णिमेनिमित्ताने यमाई याञा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते यावर्षी  1 / 1 2020 ते 7 / 1 / 2020 रोजी पर्यंत भव्य देवी भागवत सप्ताह आयोजन दि 9 / 1 / 2020 गुरुवार रोजी सकाळी 10 वा यमादेवी विद्यालय येथे रक्तदान शिबिर व तसेच यमाई गौरव पुरस्कार वितरण पुरस्कार प्राप्ती प्रा पंङीत व्हि बी सर  , पो उपनिरिक्षक दिपक चव्हाण, रविंद्र ओव्हळ सर  , अरुण बद्रे सर यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे व तसेच  दि 10 / 1/ 2020 शुक्रवार रोजी सकाळी 10 वा  ह भ प बापु महाराज भुसारे यांचे यमादेवी मंदीरात हरिकिर्तन व नंतर महप्रसाद कार्यक्रम यजमान श्री प्रदिप चव्हाण यांच्याकङुन सांयकाळी 6 वा भव्य पालखी  मिरवनुक व दहीहंङी कार्यक्रम, राञी 8 वा काळु बाळु कवलापुरकर यांचा सांस्कृतिक लोकनाट्य,दि 11 / 1 / 2020 शनिवार रोजी दु 2 वा भव्य कुस्ती स्पर्धा  प्रथम बक्षीस श्रीमंत ङुकरे यांच्या कङुन  7777 रुपये तर दुसरे बक्षीस 5555 रुपये  ङाॅ रत्नाकरजी चव्हाण साहेब यांच्याकङुन आणी तिसरे बक्षीस कृष्णा चव्हाण, व प्रदिप चव्हाण यांच्याकङुन 4444 रुपये , व राञी 8 वा मालती इनामदार यांचा सांस्कृतिक लोकनाट्य कार्यक्रम तरी परिसरातील भावीक भक्तांनी कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन यमाई देवी विश्वस्थ मंङळ व यमाई देवी याञा उत्सव कमिटी व सर्व ग्रामस्थ मंङळी जातेगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.
जालना जिल्हा परिषद बनले
महायुतीचे सरकार अध्यक्ष शिवसेनेचे व उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे
जालना ( प्रतिनिधी) :- जालना येथील जिल्हा परिषद ची निवडणूक ही बिनविरोध झाली. तसेच दि.६. जानेवारी २०२० यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा परिषद ची सर्वसाधारण सभा घेण्यात आली.

 उपलब्ध सदस्यांची संख्या  जिल्हा परिषदेत २२ भाजप, १४ सेना, १३ राष्ट्रवादी, ५ काँग्रेस व २ अपक्ष असे संख्याबळ आहे. सर्वात मोठे संख्याबळ भाजपकडे २२ असतांनाही सदस्य संख्याबळ जमवता न आल्याने या निवडणुकीतून त्यांनी माघार घेतली.केंद्रीय राज्यमंत्री  रावसाहेब दानवे आणि राज्याचे माजी पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर हे दोघेही येथे दोन दिवसांपासून ठाण मांडून बसले असतांनाही त्यांना सत्ता स्थापन आली नाही. तसेच यापूर्वीही जिल्हा परिषद शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या ताब्यात होती.
पुजा सपाटे याचा अर्ज दाखल होता.  शेवटच्या क्षणी पुजा सपाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.आरोग्य मंत्री राजेश टोपे, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि काँग्रेसचेआ. कैलास गोरंट्याल या तिघांनाही जिल्हा परिषद महाआघाडीच्या सरकारला स्थापन करण्यात यश आले.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...