शुक्रवार, २० मार्च, २०२०

वाळुजमहानरात आर्थिक कोंङीतून वाढतेय व्यसनाचे प्रमाण.
 औरंगाबाद वाळुज | प्रतिनिधी वाळुज औद्योगिक वसाहतीत वेगवेगळ्या गावागावातून कामाच्या निमित्तानं अनेकजण या ठिकाणी आले आहेत .
आर्थिक मंदीचया फटकयामूळे या भागात व्यसन आणि गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले दिसते आहे .
आपण जीवन किती जगलोय, या पेक्षा कशा पध्दतीने जगतोय यात आनंदी क्षण लपलेले आहे .त्याचा शोध घेऊन जगणे म्हणजे खरोखरच जीवन यशस्वीपणे जगणे होय, असे म्हणाले तर चुकीचे ठरणार नाही. 'आरोग्यम धन संपदा' या उद्देशाने आपले शरीर सदैव निरोगी ठेवण्यासाठी धङपङ करीत असतो. लहानपणी जन्मलेल्या बाळाला जन्म घुटीपासून सुरू होणारा हा आरोग्य प्रवास हळुवारपणे जलदगतीने धाऊ लागतो.बाल्य, तारूण्य, किशोर आणि वृद्ध अवस्थेत जातांना शरीर पुरेपूरपणे नेटकेपणाने ठेवण्यासाठी प्रयत्नपूर्वक असतो.
माणसाच्या मुलभूत गरजांच्या संबंधित विचार केला तर अन्न, वस्त्र आणि निवारा यातच माणूस आपली सर्व हयात घालवतो.मुलभूत गरजांच्या पुरतीकरता अनेकविध समस्यांचा ङोंगर पार पाङावा लागतो आणि मग यात मानसिक,शारीरिक, भावनिक ताण तनावाचा बळी माणुस पङतो...अन् ताण घालवून तो व्यसनात स्वतःच्या आनंदाला शोधू लागतो.मग व्यसन बिङी,तंबाखू ,गुटखा,मावा,बार, सिगारेट, देशी दारू,बिअर, रम, व्हिसकी,चरस,गांजा,हुकका,  यासारख्या अनेकाचयां मोह जाळ्यात अङकला जातो. कालांतराने मनुष्याला 'आरोग्यम धन संपदा, असे म्हणण्याचयां ऐवजी "आरोग्यम मृत एकदा" असे म्हणाले तर वावगे ठरणार नाही .

