मंगळवार, २४ मार्च, २०२०

कोरोनोचा मुकाबला करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र जमु नये परदेश अथवा ईतर जिल्ह्यातुन आलेल्या नागरिकांनी प्रशासनास माहिती द्यावी - जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे
जालना, प्रतिनिधी :- कोरोनो विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये यादृष्टीकोनातुन जिल्हा प्रशासन सर्वतोपरी
जालना जिल्‍यामध्‍ये एकूण ५० रुग्‍ण विलगीकरण कक्षात दाखल होते. त्‍यापैकी ४७ रुग्‍णांचे स्‍वॅब घेण्‍यात आले आहेत. त्‍यापैकी २६ रुग्‍णांचे अहवाल प्राप्‍त झाले असून ते निगेटिव्‍ह आले आहेत. त्‍या २६ रुग्‍णांना डिर्स्‍चार्ज देण्‍यात आला आहे. आजरोजी २४ रुग्‍ण विलगीकरण कक्षात दाखल असून त्‍यांची प्रकृती स्थिर आहे. दिनांक २४ मार्च, २०२० रोजी ३ रुग्‍ण नव्‍याने दाखल झाले आहेत.
 प्रतिबंधात्मक उपाययोजना करत असुन या विषाणुचे संक्रमण होऊ नये यासाठी पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र जमु नये. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे अन्यथा आपल्या घरीच रहावे व प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले आहे.जिल्‍हयातील किराणा मालाच्‍या दुकाना पुर्णवेळ सुरु राहणार असुन त्‍यासाठी नागरीकांनी गर्दी करण्‍याची काहीही आवश्‍यकता नाही.  जिल्‍हयामध्‍ये दिनांक 23 मार्च, 2020 पासुन फौजदारी प्रक्रिया संहीता १९७३ चे कलम १४४ अंतर्गत प्रतिबंधात्‍मक आदेश जारी करण्यात आलेले असुन कोणत्‍याही परिस्थितीत पाचपेक्षा अधिक लोकांनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमु नये, अथवा कोणत्‍याही रस्‍त्‍यावर, गल्‍लोगल्ली थांबु नये. नागरिकांनी  शक्‍यतो आपल्या घरीच थांबावे. अत्‍यंत आवश्‍यक असेल त्यावेळीच घराबाहेर पडावे व प्रशासनाच्‍या आदेशाची अंमलबजावणी करावी. प्रशासनाचे आदेश न पाळणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्‍यात येईल, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.   कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी  जिल्‍हा प्रशासनाने एकूण १२ कोटी ६० लक्ष रुपयांची तरतूद केली आहे.  नागरीकांनी घाबरुन जाऊ नये, जिल्‍हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि आरोग्‍य विभाग आपल्‍या सोबत आहे. नागरिकांना कुठल्याही प्रकारच्‍या शंका अथवा काही विचारणा करावयाची असल्‍यास त्यांनी जिल्‍हा नियंत्रण कक्ष, जिल्‍हाधिकारी कार्यालय, जालना येथे ०२४८२-२२३१३२ या क्रमांकावर संपर्क साधावा.   जालना जिल्‍हयातील नगर परिषदेच्‍या वतीने करोना विषाणूच्‍या पार्श्‍वभूमीवर टॅक्‍टरद्वारे फवारणी करण्यात येत असुन शहरामध्‍ये स्‍वच्‍छता व धुरीकरणसुध्‍दा करण्‍यात येत आहे.  मागील एक महिन्यात  आपण जर कोरोनाग्रस्त देशातून आलेले असाल अथवा इतर जिल्ह्यातून जालना जिल्ह्यात आला असला तर http://ezee.app/covid19jalna या लिंकवरु जाऊन संपूर्णपणे खरी माहिती फॉर्ममध्ये भरावी. जेणेकरून प्रशासनामार्फत जनतेला योग्य ती मदत करता येईल.
विभागीय आयुक्तांनी घेतला व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे आढावा
आज दिनांक २४ मार्च, २०२० रोजी दुपारी २ वाजता विभागीय आयुक्‍त सुनील केंद्रेकर यांनी औरंगाबाद विभागातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, मुख्य  कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधुन करोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी करावयाच्‍या उपाययोजनाच्‍या अनुषंगाने करण्‍यात येणा-या कार्यवाही बाबत आढावा घेतला यावेळी विभागीय आयुक्तांनी जिल्‍हयात कलम १४४ व संचारबंदीच्या अनुषंगाने उपस्थितांना मार्गदर्शक सुचना केल्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...