शनिवार, ७ मार्च, २०२०

       सावगी तलान शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न.
सिंधीकाळेगाव (प्रतिनिधी) केंद्रिय प्राथमिक शाळा सावंगी तलान केंद्र-सावंगी (त) ता. जालना दिनांक 05/03/2020 गुरुवार रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी
 कार्यक्रमाचे अध्यक्ष राजू डोंगरे हे होते.उदघाटक कमलाकर कळकुंबे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक जालना,प्रभाकर रंधवे सरपंच,डॉ.श्याम कळकुंबे उपसरपंच,रामजी खराडे,काशीनाथ राठोड ग्राम पंचायत सदस्य,प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्रकुमार हंसराजजी ओस्तवाल माजी सहसचिव श्री वर्धमान स्थानक वाशी जैन श्रावक संघ जालना,संदिप सखारामपंत बदनापूरकर प्रसिद्ध पत्रकार तसेच जिल्हा प्रतिनिधी दैनिक भास्कर जालना,भागवत जेटेवाड केंद्रप्रमुख, अशोक गायकवाड माजी केंद्रीय मुख्याध्यापक,माधव विभूते सहशिक्षक,संभाजी उस्तुर्गे केंद्रिय मुख्याध्यापक, परमेश्वर चिंचोले ग्रामसेवक,अजिमखान अत्तार,कैलास मुळे,विष्णू मोरे,बाळू हरकळ,जोती अहेरकर,सीमा खराडे,अस्मिता राठोड,सुनिता रंधवे,गजानन कळकुंबे,डिगंबर कळकुंबे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,भीमशक्ती युवा मित्रमंडळ चे सर्व सदस्य तसेच गावातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत,लावणी,गोंधळ कोळीनृत्य,भांगडा,धार्मिक गीते यांवर बहारदार नृत्य सादरीकरण केले त्याच बरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचा परिचय देणारा पोवाडा व बेटी बचाव बाबत संदेश देण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आत्माराम बोलसुरे,आश्विनी पाटिल यांनी केले.तर सूत्रसंचालन सत्यव्रत लोखंडे,प्रशांत भुरे यांनी केले. तसेच उपस्थितांचे आभार नारायण माहोरे मुख्याध्यापक पाथ्रूड तांडा यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किशन ईरमले,अशोक गुहाडे,सतीश श्रीखंडे,रजनीकांत खिल्लारे,नारायण माहोरे,रामदास लिहिणार,गंगाधर होनवडजकर,रमेश रुद्रे,के.के.तळेकर,लक्ष्मण राठोड,विपिन भगत व गावातील सर्व तरुण यांनी अथक परिश्रम घेतले.
सदर कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट रित्या विद्यार्थ्यांनी सादर केल्याबद्दल सर्व गावकऱ्यानी सर्व शिक्षकांचे कौतुक केले.यावेळी गावात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण तयार झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...