सोमवार, १८ मे, २०२०



जालना जिल्ह्यात इतर जिल्ह्यातुन शहरी व ग्रामीण भागात लोक आपल्या मूळ गावी येत आहेत त्यांची काळजी घेण्यासाठी मनसेच्या वतीने जिल्हा अध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी दिले मा.मुख्यमंत्री महोदय यांना पाठवले इमेल द्वारे निवेदन.


जालना, प्रतिनिधी:- मुंबई.पुणे.ठाणे. नाशिक. औरंगाबाद.व इतरही जिल्ह्यातून लोकांचे लोंढे ची लोंढे आपल्या मूळ गावी परत येत आहेत, येणाऱ्या लोकांचे जालना जिल्ह्यातील नगरपालिका किंवा नगरपंचायत यांनी हात धुण्याची व्यवस्था केलेली नाही हे जालना जिल्ह्यातील जनतेचे दुर्दैव आहे. जालना जिल्ह्यातील ८ हि  तालुक्याचा ठिकाणी व ज्या बाहेर जिल्ह्यातून लोक आले आहे त आशा गावात सनिटाझर निर्जंतुकीकरण फवारणी करणे अति महत्त्वाचे आहे. कारण या ८ ते १० दिवसात मुंबई.पुणे. ठाणे. नाशिक. औरंगाबाद. व इतर जिल्ह्यातुन पण खुप लोक जालना जिल्ह्यात दाखल झाले आहेत. येणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष केले तर,कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते, जनतेच्या जीवाची काळजी न घेणे कामात हलगर्जीपणा ज्या नगरपालिकेने कोरेना सारखा साथीचा रोगांकडे दुर्लक्ष केले.अशा नगरपालिका व नगरपंचायत बरखास्त करून प्रशासका नेमणूक करावी. आज परेंत जिल्हाधिकारी जालना व त्यांची टीम. पोलीस अधीक्षक जालना व त्यांची टीम. जालना जिल्हा आरोग्य अधीक्षक व त्यांची टीम. नगरपालिका नगर पंचायत सर्व अधिकारी व कर्मचारी या शासकीय यंत्रणेने खूप मेहनत घेऊन कोरोना सारख्या साथ रोगला जालना जिल्ह्यात नियंत्रणात ठेवण्यात खुप मेहनत घेऊन अप्रतिम काम केले आहे, पण लोक कोरोना बाबत जागरूक नाहीत‌. आपल्याला कोरोना होणार नाही ही भावना मनात ठेवून वागत आहेत. परंतु प्रशासनाने लोकांच्या काळजी पोटी येणाऱ्या  लोकांना जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषद (गट) सर्कल निहाय ५५ कोरेंटाईन सेंटर उभारावे जेणेकरून कोरोनाची साथ वाढणार नाही व प्रशासनावरील ताण कमी होईल. आत्ताच काळजी घेणे गरजेचे आहे.कारण सर्व सरपंच प्रशासनाला सहकार्य करीत आहेत. पण सरपंच म्हणले की राजकारणा येते‌. राजकारण म्हणजे प्रेम.भाव. आपलेपण. सगळ्यांना सांभाळून घेणे सगळ्यांच्या मनासारखे वागणे असे संबंध सरपंचाचे व गावकऱ्यांचे असतात. म्हणून या मुळे सरपंच मंडळीचा नाविलाज होतो आणि ते संबंधित व्यक्तींना सरपंचांना विनंती करतो मी घरीच होम कोरेंटाईन राहोतो. असा शब्द सरपंचाला देऊन सर्व गावाभर फिरायला सुरुवात करतो, म्हणून कोरोना सारख्या साथीच्या रोगाचे संकट टाळण्यासाठी सरपंचांना सोबत जिल्हापरिषद गट सर्कल निहाय येणाऱ्या  २० ते २२ गावातील लोकांना एकत्रित ठेवावे. या लोकांना एकत्र ठेवले तर येणाऱ्या काही दिवसात कोरोना साथ नियंत्रणात राहील.जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी जिल्हापरिषद गट सर्कल निहाय ५५ कोरेंटाईन सेंटर उभारावेत.कोरेंटाईन सेंटर उभा करण्यास हलगर्जीपणा केल्यास हे येणारे लोंढे कोठेही बसतील, तसेच थोड्या दिवसांमध्ये पावसाला सुरुवात होईल पावसाला सुरुवात झाली तर कोरोना सारख्या साथीच्या रोगावर नियंत्रण आणण्यासाठी खूप अडचणी निर्माण होतील. आणि याचा अधिकचा तान प्रशासनावर येईल. पावसाळ्याच्या अगोदर नियोजन करणे खूप महत्त्वाचे आहे कारण ग्रामीण भागात तरी बाहेर जिल्ह्यातून आलेले लोक ओळखू येतात, परंतु शहरी भागात आल्याले लोक लवकर कळखता येत नाही कारण दाट वस्ती असते.शहरी भागात वाहनांच्या पासिंग वरून लोक कुठले असावेत याचा अंदाज लावता येतो फक्त. बाहेर जिल्ह्यातील खूप लोक जालना जिल्हा येत आहेत.MH-01.MH-04.MH-5.MH-12.M-14.MH-16.MH-19. MH-20.MH-46.MH-44.MH-23. या व इतर आणेक  पासिंगच्या (गाड्या) वाहने रस्त्यावरती शहरी भागात फिरतांनी मोठ्या प्रमाणात जालना जिल्ह्यात आढळून येतात, हा खूप गंभीर व काळजीचा विषय आहे. याची काळजी घेऊन जिल्हापरिषद गट सर्कल निहाय जालना जिल्ह्यात ५५ कोरेंटाईन सेंटर उभारावेत. जालना जिल्ह्यात ५५ जिल्हा परिषद सर्कल आहेत एका सर्कलमध्ये २०ते २३ गावे असतात. म्हणून कमीत कमी लोकांना होम कोरेंटाईन कारावे.होम कोरेंटाईन केल्याले आणि घालून दिल्या नेम पाळत नाहीत. म्हणून त्यांना प्रशासनाच्या देखरेखीखाली कोरेंटाईन करावे त्यामुळे कोरोना साथ नियंत्रणात राहील. येणाऱ्या पावसाळ्याचे दिवस डोळ्यासमोर ठेवून आत्ताच कठोरात कठोर पावले उचलून योग्य त्या उपायोजना कराव्यात अशी मागणी प्रकाश सोळंके मनसे जिल्हाध्यक्ष यांनी मा.मुख्यमंत्री यांना ई-मेल द्वारे निवेदनात म्हटले आहे.

                         
                         

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...