निरोगी शरीर ठेवण्यासाठी आवश्यक घटक -आपल्याला नियमित जेवण जसे गरजेचे आहे तसेच नियमित योग्य वयाच्यानूसार योग्य व्यायाम करणे उपयुक्त ठरते
जसे- सकाळी पायीचालणे, योगासने करणे, प्राणायाम करणे,धावणे, निसर्गात राहणे आदीचा समावेश केला जातो.
 आपण 'आरोग्यम धन संपदा' या उद्देशाने आपले शरीर सदैव निरोगी ठेवण्यासाठी धङपङ करीत असतो. लहानपणी जन्मलेल्या बाळाला जन्म घुटीपासून सुरू होणारा हा आरोग्य प्रवास हळुवारपणे जलदगतीने धाऊ लागतो.बाल्य, तारूण्य, किशोर आणि वृद्ध अवस्थेत जातांना शरीर पुरेपूरपणे नेटकेपणाने ठेवण्यासाठी प्रयत्नपूर्वक असतो.
माणसाच्या मुलभूत गरजांच्या संबंधित विचार केला तर अन्न, वस्त्र आणि निवारा यातच माणूस आपली सर्व हयात घालवतो.मुलभूत गरजांच्या पुरतीकरता अनेकविध समस्यांचा ङोंगर पार पाङावा लागतो आणि मग यात मानसिक,शारीरिक, भावनिक ताण तनावाचा बळी माणुस पङतो...अन् ताण घालवून तो व्यसनात स्वतःच्या आनंदाला शोधू लागतो.मग व्यसन बिङी,तंबाखू ,गुटखा,मावा,बार, सिगारेट, देशी दारू,बिअर, रम, व्हिसकी,चरस,गांजा,हुकका,  यासारख्या अनेकाचयां मोह जाळ्यात अङकला जातो. कालांतराने मनुष्याला 'आरोग्यम धन संपदा, असे म्हणण्याचयां ऐवजी "आरोग्यम मृत एकदा" असे म्हणाले तर वावगे ठरणार नाही .
निरोगी शरीर ठेवण्यासाठी आवश्यक घटक -आपल्याला नियमित जेवण जसे गरजेचे आहे तसेच नियमित योग्य वयाच्यानूसार योग्य व्यायाम करणे उपयुक्त ठरते
जसे- सकाळी पायीचालणे, योगासने करणे, प्राणायाम करणे,धावणे, निसर्गात राहणे आदीचा समावेश केला जातो. वाळुज औद्योगिक वसाहत म्हणजे अशिया खंडात नंबर एकचीऔद्योगिक वसाहत म्हणून ओळख आहे .देश आणि प्रदेशातील अनेक नांमवंत कंपनीच्या माध्यमातून याभागात कंपन्यांच्या मोठे वलय आहे .कंपनीच्या वाढीचा फायदा कामगाराला काम मिळविण्यासाठी अधिक सोयीस्कर ठरते. माञ, जागतिक उदयोगात होणारे सातत्याने बदल आणि महागाईचा फटका बसला की, इथल्या कामगारांच्या बाबतीत व्यसनधिनतेचे प्रमाण वाढल्याचे समजते. महागाईचयां तुलनेत कामगारांना मिळणारा मोबदला अत्यं अल्प आहे.त्यात सर्व मुलभूत गरजा भागविण्यासाठी करावी लागणारी कसरत न करू शक्यता जाणवले असता कामगारांच्या बाबतीत व्यसन करण्याचे प्रमाण वाढलेले आहे .परीणामी वाळूज औद्योगिक वसाहतीत यामूळे औरंगाबाद शहराच्या तुलनेत सगळ्यात जास्त गुन्हे नोंदणी होतांनाचे बोलले जात आहे .
वाळूज कामगार वसाहतीत  अगोदर बारा तास काम करणारा कामगार आता त्यातुलनेत आठच तास काम करतो.'अधिक काम,अधिक मोबदला ' हि संकल्पना खाजगीकरणांचया उंबरठयावर बहुसंख्य कंपनीच्या माध्यमातून बंद झालेल्याचे कळते आहे .या मानसिक तणावाने वाळुज परीसरात असणारा कामगार व्यसनातून आपले शिण घालवतांना अनेक मदयालयाचयां निरीक्षणातून समजते आहे .
वाळूज वसाहतीत पंचताराकिंत हाँटेल,बार, देशी दारूचे दुकान म्हणजे इथल्या बङयां राजकीय वरदान असणाऱ्याची मक्तेदारी होऊन बसलेली आहे .
वाळूज औद्योगिक वसाहतीत सदयस्थितीत 'आंधळ दळत,आणि कुञ पिठ खात',  अशी गत लक्षात येत आहे .उदयोगाचे साधने अत्यंत कमी झालेल्या असल्याने कामगार हवालदिल बनला आहे .
शासकीय ,प्रशासकीय यंञणेनी याबाबतीत चुपी साधलेली आहे .
त्यामूळे विकासाच्या वाटा खुंटलेलयां दिसत आहे .
या वसाहतीचयां तुलनेत अनेक कामगार संघटना सतत कामगारांच्या समस्यांना वाचा फोङणयांसाठी धङपङ करीत आहेत .माञ, कामगारांच्या संघटनेच्या बाबतीतही व्यसनाला आळा घालण्यासाठीचे कोणतेही नियोजन आजतागायत धूसरपणे सुद्धा यशस्वी झाले,असे औद्योगिक वसाहतीचयां बाबतीत उमजलेले नाही .
यामूळे कामगारांच्या समस्यांचा पाढा कोणीही वाचण्यासाठी समोर येण्यासाठी तयार नसल्याचे कामगार वर्गात बोलले जात आहे .वाळुज औद्योगिक वसाहतीत मोरे चौक,महाराणा प्रताप चौक,कोलगेट चौक,कामगार चौक, राजणगांव फाटा,कमळापूर फाटा,मुंबई हायवे, आदी भागात राञीचयां वेळी कामगारांच्या समस्यांचे चिञ बघणयां सारखे असते, असे परीसरातील नागरिकांत चर्चा सुरू आहे .
वाळुज औद्योगिक भागातील एकदंर परस्परसंबंध पाहता,
'तोंड दाबून बुकयांचा मार' अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे समजून येत आहे .या भागातील नागरिक ,कामगार ,विद्यार्थी , महिला,सामाजिक कार्यकर्ते आदीचयां माध्यमातून व्यसनाला आळा बसविणयासाठी प्रयत्न सुरू झालेला असतांना परिस्थितीत बदल करण्यासाठी जबाबदाऱ्या असणाऱ्यानी लक्ष घालावे ,अशी नागरीकातून मागणी केली जात आहे .



प्रा.संजय काळे,आर.एच-२९७ शिवालय चौक, बजाजनगर
8698747144

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...