सोमवार, २३ मार्च, २०२०

कोरोनाच्या भीतीमुळे रक्तदान करण्यास घाबरू नका - जनकल्याण रक्तपेढी
जालना : सध्या कोरोना विषाणूची साथ सुरु आहे .दरवर्षी एप्रिल व मे मध्ये शाळा य महाविद्यालयात सुट्या 
असल्यामुळे तसेच नियमित रक्तदाते बाहेरगावी गेल्यामुळे रक्ताचा तुटवडा भासत असतो . जालना शहरामध्ये साधारणपणे 40 ते 50 रक्तपिशव्या जनकल्याण रक्तपेढीमधून रुग्णांना रक्तपुरवठा केला जातो . रुग्णांच्या शस्त्रक्रियेसाठी , अपघातग्रस्तांसाठी व थैलेसिमीया , हिमोफिलीया या रुग्णांना रक्ताची आवश्यकता असते . सदर बाब लक्षात घेता . रक्तदात्यांची कोरोना विषाणूबाबतचे लक्षणे व प्रवासाचा पूर्व इतिहास तपासून व सुरक्षा स्वच्छतेचे पालन करुन रक्तदान शिबीराची व्यवस्था जनकल्याण रक्तपेढीने केली आहे . रक्तदात्यांमध्ये रक्तदान करण्याविषयी भिती अथवा संभ्रम निर्माण झालेला असून प्रतिबंधक उपाय म्हणून गरजेशिवाय घराच्या बाहेर पडू नये व गर्दी करु नये हे जरी खरे असले तरी रक्तदान हे गरजु रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे . कारण सध्या स्थितीत रक्तास कुठलाही पर्याय नाही , रक्तदान केल्यामुळे अथवा रक्त संकमणामुळे कोरोना विषाणूची लागण होत नाही जालना शहरातील सर्व सामाजिक संघटना , संस्था , रक्तदाते यांनी रक्तपेढीच्या गरजेनुसार रक्तदान शिबीर आयोजित कराये व गरजु रुग्णांसाठी रक्त संकलन करून त्यांचे प्राण वाचविण्याच्या उदात्त कार्यास सहकार्य करावे . तसेच इच्छुक रक्तदाते यांनी सकाळी 10 ते 5 या वेळेत 2 किंवा 3 या संख्येने रक्तदात्यांनी जनकल्याण रक्तपेढीत येऊन रक्तदान करावे , तसेच शिविर संदर्भात रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी शिवराज जाधव - 8380049340 , 9421322252 या नंबरवर संपर्क करावा . तसेच 31 मार्चपर्यंत रक्तपेढीच्या वतीने शहरातील सर्व हॉस्पिटलांमध्ये कुरीयर सेयेच्या माध्यमातुन रक्तपिशवी पोहोच करणार असून यासाठी रक्तपेढीमध्ये या नंबरवर 02482 - 238397 , 243085 , 7722027470 संपर्क करावा , असे आवाहन रक्तपेढीचे अध्यक्ष रमेशभाई पटेल यानी केले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...