बुधवार, ८ जानेवारी, २०२०

जालना जिल्हा परिषद बनले
महायुतीचे सरकार अध्यक्ष शिवसेनेचे व उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे
जालना ( प्रतिनिधी) :- जालना येथील जिल्हा परिषद ची निवडणूक ही बिनविरोध झाली. तसेच दि.६. जानेवारी २०२० यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा परिषद ची सर्वसाधारण सभा घेण्यात आली.

 उपलब्ध सदस्यांची संख्या  जिल्हा परिषदेत २२ भाजप, १४ सेना, १३ राष्ट्रवादी, ५ काँग्रेस व २ अपक्ष असे संख्याबळ आहे. सर्वात मोठे संख्याबळ भाजपकडे २२ असतांनाही सदस्य संख्याबळ जमवता न आल्याने या निवडणुकीतून त्यांनी माघार घेतली.केंद्रीय राज्यमंत्री  रावसाहेब दानवे आणि राज्याचे माजी पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर हे दोघेही येथे दोन दिवसांपासून ठाण मांडून बसले असतांनाही त्यांना सत्ता स्थापन आली नाही. तसेच यापूर्वीही जिल्हा परिषद शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या ताब्यात होती.
पुजा सपाटे याचा अर्ज दाखल होता.  शेवटच्या क्षणी पुजा सपाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.आरोग्य मंत्री राजेश टोपे, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि काँग्रेसचेआ. कैलास गोरंट्याल या तिघांनाही जिल्हा परिषद महाआघाडीच्या सरकारला स्थापन करण्यात यश आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...