रविवार, १७ मे, २०२०

ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांचा सर्व कापूस खरेदी करावा - प्रकाश आंबेडकर




 पुणे,ब्युरो चीफ :-  महाराष्ट्रात कापसाचे उत्पन्न घेणारा शेतकरी ग्रासला असून आतापर्यंत ६० टक्के कापूस सीसीआय (पणन महामंडळ) यांनी खरेदी केला आहे. तर ४० टक्के कापूस अजूनही शेतकऱ्यांकडे आहे. ११ जून पूर्वी सर्व कापूस खरेदी करून ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना द्यावी, अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.                
         राज्यात ११ जून पर्यंत पावसाचे आगमन होण्याची शक्यता असल्याचे वेधशाळेने म्हटले आहे. त्यापूर्वी शेतकऱ्यांकडे राहिलेला ४० टक्के कापूस फेडरेशनने विकत घ्यावा, यासाठी शासनाने त्यांना पत्र लिहून विनंती करावी, हमीभाव आणि व्यापाऱ्यांनी विकत घेतलेला कापूस यातला जो फरक आहे, ते पैसे शासनाने थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करावे. असे झाले तर शेतकर्‍यांचा राहिलेला ४० टक्के कापूस विकत घेतला जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, अशी विनंती प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

सुरेश नंदिरे 
प्रसिद्धी प्रमुख 
वंचित बहुजन आघाडी
9867600300

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...