मंगळवार, २४ मार्च, २०२०

        कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी उपलब्ध                    मनुष्यबळाची सेवा जिल्हाधिकारी यांच्याकडून अधिग्रहीत
                     जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांचे आदेश
आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये जिल्हाधिकारी यांना अधिकार
बुलडाणा, प्रतिनिधी: कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. या उपाययोजना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये जिल्हाधिकारी यांना जिल्ह्यातील उपलब्ध मनुष्यबळाची सेवा अधिग्रहीत करता येणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील डॉक्टर्स, व्यक्ती/ समुह, संस्था / प्राधिकरणे आदीमधील उपलब्ध असलेली सेवा, साधनसामुग्री, अधिकारी / कर्मचारी, उपलब्ध मनुष्यबळ यांची सेवा कोरोना विषाणूचा प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी अधिग्रहीत करण्यात आली आहे. उपरोक्त नमूद सेवा अधिग्रहीत केलेल्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाने आदेशीत केल्यास तातडीने उपस्थित व्हावे व अनुपालन करण्यात यावे. तसा अहवालही जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा. अन्यथा आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील विविध कलमान्वये शिक्षा प्रस्तावित करण्यात येवून भारतीय दंडसंहीता 1860 मधील कलम 188 नुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असे जिल्हादंडाधिकारी सुमन चंद्रा यांनी आदेशान्वये कळविले आहे.      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...