सोमवार, १६ मार्च, २०२०

कोरोना मुळे शिरासमार्ग येथे शाळाबंद ,बाजार बंद रस्ते साम सुम
___________________________
कोरोणा विषाणू प्रसार नियंत्रणासाठी प्रशासन सज्ज
शिरसमार्ग प्रतिनिधी :-  कोरोना व्हायरास मुळे सर्वत्र
नागरिक भयभीत झाले आहेत.जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी देश आणि राज्य पातळीवर शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत तर स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.
बीड जिल्ह्यातील शिरसमार्ग येथील ग्रामपचायत क्षेत्रातील शाळा, महाविद्यालये,आठवडी बाजार, जनावराचा बाजार,31 मार्चपर्यंत बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.शिरसमार्ग येथील जिल्हा परिषद शाळा
 ना सुट्या देण्यात आले आहे. व तसेच आठवडी बाजार, जनावराचा बाजार, व्यवहार ठप्प झाली आहे.रस्ते साम सुम झाले आहे.
शिरसमार्ग ग्रामपचायतने आजचा आठवडी बाजार बंद केला आहे.हा बाजार स्थळ ह्या ठिकाणी भरतो.ह्या बाजारात विविध ठिकणांहून व्य पारी मोठ्या प्रमाणात येतात.हा बाजार बाजूला खेडे पाडे,वड्या अासल्यामुळे येथे नागरिकांची व व्यापाऱ्याची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. त्यांच्यप्रमाणे  आठवडी बाजारात होणारी गर्दी टाळण्यासाठी व तसेच सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला. व त्यामळे आठवडी बाजार शिरसमार्ग येथे भरला नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...