शुक्रवार, २० मार्च, २०२०


सदर बाजार पोलीसांची धडाकेबाज कारवाई पकडली देशी-विदेशी दारु चा अवैध साठा जप्त
जालना प्रतिनिधी :- सदर बाजार पोलीसांची 
धडाकेबाज कारवाई केली आहे. व कार्यवाहीत देशी-विदेशी दारु चा अवैध साठा जप्त करण्यात आला आहे.स्वत:च्या राहत्या घरातून गैर मार्गाने अवैध मद्य विक्री करणाऱ्या एका पुरुषासह दोन महिलांना ताब्यात घेत त्यांच्याकडून तब्बल 48 हजारांचा मुद्देमाल सदर बाजार पोलीसांनी जप्त केला आहे. शहरातील संग्राम नगर व लोहार मोहल्ला या ठिकाणी बुधवारी (ता.18) पोलीसांनी ही कारवाई केली. याबाबत सविस्तर माहती अशी की, जालना शहरातील संग्रामनगर परिसरातील सोनु बाबुलाल ढोलके (वय 27) व लोहार मोहल्ला परिसररातील दोन महिला हे त्यांच्या राहत्या घरातून अवैध मद्य विक्रीचा व्यवसाय करित असल्याची गोपनिय माहिती सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांना एका खबऱ्याद्वारे मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक गणेश झलवार यांचे एक पथक लोहार मोहल्ला व संग्रामनगर परिसरात पाठविण्यात आले होते.संबंधीत आरोपींच्या घरावर पोलीसांनी छापा मारला असता तिन्ही ठिकाणी दारुचा अवैध साठा आढळून आला. यामध्ये विविध कंपन्यांच्या विदेशी दारुचे 4 खोके, तर देशी मद्याचे 8 खोके पोलीसांनी या तीघांच्या घरातून जप्त केले आहेत. जप्त केलेल्या मद्याची किंमत ही चालु बाजारभावानूसार 48 हजार असून संबंधीत आरोपीविरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात दारुबंदी कायद्यानूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस अधिक्षक एस. चैतन्य, अतिरीक्त पोलीस अधिक्षक समाधान पवार, उप विभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय देशमुख, पोलीस उपनिरीक्षक गणेश झलवार, कर्मचारी अशोक जाधव, दिपक घुगे, समाधान तेलंग्रे, सोपान क्षिरसागर, बंटी ओहोळ, रमेश फुसे, महिला कर्मचारी सिंधु खर्जुले आदींनी ही कारवाई केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...