बुधवार, ४ मार्च, २०२०

पाडळी च्या महिलांनी धुंंडाळली स्वयंरोजगाराची वाट, होळीसाठी इको फ्रेंडली रंगाची निर्मिती बाजारातील वाढती मागणी
बदनापूर प्रतिनिधी: - बदनापूर, ता.2 : बदनापूर तालुक्यातील अवघ्या 70 उंबरठ्याचे छोटेसे गाव असलेल्या पाडळी (ता बदनापूर) येथील
महिला स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करीत आहेत. या महिला मागील दोन वर्षांपासून नैसर्गिक साधनांचा (इकोफ्रेंडली) वापर करून होळीच्या रंगांची निर्मिती करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या गाठीशी दोन पैसे जमा होत असून छोट्या उद्योगापासून मोठा उद्योग सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे.उपक्रमशील आणि जलसाक्षर पाडळी दुधना नदीच्या काठी असलेले पाडळी गाव उपक्रमशील आहे. गावाला संत गाडगेबाबा स्वच्छता  अभियानाचा पुरस्कार तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते मिळाला आहे. शिवाय पानंदमुक्त गाव अशी पाडळीची ओळख आहे. गावनजीकच्या दुधना नदीचे लोकसहभाग आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून खोलीकरणाचे काम झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे. महिलांनी धरली स्वयंरोजगाराची वाट पाडळी येथील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून स्वयंरोजगार निर्मितीवर भर देत आहेत.ग्रामविकास समिती ( रा. स्व. संघ) माध्यमातून नैसर्गिक कच्चा माल घेऊन होळीसाठी नैसर्गिक रंगांची निर्मिती केली जात आहे. यासाठी गटाच्या प्रमुख सुनीता दत्तात्रय सिरसाठ यांच्या पुढाकाराने महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध झाले आहे. मागच्या वर्षी या गटाने होळीच्या नैसर्गिक रंगाची निर्मिती केली होती त्यास बाजारात मोठी मागणी होती. शिवाय दिवाळीच्या वेळेस नैसर्गिक साधनांचा वापर करून सुगंधित उटनेही तयार केले होते. एकूणच महिलांना उद्योगातून उत्पन्न मिळत असल्याने गावातील इतर महिलाही स्वयंरोजगारासाठी पुढाकार घेत आहेत.अशी होते नैसर्गिक रंगाची निर्मिती पाडळी येथील सुनीता सिरसाट यांच्यासह कालींदा प्रल्हाद सिरसाठ, सीता राजेंद्र सिरसाठ, नंदाबाई विष्णू सिरसाठ, राधा रखमाजी मदन, अश्विनी दत्तात्रय सिरसाठ, मीना एकनाथ सिरसाठ, राधा कैलास सिरसाठ, जिजाबाई विष्णू अंभोरे, ध्रुपदाबाई बाळू शिनगारे या दहा महिलांनी ग्रामविकास समिती कडून उडीद डाळीचे पीठ, मक्याचे पीठ, बुंदीसाठी लागणारा खाता रंग असे कच्चा माल विकत घेतला. त्यानंतर 100 किलो कच्चा मालातून प्रमाणबद्ध मिश्रण केले. शिवाय त्याला उन्हात वाळू घातले. त्यानंतर त्याची आकर्षक पॅकिंग केली. आता हा माल बाजारात विक्रीसाठी तयार झाला आहे.प्रतिसाद पाहता दुपटीने रंगाची निर्मिती मागच्या वर्षी महिलांनी तयार केलेल्या नैसर्गिक रंगाला बाजारात व लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. या नैसर्गिक रंगामुळे शरीराला व चेहऱ्याला कुठलाही अपाय होत नसल्यामुळे होळीसाठी रंग खरेदी करणाऱ्या लोकांचा ओढा या रंगाकडे वाढत चालला आहे. त्यामुळे त्यांनी यंदा दुपटीने रंगाची निर्मिती केली. तयार झालेला रंग महिला बाजारात जाऊन किरकोळ व ठोक पद्धतीने विक्री करतात.आम्ही तयार केलेला होळीचा रंग नैसर्गिक वस्तूंपासून तयार झालेला आहे. त्यामुळे त्वचेला त्याचा कुठलाही अपाय होत नाही. आम्ही दिवाळीला उटनेही तयार केले होते. पुढे नैसर्गिक साबण, शाम्पू व बिस्कीट, केक, पापड, कुरडाया तयार करणार आहोत. छोट्या उद्योगातून मोठ्या उद्योगाकडे वळण्याचा आमचा मानस आहे.पाडळी छोटे गाव असले तरी गावातील महिला स्वावलंबी होण्यावर भर देत आहेत. त्यामुळे आम्ही नैसर्गिक रंग निर्मितीपासून आमचा छोटा व्यवसाय सुरू केला आहे. भविष्यात गावातील इतर गरजू महिलांनाही सहभागी करून उद्योग वाढवणार आहोत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...