शनिवार, ७ मार्च, २०२०

रोबोटिक तंत्रज्ञान रुग्णांसाठी वरदान - आरोग्यमंत्री राजेश टोपे
रोबोटिक शस्त्रक्रिया लाऊज व ऑपरेशन थिएटर चे उद्घाटन
जालना /प्रतिनिधी. :- रोबोटीक तंत्रज्ञानामुळे अत्यव्यस्थ रूग्णांवर सहज उपचार करणे शक्य होणार आहे. नाशिकमध्ये एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरमध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिल्याने नाशिकचे पर्यायाने
महाराष्ट्राचे नाव जागतिक स्तरावर पोहोचेल व रोबोटिक तंत्रज्ञान रूग्णांसाठी वरदान ठरेल, असे गौरवोद्गगार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरमध्ये आयोजित केलेल्या पहिल्या रोबोटिक शस्त्रक्रिया लाउंज आणि रोबाटिक ऑपरेशन थिएटरच्या उदघाटन सोहळ्या प्रसंगी केले.
      यावेळी एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरमध्येआयोजित केलेल्या पहिल्या रोबोटिक शस्त्रक्रिया लाउंज आणि रोबाटिक ऑपरेशन थिएटरच्या उदघाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आरोग्यमंत्री राजेश टोपे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून केंब्रिजचे मार्क स्लॅक, ऑस्ट्रेलियाचे मार्कस कॅरी, पद्मश्री डॉ. रमाकांत देशपांडे, सीएमआर सर्जिकलचे सीईओ वेगार्ड नेर्सेट, एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरचे एमटी आणि मुख्य सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. राज नगरकर उपस्थित होते. यावेळी रोबाटिक ऑपरेशन थिएटरचे उदघाटन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते झाली. पुढे बोलतांना आरोग्य मंत्री टोपे म्हणाले की, ‘कॅडेव्हर प्रशिक्षण व संशोधन केंद्र असणे, ही काळाची गरज आहे. भारतातील पहिली रोबोटिक कॅडेव्हर लॅब एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरमध्ये उभारल्याने, त्याचा लाभ सर्वसामान्य रूग्णांना व्हावा यादृष्टीने राज्य सरकार पुढाकार घेणार आहे. या लॅबच्या परवानगी संबंधांची नियमावली भारत देशासाठी असेल. त्यात राज्य सरकार पुढाकार घेईल. त्याचबरोबर लॅबच्या सुविधा सर्वसामान्यांना मिळाव्यात याकरिता पीपीपी तत्वावर राज्य सरकारकडून प्रयत्न केले जातील तसेच राज्यात रोबोटीक शस्त्रक्रिया पीपीपी तत्वावर सुरु केल्यास चार विभागांना त्याचा फायदा होईल असे ही टोपे यांनी स्पष्ट केले.यावेळी डॉ. राज नगरकर म्हणाले की, एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर हे नेहमीच नावीन्याचा शोध घेत प्रगत तंत्रज्ञान रूग्णांच्या सेवेत घेऊन आलो आहोत. त्यामुळे नाशिकचे नाव जगाच्या नकाशावर नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या तांत्रिक बदलामुळे आता रोबोटिक शस्त्रक्रियेचा सगळीकडे वापर केला जात आहे. नाशिकमध्ये देखील पहिल्या रोबोटिक शस्त्रक्रिया लाउंज आणि रोबोटिक ऑपरेशन थिएटरचा प्रारंभ झाल्याने रूग्णांना याचा दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.याकार्यक्रमास नागरिकांची मोठया संख्येने उपस्थित होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...