सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२०

   महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना टेंभुर्णी व                    तीर्थपुरी येथे आधार प्रामाणिकरणास प्रारंभ

जालना, दि. 24 - महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्याच्या टेंभुर्णी तर घनसावंगी तालुक्याच्या तीर्थपुरी या गावातील थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणिकरण करून कर्जमुक्त प्रथम शेतकरी पंढरीनाथ महादू धारे यांना आधार प्रमाणित नोंद प्रमाणपत्र देऊन या योजनेचा शुभारंभ आज  दि. 24 फेब्रुवारी रोजी टेंभुर्णी येथील आपले सरकार सेवा केंद्र येथे करण्यात आला.यावेळी सहाय्यक निबंधक श्रीमती कल्पना शहा, चेअरमन रावसाहेब अंभोरे, जिल्हा सहकारी बँकेचे भागचौकसनिस देविदास दंदाले, गटसचिव गणेश चव्हाण, विष्णू डोईफोडे, भुंजगराव पिंपळे, शालिक बनकर, सरपंच गणेश धनवाई, भिकन खाँ पठाण, अंकुश देशमुख, हरिभाऊ सोनसाळे, गोरखनाथ राऊत आदींची उपस्थिती होती.
महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत आज जिल्ह्यातील टेंभुर्णी व तीर्थपुरी येथील आधार प्रमाणिकरण कामाची पथदर्शी योजना हाती घेतली असून या दोन गावातील थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याद्या पूर्ण झाल्या असून त्यांच्या आधार प्रमाणिकरणाच्या कामाचा शुभारंभ आज झाला. टेंभुर्णी व तीर्थपुरी येथील प्रत्येकी 551 अशा एकुण 1 हजार 102 पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर असून त्यांचे आधार प्रमाणिकरण केले जाणार आहे. या दोन गावातील यादी प्रसिद्धीनंतर काही अडचणी  असतील तर त्याची माहिती शासनाला सादर करण्यात येणार आहे. यात शेतकऱ्यांनी ऑनलाईन माहितीची खातरजमा करुन कर्जमुक्तीसाठी सहमती दर्शवायची आहे.  जिल्ह्याभरातील सर्व गावांची अंतिम यादी येत्या 28 किंवा 29 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सांगितले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...