शुक्रवार, ६ मार्च, २०२०

जालना शहरातील औद्योगिक वसाहतीतील ओम साईराम स्टील कंपनीत अपघात 3 कामगार जाळून ठार अन्य नऊ कामगार गंभीर जखमी
जालना (प्रतिनिधी) :- जालना शहरातील चंदनझिरा एमआयडीसीतील ओम साईराम स्टील कंपनीत गुरुवारी दुपारी 04 वाजता 12 कामगार
भट्टीजवळ काम करत असताना हि घटना घडली.या घटना संदर्भात अधिक माहिती अशी की, एमआयडीसी मधील ओम साईराम स्टील कंपनीत दु.4 वाजेच्या दरम्यान भट्टीजवळ 12 कामगार काम करत असतांना गुरुवारी दुपारी भट्टीतील तप्त लोहरस एका बकीटि मधुन क्रेन द्वारे नेत आसताना भट्टीतील तप्त लोहरस कामगाराचा अगावर पडून त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यात तानत्रिक बिघाडामुळे ती बकेट क्रेनमधुन खाली पडल्या ने खाली काम करणाऱ्या कामगारांच्या आगावर भट्टीतील तप्त लोहरस पडुन यात 3 कामगाराचा भाजुन जागीच मुत्यु झाला आहे.अन्य 9 जन गंभीर जखमी झाले असुन त्याना समान्य रुग्णालयात उपचारासाठी हालवित होते व त्या नतर येथुन काहीना औरंगाबाद येथे खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.दरम्यान ठार झालेल्यांची नावे मात्र अजुनपर्यंत समोर आली नसून ठार झालेल्यांमध्ये इतर राज्यातील कामगारांचा समावेश असल्याचे कळते. मृत मध्ये संख्या वाढण्याची शक्यता आहे.दरम्यान या दुर्देवी घटनेनंतर परिसरात तणाव वाढू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...