शनिवार, १३ जून, २०२०

अंबड व्यापारी महासंघाचे प्रभारी अध्यक्ष द्वारकादास जाधव तर प्रभारी सचिव गणेश बोरडे यांची एकमताने निवड.




अध्यक्ष चंद्रप्रकाश सोडाणी यांच्या अध्यक्षतेखाली आनंदी लॉन्स येथे सोशल डिस्टन्स पाळून बैठक पार

अंबड़/प्रतिनिधि : अंबड व्यापारी महासंघाची आज 13 जून रोजी विद्यमान अध्यक्ष चंद्रप्रकाश सोडाणी यांच्या अध्यक्षतेखाली आनंदी लॉन्स येथे सोशल डिस्टन्स पाळून बैठक पार पडली...महासंघाचा कार्यकाळ संपल्यामुळे शहरातील सर्व संघटना अध्यक्ष त्यांचे प्रतिनिधी व विविध व्यापारी यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली..बैठकीत पुढील काही कालावधी साठी *प्रभारी अध्यक्ष* म्हणून सिड्स संघटनेचे श्री द्वारकादास मेहेरबान जाधव यांची तर *प्रभारी सचिव* म्हणून श्री गणेश रोहिदास बोरडे यांची एकमताने निवड करण्यात आली...प्र.अध्यक्ष यांच्या कडे मावळते अध्यक्ष चंद्रप्रकाश सोडाणी व सचिव अंबादास अंभोरे यांनी आपला राजीनामा सादर केला..व गेल्या काळात शहरातील सर्व व्यापारी बांधव सर्व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी शहरातील सामाजीक संघटना कार्यकर्ते विविध राजकीय नेते कार्यकर्ते सर्व लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या सर्वोतोपरी सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले...नूतन अध्यक्ष व सचिव यांनी पुढील काळात शहरातील सर्व लहान मोठे व्यापारी बांधवांची अद्यावयात यादी आप आपल्या संघटनां मार्फत प्राप्त करायची असून त्यानंतर शहरातील सर्व लहान मोठ्या व्यापारी बांधवांना एकत्र करून पुढील तीन वर्षा साठी अंबड व्यापारी महासंघाचे पदाधिकारी व कार्यकरणीची निवड करायची आहे असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला..बैठकी दरम्यान अनेक व्यापारी बांधवानी आपली मनोगत व्यक्त केली. बैठकीस खालील संघटना अध्यक्ष व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते**
मेडीकल-शिवाजी बजाज
हार्डवेअर-अतुल मालू आडत-अशोक बियाणी
सिड्स-द्वारकादास जाधव
इलेक्ट्रॉनिक-ओमप्रकाश उबाळे सराफा-रमेश शहाणे
ब्लिडींग मटे..-शिरीष सावजी स्टील भांडी- जे.चौधरी मद्य-राजुसेठ बजाज हॉटेल-संजय जोशी किराणा-निलेश लोहिया कापड- भाई जामदरे
पान स्टोल-अजीज बेग हेअर सलून-कांता चित्रे मंडप डेको-मनोज शर्मा जनरल-शिवाप्रसाद चांडक मशिनरी-गुलाब राठोड फोटो स्टुडियो-अरुण भवर फुटवेअर-सुनील मोटवणी यांच्यासह व्यापारी कैलाश जयणारायन राठी, भीमराव शिंगाडे, पुरुषत्तोम सोमाणी,  कैलास अग्रवाल, राजेंद्र डहाळे, बाळासाहेब पांढरे, राधेश्याम मंत्री, अजित मालानी, सुनील खानचंदानी, संदीप जाजू, विष्णू देवडे, विशाल काला, रामेश्वर भोरे, विशाल गिलडा, संतोष ढोबळे, शेख अल्ताफभाई, नरेश बुंदेलखंडे, यांच्या सहीत मावळते अध्यक्ष *चंद्रप्रकाश सोडाणी* मावळते सचिव *अंबादास अंभोरे* नूतन प्रभारी अध्यक्ष *द्वारकादास जाधव* प्रभारी सचिव *गणेश बोरडे* यांची उपस्थिती होती...सर्वांचे आभार मानून बैठक आनंदी लॉन्स येथे सोशल डिस्टन्स पाळून बैठक  संपन्न झाली. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...