मंगळवार, २ जून, २०२०

                                 घरगुती महिला कामगारांना मदत देण्यात यावी- वंचितची मागणी.




परभणी,ब्युरोचीफ :- लॉकडाऊन आणि संचारबंदीच्या काळात काम बंद असल्याने जिल्ह्यात अनेक घरगुती महिला कामगारांना नुकसान भरपाई म्हणून महिला कामगारांना ५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने  करण्यात आली आहे. तसे निवेदन परभणी जिल्यातील जिंतूर तहसीलदारांना देण्यात आले आहे.
      कोरोना महामारीने देशात आणि राज्यात टाळेबंदी सुरू असून लॉकडाऊनमुळे घरगुती महिला कामगारांना काम मिळेनासे झाले आहे. मागील दोन महिन्यापासून त्याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या गंभीर परिस्थितीमध्ये शासनाकडून बांधकाम कामगारांना, कामगार कल्याण मंडळ अधिकारी मार्फत
नोंदणी केलेल्यांना दोन हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येत आहे, याच धरतीवर नोंदणीकृती व अनोंदणीकृती घरगुती कामगार महिलांना विनाअट ५ हजार रुपयाची आर्थिक मदत शासनाने करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना तहसीलदारांमार्फत निवेदन देऊन करण्यात आली आहे. जिंतूर मधील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सतीश वाकळे, सय्यद शकूर, नामदेव प्रधान, गणेश काकडे, आकाश अंभोरे यांनी या मागणीचे निवेदन दिले आहे.
            राज्यात लाखो महिला कामगार आहेत ज्या घरगुती काम करतात. अशिक्षित असल्याने अनेकांना त्यांची नोंदणी देखील करता आलेली नाही, अश्या महिलांना राज्य शासनाकडून आर्थिक मदत मिळावी म्हणून वंचित बहुजन आघाडीकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याची सुरवात परभणी जिल्यातून करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...