मंगळवार, २१ एप्रिल, २०२०


जिल्हा परिषद कन्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे तांदूळ वाटप
धर्माबाद (भगवान कांबळे ):- कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्यभरातील सर्व माध्यमांच्या शाळा (ता. १५) मार्चपासून बंद करण्यात आल्या आहेत. 
मागील पंचवीस  दिवसांपासून शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थी सुरक्षितपणे आपापल्या घरी वावरत आहेत.शाळेतील अनेक विद्यार्थ्यांचे पालक मोलमजुरी करून गुजराण करतात. मागील पंचवीस दिवसांपासून सर्व व्यवसायिक शेतीची कामे बंद असल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ येत आहे. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेतून मध्यान्ह भोजन दिल्या जात असे. त्यामुळे मुलांच्या दुपारच्या भोजनाची व्यवस्था शाळेमध्येच होत असल्याने पालकांनाही आधार मिळत असतो. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या 23 मार्चपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे शालेय पोषण आहारात खंड पडला आहे. शहरी भागातील विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना शाळा स्तरावर शिल्लक असलेला तांदूळ वितरित करण्याचे शिक्षण संचालक यांनी 15 एप्रिल रोजी एक पत्र काढून आदेशीत केले होते. त्यानुसार धर्माबादच्या जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेत शालेय पोषण आहार योजने अंतर्गत शाळा स्तरावर शिल्लक असलेला तांदूळ विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना वितरित करण्यात आले. सर्व विद्यार्थी व पालकांना सुरुवातीस सामाजिक योग्य अंतर ठेवण्याचे व तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधूनच उपस्थित राहण्याची सूचना देण्यात आली होती. त्याचे सर्वांनी तंतोतंत पालन केले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष लक्ष्मण पांचाळ, पत्रकार तथा समितीचे शिक्षणतज्ञ भगवान कांबळे, नगर सेवक शाळेचे स्वीकृत सदस्य रमेश पाटील बाळापूरकर, सदस्य गंगाप्रसाद रापतवार, सय्यद अहमद अब्दुल, महेंद्र तामटे, सौ. लक्ष्मीबाई आंबेवार, सौ. अजमेर सय्यद कलीम, निर्वाण वाघमारे यांच्यासह मुख्याध्यापक एम. एन. कागेरू, नासा येवतीकर, माधव हिमगिरे, ए. एस. सय्यद या शिक्षकांची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...