बुधवार, २२ एप्रिल, २०२०


       लाँकडाऊनचा फुल उत्पादक शेतकर्यांना मोठा फटका
सिंधीकाळेगाव,प्रतिनिधी (शाम गिराम):-जगभरात थैमान घातलेल्या कोरोणा विषानुने लाँकडाऊन करण्यात आले आहे. या कालावधीत धार्मिक, सामाजिक 
कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली आहे. याचा सर्वाधिक फटका फुल उत्पादकांना बसला आहे. जालना तालुक्यातील पिरकल्याण येथील शेतकरी अक्षय शिंदे यांनी शेतामध्ये गुलछडी, गलांडा आदी फुल पिकांची चार महिन्यापुर्वी लागवड केली होती माञ फुले विक्रिस आली आणि कोरोनामुळे संचार बंदी लागु झाली त्यामुळे फुल शेती करणार्यांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. फुलशेतीवर केलेला खर्चही निघणे मुश्किल झाले, असुन व्यापारीही येत नसल्याने फुल उत्पादक शेतकर्यांची चिंता वाढली. रोज कमीत कमी 20 ते 25 किलो माल वाया जात आहे.  लॉकडाउन असल्यामुळे फुल मार्केट पूर्णपणे बंद आहे शेतकऱ्यांचे फुल शेतातच सडत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढलं आहे .

प्रतिक्रिया (अक्षय शिंदे)
माझी 20 गुंठे गुलछडी आहे दररोज 15 किलोच्या आसपास फुल निघत होते परंतु संचारबंदीमुळे
        
फुल शेतातच सडून जात आहे त्यामुळे माझं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे खरं तर फुल शेतीवर शेतकऱ्यांचा दैनंदिन उदरनिर्वाह अवलंबून असतो.फुलमार्केट बंद असल्याने संपूर्ण शेतकरी अधिक आर्थिक अडचणीत सापडला आहे फुलशेती करणार्यांना शेतकऱ्यांना सरकारने काही मदत करायला हवी अशी भावना सर्व सामान्य शेतकऱ्यांची आहे.अशा प्रकारचे फुले फुलली परंतु लाकडाऊनमुळे विक्रिसाठी नेता येत नाही

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...