बुधवार, ४ मार्च, २०२०

आधार प्रमाणीकरणाचे काम करण्यासाठी कोणत्याही शेतकऱ्यांनी पैसे देवू नये
जालना / प्रतिनिधी :-  महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 जाहीर केलेली आहे. सदर योजनेतंर्गत आधार प्रमाणिकरणाचे  काम आपले सरकार सेवा केंद्र चालकामार्फत,स्वस्त राशन दुकान चालकांमार्फत सुरु करण्यात आले असून  जालना जिल्हयातील 1,30,158 शेतकऱ्यांची यादी प्रसिध्द झाली  आहे. तसेच शेतक-यांचे आधार प्रमाणिकरण करण्याचे काम सुरु झालेले आहे. या प्रकरणी शासन धोरणाच्या अनुषंगाने कार्यवाही न करता शेतक-यांकडून पैसे घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने जिल्हाधिकारी जालना  यांनी दिनांक 3 मार्च 2020  रोजीच्या पत्रान्वये जिल्हा पुरवठा अधिकारी, जालना व जिल्हा समन्वयक, E-Governance Services India Ltd.Jalna यांना सर्व आपले सरकार सेवा केंद्र, स्वस्त राशन दुकान चालकांना सूचना देऊन कोणत्याही प्रकारचे पैसे घेतले जाणार नाही याबाबत खबरदारी घेणे बाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. तरी सर्व  आपले सरकार सेवा केंद्र व स्वस्त राशन दुकान चालकांना आवाहन ही करण्यात आले आहे. तरी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत आधार प्रमाणिकरणासाठी कोणत्याही लाभार्थ्याकडुन पैसे घेऊ नये अथवा मागणी करु नये, तसेच संबधीत लाभार्थी यांनी कोणत्याही आपले सरकार केंद्र व स्वस्त राशन दुकान चालकांना पैसे देवु नये.अशा प्रकारचा गैरप्रकार आढळुन आल्यास संबंधीत तहसिलदार, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयास निदर्शनास आणुन दयावे. असे आवाहन जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था, जालना यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...