बुधवार, ३ जून, २०२०

         सलग अडीच महिन्यांपासून अंबरनाथ मध्ये गरजूंना मदत वंचितकडून मदतीचा ओघ सुरूच



अंबरनाथ,ब्युरोचीफ :- कोरोना काळात लॉकडाऊन असल्याने अंबरनाथ भागात अनेक गरजूंना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. त्याच बरोबर दैनंदिन जीवनासाठी लागणारे साहित्य रोगप्रतिकार औषधे इतर राज्यात जाणाऱ्या मजुरांना तयार जेवण, इतर साहित्य, पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. गेल्या अडीच महिन्यांपासून वंचित बहुजन आघाडीचे अंबरनाथ पूर्वचे शहराध्यक्ष प्रवीण गोसावी यांनी हा उपक्रम राबवला आहे.** अंबरनाथ परिसरात कामानिमित्त  येऊन तात्पुरता निवारा घेणारे कामगार मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात कारखाने, लघु उद्योग बंद झाल्याने अनेक कामगार व त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली होती. ज्यांच्याकडे पैसे होते त्यांनी कसेही करून त्यांच्या स्थलांतर केले. मात्र इतर कामगारांचे हाल झाले. अशा लोकांना वंचित बहुजन आघाडीचे अंबरनाथ पूर्वचे शहराध्यक्ष प्रवीण गोसावी, गुंजाई फाउंडेशन, शिवराय फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने पाच हजार कुटुंबांना रोगप्रतिकारक औषधांचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर अन्नधान्यांचे किट, भाज्या, तयार जेवण, मास्क, स्यानेटायझरचे मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले. तसेच जे मजूर अंबरनाथवरून त्यांच्या गावी जाण्यासाठी निघाले होते, अश्या लोकांसाठी महामार्गावर तयार जेवण, पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. तसेच त्यांच्या विश्रांतीची सोय देखील करण्यात आली होती. गेले अडीच महिने या साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. अद्यापही अंबरनाथ भागात वंचित बहुजन आघाडीकडून गरजूंना मदत करण्यात येत असल्याचे प्रवीण गोसावी यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...