बुधवार, २९ एप्रिल, २०२०


          भोकर नगरपरिषदेकडून पत्रकारांचा सत्कार

नांदेड (भगवान कांबळे ) :- मागील सतत एक महिन्यापासून कोरोना सारख्या महामारी मध्ये कसलीही सुविधा नसताना ग्राउंड लेव्हल वर जाऊन वार्तांकन करणाऱ्या भोकर येथील सर्व पत्रकारांचा नगर परिषदेकडून प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

पत्रकार हा समाजाचा आरसा असतो समाजामध्ये घडणाऱ्या चांगल्या व वाईट घटनांच्या बातम्या तो प्रकर्षाने जगापुढे मांडण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे त्यास अनेक संकटांना सामोरे जावे लागते, मागील एका महिन्यापासून संपूर्ण भारतामध्ये कोरोना कोवीड -19 हा आजार सर्वत्र पसरला आहे, त्यामुळे सर्व नागरिकांना सक्तीने घरी बसविण्यात आले असून, लॉक डाऊन करण्यात आले आहे, या आजाराविषयी माहिती, तसेच आपला जिल्हा, आपला तालुका यातील इत्यंभूत माहिती घरी बसलेल्या नागरिकांना पोहोचविण्याची मोठी जबाबदारी तेथील पत्रकार पारपाडत आहेत, तसेच या पत्रकारांकडे कसल्याही प्रकारची पी पी ई किट उपलब्ध नाही, त्यांच्याकडे कसल्याही प्रकारची सुविधा नाही, अशा परिस्थितीत येथील पत्रकार काम करत असल्याने त्यांची दखल घेऊन भोकर नगर परिषदेच्या वतीने मुख्याधिकारी प्रियंका टोंगे आणि माजी नगराध्यक्ष विनोद पाटील चिंचाळकर यांच्या हस्ते आज दिनांक 29 एप्रिल रोजी भोकर येथील नगर परिषदेमध्ये भोकर येथील पस्तीस पत्रकारांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले असल्याने सर्वत्र भोकर नगरपरिषदेचे कौतुक होत आहे. यावेळी ज्येष्ठ पत्रकार  एल ए हिरे , बी आर पांचाळ, बाबुराव पाटील संपादक रमेश गंगासागरे, मनोज गिमेकर, मनोज चव्हाण, राजेेश वाघमारे, जय भीम पाटील, शंकर कदम व इतर पत्रकार यांच्यासह नगर परिषदेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...