बुधवार, २२ एप्रिल, २०२०


सैलानी येथील मनोरुग्ण व नातेवाईक यांची जेवण व राशनची व्यवस्था करा

आमदार श्वेताताई महाले यांची पालकमंत्री ना.राजेंद्र शिंगणे साहेब यांच्याकडे मागणी
बुलडाणा,प्रतिनिधी:- सैलानी ता.जि. बुलडाणा हे जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र असून हिंदू आणि मुसलमान या दोन्ही धर्माचे भाविक दर्शनासाठी येत असतात. येथे मोठ्या प्रमाणावर मनोरुग्ण बरे होतात अशी मान्यता असल्याने तिथे मनोरुग्ण येण्याचे खूप मोठे आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविक येणे बंद झाल्याने मनोरुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची उपासमार होत असल्याने त्यांच्या राशन व जेवण्याची व्यवस्था करण्याची मागणी आ. सौ. श्वेताताई महाले यांनी पालकमंत्री मा .ना. राजेंद्रजी शिंगणे साहेब यांच्याकडे एका लेखी निवेदनाव्दारे केली आहे .दि 21/4/2020 रोजी आजही लॉक डाऊन असतांना ही सैलानी  येथे शेकडो मनोरुग्ण व त्यांचे नातेवाईक आहे. सगळी कडे तीर्थक्षेत्रे बंद असल्याने भविकांचे येणे जाणे बंद आहे . तिथे मागून खाणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने त्यांचे पोट ही मिळेल त्याच्यावर असल्याने त्यांची उपासमार होत आहे . तेथील मनोरुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना खाण्यासाठी काहीही नसल्याने त्यांचे हाल होत आहे .  त्यांच्याजवळ राशन कार्ड नाही. त्यामुळे शासनाच्या कोणत्याही योजनेचा त्यांना लाभ मिळत नाही. मनोरुग्ण साखळयांमध्ये बांधलेले असल्याने ते खाण्यापिण्यासाठी भटकंती सुद्धा करू शकत नाही . जे मनोरुग्ण मोकळे आहेत त्यांना कुणी जवळ येऊ देत नाही .
     त्यामुळे तिथे राहत असलेले मनोरुग्ण आणि त्यांच्या नातेवाईक यांची राशनची व जेवण्याची व्यवस्था करण्यासाठी तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी आ. सौ. श्वेताताई महाले यांनी केली आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...