शनिवार, ७ मार्च, २०२०

                           8 मार्च महिला दिन विशेष
अशिक्षित सीताबाई ते उद्योजक सीताबाईचा थक्क करणारा प्रवास सिंधी काळेगाव येथे सुरू झालेली आवळा कॅन्डी ची हेच थायलंड पर्यंत विक्री.
सिंधी काळेगाव/(श्याम गिराम) प्रतिनिधी :-अंबड तालुक्यातील 
ताडहदगाव  येथे शेतकरी   कुटूंबीयात जन्मलेल्या  सिताबाई मोहिते . कुटूबातील परीस्थीती जेमतेम त्यामुळे सिताबाई कधीही शाळेत जाण्याचा विषय च नव्हता त्यामुळे घरची गरीबी असल्यामुळे सिताबाई  कधीही शाळेत चाऊ शकल्या नाही. त्यात ग्रामीन भागात लग्नही लवकरच व्हायचे . त्यामुळे त्याच लग्न ही लवकरच झाले. जालना तालुक्यातील घोडेगाव येथील रामभाऊ मोहीते यांच्या साबत त्याचा विवाह झाला . सासर ची थोडीफार शेती होती परंतु रामभाऊ सिंधी काळेगाव येथे सालगडी म्हणुन कामाला राहीले . त्यामुळे सिताबाई सुद्धा रामभाऊ सोबत काम करू लागल्या . परंतु स्वत:ला लिहीता वाचता येत नसल्याने त्यांना खुप राग येत होता. त्यामुळे त्याना काहीतरी नविन करण्याची उम्मीद निर्मान झाली. काहीतरी जोडधंदा करावा अस त्यांना मनोमन वाटत होते. त्यासाठी त्या धडपड करत होत्या .  परतु त्या निरक्षर असल्याने त्याना अनेक अडचनीचा सामना करावा लागत होतो.  एकदा त्याच्या मैत्रीनीजवळ  त्यानी आवळा कँन्डी बघीतली व घेतली ती चविस्ठ  लागली   त्यामुळे त्यानी ती आळला कँन्डी बनवली त्या व्यक्तीची भेट घेतली . योगायोगाने ती व्यक्ती ही ओळखीची निघाल्याने सिताबाई ला मनोमन आनंद झाला .  व त्याच्याकडून आवळा कँन्डी बनवण्याची प्पकीया जाणुन घेतली . परतु पहीलीच वेळे असल्याने सिताबाई कडून प्रमान चुकले  परंतु त्यामुळे त्या  नाराज झाल्या होता.  परंतु काही तर करायच्या उम्मेदीमुळे परत त्यांनी त्या व्यक्तीची भेट घेतली . नतंर त्या व्यक्तीने तूम्ही रितसर प्रशिक्षन घेण्यास सांगीतले. त्यामुळे मोहिते दापत्यांनी खरपूडी येथील विज्ञान केद्रात प्रशिक्षन घेतले . व त्या नतंर परभणी येथील कृषी विद्यापीठात ही प्रशिक्षन पुर्ऩ केले . विशेष म्हणजे रामभाऊ मोहिते हे शिक्षीत असल्याने ते सर्व सिताबाई ला समजावुन सांगत होते. परंतु निरक्षर असलेल्या सिताबाई यांच्याकडून अनेक वेळा चूका झाल्या . परंतु सिताबाई ने कधीही हार मानली नाही . नंतर च्या काळात आळला कँन्डी विक्री होऊ  लागल्याने  त्यातुन त्यानी दोनशे (२००) रुपए जमा केले त्यातून त्यांनी थोड्या प्रमानात साहीत्य घेऊन त्यानी भोलेश्वर फळ व भाजीपाला उद्योग सुरू केला . व सन १९९७ मध्ये स्वत: शेद्रीय खताचा वापर करून  रोपे तयार केले.व त्याची विक्री करू लागले . दोन तीन वर्षा नंतर त्यांचा आवळा कँन्डीचा व्यवसाय सुरळीत चालु लागला .   व त्याना चांगले उत्पन्व मिळु लागले . विशेष म्हणजे त्यांना आवळा कँन्डी ची विक्री ही शेजार्यापासुन सुरू केले ते थेट थायलंड पर्यत गेल्या . त्यानंतर त्यानी अनेक कृषी प्रदर्शनात  सहभाग घेतला . प्रदर्शनामुळे आवळा कँन्डीला प्रसिद्धी मिळु लागली . व आवळा कँन्डीची मागणी ही वाढू लागली त्यामुळे त्यांना आर्थिक उत्पन्न मिळू लागले . व आज ही त्याचा व्यवसाय जोमाने सुरू आहे. व महाराष्ट्र शासनाने त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानीत केले आहे.
२०० रुपऐपासून सूरूवात.
सिताबाई मोहिते यांनी अगदी  कमी  भांडवलावर स्वत:चा व्यवसाय सुरू केला होता. त्यांनी सुरूवातीला फक्त २०० रुपऐ चा आवळा खरेदी केला होता. सन २००३ मध्ये शेतकरी मेळाव्यात त्यांनी आवळा कँन्डी व सरबत चा स्टॉल लावला  होता . व पाच दिवस सुरू असलेल्या  मेळाव्यात त्यांनी १२०० चे विक्री केली . व आवळ्याने २००रुपऐ वजा करता  त्यांना निव्वळ नफा १०००रुपऐ राहीला होता . व त्या नफ्यातून त्यानी आवळा  उद्योक मोठ्सा जोमाने सुरू केला व त्यानतंर त्याच्या या उद्योगाला भरभराटी आली .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...